Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आता कुठे तोंड लपवू अशी अवस्था
आता कुठे तोंड लपवू अशी अवस्था इंडिया टुडे बघणाऱ्या डोकी सरकलेल्या चाहत्यांची झाली असेल !

चुकीच्या खोट्या ,फकीर
चुकीच्या खोट्या ,फकीर धार्जिणा बातम्या देवून देशातील सर्व घटकांचे प्रचंड नुकसान हे चॅनल करतच आहेत.
खोटा टीआरपी दाखवून उद्योगांना पण फसवत आहेत जाहिराती च जास्त दर घेवून.
लबाड कुठले.
रीयाचं ड्रग कनेक्शन हे खोटं
>रीयाचं ड्रग कनेक्शन हे खोटं आहे का?
"Not part of drugs chain”
“No criminal antecedents”
“Didn’t harbour Rajput, he was in his own house”
"All equal before law, no special liability to stars”
वरील वाक्ये बेल आदेशात आहेत. मुळात "ड्रग कनेक्शन" हा शब्द वापरून आहे त्यापेक्षा काहीतरी भयंकर आहे असे भासवायचा तुमचा प्रयत्न आहे. ड्रग नव्हे, गांजा.
>बाकी मी याआधीही अनेक वेळा लिहिलंय की खरं काय ते कधी बाहेर येईल अशी आशा वाटत नाही.
तुम्हाला खरं काय याचाशी देणेघेणे नाही. बिहार निवडणूकिपर्यंत कसातरी विषय ताणायचा आहे. आत्महया झाली हे खरे आहे हे तुम्हालाही माहित आहे.
> एखाद्याला ड्रग बोर्नव्हिटाइतके इनोसंट वाटत असतील तर बाकीच्यांनाही तसंच वाटलं पाहिजे ही कुटूंबवत्सल अपेक्षा योग्य नाही.
ड्रग इनोसंट आहेत असे विधान मी ( किंवा आणखी कुणी) केलेले नाही.
बीबीसी नी बिहार वर बनवलेले
बीबीसी नी बिहार वर बनवलेले तीन व्हिडिओ आज बघितले .
पत्रकारिता त्याला म्हणतात.
बिहार मध्ये लोकांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
शिक्षण पासून सर्व च क्षेत्रात अत्यंत दयनीय अवस्था आहे.
मागील 50 वर्षात 1 पण फॅक्टरी बिहार मध्ये लागली नाही.
कॉलेज मध्ये शिक्षक नाहीत शिकवायला.
लोकांना काम नाही .
सत्तू वर जगत आहेत लोक डाळ,चपाती पण त्यांना घेणे परवडत नाही.
आणि तेथील निवडणुकीचा मुद्ध SSR केस आहे.
लोक भडकली आहेत bjp आणि त्यांच्या समर्थक पक्षांवर.
त्या पांडे ला तिकीट मिळाली अस्ती तर सेने नी बिहार मध्ये त्याला हरवला असता.
त्या भीती नी च त्या पांडे ला तिकीट दिले नाही.
फक्त भावनिक मुद्धा वर प्रतेक
फक्त भावनिक मुद्धा वर प्रतेक वेळी निवडणुका जिंकता येत नाहीत.
कधी राम मंदिर,कधी पाकिस्तान,कधी मुस्लिम,कधी सुशांत सिंग हाच प्रकार चालला आहे...दोनदा लोक फसली आता फसणार नाहीत.
लोकांना पोट पण आहे,
नोकरी व्यवसाय त्यांना हवा आहे,बँकेतील पैसे सुरक्षित हवे आहेत .
आणि bjp ल आर्थिक,सामाजिक प्रश्न मध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही
बिहार मध्ये bjp आघाडी हरणारच आहे आणि त्या नंतर प्रतेक राज्यात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
कट्टर भाजपा समर्थक आणि भाजपा
कट्टर भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधक ह्यांचे मायबोलीवरील डेमोग्राफिक्स अनुक्रमे बहुतांश स्त्री आयडी आणि बहुतांश पुरूष आयडी असे कधी झाले कळलेच नाही

स्टॅट्सचा संदर्भ घेता कुठलाही एक गट साधारणत: ५०% पुरूष आणि ५०% स्त्रिया असा असायला हवा.... ही सँपल सेट मधली अॅनोमली म्हणायची की काही बायस्ड सँपल सेट म्हणायचा... काहीही म्हणा पण हा जेंडर बायस डेंजर आहे हे खरे.
