सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण शबरीमला साठी स्त्रीयांना का प्रवेश नाही हे एकदा नीट वाचुन मग इकडे डिस्को किंवा झुंबा करा.

ते कोर्टाला सांगा

सुशांत सिंह राजपूत के परिवार को रिया से माफ़ी माँगनी चाहिए. बिना किसी आधार के उन्होंने उस पर हर आरोप लगा दिया. बेटे की मानसिक स्थिति को जानते हुए इग्नोर किया. इससे हासिल क्या हुआ? बेटे के जीवन की हर बात पब्लिक में आयी और उसको सम्भालने वाली लड़की को झेलना पड़ा. Toxic.

सबरीमाला मंदिरासाठी जेव्हा प्रदर्शने केली गेली, तेव्हा त्यात एक मुस्लिम स्त्री होती. तिचे तिथे काय काम होते? >> ती लहाणपनापासून हिंदू वस्तीत वाढली असेल. तिच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणी हिंदू असतील. सर्व जाती धर्मातील लोकांचं तिच्या घरी येणंजाणं असेल.

Proud

मुंबईत नट मेला म्हणून घसा फोडणारी कंगना तिच्या स्वतःच्या हिमाचल प्रदेशात सीबीआय चा अधिकारी मेला तरी गप्प आहे.

सीबीआय चे अश्विनीकुमार ह्यांचा मृतदेह मिळाला.

Ashwini Kumar was the Governor of Nagaland from March 2013 to June 2014. He was also the Governor of Manipur for a brief period in 2013. He was the DGP of Himachal Pradesh from August 2006 to July 2008. Between 2 August 2008 and 30 November 2010 he served as the director of the Central Bureau of Investigation (CBI). During that time Amit Shah was arrested in the fake encounter case of Shohrabuddin Sheikh.

सीबीआय ने अमित शहाना उचलले होते , तेंव्हा हे त्यात होते.
बिचारे , लोयाना भेटायला निघून गेले

https://hwnews.in/news/national-news/former-cbi-chief-ashwini-kumar-foun...

कुणीही कुठल्याही जाती धर्माबद्दल कायदा करू शकतो व त्याबद्दल विचारू शकतो , तुम्हीही 3 तलाक बद्दल बोला , ख्रिश्चन चर्चने भ्रष्टयाचार केला तर तुम्हीही त्यावर बोला आणि आरक्षणावरही तुम्ही चर्चा करा , ज्या कायद्याने तुम्हास हे अधिकार दिले , त्याच कायद्याने तिलाही तो अधिकार दिला >>>>>>

मुंबई मध्ये भोंग्यंचा त्रास होतो म्हणून सांगायला गेलेल्या भोसले नामक युवती ला तुमच्या सर्वधर्म समभाव वल्यानी शिवीगाळ केली तेंव्हा तुमची libral गैग कुठे होती हो ?
कायद्या ने दिलेला हक्क बजावण्यासाठी च गेली होती ना ती ?
त्या संदर्भात तुम्ही तिला किमान इथे पाठिंबा दिलेले काही स्क्रीन शॉट चिट कवा आणि मग च धर्म आणि कायद्या वरून लेक्चर द्या !!!!

मुंबई मध्ये भोंग्यंचा त्रास होतो म्हणून सांगायला गेलेल्या भोसले नामक युवती ला तुमच्या सर्वधर्म समभाव वल्यानी शिवीगाळ केली तेंव्हा तुमची libral गैग कुठे होती हो ?
कायद्या ने दिलेला हक्क बजावण्यासाठी च गेली होती ना ती ?
त्या संदर्भात तुम्ही तिला किमान इथे पाठिंबा दिलेले काही स्क्रीन शॉट चिट कवा आणि मग च धर्म आणि कायद्या वरून लेक्चर द्या !!!!>>>>> कस आहे मृदुला, त्या वेळी यांच्या शेपट्या ढुंगणात जातात. इथे या लिबरल्स ना हीच भाषा समजते. अब्दुल सत्तार आणी अबु आझ्जमी येऊन यांच्या तोंडात मारतात तरे हे दुसरा गाल पुढे करतात. हो ना मनीष ! जर तुमच्या जैन धर्मावर खरे बोललेले तुम्हाला चालत नाही तर कृपया हिंदु धर्माबाबत नाक् खुपसु नका, तुम्हाला तो अधिकार नाही. आणी तसेही मी काळु माऊशी बोलत होते, तेव्हा मध्येच पिंक टाकु नका.

साधना यु आर राईट !

