सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का?”.
हा तर एक प्रश्न आहे.
व्याकरणचे शिकरण
Submitted by BLACKCAT on 17 November, 2020 - 16:59
--

चिरिमिरी साठी फेमस आहेत महाराष्ट्र पोलीस.
राज ठाकरेंनी जाहिर सभेत पोलीसांच्या चिरिमिरी घेण्याच्या सवयीवर बोट ठेवले होते.

राज ठाकरेंनी जाहिर सभेत पोलीसांच्या चिरिमिरी घेण्याच्या सवयीवर बोट ठेवले होते.>>>> आणी त्यांचे थोरले बंधु उर्फ मामु पोलीस महासंचालकांना धुणे धुवा, भांडी घासा असे काही बाही बोल्ले होते म्हणे.

तेच रन आउट झालेत

व्याकरण गडगडले
Submitted by BLACKCAT on 17 November, 2020 - 17:12

माझं व्याकरण कसं काय गडगडलं काळबोकोबा? सरकार पक्षाचे नेते काय बोलले ते मी इथल्या पुरोगाम्यांच्या लाडक्या वर्तमानपत्राचा दाखला देऊन कॉपी पेस्ट केले. बोलणारा तुमचा नेता, छापणारा तुमचा पेपरवाला आणि व्याकरणाची चूक ही माझ्या सारख्या कॉपी पेस्ट करणार्‍याची. कॉंग्रेसच्या चमच्यांना यामुळेच कोणीही गांभीर्याने घेत नाही.

व ट वृ क्ष धन्यवाद.

अपेक्षेप्रमाणेच मला पुरावा मागणार्‍यांची बोटखिळी बसली हे दिसून येत आहे.

Submitted by रश्मी.. on 17 November, 2020 - 17:38

परंवीर सध्या ते करत आहेत.

तुम्ही पोलीस म्हणजे मुंबईचे की अख्ख्या विश्वातील ?

गुहागर मुंबईत कधी आले ?

Submitted by BLACKCAT on 17 November, 2020 - 16:58

खणता खाजा अजून देशाचा नेता होऊ शकला नाही तर हा भाजा विश्वाचा नेता होऊ शकेल काय विश्वाच्या पोलिसांबद्दल बोलायला. गुहागर आणि मुंबई दोन्ही ठिकाणचे पोलिस हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारितच येतात ना?

गुहाहर मुंबईत आल्याचं मी कधी लिहिलंय? काँग्रेसी चमच्यांना वारंवार स्वप्नदोष होऊ लागलेत की काय?

बरं. आता सुशांत सिंग कडे परत येऊ. त्याच्या मृत्यूमागे काय काळंबेरं होतं, त्याचा पैसा कोणी हडप केला? शोधलं का सी बी आय आणि ईडीने?

महाराष्ट्र पोलिस भ्रष्ट आहेत हे सरकार पक्षातील नेत्यांचं म्हणणं मान्य केलंत का एकदाचं? पण बोटखिळीमुळे स्पष्ट लिहिण्याचं टाळलंच ना?

आता जर मपो भ्रष्ट आहेत तर पुनर्तपास करणे क्रमप्राप्त आहेच. तो पूर्ण झाला की निष्कर्षही समोर येतीलच. अर्थात आधीच्या दोन महिन्यांत मपोंनी साक्षीपुराव्यांची बर्‍याच अंशी विल्हेवाट लावली असल्याने सीबीआयच्या कामातील अचूकपणावर याचा परिणाम होऊ शकतोच.

>>>आता जर मपो भ्रष्ट आहेत तर पुनर्तपास करणे क्रमप्राप्त आहेच
बापरे ! मग तर लक्षावधी केसेसचा पुनर्तपास करावा लागेल ! सुशांत काय स्पेशली प्रिव्हिलेज्ड आहे का या बाबतीत ?

>>>>अर्थात आधीच्या दोन महिन्यांत मपोंनी साक्षीपुराव्यांची बर्‍याच अंशी विल्हेवाट लावली असल्याने सीबीआयच्या कामातील अचूकपणावर याचा परिणाम होऊ शकतोच
सीबीआय खड्ड्यात जाऊदे मग. बिपीन कोर्टातच निर्णय होउदे.

{{{ बापरे ! मग तर लक्षावधी केसेसचा पुनर्तपास करावा लागेल ! सुशांत काय स्पेशली प्रिव्हिलेज्ड आहे का या बाबतीत ? }}}

बळीच्या घरच्यांनी मागणी केली होती हो पुनर्तपासाची. जशी नाईकांच्या प्रकरणात आज्ञा झाली होती.

