सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिशय उमदा, आणि गुणी कलाकार. त्याचं असं अकाली जाणं धक्कादायक, आणि अंतर्मुख करणारं. बच्चनसाहेबांच्या शब्दात सांगायचं तर - "...टु एंड ए मोस्ट गेन्फुल लाइफ, इज सिंपली नॉट पर्मिटेड".

भावपूर्ण श्रद्धांजली.

त्याचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्याच घरातला, घरा बद्दल, त्याच्या पुस्तकांबद्दल बोलताना, त्याची केवढी तरी पॉवरफुल दुर्बिण ज्याला तो टाइम मशीन म्हणत होता, त्याचा कुत्रा हे सगळं बघून सगळं छान चालल्या सारखं वाटलं. अर्थात हा व्हिडिओ कधीचा आहे त्याची कल्पना नाही. पण फार पूर्वीचा नसावा. एवढा हसतमुख माणूस, पुस्तकांची मैत्री असणारा, तारे बघण्याचा छंद असणारा , कुत्र्यावरपण मनापासून प्रेम असणारा, म्हणजे विचार येत होता कि हि पुरेशी स्ट्रेस बस्टर नाहीत का? खुप शॉकिंग आहे त्याचं आत्महत्या करणं, आणि म्हणून जरा सस्पिशियस वाटतय .
भावपूर्ण श्रद्धांजली

एवढा हसतमुख माणूस, पुस्तकांची मैत्री असणारा, तारे बघण्याचा छंद असणारा , कुत्र्यावरपण मनापासून प्रेम असणारा,.....खुप शॉकिंग आहे त्याचं आत्महत्या करणं, आणि म्हणून जरा सस्पिशियस वाटतय .>>>>>>
धनुडी सहमत. या सर्वाबरोबरच त्याला अध्यात्माची आणि समाजकार्याची सुद्धा आवड होती. अश्या व्यक्तिमत्वाचा माणूस या टोकाला जाईल यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. मागे काही दिवसांपूर्वी त्याच्या एक्स मॅनेजरचा झालेला मृत्यू, सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतच्या मामाने केलेली पोलीस चौकशीची मागणी यावरून वाटतंय काहीतरी वेगळं प्रकरण असावं.

कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांप्रमाणेच नैराश्य किंवा इतर मानसिक आजार कोणत्याही आर्थिक आणि सामाजिक स्तरातील लोकांना होऊ शकतात.

श्रद्धांजली

आता असं कळलंय की त्याच्या ३ बेस्ट फ्रेंड्सनी पण गेल्या १ महिन्यात आत्महत्या केल्या आहेत. सगळंच गुढ आहे.

3 बेस्ट फ्रेंड्स??? कुठे लिंक आहे का?

मला मानव अर्चना जोडी खूप आवडायची. आता युट्युबवर त्याचे आणि अंकिताचे व्हिडियो बघून रडायलाच येतंय. किती हॅप्पी होते दोघे.

काल युट्युबवर बघितल्याचे आठवते. पण ते त्याचे शेवटचे फोटोस समोर येतात आणि काही बघावंसं वाटत नाही.

एवढा हुशार मुलगा पण काय नक्की झाले काहीच कळत नाही.
जर असे मानले की, बुलिंग आणि ग्रूपिझ्मचा हा बळी होत होता तरी, बोलला नसेल का अतिशय जवळच्या विश्वासु माणसांशी?
इतके महत्व अश्या नीच लोकांना कशाला द्या?
गेलेल्या माणसांविषयी काहीच तर्क लावु नये हेच खरे.

त्याच्या आत्म्यास शांती लाभो!!

You tube वर त्याचे काही जुने videos पाहिले, कपिल शर्मा च्या आणि बाकीचे ही. किती आकर्षक व्यक्तिमत्व, हुशार, हजरजबाबी, मेहनती. का वाटलं असेल त्याला जीव द्यावासा? असं काय झालं की त्याला वाटलं की यातून बाहेर पडता येणारच नाही. दिवस बदलणारच नाही? चांगल्या मानसोपचाराचा सल्ला वेळेवर मिळायला हवा होता, घरच्यांची साथ आणि सोबत मिळायला हवी होती, उमदा मुलगा आणि कलाकार हकनाक गेला, खूप वाईट वाटतंय....

