माझे घरातले ऑफिस -- कामाचा कोपरा

Submitted by किल्ली on 20 August, 2020 - 06:24
kamacha kopra

Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.

Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.

काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.

हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक Happy

तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.

येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.

मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------

Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults


--

ऋन्मेष, भिंत मुलाने रंगवली आहे का?? छान रंगकाम. Happy
>>>
धन्यवाद, पण मुलाने नाही मुलीने.
त्या बिचारयाचा जन्म होण्याआधीच तिने घरातील प्रत्येक भिंतीचा कानाकोपरा आपल्या मालकीचा केला. त्याला रंगवायला काही शिल्लकच ठेवले नाही. त्याच्यासाठी पुन्हा एक रंगाचा हात मारायचा विचार करत होतो. पण त्याला आवड नाही तितकी रंगकामची.

माझ्या मुलाने रंगवून झालेत, आता मुलीने सुरु केलयं.
किती ही क्रेऑन, स्केच पेन लपवून ठेवा, कुठुन तरी सापडतच तीला. Happy

च्रप्स Proud
नशीब आमच्यात विडिओ कॉलिंग नसते. अन्यथा साफसुथरा बॅकग्राऊण्ड शोधणे दिव्य होते.
मुलीचा फोटो वा विडिओ काढावा लागतो तेव्हा आम्हाला मागे चादर पडदा लावावा लागतो.

मागचा पसारा झाकायची सोय टीम्सवर आहे..... अगदी ऑफिस सेटअप पासून वाळवंट, बीच कुठलीही बॅकराउंड सिलेक्ट करु शकता!
बाकी ॲप्सवरही असावी ही सोय.... नक्की माहिती नाही!

अच्छा चेक करायला हवे. मुलीच्या ऑनलाईन क्लासला उगाच पोरीने उधळलेले रंग दिसत राहतात.

मानव
तुमचे लॅपटॉप ठेवलेले ड्रेसिंग टेबल(ड्रेसिंग टेबल म्हणतेय कारण समोर आरसा आहे) अगदी 5 स्टार हॉटेल मधल्या सारखे आहे

मी_अनु माझं नोकरीतलं जवळ जवळ अर्ध आयुष्य हॉटेलमध्ये गेलंय.
ही तशी गेस्ट बेडरूम. हॉटेल वरूनच कल्पना घेऊन हे ड्रेसिंग- कम-युटिलिटी(बॅग ठेवून उघडायला, काम झालं की खाली सारकवायला)-कम-वर्क स्टेशन असं करून घेतलंय.
वरती पुस्तक ठेवायचं शेल्फ आहे जे फोटोत आले नाही.

भरपूर वेळ आहे अजून निवृत्त व्हायला.
हां, मध्येच कुठले घबाड मिळाले तर विचार करता येईल लौकर निवृत्ती घेण्याचा. पण तरी काहीतरी करावे लागेलच ना.

५०

सगळ्यांची घरची ऑफिसेस मस्त आहेत
मी तर गेले वर्षभर घरून काम करतोय
आणि व्हीडिओ कॉल वगैरे कधी नसतोच
त्यामुळे एक लाकडी डेस्क घेऊन बेडरूम मध्ये निवांत पाय पसरून गाणी ऐकत काम करतो
जास्त वेळ खुर्चीवर बसायला आवडत नाही
पुणेरी असल्याने दुपारी जेवण करून झाल्यावर तिथेच वामकुक्षी पण घेता येते Happy

अहो मानवमामा ते आशुचॅम्प सायकलवरून भारतभ्रमण करणारे, गडकिल्ले चढणारे, शेकड्याने सुर्यनमस्कार मारणारे आहेत. त्यांच्या फिटनेसची काळजी करण्याची चिंता नसावी असे वाटते.
उलट कारने ऑफिसला जाणारे आणि जॉब प्रोफाईलच तसे म्हणून नाईलाजाने का असेना दिवसभर तिथे एसीत खुर्ची उबवणारे अशी लोकं फिटनेसच्या दृष्टीकोणातून ॲज गूड ॲज वर्क फ्रॉम होमच करत असतात.

धन्यवाद अभिषेक
मी सुद्धा माझी ओळख इतक्या चांगल्या पद्धतीने करून देऊ शकलो नसतो Happy

मानव मामा अहो आराम नाही करत हो, माझं काम बैठ्या स्वरूपाचे आहे त्याला काय करू?

छान विषय आणि प्रतिसाद सुद्धा एकसे बढकर एक Happy माझा कोपरा इतका नवीन नाही कारण तो डेव्हलप करून वर्षे लोटली आहेत. एकेकाळी फारसा वापरात नसलेला हा भाग, कामाची जागा म्हणून काही वर्षापूर्वी डेव्हलप करून घेतला. नंतर माझा जास्तीत जास्त वेळ इथेच जाऊ लागला. लॉकडाऊनच्या काळात तर सर्वाधिक वापर झाला व होतोय. टेबलच्या पोजिशनमध्ये अधूनमधून बदलत होतो. सध्या खिडकी समोर येईल असे आहे. उजव्या बाजूचा व्हाईटबोर्ड बहुउद्देशीय. ऑफिसच्या कामासाठी, मुलाला शिकवण्यासाठी, महत्वाचे TODO लिहून ठेवण्यासाठी इत्यादी. आणि त्याची पलीकडची बाजू ऑफ-व्हाईट असल्याने उलट करून लावला कि प्रोजेक्टर वर मुव्ही पाहण्यासाठी Happy
MyCorner.jpg

भारी, घरातील ऑफिसं.

Pages