काय गौडबंगाल आहे हे? मायबोली वॉंट्स टू नो...
ड्रग इनोसंट आहेत असे विधान मी
ड्रग इनोसंट आहेत असे विधान मी ( किंवा आणखी कुणी) केलेले नाही.
झालं तर मग. लोकांच्या प्रतिक्रिया ड्रग बद्दलच आहेत, चॅट पब्लिक डोमेनमध्ये आहेत.
हाब,
हाब,
प्रतिपक्षाच्या बाणांपासून स्त्रियांमागे लपायची उज्वल परंपरा आहे आपल्या देशात,
तेव्हा रथावर प्रत्यक्ष स्त्री घेतलेली, आता सोमीवर स्त्री id येतात
सीबीआय ने अमित शहाना उचलले
सीबीआय ने अमित शहाना उचलले होते , तेंव्हा हे त्यात होते.बिचारे , लोयाना भेटायला निघून गेले.>>>तुम्हाला याना अमित शहानी मारले असे म्हणायचे आहे का? तसे असेल तर शहाविरुद्ध कोर्टात अर्ज ठोका. याच अश्विनी कुमाराना भाजपने गवर्नर केले होते याचा अर्थ भाजप त्यान्च्याविरोधात नव्हते. उगीच लोकावर असन्दिग्ध आरोप करणे सोडुन द्यावे ही विनन्ती.
प्रतिपक्षाच्या बाणांपासून
प्रतिपक्षाच्या बाणांपासून स्त्रियांमागे लपायची उज्वल परंपरा आहे आपल्या देशात,

तेव्हा रथावर प्रत्यक्ष स्त्री घेतलेली, आता सोमीवर स्त्री id येतात Happy >> भारी अॅनालॉजी...आवडली
पण ते महाभारत १८ दिवसात संपले सुद्धा... ईथले रथी-महारथी सगळे अमरत्वाचा शाप घेऊन आले आहेत त्यामुळे ईथले महाभारत कधी संपेल असे वाटत नाही.
काल मुंबई पोलिस कमिशनर साहेबांनी एनडीटीवी ला दिलेली मुलाखत पाहिली.. ते म्हणाले......
टीआरपी फ्रॉड अंतर्गत आमच्याकडे हंसा नावाच्या एका एजन्सीने 'जी काही घरांमध्ये लाईट मीटर सारखे टीवी मीटर लावते' तक्रार केली आहे. हंसा ला 'बार्क'ने जी टीआरपी रेग्युलेटिंग आणि पब्लिशिंग एजंसी आहे तिने हे मीटर लालावायचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. असे मुंबईत २००० मीटर्स आहेत. तर हंसा आणि बार्क ने तक्रार केली आहे की आम्हाला ह्या टीआरपी मध्ये संशयास्पद ट्रेंड दिसतो आहे.. मग मुंबई पोलिसांनी तपास केला असता....त्यांना असे कळाले की..
मीटर असलेल्या लोकांनी महिना ४०० ते ५०० रुपये घेऊन पैसे घेऊन मुद्दम रिपब्लिक चॅनल बघितले
ह्या लोकांनी ते घरी नसतांना त्यांचे टीव्ही रिपल्ब्लिक चॅनलवर चालू ठेवले
ह्या लोकांना ईंग्रजी कळत नसतांना सुद्धा त्यांनी दिवसभर ईंग्रजी रिपब्लिक चॅनल बघितले.
हे आम्ही म्हणत नाहीये पण ...रेग्युलेटिंग एजन्सी BARC म्हणते आहे...आणि त्यांच्या मते हे सगळे संशयास्पद आहे ...क्रिमिनल ऑफेन्स आहे आणि मुंबई पोलिस ह्याचा मुळापर्यंत तपास करणार आहोत. मुळात कोणत्या घरात मीटर्स लावले होते ही अतिशय गोपनीय माहिती रिपब्लिक आणि अजून दोन मराठी चेंनेल्स ने कशी मिळावली हा रहस्यभेद करणे, ह्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा खोलात जाऊन तपास करणे अतिशय जरूरी आहे आणि आम्ही तो कसोशीने करणार आहोत.
मुंबईचे पोलिस कमिशनर हे सांगत असतांना.. मला फार आशा होती की ते म्हणतील की 'अर्नब चा टॉर्चर २४ तास सहन केलेल्यांना मुंबई पोलिस काही सदभावनेतून मदत वगैरे करतील, सहानुभूती दाखवतील'..पण नाही त्यांची चौकशी होणार आहे आणि गरज पडल्यास साक्षीदार केले जाईल किंवा कारवाई सुद्धा होणार आहे.