असा वाचलं कि महेश भट आणि मुकेश भट याना त्याच्या डिप्रेशन च्या आजाराची कल्पना होती.. तरी त्यांनी पुढे मदत केली नाही.. उलट त्याच्या करंट गर्लफ्रेंड रिया ला पण त्याच्या पासून वेगळे राहायला सांगितले..
त्याची मोठी बहीण पण त्याच्या सोबत मुंबई ला राहायला आली होती. पण तरीही काही उपयोग झाला नाही.. त्याने औषधं घेणं बंद केलं होतं .. त्याची गर्लफ्रेंड या डिप्रेशन च्या अवस्थेत त्याला सोडून कशी जाऊ शकते..
मला तर खूप अपसेट वाटत आहे हि न्यूज ऐकल्या पासून..

हो असेलही
आणि दोन्ही केस मर्डर आत्महत्या आत्महत्येला परावृत्त करणे काही असू शकते.
ज्या लोकांमुळे हि वेळ आली त्यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन देखील आहेत.
धंदा है पर गंधा है झालीय हि ईंडस्ट्री
सलमान खानचे तर सरळ सरळ नाव घेताहेत बरेच जण अश्या कृत्यांसाठी.
या प्रकरणाबाबत माहीत नाही पण या आधी त्याने असे करीअर संपवायचे पराक्रम केलेत. विवेक ओबेरॉय सर्वात मोठे उदाहरण. काल त्यानेही आपले मन मोकळे केले. कारण त्याने अनुभवलाय हा त्रास.. कंगना बोलते तिला वेडी ठरवायच्या मागे लागलेत. तिला आदित्य पांचोलीनेही त्रास दिलाय. त्याचेही अंडरवर्ल्ड संबंध सांगितले जातात. सूरज पांचोली त्याचा मुलगा का? काल ऐकले की निशब्दची हिरोईन जिया खान मृत्युप्रकरणी त्यावर केस आहे. दबंग दिग्दर्शक अनुभव कश्यप ना. तो तर सुशांतच्या आत्महत्येच्या चार दिवस आधीपासून सलमान खानच्या अख्या कुटुंबावर तुटून पडलाय. शेखर कपूरसारखा दिग्दर्शक त्याबद्दल लिहितोय. फेब्रुवारीत बहुधा कमाल खानचे एक ट्विट होते ज्यात त्याने लिहिलेले की चोप्रा जोहर नाडियादवाला आणि सलमान खान प्रोडक्शन वगैरे चित्रपट बनवणारया कंपन्यांनी सुशांतवर बहिष्कार टाकलेला आणि त्याच्या हातून ७ चित्रपट काढून घेतले होते. त्याच्या स्वत:च्या गेले काही दिवसाच्या ट्विटस.. सरळ सरळ हि आत्महत्येची वेळ त्याच्यावर का आली हे दर्शवतेय. काल बिहारमध्ये सलमानचे पुतळे जाळत निदर्शने सुरू होते. पण कदाचित काही काळापुरता. हा धुरळा उठून पुन्हा खाली बसेन. पुन्हा भाईंचे चित्रपट ५०० करोड कमावत असतील. कमावू द्या. काही हरकत नाही. पण असे कित्येक सुशांत आपण तेव्हाही गमावतच असू..

बापरे भयानक आहे हे सगळं.... वाईट झालं खूप, आणि या बड्या धेंडांचं काही नुकसान होणार नाही, त्यांना काही शिक्षा होणार नाही, त्यांचे चित्रपट येणार आणि करोडोंचा धंदा करणार पण हा मुलगा बिचारा जीवानिशी गेला....परत कधीही न दिसण्यासाठी.

अगदी खरं आहे वरील प्रतिसादांमधे लिहिले आहे ते. वादळे येतात तेवढ्या पुरता धुरळा उठवतात आणी पुन्हा शांतता. कितिही नावे उघड्पणे समोर आली तरी पुढे काय होईल याची सर्वानाच कल्पना आहे. सुशांत केवळ निमित्त आहे. पण अनेक अशे लोकं असतिल जी या धुरळ्यात सापडली असतिल आणि आपलं सर्व गमावून बसली असतिल. आजच युट्युबला शाहरुख आणी इरफान खानचा एक व्हिडिओ बघितला. हा त्या शो चाच एक भाग होता. पण त्यात इरफान खान अगदी खरं बोलत होता. ठाण मांडून बसलेले लोकं यांचे चित्रपट आणि ईरफान, सुशांत, आयुषमान यांचे चित्रपट या वरून दोघांत चाललेले संभाषण आजच्या घटनेला धरून आहे असे वाटले.

