Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुशान्त कंगना यांच्या मुळे
सुशान्त कंगना यांच्या मुळे उडालेल्या धुरळ्याचा फायदा घेत पायल घोष नामक अभिनेत्रीने अनुराग कश्यपने मागे कधी तरी तिच्यावर अति प्रसंग केल्याचा आरोप केला. त्यात रिचा चढ्ढाच ही नाव गोवलं. रिचाने तिला कोर्टात खेचल्यावर पायलने माफी मागायची तयारी दाखवली.
सुशांत प्रकरणी चुकीच्या बातम्या चालवल्याबद्दल काही चॅनेल्सना दंड ठोठावलाय. रियानेही या चॅनेल्सच्या विरोधात कोर्टात जायला हवं. तीन महिने झालेला छळ , मनस्ताप, बदनामी यांची भरपाई होऊ शकत नाही. पण चॅनेल्सना धडा मिळेल.
या सगळ्या प्रकरणात सुशांतचं ड्रग्ज घेणं ही एकच गोष्ट पक्की समोर आली आहे.
हे मात्र नवीनच कळलं !
हे मात्र नवीनच कळलं !


म्हणे टी आर पी वाढवण्यासाठी रिपब्लिक ने घरो घरी ५०० रु दिले !
आणि त्या मुळे टी आर पी वाढला !
आणि तसे करणे गुन्हा आहे हे पण पहिल्यांदाच कळले , आणि इतक्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करायला मुंबई पोलिसां कडे वेळ आहे हे पण समजले !
आता त्या गुप्तेश्र्वर पांडे आणि मुंबई पोलीस मध्ये काडीचा फरक राहिला नाही .
दोघांनी पोलिसांचा आब धुळीस मिळव ला.
जिया खान च्या मृत्यू चा तपास करू शकले नाही , दिशा सालियान च्या मृत्यू चा तपास करू शकले नाही आणि टी आर पी स्कॅम मात्र बरोबर शोधून काढले !!!!!
काही तरी पटेल अशा केस मध्ये अडकवा ना अर्णव ला , हे काय बालिश आरोप लावलेत ?
वर महेशकुमार ने दिलेली समरी
वर महेशकुमार ने दिलेली समरी वाचता
1) सुशांत ला फायनान्स करणे ( इकडच्या भैय्यीणींच्या मते सुशांत रिया ला पोसत होता, त्यामुळे रिया ने सुशांत ला पैसे देणेहा प्रश्नच नाही)
2) सुशांत ला आश्रय देणे, (परत as per भैय्यीणस, सुशांतने च तिला आश्रय दिला होता)
या दोन्ही कलमांचा पूर्णपणे चुकीचा अर्थ लावला, कारण काहीही करून रियाला अटक करण्यास NCB आतुर होते.
कोरोना अपयश, बिहार निवडनुकांसाठी स्टेज सेट करणे, महाराष्ट्र पोलीस/प्रशासनावर कलंक लागावा या साठी ही सगळी धडपड होती, त्यांच्या दुर्दैवाने निवडणुकी आधीच सगळे चित्र साफ झाले.
महाराष्ट्र भाजप चे एकजात सगळे नेते यात उतरले,
काही नेत्यांनी आपल्या बायको च्या खांद्यावर बंदूक ठेऊन ट्विट केले .
कंगना नावाच्या वाह्यात नटीला प्यादे करून त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्री ला बदनाम करायचा घाट घातला.
आणि माबो चे भाबडे id यात राजकारण का आणता म्हणून धाय मोकलून रडत होते.
कंगना आणि किरण बेदी मध्ये भरपूर साम्य जाणवते,
दोघींना हुकुमाचा एक्का म्हणून रिंगणात उतरवण्यात आले. दोघी एका मर्यादे नंतर फेल गेल्या .