>>>>अर्थात आधीच्या दोन महिन्यांत मपोंनी साक्षीपुराव्यांची बर्‍याच अंशी विल्हेवाट लावली असल्याने सीबीआयच्या कामातील अचूकपणावर याचा परिणाम होऊ शकतोच
सीबीआय खड्ड्यात जाऊदे मग. बिपीन कोर्टातच निर्णय होउदे.

Submitted by कॉमी on 17 November, 2020 - 18:30

माझी कॉमेंट ही -

त्याच्या मृत्यूमागे काय काळंबेरं होतं, त्याचा पैसा कोणी हडप केला? शोधलं का सी बी आय आणि ईडीने?

Submitted by भरत. on 17 November, 2020 - 18:15

या प्रश्नाचं उत्तर होती. पण तुमची कॉमेंट फारच पर्सनल होती.

भरत यांचा प्रश्न १००% बरोबर आहे. भाजपच्या कित्येक चेल्या चपाट्यांनी सुशांतच्या अकौंट मधून मधून रिया चक्रवर्तीच्या अकौंट मध्ये पैसे गेलेत असा स्पेसिफिक दावा केला होता. हे काही झाले नाही असे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस कसे का असोत, सुशांत सिंग प्रकरणात काहीही काळेबेरे नव्हते हे पुरेसे स्पष्ट आहे. मुंबई पोलीस सरकारच्या तालावर नाचते आहे हे स्पष्ट आहे, म्हणून कशावर पण विश्वास ठेवायचा ?

>>>> या प्रश्नाचं उत्तर होती. पण तुमची कॉमेंट फारच पर्सनल होती.

तुम्ही मुपो आणि सीबीआय सगळाच पट उधळून लावताय. म्हणून अशी प्रतिक्रिया होती. व्हाट्स ऍप आणि कोणत्याही सोर्स शिवाय बातमी देणाऱ्या न्यूज चॅनेल्स वर दंगा झाला आहे फक्त, ना सीबीआय ना मुपो, कोणत्याही तपास संस्थेने यात काहीही खोल कट असल्याचे स्पष्ट केले नाही. त्यावर "महिन्याभरात पुरावे नष्ट केले असतील" अशी लाईन पकडली तर काय बोलणार ? तुम्ही यात काळंबेर आहे हे ठरवले आहे आणि कोणताही पुरावा किंवा पुराव्यांचा अभाव तुमचे मन वळवणार नाही असा त्या वाक्याचा मी अर्थ काढला. तरी ही, तुम्हाला वाईट वाटले असले तर सॉरी.

भास्कर जाधव काय बोलले ते बोलले. पण जर पोलीस हप्ते घेत असतील तर त्याला जबाबदार पूर्णतः पोलीसच कसे? ( हा प्रश्न कॉमी , बिपीनचंद्र किंवा दुसर्‍या कोणाही मायबोलीकराला उद्देशुन नाही ) प्रत्येक शासनात पोलीसांवर दबाव आणणारे मंत्री, संत्री, आमदार खासदार, धनाढ्य लोक हे जबाबदार आहेत, सामान्य जनता जबाबदार आहे, तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. सिंघम मध्ये अशोक सराफ अजय देवगणशी जे बोलतो ना १०० टक्के खरे आहे.

पोलीसांवरचा १२ - १८ तासाचा कामाचा दबाव जर हटवला, त्यांचे पगार पाणी वेळेवर दिले, त्यांच्या रहिवासाची सोय केली, कर्जाची, त्यांच्या मुला बाळांच्या शिक्षणाची सोय केली तर ते पण हप्ते घेऊन इतरांचा तळतळाट व रोष घेणार नाहीत. आणी हे पैसे जनतेकडुन न घेता या *&#@% आमदार- खासदार, मंत्री यांच्याकडुन घ्या. या नेत्यांचे भत्ते बंद करा, यांना गाड्या उडवायला जे कर्ज मिळते ते पण बंद करा. प्रत्येक पक्षाच्या भ्रष्ट आमदार - खासदाराच्या ढुंगणावर लाथ घालुन त्याच्याकडुन जनतेचा लुटलेला पैसा वसुल करा. मग हे सत्र बंद होईल.