हा विडिओ जरूर बघा...
https://www.youtube.com/watch?v=pymFRfegkNQ&ab_channel=NDTV
ह्या विडिओतून बाकी काही नाही पण एक महत्वाची माहिती मिळाली की निधी राझदान सध्या अमेरिकेतच हार्वर्ड मध्ये प्रोफेसर आहे..
तिच्यासाठीतिच्यामुळे एनडीटीवी खूप बघितला जाई ते जुने दिवस आठवले.हे बलात्कार तुमच्या
हे बलात्कार तुमच्या वर्गातल्या स्त्रियांवर झालेले नसल्याने ते महत्त्वाचे नसतील.>>>
ही असली विधाने हल्ली इतक्या वेळा मायबोलीवर ऐकलीत...हे बोलणाऱ्यांच्याच मनात जातपात, उच्चनीच, स्त्री पुरुष हे भेदभाव इतके ठासून भरलेले आहेत की कोणी काही बोलले की त्यांना आधी बोलणाऱ्यांची जात, शिक्षण, लिंग सगळे दिसायला लागते.
अर्णब, कंगना आणि इतर भयंकर चुका करताहेत म्हणून इथले विद्वान खडे फोडताहेत, ते खडे फोडताना स्वतः तेच करताहेत.
तुमच्यात आणि अर्णब गॅंग मध्ये काहीही फरक नाही. तुम्ही त्याच्यासारखेच आहात..... फरक एवढाच की त्याची पहूंच देशभरात आहे आणि तुमची मायबोली आणि तुमच्या सो मी वावराइतकीच...
कट्टर भाजपा समर्थक आणि भाजपा
कट्टर भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधक ह्यांचे मायबोलीवरील डेमोग्राफिक्स अनुक्रमे बहुतांश स्त्री आयडी आणि बहुतांश पुरूष आयडी असे कधी झाले कळलेच नाही >>
आणि स्त्री आयडीनी प्रत्येक गोष्टीत स्टँड घ्यायला हवाच आणि तोही अमुक एक स्टँडच घ्यायला पाहिजे असाही आग्रह असतो. त्यांनी गप्प बसलेलेही चालत नाही. एकूण स्त्रियांकडूनच इथल्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत.
ही असली विधाने हल्ली इतक्या
ही असली विधाने हल्ली इतक्या वेळा मायबोलीवर ऐकलीत///
बायका त्यांच्या against तोंड उघडायची हिंमत करतात यामुळे ते rattle होतात. मग गप्प बसवायला अशी विकृत भाषा वापरतात. ट्रोल करतात. And it works.
अर्र, दाखवलेल्या आरशातला
अर्र, दाखवलेल्या आरशातला स्वतःचा चेहरा पाहून खूपच राग आलेला दिसतोय. चालूच द्या.
वटवृक्ष मॅडम, तुमच्या अर्णवला वाचवायला स्वतः प्रकाश जावडेकर आणि भाजपचे अध्यक्ष ( नामधारी का होईना) जे पी नड्डा मैदानात उतरलेत.
BARC ने दाखल केलेल्या FIR
BARC ने दाखल केलेल्या FIR मध्ये इंडिया टूडे च नाव आहे त्यांना त्याबद्दल संशय होता पण जेव्हा पोलीसांनी चौकशी केली असता जे आरोपी आहे त्यांनी रिपब्लिकन वाले टीआरपी विकत घेत आहेत असे सांगितले ज्या घरात मीटर लावले होते त्यांनी पण तेच सांगितले हे काल स्वतः ज्वाइट सीपी इंडिया टिवी ला सांगत होते...आता पुढे यात अर्णब आडकतो की पोलीसांवरच बुमरॅग होतो?..आता येणारे काही दिवस फुल एंटरटेंमेंट
अर्र, दाखवलेल्या आरशातला
अर्र, दाखवलेल्या आरशातला स्वतःचा चेहरा पाहून खूपच राग आलेला दिसतोय. चालूच द्या.
इतके घाणेरडे आरोप प्लीज करू नका. इथे लिहायचं नाही इतकंच ना? ओके नाही लिहीत. पण प्लीज हे खूप भयानक चीप खोटे आरोप करू नका.