उपयुक्तता संपल्यावर किबे तर लायबिलिटी बनली मग तिला पुद्दुचेरी ला पुनर्वसित करण्यात आले,
कंगनाचे काय करतात ते पहायचे, ही यडी सेन्सॉर बोर्ड ची अध्यक्ष वगैरे नाही झाली म्हणजे मिळवले.
कंगनाचे काय करतात ते पहायचे,
कंगनाचे काय करतात ते पहायचे, ही यडी सेन्सॉर बोर्ड ची अध्यक्ष वगैरे नाही झाली म्हणजे मिळवले. >>
मुंबई पोलिसांनी मोठा TRP
मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला आहे. यात तीन टीव्ही चॅनल्स आहेत. अर्णब गोस्वामीच्या 'रिपब्लिक टीव्ही' या वृत्तवाहिनीचेही यात नाव आले आहे. या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु आहे असे मुंबईच पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी गुरुवारी सांगितले. रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल असे त्यांनी सांगितले.
या रॅकेटबद्दल सविस्तर माहिती देताना परम बीर सिंह म्हणाले की, ‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. “मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला” असे सिंह यांनी सांगितले.
“या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन अन्य चॅनलच्या मालकांना आज अटक करण्यात आली असे अधिकाऱ्याने सांगितले. या रॅकेटतंर्गत प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले जायचे असे पोलिसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी अर्बन ज्या
काही दिवसांपूर्वी अर्बन ज्या पद्धतीने उद्धव ठाकऱ्यांबद्दल बोलला, तसेच आज परमबीर सिंग बद्दल बोलतोय का पाहूया,
किती पाणी आहे त्याच्यात पाहूया,
बंगालात कोणीतरी भाजप्याची
बंगालात कोणीतरी भाजप्याची हत्या केली
सगळे ह्यांचेच लोक होते व घोषणा देत होते
कुणीतरी गोळी झाडली
अर्णव हा व्यक्ती न्यूज चॅनल
अर्णव हा व्यक्ती न्यूज चॅनल चालवायच्या लायकीचा नाही.
खोट्या बातम्या देणे,लोकांना अगोदरच आरोपी ठरवून त्यांना त्रास देणे.
देशातील कोणत्याच महत्वाच्या घटना ना न्यूज मध्ये स्थान न देणे.
अशीच बरीच फालतू काम तो करत आहे त्याची बाजू घेण्याची काहीच गरज नाही.
हा korea मध्ये असता तर ह्याला तोफेच्या तोंडी दिला असता.
आणि केंद्र सरकार भारताचे अस्तित्वात असते (आता फक्त नावाला आहे)तर रिपब्लिक टीव्ही बंद करून अर्णव ल अटक केली असती.
एक चांगला लेख!https:/
एक चांगला लेख!
https://gulfnews.com/opinion/op-eds/hounding-of-rhea-chakraborty-nationa...
शीर्षकच बोलके आहे !
Hounding of Rhea Chakraborty: National sport of India isn't cricket, it’s targeting women.
रियाला जामीन मिळताना कोर्टाने जी कारणे दिली आहेत ती तिच्या अटकेच्यावेळीही खरीच होती, मग अटक का केली व इतके दिवस आत का ठेवले हाही प्रश्न आहे. शिवाय इतके दिवस आत ठेवून एन सी बी ने फार काही मिळवले असेही नाही.
सीबीआय ने सुशांत चे पन्नास कोटीहून जास्त रुपयाचे व्यवहार तपासले, रियाने पैसे लांबवल्याचे काहीही अढळाले नाही. पंधरा कोटी या सर्व थापा होत्या.
सुशांत ने आत्महत्याच केली आहे.