पण हा मुलगा बिचारा जीवानिशी गेला....परत कधीही न दिसण्यासाठी >>>>>>>
खरेच खूप हळहळ वाटली .
आता पर्यंतच्या त्याच्या करीयर मध्ये एकदा ही त्याची वर्तणूक अहंकारी वाटली नव्हती .
कुठल्या तरी प्रमोशन च्या वेळी बाकी सगळे कलाकार भिकाऱ्यांना इग्नोर करत असताना याने त्यांच्या बरोबर सेल्फी काढल्याचा व्हिडिओ नेट वर प्रसारित झाला आहे .
सलमान ने स्टेज वर अपमान केल्या नंतर अर्जित् सिंग ने व्यवस्थित प्रत्युत्तर दिले होते पण
सुशांत सिंग मात्र शाहरुख च्या शाब्दिक हल्ल्या मुळे झालेला अपमान स्टेज वर केविलवाणा चेहरा करून गिळून टाकत होता .
सुशांत सिंह वर जाणूनबुजून शाब्दिक हल्ले करून हेटाळणी करून त्याचे जीवन संपविण्यात शाहरुख , तृतीयपंथी जोहर , सलमान , आलिया भट्ट यांचा हात आहे हे नक्कीच .
आणि कायदा या केस मध्ये यांचे काहीही बिघडवू शकत नाही हे ही तितकेच खरे .
त्यामानाने दक्षिणेत कोणीही स्व कर्तुत्व बळावर स्टार होवून दर्शकांच्या मनावर राज्य करू शकतो आणि तेथे खान मंडळी सारखी कंपू बाजी कथा ऐकवित नाही .

सुशांत सिंग मात्र शाहरुख च्या शाब्दिक हल्ल्या मुळे झालेला अपमान स्टेज वर केविलवाणा चेहरा करून गिळून टाकत होता
>>> ते स्क्रिप्टेड असते हो सगळे... पूर्ण क्लिप बघितली तर कळते ते...

आज व्यवसाय म्हणून ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यात ही फिल्म इंडस्ट्रीच सर्वात जास्त बदनाम आहे. वरून सर्व चंदेरी आणि हवंहवंसं वाटणारं वैभव देत असली तरी आतून तेवढीच पोखरलेली आणि भीबत्स रूप दाखवणारी आहे. जवळपास सर्वच वाईट आणि अनैतिक गोष्टी या इंडस्ट्रीत अगदी कॉमन आहेत. त्यात अंडरवर्ल्डशी संबंध, अवैध हत्यारे बाळगणे, खून, दारू पिऊन गोंधळ घालणे, लोकांना चिरडणे, अवैध शिकार, ड्रग्स आणि नशेखोरी, अनैतिक संबंध, पार्ट्या आणि त्यातले किळसवाणे प्रकार, कास्टिंग काऊच, मी टू प्रकरण इत्यादी. आणखीसुद्धा बरेच काही असेल जे अजून बाहेर आलेले नाही. त्यात काही चांगली माणसेही असतील पण मग हे सर्व प्रकार पाहून ती अश्या वातावरणात फार टिकत नाहीत. जे आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात त्यांना जणू वाळीत टाकले जाते आणि त्यांचे करिअर संपवले जाते.
काही अंशी याला जबाबदार पण आपणच आहोत कारण शेवटी आपल्याच पैशांवर ही इंडस्ट्री उभी आहे. आपणच यांना डोक्यावर चढून ठेवलेले आहे म्हणून यांच्या डोक्यात हवा जाते. त्यामुळेच काळवीटाची शिकार करणाऱ्या आणि रस्त्यावर झोपलेल्या गरीब नागरिकांना चिरडूनपण हे लोक कारावासातून सुटतात आणि हे माहीत असुनही आपण यांचे चित्रपट पाहतो आणि करोडोंची कमाई करून देतो. अगदी देशद्रोहीपणा करूनही तुरुंगातून सुटून येऊन यांना चित्रपट मिळतात कारण आपण ते पाहतो. काहींचे तर ते आदर्श असतात.
संस्कृतीचा आरसा असावयास असणाऱ्या ह्या इंडस्ट्रीत जास्त लोक संस्कृतिभक्षकच भरले आहेत असे वाटते. ज्या दिवशी आपण अश्या लोकांना डोक्यावर घेणे बंद करू तेंव्हाच हे लोक जमिनीवर येतील आणि सुशांतसारख्या नवख्या आणि इंडस्ट्री स्वच्छ होउन चांगल्या लोकांचा बळी जाणार नाही.
युट्युब वर याबाबत एक आचार्य प्रशांत यांचा विडिओ पाहण्यात आला. अतिशय कळीचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. त्यांचे इतर विषयावर पण छान विवेचन असते. सध्याच्या घटनेमुळे मला हा विडिओ जास्त आवडला (पाहताना स्पीड 1.25X किंवा त्यापुढे ठेवा कारण हा माणूस थोडा स्लो बोलतो)
https://www.youtube.com/watch?v=6HRg6Ghpfag

