सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दारूच्या नशेत गाडी चालवणार्‍या अनेक व्यक्तींनी आजवर शेकडो खून आणि अपघात घडवून आणून हजारो माणसे मारली आहेत पण दारू बंद झाली का.

--

दारुची व ड्रग्सची तुलना ?
शुद्धीवर आहात ना ?

हायझेनबर्ग मस्त पोस्ट!

फक्त हे प्रकरण तापवण्यात खऱ्या राजकारण्यांपेक्षा मिडिया आणि रिकामटेकडे सोशल मिडिया वीर यांच्याकडे जास्त दोष जातो.
आता इथलाच या धाग्याचा टीआरपी बघा ना!

कुणाला कुणाचे पडलेले नसते.... सगळे आपापले राजकीय/व्यावसायिक अजेंडे रेटत असतात!

Sumit , गंमत माहितीये का? दारू आणि कॅनाबीज मधली लाईन संपूर्ण पणे अर्बीट्ररी आहे. कॅनाबीज मध्ये असे काहीही घातक नसते जे दारुत किंवा तंबाखूत नसते. त्यामुळे काही अमेरिकन राज्य आणि कॅनडा मध्ये कॅनाबीज कायदेशीर आहेत.

ड्रग्ज म्हणजे हेरोईन आणि कोकेन हे नक्कीच दारूपेक्षा फार वाईट आहेत.

Pages