{{{ भाजपच्या कित्येक चेल्या चपाट्यांनी सुशांतच्या अकौंट मधून मधून रिया चक्रवर्तीच्या अकौंट मध्ये पैसे गेलेत असा स्पेसिफिक दावा केला होता. हे काही झाले नाही असे स्पष्ट झाले आहे. }}}

हे इतकं सोप्पं असतं तर त्याकरिता सीबीआयच काय पण मुंबई पोलिसांची देखील गरज नाही. प्रत्यक्षात यात बरीच गुंतागुंत आहे. सुशांत + रिया + शौविक तर कुठे सुशांत + शौविक अशा अनेक कंपन्या कागदोपत्री स्थापल्या गेल्या. प्रत्येक कंपनीत भागीदारांचे वेगवेगळे भागीदारांचे पर्सेंटेज ठरवले गेले. त्यानंतर रकमा या बर्‍याच ट्रँझेक्शन्समधून एका खात्यातून दुसर्‍या, दुसर्‍यातून तिसर्‍या आणि पुन्हा तिसर्‍यातून पहिल्या अशा फिरविल्या गेल्या. दोषारोप झालेले आहेत, निष्कर्ष काढला गेलेला नाहीये.

रियाला ठरवून त्रास दिला गेला आहे असे समजणे तद्दन मूर्खपणाचे आहे कारण तिचे आणि भाजपचे वैर असल्याचे सकृद्दर्शनी तरी दिसून आलेले नाही. तिची अनेकवेळा चौकशी झाली. आधी तिच्या भावाला आणि नंतर तिला अत्यंत सभ्यपणे अटक करण्यात आली होती.

अर्णव प्रकरणात त्याचे आणि काँग्रेसचे जुने वैर आहे आणि शिवसेना आता कॉंग्रेसचा साथी असल्यामुळे गेल्या काही काळापासून तो शिवसेनेवरही टीका करीत आहे. त्यामुळे त्याची कुठलीही पूर्वसूचना न देता हिंसात्मक पद्धतीने झालेली अटक ही मुंबई पोलिसांचे वर्तन संशयास्पद ठरविण्यास कारणीभूत आहे.

ह्या कंपन्या, इन एनी केस, सुशांत सिंग रजपुतच्या सहमतीवरच बनलेल्या. तो प्रत्येक कंपनीत डायरेक्टर होता. जोपर्यंत सीबीआय किंवा ईडी काही ठोस निष्कर्ष काढता नाही, तोवर बोलणे अयोग्यच होते. अफरातफर असू शकते, पण रिया चक्रवर्तीच्या अकौंट मध्ये 15 करोड गेले हे कोणी आणि का पसवलं, आणि काहीही ठोस माहिती नसताना थेट आरोप का केले गेले ?

आणि, सीबीआय ने siphoning of funds नाही आहे असे सांगितले आहे. ईडी मनी लाउंड्रीन्ग चा तपास करते आहे. काढू देत ना त्यांना निष्कर्ष.

कॉम्रेड अर्णबना अटक केली हे घाणेरडे काम आहेच, शंकाच नाही. शेवटी शिवसेना भाजपासोबत इतके वर्ष युती करून आहेत, वेगळे असणार नाहीतच. पण अर्णबला कोणताही तार्किक माणूस सुशांत प्रकरणात गंभीरपणे घेत नसावा (आशा.) त्यामुळे त्याला घाबरून अटक केली हे म्हणणे हास्यास्पद वाटते. उद्धव ठाकरेंना एकेरी बोलणे आणि संजय राऊतना खुले चॅलेंज दिल्यामुळे हे झाले असावे.

रियाला ठरवून त्रास दिला नाही ? बाबौ. ठीक आहे ब्वा. याचा प्रतिवाद करून काही उपयोग नाही जर इतकं थेट असलेलं दिसत नसेल तर.

{{{ रियाला ठरवून त्रास दिला नाही ? बाबौ. ठीक आहे ब्वा. याचा प्रतिवाद करून काही उपयोग नाही जर इतकं थेट असलेलं दिसत नसेल तर. }}}

पत्रकार आणि पाप्पाराझींबद्दल लिहिलेलं नाहीये, तपास यंत्रणांबद्दल लिहिलं आहे.