सुशांतची बातमी पहिल्यांदा व्हाट्सअप्पवर पाहिली तेव्हा विश्वास बसणे अशक्य झाले. पण दुर्दैवाने बातमी खरी होती. मी त्याचा एकही चित्रपट पाहिला नाही किंवा टीव्ही मालिकाही पाहिली नाही. पण फोटोतून दिसणारा उमदा तरुण नंतर बातम्यात आले तसा निराश, कोकच्या आहारी गेलेला, वेड्याचे झटके येणारा, भास होणारा असा अजिबात वाटला नाही. त्याच्या इंस्टा अकौंटवरचे मेसेज खूप वेगळे होते, नटाला न शोभणारे.

त्याच्याबद्दलच्या उलटसुलट बातम्यांमुळे नंतर खरे खोटे काय काहीच कळेनासे झाले. मीडिया मॅनेज करणे आजकाल सोपे आहे पण म्हणून अहंगंडापोटी इतके विष पेरायचे?

शाहरुख व शाहिद कपूरचा सुशांतसोबतचा एक व्हिडिओ व्हात्सापवर पाहिला. आधी कधी पाहिला नव्हता. स्टेजवर लोकांना बोलावून त्यांचा अपमान करणे हा मनोरंजनाचा एक नवा प्रकार आहे हे पहिल्यांदा कळले. शाहरुख व शाहिद दोघांची जितकी घृणा वाटली तितकीच प्रेक्षक बनून बसलेल्या आणि खदाखदा हसणाऱ्या सिनेसृष्टीतील इतर कलाकारांची घृणा वाटली. त्यांचे घृणास्पद वर्तन कधीही स्मरणातून जाणार नाही आणि त्यामुळे या लोकांना मी पडद्यावर परत कधीही पाहू शकणार नाही.

काही जणांनी असे म्हटले की इंडस्ट्रीने आपल्याला स्वीकारले नाही हे सुशांतला खूप लागले. ह्या असल्या विकृत इंडस्ट्रीने
आपल्याला स्वीकारावे ही त्याची इच्छा होती? त्याने नैराश्य आले?

सुशांत शिकलेला, बुद्धिमान माणूस होता. सिनेमाखेरीज पर्याय नाही असे त्याच्या बाबतीत तरी नसावे. दुसऱ्या फिल्डमध्येही तो काहीतरी करू शकला असता. आत्महत्या करून त्याला काहीही मिळाले नाही आणि त्याच्या घरचे सोडून बाकी कोणाचे काहीही नुकसान झालेले नाही. मग ही आत्महत्या का?

इंडस्ट्रीमध्ये अमुकतमुक होते असे आज काहीजण म्हणताहेत. पण ते कुठे होत नाही? कॉर्पोरेट जगात होत नाही?घराघरात होत नाही?

हल्ली नैराश्य हा एक नाजूक विषय आहे. कोणालाही काहीही कारणाने ते येऊ शकते आणि तो काहीही टोकाची भूमिका घेऊ शकतो. आयुष्यातील अप्रिय घटनांनी तात्कालिक नैराश्य येणे स्वाभाविक आहेच पण सुरवातीचा छोटा कालखंड सोडला तर सुशांतसारखा एखादा बुद्धिमान माणूस त्यावर मात करू शकत नाही? नैराश्यातून वर डोके काढून पर्याय शोधू शकत नाही? मग त्या बुद्धीचे करायचे काय? ती असून नसून दोन्ही सारखेच...

सुशांतला श्रद्धांजली. त्याचे वाईट जितके वाटतेय तितका रागही येतोय. त्याने जे काही भोगले असेल गेल्या वर्षभरात, त्यापेक्षा भयंकर असे आयुष्य त्याने स्वतःच्या वडिलांच्या माथी मारले.