हो ना
मग ती मुस्लिम स्त्रीही हिंदू स्त्रियांना मदत करायला जात असेल
तिलाही कायद्याने विचारले नाही , तू मुसलमान असून हिंदू देवळाच्या दारात आंदोलनाला का बसली म्हणून ? दारात हजारो हिंदू स्त्रियाही बसलेल्या आहेतच , त्यांना सांगा तिथे प्रवेश का नाही ते >>>>>>>>>>>>>>>
आज पर्यंत तिने मुंबई मधील हजी अली आणि दिल्ली मधील जामा मस्जिद मध्ये महिलांना प्रवेश मिळवा म्हणून कधी आवाज नाही उठवला मग तिला हिंदू धर्मा बाबत लुडबुड करायची गरजच काय ?
तिला अगोदर तिच्याच धर्मातील स्री यांना हक्क मिळवून द्यायला सांगा !
आम्हाला तरी कळेल सुधारणा वादी स्री या बरोबर शांती वादी कसे वागतात !!!!

अबू आजमीला थोबाडीत मारून काय उजेड पडला ?

मारणाऱयांची सत्ता गेली आणि एकजण बिचारे तर परलोक सिधार गये

अबूवर मात्र अल्ला मेहेरबान

https://www.google.com/amp/s/www.newslaundry.com/amp/story/2020%252F10%2...

NBSA ने सुशांत प्रकरणी बेजबाबदार रिपोर्टिंग, दिशाभूल करणारी माहिती देणे इत्यादी कारणांसाठी न्यूज चॅनेल वर ताशेरे ओढले,
आज तक ला दंड केला
*रिपब्लिक एंटरटेनमेंट चॅनेल मध्ये येत असल्याने बहुदा त्याला न्यूज चे नियम लागू नसतील Happy

आज पर्यंत तिने मुंबई मधील हजी अली आणि दिल्ली मधील जामा मस्जिद मध्ये महिलांना प्रवेश मिळवा म्हणून कधी आवाज नाही उठवला मग तिला हिंदू धर्मा बाबत लुडबुड करायची गरजच काय ?

तिला लुडबुड करताना कोर्ट काहीच बोलले नाही

हाजी अलीला स्त्रिया जातात , बघून या, 2016 पासून.

मायबोली वर रिया, मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल दिशाभूल करणारी माहिती सातत्याने पसरावणाऱ्या id वर पण प्रशासन ताशेरे ओढणार का?

तसेही आता या विषयावर बोलण्यासारखे काही राहिले नसल्याने इकडच्या तिकडच्या बातम्या चिकटवून गिरा तो भी टांग उपर दाखवायचे सुरू केले आहे.

थोडी जनाची नाहीतर मनाची शिल्लक असेल, ब्रेकिंग न्यूज ची वखवख संपली असेल, तर चढाओढीने लोकांचे चारित्र्यहनन केले त्याबद्दल दिलगिरी तरी व्यक्त करा म्हणावं.

पाहिला का ड्रेस ?

Submitted by BLACKCAT on 8 October, 2020 -
>>>>>
शिवसेनेचे झेंडे उरले असतील घरी, युती तुटल्यावर त्यांचा काय उपयोग?? टाकाउतुन टिकाऊ तयार करतायत वैनी.

हाजी अलीला स्त्रिया जातात , बघून या >>>>>

मला वाटलंच होत तुम्ही अभिमानाने पण अर्धवट माहिती सांगणार !
हाजी अली ला फक्त बाहेरच्या भागात महिलांना प्रवेश होता , आणि आतील भागात फक्त पुरुष जाऊ शकतात !
आणि जामा मस्जिद च्या जवळ तर फिरकुन देखील देत नाहीत ........

कॉँग्रेट्स वटवृक्ष , 2000 व्या प्रतिसादासाठी

सुशांत सिंग श्रद्धांजली भाग 2 काढायचा का?

कायच्या काय

हाजी अलीला स्त्री व पुरुष दोघेही भाविक समान अंतरावरच पोचू शकतात

फक्त अगदी आत पुरुष धर्मगुरू जातो

हिंदू देवळातही असेच असते
चर्च मध्येही असेच असते

gandhi land.jpg

डाव्या बाजूला पुरुषांची रांग आहे , ते मध्ये हिरवे आहे , त्याच्या पलीकडे स्त्रियांची रांग आहे , पुरुष जितक्या जवळ जातात , तितकेच जवळ तिकडून स्त्रिया जातात , पण 2 भिन्न रांगा आहेत