{{{ ह्या कंपन्या, इन एनी केस, सुशांत सिंग रजपुतच्या सहमतीवरच बनलेल्या. तो प्रत्येक कंपनीत डायरेक्टर होता. }}}

एखाद्या सिक्रेटली चहात मिसळून नशेचे पदार्थ दिल्यावर त्याची सहमती / असहमतीचा विषय कुठे येतो? सुशांत नशेत असतानाचे व्हिडीओज् रियाच्याच मोबाईल मधे सापडलेत. एका फौजी डॉक्टरच्या मुलीने केलेले हे कृत्य पाहता तपासयंत्रणांनी तिची चौकशी करणे गैर नाही. अर्णव प्रमाणे तिचे टॉर्चर तपासयंत्रणांनी केलेले नाहीये.

तसे घडले असल्यास ती तपास यंत्रणांवर खटला भरु शकते.

अर्णव देखील मपो किंवा म हा रा ष्ट्र राज्य सरकारला स्वस्तात सोडणार नाहीचे.

तो काय करणार आहे ?

पैसे बुडवले नाहीत , पैसे दिल्याची पावती दाखवत नाही , तो दोषी असावा

सुसाईड लेटर मिळाल्यास कारवाई करणे व केस कोर्टात पोचवणे हे पोलिसांचे काम आहे

आता कोर्ट ठरवेल काय ते
ह्यात पोलिसांचा काय दोष ?

अर्णव चे टॉर्चर कुठे झाले बुवा ? अटक करायला आल्यावर त्याला स्पर्श करताच असॉल्ट असॉल्ट म्हणून ओरडत होता तो. आणि केले असेल टॉर्चर तर चूकच आहे.

रियावर तपास यंत्रणांनी अन्याय केला असे मी आणि भरत कोणाच्याही प्रतिसादात नाही आहे. अर्णब आणि मंडळाने नक्कीच केला.

चहात मिसळले- ते cbd oil होते. ते हाय देणारे ड्रग नाही, रिलॅक्सन्ट आहे. प्रिसक्रिप्शन सकट कायदेशीर आहे, जरी कॅनबीज पासून बनलं तरी.

बाकी काय मिसळून काय काय झाले हे स्पेक्युलेशन आहे. ड्रग्ज मिसळले म्हणून असे झाले वैगेरे म्हणत काहीही गोष्ट रचता येईल मग.

मुंबई पोलिसांचा हप्त्याचा पैसा कुठपर्यंत पोचावावा लागतो आणि कशासाठी वापरला जातो हे उघडे गुपित आहे.

भ्रष्ट कारभार हा पूर्ण देशात आहे फक्त महाराष्ट्रात च सेना सत्तेवर आल्या पासून चालू झाला आहे असे नाही.
फडणवीस होते तेव्हा पण भ्रष्ट कारभार होता आणि आता पण आहे.
देशातील सर्वच राज्यात जोमात आहे पण महाराष्ट्र प्रशासन बाकी राज्य पेक्षा नक्कीच चांगल्या दर्जा चे आहे.

खोटी आश्वसने रेटून देण्यात फडणवीस पण मोदी पेक्षा बिलकुल कमी नाहीत.
ते मुख्य मंत्री झाले तेव्हा त्यांनी मुलाखत दिली होती ती आठवली.
किती किती छान छान चित्र उभे केले होते.
सरकारी ऑफिस मध्ये कामाचे दर पत्रक लावले जाईल.
सरकारी काम एवढ्या दिवसात झालेच पाहिजे असे बंधन कर्मचारी लोकांना घातले जाईल.
शेतकऱ्या ना असा फायदा पोचवलं जाईल की त्यांना कर्ज घेण्याची गरज लागणार च नाही.
आणि अशी अनेक आश्वासन दिली होती.
एक पण पूर्ण करता आले नाही.
मोदी शेतकऱ्यांचे उत्पादन डबल करणार होते डबल तर झाले नाही पण अर्धे मात्र झाले.