ते स्क्रिप्टेड असते हो सगळे... पूर्ण क्लिप बघितली तर कळते ते...>>>

पूर्ण क्लिप देणार का इथे? मी जितके पाहिले त्यात तरी शेवटी तिघे मिळून आम्ही हा खेळ केला असे जाहीर करताना दिसले नाही. उलट सुशांत बावचळल्यासारखा दिसतो.

बहुतेक वेळा स्क्रिप्ट असते.सलमान खान ने एकदा अरबाझ खान च्या पिक्चर्स ची खूप उडवली होती.
आणि कंसेंट घेऊन केलेले असते.पण हेही खरं की सुशांत चे एक्सप्रेशन फारसे मजा वाटल्याचे नाहीत.

> ते स्क्रिप्टेड असते हो सगळे... पूर्ण क्लिप बघितली तर कळते ते..>>>>>
Scripted असेल तर तिथेच स्टेज वर सोडलं गेलं पाहिजे ना !
पण सल्लू ने २०१३ ला अर्जित बरोबर वाद झाल्या नंतर २०१६ पर्यंत त्याच्या एका ही मूवी मध्ये गाणे दिले नाही .
२०१६ ला सुलतान मध्ये ' जग घुमिया थारे जैसा ' हे गाणे अर्जित आणि राहत फतेह दोघांकडून दोन वर्जन गावून घेतली आणि मार्केट मध्ये हवा पसरवली अर्जित चे गाणे गायब करणार !

त्या नंतर अर्जित ने ट्विटर ,फेसबुक वर मोठी लेटर लिहून सल्लू ची २०१३ बद्दल माफी मागितली तरी सल्लू ने अर्जित चे गाणे उडवलेच आणि राहत फतेह चे ठेवले .
दोन तीन वर्षा पूर्वी गोविंदा , पाहलाज निहालनी बद्दल सुद्धा सलमान ने नाकाबंदी करून त्यांना सिनेमे न भेटणे , भेटले तर रखवडणे , झालेच तर सिनेमा हॉल न मिळून देणे असली कामे केली आहेत . हे स्वतः गोविंदा ने सांगितले आहे .
थोडक्यात सल्लू आणि शाहरुख बॉलीवुड त्यांच्या बापाचे आहे असे समजतात आणि तसे वागतात .
" आणि दर्शकच त्यांच्या सिनेमाला गर्दी करून त्यांना करोडो कमवून देतो . " हे वाक्य वर आलेले आहे आणि ते सत्य आहे .

"असल्या विकृत इंडस्ट्रीने आपल्याला स्वीकारावे ही त्याची इच्छा होती? त्याने नैराश्य आले? सुशांत शिकलेला, बुद्धिमान माणूस होता. सिनेमाखेरीज पर्याय नाही असे त्याच्या बाबतीत तरी नसावे" ----> खरे आहे. थोड्या काळासाठी वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण बाहेर पडून काहीतरी वेगळे करणे कदाचित त्याला नको असेल किंवा अवघड वाटले असावे.

फिल्म इंडस्ट्री पॉलिटिक्स सारखी झालीये. चांगली लोक कमी आणि विकृत लोकच जास्त भरली आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावरच सर्व काही चालते. पण म्हणून चांगल्या लोकांनी त्याच्या नादी न लागणे किंवा त्यातून बाहेर पडणे हा योग्य मार्ग असू शकत नाही (आत्महत्या तर नाहीच नाही). एक सुजाण नागरिक म्हणून आपण योग्य निर्णय घेऊन हे नक्की थांबवू शकतो. मी गेली ५ वर्ष सलमान खान, संजय दत्त यांचा एकही चित्रपट थिएटर मध्ये पाहिलेला नाही आणि यापुढेही पाहणार नाही. मला करण जोहर असाही आवडत नाही त्यामुळे त्याची चित्रपट मी गेली अनेक वर्षे थिएटरात पाहिले नाहीत आणि पाहणारही नाही. आपण ठरवून काहीतरी केले तरच परिस्थिती बदलू शकेल आणि नवीन आणि चांगल्या कलाकारांना योग्य संधी मिळेल.