एखाद्या मुलीला खांबाला बांधून लोक तिला "कुलटा, कुलटा" असे ओरडत दगड मारत आहेत असे दिसले तर आपण काय करावे ? लोकांना थांबवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा ? तिला अंग झाकायला आपला एखादा कपडा द्यावा? की घटकाभर करमणूक म्हणून आपणही दोन तीन दगड मारावेत व आपल्या कामाला निघून जावे ? ट्विटर तर गटारगंगाच आहे पण दुर्दैवाने इथेही आध्यात्मिक व कुटुंबवत्सल आयडीज ना दगड मारायचा मोह आवरला नाही. दिलगिरी व्यक्त होईल अशी आशाच नाही पण निदान इथून पुढे तरी थोडीशी एम्पथी दाखवावी हीच माफक अपेक्षा !
ओ तुम्ही नका लिहू
ओ तुम्ही असले काही नका लिहू
इथले लोक बोलताहेत तुमचे कुलकर्णी आडनाव खोटे आहे म्हणून ,
बाकी वडाचे झाड , मांजर , वगैरे आयडी असले तर चालते , पण कुलकर्णी ? आणि कुलकर्णी आडनाव घेऊन त्यांना वा वा म्हटले तर चालले असते बरे , मग शंका नसती घेतली त्यांनी
त्यांना नाही पटले की इथला आयडी डुप्लिकेतच असतो , जसा राहुल इटलीचा असतो तसे
Sudhir Suryawanshi
Sudhir Suryawanshi
@ss_suryawanshi
Reporters are crowding at Republic TV channel editor & owner Arnab Goswami office and residence to take his comment in connection manipulations fake TRP case. However, Arnab is evading the questions and not coming out to speak with media over fake TRP charges against his channel
कहाँ छुपा है अर्णव? सामने आता क्यों नहीं?
आध्यात्मिक व कुटुंबवत्सल
आध्यात्मिक व कुटुंबवत्सल आयडीज ना दगड मारायचा मोह आवरला नाही>>>>
वडीलधारे विशेषणं राहिले
हे बलात्कार तुमच्या
हे बलात्कार तुमच्या वर्गातल्या स्त्रियांवर झालेले नसल्याने ते महत्त्वाचे नसतील.
हे असले घाणेरडे विचार स्वतःपुरते ठेवा. इतरांबद्दल assume करू नका. Putrid and disgusting.
या रॅकेटबद्दल सविस्तर माहिती
या रॅकेटबद्दल सविस्तर माहिती देताना परम बीर सिंह म्हणाले की, ‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. “मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला” असे सिंह यांनी सांगितले >>>>>>
हो सगळं मान्य !!!
मला एकच विचारायचं आहे करोडो रुपयांचा घोटाळा आहे का हा ?
अती संवेदनशील प्रकरण आहे का हे ?
इतके महत्त्वाचे च्यनेल आहे का ते की त्या साठी कमिश्नर ने पत्रकार परिषद घ्यावी ?
त्या फडतूस च्यानल चे टी आर पी कमिश्नर अजुन का वाढवत आहे ?
या प्रकारे जाहीर इज्जत काढण्याचे काम एखाद्या पी एस आय ला दिले असते तर ते शोभले असते , कमिश्नर ला नाही !!!!!
याला म्हणतात
काम ना धाम अनं साऱ्या अंगाला घाम.
नाही. हा मुंबई पुलीसच्या
नाही. हा मुंबई पुलीसच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. आणि त्यावर कमिशनरने म्हणजे मुख्य जबाबदार माणसाने स्पष्टीकरण देणे गरजेचे आणि सयुक्तिक होते. मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि त्यांच्यावरचे आरोप खोटे होते हे बहकलेल्यांना स्पष्टपणे वजनदार शब्दांत सांगण्यासाठी.
विकु,
विकु,
रीयाचं ड्रग कनेक्शन हे खोटं आहे का?
बाकी मी याआधीही अनेक वेळा लिहिलंय की खरं काय ते कधी बाहेर येईल अशी आशा वाटत नाही. पण जे ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे ते पाहून लोक मत बनवत आहेत. एखाद्याला ड्रग बोर्नव्हिटाइतके इनोसंट वाटत असतील तर बाकीच्यांनाही तसंच वाटलं पाहिजे ही कुटूंबवत्सल अपेक्षा योग्य नाही.