रिया चक्रवर्ती आणि ड्रग्ज !
सुशांत राजपूत व त्याअनुषंगाने पूढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतर काही लोकांना NCB ने अटक केलेली. याप्रकरणी NDPS कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्चन्यायालयात आले होते. यावर जस्टीस कोतवाल यांनी काल निकाल.देताना रिया चक्रवर्तीला जामीन दिला आहे. निकालपत्रात जस्टीस कोतवाल यांनी प्रकरणाचा पूर्ण आढावा घेतला आहे. 28 ऑगस्ट ला NCB ने अब्बास लखाणी नामक व्यक्तीला अटक केलेली. त्याच्याकडे 56 ग्राम गांजा आढळुन आलेला. त्याने करन अरोरा कडून खरेदी केला होता. त्याच्याकडे 13 ग्राम गांजा सापडला. दोघांना ncb ने अटक केली.या दोंघांच्या चौकशीत झैद विलात्राचे नाव पुढे आले. त्याच्याकडे सर्च केले असता साडे नऊ लाख रुपये, सुमारे दोन हजार अमेरिकेत डॉलर, 180 युके पाउंड,15 अरबी दिरम सापडून आले. हे पैसे त्याला ड्रगच्या सेल मधून मिळालेले होते असे त्याने सांगितले. त्याच्याकडून अब्देल परिहारचे नाव मिळाले. परिहारच्या स्टेटमेंट नुसार तो शोविक चक्रवर्तीच्या सांगण्यानुसार विलात्रा आणि केझान इब्राहिम यांच्या थ्रू ड्रग्ज सप्लाय करायचा. पुढे परिहार आणि इब्राहिम दोघांना अटक झाली. शोविक चे स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्याला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली.दिपतेश सावंत, सॅम्युअल मिरांडा जे सुशांतकडे काम करायचे यानांही अटक करण्यात आली.
शोविक चक्रवर्ती परिहार,इब्राहिम आणि झैद यांच्याकडून खरेदी करत असे व सुशांतच्या सहकाऱ्यापर्यंत पोचवत असे. याचे पेमेंट सुशांत आणि रिया मिळून करत असत. सॅम्युअल आणि दिपेतेश यांनीही असेच स्टेटमेंट..
दिले आहेत कि त्यांनी सुशांत-रियाच्या सांगण्यानुसार ड्रग्ज रिसिव्ह केले व सगळा व्यवहार सुशांत रिया बघायचे. NCB च्या म्हणण्यानुसार रिया या सगळ्या सिंडिकेटची महत्वाची व्यक्ती आहे, ती सुशांत साठी ड्रग्ज खरेदी करायची आणि हा व्यवहार ते दोघे मिळुन बघायचे.
त्यामुळे रिया अवैध तस्करीच्या फायनांसिंग आणि सुशांत ड्रग्ज घेतो हे माहिती असून त्याला आश्रय देण्याच्या आरोपाखाली NDPS सेक्शन 27A नुसार दोषी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रियाला 8 सप्टेंबर ला अटक करण्यात आली. NDPS ऍक्ट 27A नुसार अवैध तस्करीला फायनान्स करणे आणि ड्रग्ज..संदर्भात इतर काही कृतींमधे सामील असणाऱ्या व्यक्तीला आश्रयदेणे(harbouring) हा गुन्हा आहे व त्यासाठी 20 वर्षेपर्यंत व दोन लाख दंड अशी शिक्षा आहे. फायनांसिंग ची व्याख्या Ndps मधे दिलेली नाही. जस्टीस कोतवाल यांच्या मते एखाद्या व्यवहारात पैशे देणे याचा अर्थ ते कृत्य फायनान्स करणे..असे होत नाही. फायनान्स म्हणजे एखादि कृती करण्यासाठी किंवा चालू राहण्यासाठी फंडिंग करणे. इथे फायनान्स म्हणजे असा आर्थिक सपोर्ट ज्यावर तस्करी अवलंबून आहे. सुशांत साठी ड्रग्ज खरेदी करायला रियाने पैसे खर्च करणे याला अवैध तस्करीला फायनांस करणे असे म्हणता येणार नाही.दुसरा मुद्दा आश्रय देण्याचा. इथे जस्टीस कोतवाल यांनी म्हटले आहे यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने गुन्हा केलेला असला पाहिजे आणि पहिल्याने त्याला आश्रय दिलेला असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला वाचवण्याच्या उद्देशाने आश्रय दिलेला असने आवश्यक
आहे. ईथे सुशांत वर कुठलाही गुन्हा नव्हता. तो स्वतःच्या घरी स्वतःच्या खर्चाने राहत होता. त्याच्यावर कुठल्याही अटकेची शक्यता नव्हती. त्यामुळे रियाने त्याला आश्रय दिला असे म्हणता येणार नाही. इथे अजुन एक इंटरेस्टिंग पॉईंट आरोपींच्या वकिलांकडून पुढे करण्यात आलेला की ड्रग्ज सेवन केले तर सेक्शन 27 नुसार एक वर्ष तुरुंगवास व 20 हजार दंड आहे. NCBच्या लॉजिक नुसार जर एखाद्याच्या मित्राने किंवा रिलेटीव्हने ड्रग्ज घेण्यासाठी पैसे दिले तर सेवन करणाऱ्याला एक वर्षे शिक्षा आणि पैसे देणाऱ्याला 20 वर्षे शिक्षा असा अर्थ होतो. जस्टीस कोतवाल यांनी हे अतिशय अतार्किक आहे असे म्हंटले आहे.रिया वर NDPS अंतर्गत चे इतर सेक्शन लावले होते त्यासाठी कमर्शियल क्वांटीटी मधे ड्रग्ज सापडणे आवश्यक आहे.(गांजाची कमर्शियल क्वांटीटी 20 किलो आहे) NCB ला रिया कडे किंवा सुशांतच्या घरी कुठेही कमर्शियल क्वांटीटी मधे ड्रग्ज आढळुन आले नाहीत.NCB च्या मते ड्रग्ज सेवन केले गेले आहेत. अशा परिस्थितीत NCB कडे रिया ने कमर्शियल क्वांटिटी समाविष्ट असलेला गुन्हा केला हे दाखवायला काही मटेरियल नाही. त्यामुळे कमर्शियल क्वांटिटीच्या गुन्ह्यात ती दोषी आहे असे म्हणता येणार नाही. रियाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही.ती कुठल्याही ड्रग्ज डिलर्सच्या साखळीचा भाग नाही. तीने नफा कमावण्यासाठी ड्रग्ज तिसऱ्या कुणाला दिले नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
सरकारी वकिलांनी मुद्दा उपस्थित केलेला की सेलिब्रिटी किंवा रोल मॉडेल यांच्याप्रती कठोर अप्रोच ठेवला पाहिजे जेणेकरून इतर तरुण अश्या..गोष्टी करणार नाहीत. जस्टीस कोतवाल यांनी यावर असहमती दर्शवली. त्यांनी म्हंटले आहे कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्यात सेलिब्रिटीना स्पेशल प्रिव्हिलेज भेटत नाही त्याचप्रमाणे कारवाई होताना पण त्यात विशेष असे काही नसते.
प्रत्येक केस हि मेरिट वर बघितली गेली पाहिजे, आरोपींच्या स्टेट्स नुसार नाही.
एक लाख रुपयांच्या बॉण्ड वर जस्टीस कोतवाल यांनी रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर केला.