एकदा प्रसिद्धी मिळाल्यावर बाहेर येऊन साधे जॉब करणं कठीण असेल/कोणी देतही नसेल.
यात लॉकडाऊनचाही बराच भाग असावा.एकंदर आजाराच्या बातम्या/पार्टी सोशलायझेशन चा अभाव.
जितकी प्रसिद्धी जास्त तितकं मागे फिरणं कठीण होत असावं.या लोकांना सामान्य बनून गर्दीतला चेहरा बनण्याची सूट नसतेच.प्रत्येक ठिकाणी कोणीतरी ओळखून जज करेल ही भीती.

मला तरी हे पॅरानॉर्मल आहे असे वाटत आहे...आधी मॅनेजर आणि नंतर हा....
मॅनेजर च्या सुसाईड वेळी देखील नोट नव्हती... तिला कसले डिप्रेशन...

आजच युट्युबला शाहरुख आणी इरफान खानचा एक व्हिडिओ बघितला. हा त्या शो चाच एक भाग होता. पण त्यात इरफान खान अगदी खरं बोलत होता. ठाण मांडून बसलेले लोकं यांचे चित्रपट आणि ईरफान, सुशांत, आयुषमान यांचे चित्रपट या वरून दोघांत चाललेले संभाषण आजच्या घटनेला धरून आहे असे वाटले.

Submitted by निर्झरा on 17 June, 2020 - 19:00

>>>>>>>

हाच तो विडिओ

https://youtu.be/LbpR6zm610M

मागे मी सुद्धा शेअर केलेला. फनी आहे हा. सर्वांनी जरूर बघा. स्क्रिप्टेड असते हे. त्यामुळे ईरफान जे काही खरे बोलत होता त्यात शाहरूख स्वत: देखील त्याच्या सोबतच होता हे लक्षात घ्या.

ईरफानला घेऊन बिल्लू नावाच्या चित्र्पटाची निर्मिती खुद्द शाहरूखनेच केली होती हे फार कमी जणांना ठाऊक आहे.

वरच्या त्या विडिओत शाहरूखने स्वत:च आपण करत असलेल्या रोमांटीकछाप सिनेमांची एक प्रकारे खिल्लीच उडवली आहे. आणि असे त्याने बरेचदा केले आहे.

ईथे आपण एक समजून घ्यायला हवे की शाहरूख हा देखील एक अऊटसायडरच आहे. ईथे आला तेव्हा ना त्याकडे पैसा होता ना ओळख. एका रात्री बाहेर झोपायचीही पाळी त्यावर आलेली. सुशांतप्रमाणेच तो देखील सिरीअलमधून चमकतच पुढे आलेला. सुरुवातीच्या बाजीगर डर अंजाम कभी हा कभी ना चमत्कार राजू बन गया जंटलमॅन सारख्या चित्रपटातून त्याने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवल्यावर त्याला यश चोप्रा जोहर आदी मंडळींनी हेरले आणि म्हटले तर आपल्या बॅनरचे चित्रपट हिट करायला वापरले. सोबत त्यालाही स्टारचे सुपर्रस्टार बनवले. त्याला कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर जवळपास एकाच शैलीतील चित्रप्ट सातत्याने करायचेच असतील असे नाही पण कदाचित त्यालाही अश्या सो कॉलड गॉडफादर्सना कधीच नकार देणे जमले नसणार. त्यांनी त्याला आपला कॅंप सोडून जाऊ दिले नसणार. या लोकांनी त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कधी गोळी चलवलीही असेल किंवा आणखी काही पडद्यामागे सत्य असेल. पण ऑफ द स्क्रीन एखादा माणूस कसा आहे हे आपल्याला समजते. माहीत असते. म्हणून आजवर त्याने कोणाशी घाणेरडे राजकारण केल्याचे आरोप त्यावर कधी झाले नाहीत

आता आपल्यालाच हे समजून घ्यायला हवे की शाहरूख हा एक ब्रांड आहे. तो टीआरपी मिळवून देतो. त्यामुळे न्यूजवर अश्या क्लिप दाखवून टीआरपी खेचायचा प्रयत्न राहणारच. ईथेही कोणाला शाहरूख आवडत नाही त्याने त्याच्यावर आरोप करून चर्चा घडवल्यास धागा टीआरपी खेचेन. पण मूळ दोषी जे आहेत ते या नादात सुटतील. तसे कोणी होऊ देऊ नका.