सुशान्र सिन्ग प्रकरणाचा तपास अजुन चालु आहे ना? मग पेशन्स ठेवा की जरा, त्याच्या प्रकरणातल्या गुन्तागुन्तितुन एन सि बायला अनेक ड्र्ग पेडलरला उचलता आले, बॉलिवुडचे ड्रग डिलर्सशी असलेले कनेक्शन ओपन झाले.
इथे खुपदा ड्रग्स म्हणजे काय चिल्लर प्रकार हो, अगदी कॉलेजच्या गेटवर, शाळेत सुद्धा चण्याफुटाण्यासारखीच मिळते त्यात काय एवढ टाइप पोस्ट येवुन गेल्यात, कुणि लिहल्या वैगरे बाजुला ठेवु पण
परवा आमच्या पासुन २ तासाच्या अन्तरावर असलेल्या अतिशय उच्चभ्रु लोकॅलिटी मधे एका भरधाव कारने रस्ता क्रॉस करत अस्लेल्या दोन हायस्कुल किडसला उडवले एकाचा जागिच आणि दुसर्‍याचा हॉस्पिटल मधे म्रुत्यु झाला. ड्रायव्हर ३० च लिमिट असताना गाडि ६०च्या पुढे चालवत होता,कॉलेज गोइन्ग पर्सन विथ पझेशन ओफ आणि अन्डर इन्फ्ल्युअन्स ऑफ ड्रग्स, घेतलेले अमाउन्ट अतिशय कमी होत तरी हाय मिळुन रेस लावायची दुर्बुद्धी झाली आणी पुढचा अनर्थ घडला.
काहिवेळेस एखाद्या घटनेचे अनेक रीपलकेशन होतात आणी वाइटातुन चान्गल घडत ते अस,सुशान्तच्या म्रुत्त्यु प्रकरणातुन ड्रग्स नेक्सस उघडकिस येवुन त्याला थोडी जरब जरी बसली तरी हेही नसे थोडके, बाकि सुशान्तची केस सिबीआय ने क्लोज केलेली नाही, निकाल मिळेपर्यत धिर धरु.

बापरे प्राजक्ता काय भयानक घटना आहे.. >>> होना वाचुनच कसतरी झाल, गुन्हा करणारी व्यक्ति प्रचन्ड श्रिमन्त आहे त्यामूळे बेल साठिची अमाउन्ट सुद्धा मिलियन्स ओफ डॉलर मधे सेट केली होती, घडलेल्या घटनेवर इथे फेसबुक ग्रुपवर पण खुप सन्ताप व्यक्त करुन झाला लोकान्चा.
मध्यतरी एल ए डाउनटाउन मधे पण साईड वॉक वर चालणार्‍या एका ९ मन्थ प्रेग्नन्ट बाइला एकाने ड्रग्सच्या इन्फ्ल्युन्स मधे गाडी चालवुन उडवले होते.

साप साप म्हणत भूई धोपटत राहिले.....पुढे जाऊन तर आख्खा डोंगर खोदून काढला ज्यातून एक पिटुकलासा ऊंदीर निघाला... मग म्हणाले अहो मला हा ऊंदीरच शोधायाचा होता ...लब्बाड माझ्या घरात चोरून चार दाणे तांदूळ खात होता Wink

दारूच्या नशेत गाडी चालवणार्‍या अनेक व्यक्तींनी आजवर शेकडो खून आणि अपघात घडवून आणून हजारो माणसे मारली आहेत पण दारू बंद झाली का. Proud
ह्यावरून एक शेर आठवला...
हम को मालूम है सुशांत की हक़ीक़त लेकिन
दिल को ख़ुश रखने को ड्रग्जका ये ख़याल अच्छा है Proud

तेच तर

ड्रग शोधायला सुशांत मरावा लागतो
मल्ल्याला पकडायला बँक मरावी लागते
चीनवर बहिष्कार टाकायला दिवाळी यावी लागते

सुशांतच्या कितीतरीआधी भाजपाचा महाजन ड्रग प्रकरणात सापडला होताच की
भाजपा नेते तर देवाच्या प्रसादाच्या पाकिटातून ड्रग तस्करी करताना सापडलेत

https://timesofindia.indiatimes.com/city/chennai/bjp-office-bearer-arres...

हायझेनबर्ग एकदम सही.

खून झालाय म्हणून शोध घेऊन रिया चक्रवर्ती सुट्टा मारते शोधून काढलं.
आणि ड्रग्जचा नेक्सस वैगेरे सापडलाय हे काय मला माहित नाही ब्वा. पण ऐकून असं वाटतंय जणू काय पाब्लो एसकोबार सारखा मोठा ड्रग्ज रॅकेट बंद पाडला. बॉलीवूड मधले ना ड्रग्ज बनवतात ना डिस्ट्रीब्युट करतात. कन्झ्युमर्स ना पकडण्यात काय हशील ?

तेच तर

मुंबईत कोथिंबीर आणि कांदाही उगवत नाही , मग ड्रग कुठून येतात ?

ड्रग उगवण्यात गायपट्टा आणि हिमाचल प्रदेश नंबर 1 आहेत
तिकडे शेतच पेटवून दिले की इकडे ड्रग येणारच नाहीत

Pages