बाकी भाजपवाले अगदी वाईट वाईट वाईट म्हणता म्हणता अचानक सामनाला फडणवीसांची मुलाखत हवीशी झाली. तेही लगेच मुलाखत द्यायला तयार झाले. मुलाखतीची तयारी करायला राऊत फडणवीस यांची हयात मध्ये अजून एक मुलाखत झाली. त्यानंतर भाजप समर्थक महाराष्ट्र भाजपवरच इतके भडकले आहेत की इतरांबद्दल बोलायची वेळच येत नाही. फडणवीसांना भेटल्याबद्दल राउत यांच्यावर मविआ समर्थक मात्र चिडलेले दिसत नाहीत.
पण यांच्या भेटीगाठी सुरू आहेत तर खरं काय होतं, ह्यात मध्ये काय बोलले आणि सुशांत केसमधील सत्य याबद्दल मला होप्स नाहीत.
Hounding of Rhea Chakraborty:
Hounding of Rhea Chakraborty: National sport of India isn't cricket, it’s targeting women.>> Arab newspaper is teaching India about women's issues.
Have they dare writing about state of women in Arab countries.
पण विकुंंच्या पु्र्ण पोस्ट ला अनुमोदन.
उलट होतंय !
उलट होतंय !
त्यांच्या स्पष्टीकरण मुळे बरेचसे बहकलेले नाही पटलं तरी योग्यच आहे म्हणून शेखी मिरवत बसतील ना .....
पण यांच्या भेटीगाठी सुरू आहेत
पण यांच्या भेटीगाठी सुरू आहेत तर खरं काय होतं, ह्यात मध्ये काय बोलले आणि सुशांत केसमधील सत्य याबद्दल मला होप्स नाहीत .


+११११११
खरंच की संपादक आणि फडणवीस दोस्ती सगळे जण विसरून गेले !
अय्या ५० ग्राम कोकेन आणि १०
अय्या ५० ग्राम कोकेन आणि १०-१२ कोटींची कथित फ्रॉड शोधायला ईडी आणि एनसीबी आले होते की.
ते बाकीचे दोन च्यानल कोणते ते
ते बाकीचे दोन च्यानल कोणते ते सांगितले का हो साहेबांनी ?
राग खूप होता म्हणून ठळक पने रिपब्लिक चे नाव घेतले समजू शकत !
पण ते बाकीचे दोन च्यानल कोणते ?
फडणवीसांना भेटल्याबद्दल राउत
फडणवीसांना भेटल्याबद्दल राउत यांच्यावर मविआ समर्थक मात्र चिडलेले दिसत नाहीत. >> त्याला प्रगल्भ राजकारण म्हणतात. विरोधी पक्ष नेता अस्पृष्य नसतो (जसं एक विश्वगुरू मानतात).
११११११
११११११
खरंच की संपादक आणि फडणवीस दोस्ती सगळे जण विसरून गेले !
मविआ समर्थक आपल्या विरोधात बोलणारे सगळे लोक म्हणजे जुन्या ओनीडाच्या जाहिरातीतील शिंगंवाला राक्षस आणि आपण आणि आपले बॉलिवूड म्हणजे अगदी न्यायप्रिय आणि इनोसंट (बंगल्यावर नेऊन मारहाण, कार्टूनसाठी डोळा फोडणं इत्यादी notwithstanding) अशा थाटात वावरत असतात.
पण भाजपच्या टॉप नेत्याची मुलाखत सामना त कशाला, त्यासाठी ह्यात मध्ये एक प्रदीर्घ प्री-मुलाखत कशाला, असे प्रश्न त्यांना पडत नाहीत. हुशार आहेत ते.