व्हॉटसपवर एक पेटीशन फिरतेय
करण जोहर, सलमान खान आणि यशराज फिल्म या तिघांच्या विरोधात. यांच्यावर बहिष्कार टाकणारे
याचा काय फायदा होतो की नाही कल्पना नाही.
पण मी साईन केले. पुढे फॉर्वर्ड केले. किमान हे जास्तीत जस्त लोकांपर्यंत तरी पोहोचेल की काय घाणेरडे राजकरण चालते..

मूळ दोषी आता पेटून उठणारी जनता आहे.... किती जणांनी त्याचे चित्रपट थेटर ला जाऊन पाहिले ??? धोनी आणि चिचोरे सोडला तर... तो बिचारा मेसेज टाकायचा इन्स्टा वर कि प्लिज माझे चित्रपट बघा... सोनचिरिया , ब्योमकेश वगैरे चांगली स्क्रिप्ट असणारे चित्रपट पडले... का नाही लोक गेले बघायला.. का स्टुडन्ट ऑफ द इयर सारखे चित्रपट जास्त चालले??
ज्याचे चित्रपट चालत नाहीत त्याला कोण प्रोड्युसर घेईल? शेवटी हा बिझिनेस आहे...
मला सांगा त्याचा ड्राईव्ह हा चित्रपट नेटफ्लिक्स वर रिलीझ झाला ... तो समजा थेटर ला रिलीज झाला असता गेले असते लोक बघायला??? बिलकुल नाही...
सांगा मग दोषी कोण आहे ????

साधना यांच्याशी शंभर टक्के सहमत. जो माणूस दोन-चार लाख भाडे भरतो दर महिन्याला त्याला नोकरी शोधायची गरज नाही. अतुल कुलकर्णी मुलाखतीत म्हणाला होता की मी चित्रपटात काम करतो हा माझ्या आयुष्याचा भाग आहे, ते माझे पूर्ण आयुष्य नाही. नाही मिळाले चित्रपट तर मालिका, वेबसिरीज करता येतात. अभिनय कार्यशाळा सुरु करु शकतो. शेती करू शकतो, समाजकार्य करु शकतो, प्रवास करू शकतो. पार्टीला बोलवत नाहीत तर न का बोलवेनात. स्वतःहुन कुठल्याही पार्टीला न जाणारे अनेक जण आहेत.
ज्या मुलीबरोबर त्याचं पटत नव्हतं त्या मुलीशी त्याने संबंध का ठेवावे. अशा लोकांना तर विचार न करता आयुष्यातून काढून टाकलं पाहिजे.
तुमची काहीही चूक नसताना कोणामुळे तुमचं नुकसान होतं, तेव्हा खूप राग येतो, हतबल वाटतं पण त्याला काही इलाज नाही. तुमचं नुकसान करून वरून तुम्हाला कमी लेखणारे लोक कधी ऑफिसात असतात, घरात असतात, प्रत्येक क्षेत्रात असतात. कधी मित्र स्वार्थीपणा करतात, कधी तुम्हाला वापरून घेतलं जातं, हे सगळं चांगल्या माणसांच्या बाबतीत घडत असतं. याबाबतीत प्रत्येकाची संवेदनशीलता वेगळी असू शकते. वाईट वाटलं पण कदाचित हे सगळं त्याच्या सहनशीलतेपलीकडचे असेल.

परवा या संदर्भात मराठी वृत्त वाहिनीवर चर्चा चालू होती. गिरीजा ओक मराठीतील घराणेशाहीची प्रतिनिधी म्हणून आली होती तर नितीश भारद्वाज आला होता ज्याने केदारनाथमध्ये सुशांत बरोबर काम केलं होतं. मराठीत काही कपूर, खान नाहीत आणि मला वाटतं मराठीत हा प्रश्न फारसा मोठा नाही.
नितीश भारद्वाजचं करिअर कधीच एवढं मोठं नव्हतं. हे जे लोक आता म्हणताहेत की त्याने आमच्याशी बोलायला हवं होतं त्यातले किती लोक त्याच्या संपर्कात होते. यूट्यूब वर अनेक विडिओ आले आहेत जसे की उषा नाडकर्णी त्याला मुलगा मानायच्या आणि प्रार्थना बेहरेला तो लहान बहीण म्हणायचा. जेव्हा प्रत्यक्ष गरज असते तेव्हा लोकांकडे बोलायला वेळ नसतो आणि माणूस गेल्यावर तो किती जवळचा होता हे दाखवायची अहमिका लागते.

Pages