ज्यांच्याकडे ढोंगीपणा नाही
ज्यांच्याकडे ढोंगीपणा नाही अशा स्त्रियांना माझं विधान पटेल. हाथरसच्या धाग्यावर मी_अनु यांनी हे लिहिलंय (त्यांना वादात ओढायची इच्छा नाही)
<निर्भया प्रकरणात 'इतकी हाय प्रोफाईल, मेडिकल स्टुडंट, शिकलेली मुलगी गेली' हा भागही जास्त असावा (समाजातल्या पांढरपेश्या वर्गाने गुन्हा स्वतःशी जास्त रिलेट करणे) हा भाग असावा. तसेच इतक्या निर्घ्रूण प्रकारे केलेला आणि मिदीयासमोर आलेला हा पहिला प्रकार होता. (दुर्दैवाने त्यापूर्वी घडलेल्या भोतमांगे प्रकरणाला नॅशनल मिडीया कव्हरेज मिळाले नाही. अतिशय नीच प्रकार होता. कोपर्डी प्रकरणाला कव्हरेज मिळाले नाही.)
असा विचार करायला,मांडायलाही लाज वाटते पण 'गरीबांच्या पोरीबाळींसोबत हे असे प्रकार पिढ्यानुपिढ्या होत आलेत, होत असतातच' अशी काहीतरी मनाची भूमिका असावी. जेव्हा थोड्या हाय प्रोफाईल मधली (शिक्षीत वर्गातली) एखादी निर्भया, नैना पुजारी जाते तेव्हा 'याजागी आपण्/आपल्या मुलीबाळी असू शकतील' या कल्पनेने जास्त रिअॅक्शन्स येतात.>
त्यांच्या या प्रांजळपणाबद्दल मला त्यांचा आदर वाटत आला आहे.
मुलगी कोणत्या वर्गातली, शहरी की ग्रामीण, मध्यमवर्गीय की गरीब, तिची जात कोणती यावर प्रतिक्रिया किती तीव्र उमटते हे मीच नाही तर सामाजिक विज्ञानाच्या अभ्यासकांनी मांडलेलं मत आहे. निर्भयाच्या वेळी या आशयाचा लेख वृत्तपत्रात वाचला होता.
सनव आणि साधना यांच्या साठी आणखी एक क्रायटेरिया म्हणजे त्यांची प्रतिक्रिया ही पोलिटिकलही असते. हाथरस धाग्यावरच्या त्यांच्या पहिल्या प्रति सादापासूनच त्यांच्या ऑर्ग्युमेंट्स अत्यंत जहाल विषारी आणि कुठल्याही कचाट्यात सापडू नयेत अशा संदिग्धपणे , पण जर कोणी ओळखून उत्तर दिले तर त्याच्याच मनात चुकीचे विचार आहेत (हा नेहमीचा पॅटर्न, सिंबांना अनुभव आहेच) असा कांगावा करता येतील अशा आहेत.
मराठा समाजाने कोपर्डी बलात्काराचा फायदा घेऊन आरक्षण मिळवलं असं अत्यंत हलकट विधान त्यांनी नाव न घेता केलं आहे. किमान दोनदा.
त्या ए क फेसलेस आयडी आहेत, त्यामुळे कधीच नवल वाटत नाही.
साधना यांच्याबाबतीत नवल वाटायचं थांबलं.
मी पर्सनल लिहायचं टाळतो. पण समोरून हल्ला झाला तेव्हा उत्तर देणं भाग आहे.
मुंबई पोलिस आणि पर्यायानं
मुंबई पोलिस आणि पर्यायानं महाराष्ट्र सरकार यांचं 'विनाशकाले विपरीत बुद्धी' असं झालंय. आता बाकी काही करायला उरलं नाही तर हे असले माकडचाळे चालू केले आहेत.
उद्धवा, अजब तुझे सरकार!
वटवृक्ष, साधना, सनव ... कोणालाही रिअॅक्ट करण्याची / उत्तरं देण्याची गरज नाही. तुम्हाला जे आणि जेव्हा लिहायचं असेल ते लिहा. आपलं मत मांडूया बाकीच्यांना खुलासे देण्यात वेळ नको घालवायला. त्यांना जे लिहायचं ते लिहू देत.
कोरम आणि कोरस पूर्ण झाला.
कोरम आणि कोरस पूर्ण झाला.
Bip च आणि अर्णव चा काय संबंध.
Bip च आणि अर्णव चा काय संबंध.
Bjp नेहमी अर्णव सारख्या मूर्ख व्यक्ती ची बाजू का घेत आहे हा प्रश्न आहे.