खरं तर हे सगळे नेते एकमेकांच्या घरी गणपतीला जातात, एकमेकांच्या मुलाखती घेतात, फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये क्लोजड डोअर मिटिंग्ज घेतात, पक्षांतरं करतात, वरवर विरोध दाखवत गुप्तपणे एकमेकांसाठी सेटिंग पण करतात. म्हणूनच वाटतं की काही होप्स नाहीत.
हो ना मनीष ! जर तुमच्या जैन
हो ना मनीष ! जर तुमच्या जैन धर्मावर खरे बोललेले तुम्हाला चालत नाही >> बोला की.. मी कधी अडवलं आहे? मी स्वतः शिव्या घालतो चुकीच्या गोष्टींवर.. आणि मी "तुमच्या" हिंदूधर्माबद्दल कुठं काय बोललोय? काही शक्यता लिहिल्या त्या तुम्हाला एवढ्या का बोचल्या?
तसे हि इथे सेनेची बाजू
मविआ समर्थक आपल्या विरोधात बोलणारे सगळे लोक म्हणजे जुन्या ओनीडाच्या जाहिरातीतील शिंगंवाला राक्षस आणि आपण >>>>>
तसे हि इथे सेनेची बाजू मांडणारे कोणी वाटतं नाही !

आणि संपादक ची बाजू तावातावने काँग्रि का म्हणून मांडतील ?
सध्या फक्त भाजप ला बाहेर ठेवायच्या या मुद्द्यावरून माय नो नी हिरवा कंदील दाखवला म्हणून येथील काँग्रि पण संपादक ला ' आदर्श संपादक ' मानत आहेत .
एकच वाटतात !
ते अर्णव समर्थकांना शोधून शोधून , उत्तर कोरियातील किम जोंग कडून आणलेल्या तोफांनी उडवत सुटले आहेत
आज कधी नव्हे ते रिपब्लिक
आज कधी नव्हे ते रिपब्लिक बघितले !
हाई ट झाली !
अर्णव एफ आई आर ची कॉपी दाखवतोय त्यात स्पष्ट पने इंडिया टुडे चा उल्लेख असताना हा अधिकारी रिपब्लिक चे नाव घेत होता !
त्या साठीच मी प्रतिसाद दिला होता तो गुप्तेश्वर आणि यांच्यात काडीचा फरक राहिला नाही ....
त्या निमित्ताने
हिरा आणि रंगीत खडा यातील फरक दिसून आला !!!!!
म्हणजे हे लोक थोडे फार पण शिकलेले नसतात का ?
एप्रिल मध्ये त्या वाधा वण केस मध्ये झालेली बदनामी पुरेशी नव्हती का ?
हे मात्र नवीनच कळलं !
हे मात्र नवीनच कळलं !
म्हणे टी आर पी वाढवण्यासाठी रिपब्लिक ने घरो घरी ५०० रु दिले !
आणि त्या मुळे टी आर पी वाढला !
Happy
आणि तसे करणे गुन्हा आहे हे पण पहिल्यांदाच कळले , आणि इतक्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करायला मुंबई पोलिसां कडे वेळ आहे हे पण समजलेने
फालतु चनेल देश बिघ्डवु शक्ततात
Wow इंडिया टुडे?
Wow इंडिया टुडे?
Bjp samathsk म्हणजे bjp नी
Bjp samathsk म्हणजे bjp नी विकत घेतलेले बाकी चॅनल पण धास्तावले आहेत.
फेरफार करून ,टीआरपी वाढवणे,कर्ज बुडवणे,खोट्या बातम्या देणे अशा सर्व गैर कामात मालक ( मालक म्हणजे स्व घोषित फकीर ) प्रमाणे हे पण व्यस्त आहेत.
त्या मुळे बाकी पण चांगलेच घाबरले आहेत.
3 kmpnyaanchi naave aahet
3 kmpnyaanchi naave aahet
Pages