दरम्यान मिडियाने रिया सोबत जे केलं ते अक्षम्य आहे....!

महेशकुमार, तुम्ही सोप्या शब्दात न्यायाधीशांचं म्हणणं सांगितलंत धन्यवाद.

खरंतर मिडीयानेच ह्या केसची वाट लावली, दोन्ही बाजूंनी. अजुनही खरं काय ते समोर येईल की नाही आणि तेच खरं असेल का ह्यावर विश्वास कसा ठेवायचा. फोन chatting वगैरे लिक कसं झालं, कोणी केलं हाही प्रश्न आहेच की, मग ते रिया आणि जया शहा असुदे किंवा सुशांत आणि त्याची बहिण यांचं असुदे.

वैयक्तिक मी कुठल्याच बाजूचे समर्थन नाही केलं कारण नक्की काय असेल ह्याबाबत मी अजुनही confused. तरी मी फार बातम्या बघत नाही, एबीपी माझा आणि मराठी news channels सोडून. इथेच वाचलं तर वाचते, तेही खूप लिंक वाचन होत नाही. म टा हल्ली घरी यायला लागलाय. मार्च एंड पासून बंदच होता.

रियाचा भाउ अजूनही तुरूंगातच आहे
रियाला जामिन मिळाला आहे , बाइज्ज्त बरी केलेलं नाही. पासपोर्ट ताब्यात घेतलाय, दर आठवड्यात पोलिसस्टेशन मधे हजेरी द्यायची आहे, शर सोडायला परवानगी नाही.

जर तिनं काही चुकीच केलं नसेल तर ती होइल बाइज्जत बरी.

हाथरस धाग्यावर बलात्काराचे खोटे आरोप करणार्‍यां नाही कठोर शिक्षा व्हायला हवी असं वाचलं.
दिशा सालियनच्या पालकांनी विनंती करूनही तिच्यावरच्या बलात्काराची रसभरित वर्णने करणार्‍यांना काय शिक्षा व्हायला हवी?
--------
सुशान्तला न्याय मिळवायला जसे फेक हँडल्स तयार केले गेले तसंच रिपब्लिकने पैसे देउन टी आर पी विकत घेतले.

Pages