BJP ni कंगना आणि अर्णव ला सुपारी दिली आहे का माकड चाळे करण्यासाठी.
Hathras मधील पीडित मुली ची अर्णव सरळ बदनामी करत आहे हे bjp च्या पाठी रख्याना दिसत नाही का.
आणि ह्याच्या मुळे bjp ल मोठी राजकीय किंमत नक्की चुकवावी लागणार आहे.
लोक मूर्ख नाहीत अर्णव सारख्या बकवास व्यक्ती ची पाठराखण करायला.
तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची
तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.
माझ्या डोक्यात काय आहे, मी कसा विचार करते, हे मी नाही तर तुम्ही ठरवणार व लिहिणार.
आणि तुम्ही लिहीलं म्हणजे ते तसंच असणार.
तुम्ही सांगितलं की मला एखाद्या बाईवर बलात्कार झाला की मी तिची जात/क्लास बघते आणि मगच मला आनंद/दुःख होतं किंवा काहीच वाटत नाही. तुम्ही जजमेंट दिलं म्हणजे असंच असणार. मी त्यावर प्रतिक्रिया दिली की तो कांगावा आणि खोटेपणा. बरोबर ना?
तुम्हाला हा जजमेंट पास कऱण्याचा अधिकार देऊन मायबोली प्रशासनानेही योग्य तो मेसेज दिलेला आहे की एकतर हे रोज ऐकून घेत इथे लिहावं अन्यथा गप बसावं. म्हणूनच म्हटलं, तुम्ही जिंकलाय, अभिनंदन. मी आणखी नाही हा प्रकार bear करू शकत.
चला ,
चला ,
लोकांना वेळ मिळाला इकडे रिऍक्शन द्यायला
की काळ वेळ पाहून ताज्या दमाचे राखीव गडी ( ही लिंग निरपेक्ष म्हण आहे) उतरवले मैदानात??
कोणालाही रिअॅक्ट करण्याची /
कोणालाही रिअॅक्ट करण्याची / उत्तरं देण्याची गरज नाही. तुम्हाला जे आणि जेव्हा लिहायचं असेल ते लिहा. आपलं मत मांडूया बाकीच्यांना खुलासे देण्यात वेळ नको घालवायला. त्यांना जे लिहायचं ते लिहू देत.
पोस्टसाठी धन्यवाद मामी. Maybe I am not that strong. Rape बद्दल हे जे वर माझ्याबद्दल लिहिलं ते बघुन त्रास वाटला. सोशल मीडियातील ट्रोलिंगने स्वतःला affect होऊ देऊ नये असं कितीही म्हटलं तरी यावेळी मला आतून affect झालं. रोज बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात. रोज नव्याने त्रास होतो. कोण जात धर्म क्लास बघून मग रिएक्ट कसं व्हायचं ते ठरवत असेल? कोणती बाई आणि आई?
सो एनिवेज. माझी इथल्या पुरुषांच्या कंपूचं ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता संपली. So they win.
बरोब्बर व्हिक्तिम कार्ड खेळता
बरोब्बर व्हिक्तिम कार्ड खेळता येते, मोदींकडे शिकवणी लावली असेल का?
कोणतीही गोष्ट जो पर्यंत स्वतः किंवा स्वतः ज्यांच्या बरोबर आईडेन्टिफाई करू शकतो त्या व्यक्ती/समूहा पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत माणूस काठावर असतो,
मग तो करोना असेल, (आठवा अमिताभ ला करोना झाल्यावर रुन्मेष ला तो जवळ आला असे वाटले, तो पर्यंत वाढत असलेले हजारो आकडे दिसत असताना तो कूल होता)
जॉब लॉस/आर्थिक मंदी असेल (आठवा, नोटबंदी मध्ये स्वतः किंवा माझ्या सर्कल मध्ये कोणाला त्रास झाला नाही, म्हणजे त्रास झाला म्हणणारर शेतकरी, कामगार खोटे बोलतायत, देशद्रोही आहेत असेच लॉजिक इकडे लावले गेलेले)
किंवा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा असेल.
खरेतर सामान्य लोक इतपत संवेदनाशील असतात की या सारख्या गंभीर गुन्ह्याची सह-वेदना ते सहज अनुभवू शकतात,
पण काही नर्मदेतले गोटे असतात ज्यांना, बलात्कारित स्त्री-त्यात दलित स्त्री, काय मानसिक तणावातून जात असेल याची कल्पना येत नाही, ती कल्पना येण्याची हुकमी पद्धत भावनिक पातळीवर परकाया प्रवेश करणे,
शाळेत भिकार्याचे आत्मवृत्त म्हणून निबंध असतो तो याच साठी, त्यात शाळा मला भिकारी म्हणाली, किंवा शाळेला मी भिकारी व्हावेसे वाटते असा कांगावा करणे म्हणजे निबंध लिहिन्यापासून पळ काढणे आहे.
आत्ता तुम्ही तेच करत आहात,
तुमच्या सर्कल मध्ये कोणी यातून गेले नाही म्हणून तुम्ही याबाबत सेन्सेटिव्ह नाही , या विधानाचा अर्थ तुम्ही "माझ्या बाबतीत असे घडावे अशी यांची इच्छा आहे" असा लावणार असाल तर तो भरत सारख्या id ला कोंडीत पकडण्यासाठी केलेला तुमचा हलकटपणा आहे. तो तुमचा तुम्हाला लखलाभ होवो.
स्वतः स्त्री असून(तुमचा प्रोफाइल सांगतोय तसे) जर तुम्ही एका स्त्रीच्या भावना समजू शकत नसाल, आणि वर तिच्यावरच घाणेरडे संशय घेणार असाल तर तुम्ही न लिहिलेच चांगले.
व्हिक्टिम कार्ड तर झुडुपात
व्हिक्टिम कार्ड तर झुडुपात पडणारे पण खेळतात... ते सोयीस्करपणे दिसणार नाही!
बाकी नेहमीचे गोल गोल फिरणे चालू द्या!
बाकी या सगळ्यात स्त्री-पुरुष
बाकी या सगळ्यात स्त्री-पुरुष वगैरे फुसकुली सोडून देवून एक आयडी निवांत मजा बघत बसलाय
आणि दुसरी गोष्ट,
आणि दुसरी गोष्ट,
हाय तौबा करायची असेल तर,
"दलित लोकांच्या वस्तूला, उच्चवर्णीय हात लावत नाहीत. या हिशेबाने दलित स्त्रीला त्यांनी स्पर्श सुद्धा केला नसेल " या सिक कमेंट बद्दल करा,
पण ते तुमच्याने होणार नाही,
संवेदनशीलता आडातच नसेल तर पोहोर्यात कुठून येणार. (जर मूळ स्वभावात नसेल, तर जालीय id त कुठून येणार? असा अर्थ आहे या वाकप्रचाराचा, उगाच माझ्या आई बापाला शिव्या दिल्या म्हणून ट्विस्ट देऊन गळा काढू नका)
माझी इथल्या पुरुषांच्या
माझी इथल्या पुरुषांच्या कंपूचं ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता संपली. So they win. >>> नाही सनव. जे कोणी असं विचित्र लिहितात त्यामुळे आपण का त्रास करून घ्यावा? ज्याची जशी विचारसरणी तसंच ते लिहिणार. आपले मुद्दे लिहिणं का बंद करायचं? ती कंगणा बघा. कशी चपराक दिली. तसंच. बाकी कोणी काही लिहू द्यात. मी अनेकदा त्या पोस्टी वाचतंही नाही. तेच तेच आणि तेच तेच लिहिलेलं असणार आणि त्यांच्या दृष्टीनं ते योग्य विचार करत आहेत तर त्यांना त्यांच्या त्या विचारांत सोडून देऊ. जर कधीकाळी डोळे उघडले तर योग्य स्टँड घेतील अशी अपेक्षा करू फारतर. पण असे बाजारबुणगे विचित्र लिहितात म्हणून लिहिणं सोडू नका. आपलं मत मांडा आणि बाजूला व्हा.
अर्णव च्या केस मध्ये म आ वी
अर्णव च्या केस मध्ये म आ वी चे आय पी एस तोंडावर आपटले म्हणून समर्थक चिडले आहे का ?
त्या गुपतेश्र्वर ला शिव्या घालणारे कुठे गेले ?
आय पी एस मध्ये बिनडोक सुद्धा असतात हे गुप्तेश्र्वर् आणि परमजित मुळे समजले !!
सिंबा, मला वाटतं या लोकांची
सिंबा, मला वाटतं या लोकांची हिपोक्रिसी आता पुरेपूर उघड झाली आहे.
यांच्या प्रतिसादाचे पॅटर्नही आता चांगले लक्षात आले आहेत.
उगाच यांच्यावर आणखी वेळ वाया घालवायची गरज नाही.
Pages