तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

मी / आम्ही प्लास्टिक आईस क्यूब्ज वापरतो, म्हणजे शेवटी शेवटी ड्रिंक्स डायल्युट होतात तशी न होताही शेवटपर्यंत चिल्ड ड्रिंक सिप करता येतं.

व्हिस्की स्टोन्स त्यापेक्षा बेटर असतात का? मला वाटतं की प्लास्टिक आईस क्युब्ज पेक्षा स्टोन्स लवकर वॉर्म होत असतील.

अजिंक्यराव, जुन्या लिंक्स शोधून काढून इथे शेअर केल्यात, धन्यवाद !! मस्त आहेत लेख. पुन्हा वाचायला मजा आली.
नी चा व्होडका जेली शॉटचा पण एक धागा आहे. नवीन वाचकांसाठी त्याची पण लिंक इथे द्याल का? जेली शॉट्स आमच्या सगळ्या पार्टीजमध्ये हिट हातखंडा आणि लोकाग्रहास्तव बनवावेच लागतात. ते मी नीधपचा धागा वाचूनच बनवायला लागले.

प्लास्टीक क्यूब्स कधी वापरले नाहीत, त्यामुळे कल्पना नाही. पण स्टोन्स फ्रीझर मधे असतात आणी ड्रिंक डायल्यूट न करता, पुरेसं गार करतात, ह्याचा अनुभव आहे. बाकी अश्विन म्हट्ल्याप्रमाणे डिहायड्रेशन न होऊ देणं हे महत्वाचं आहेच. सहसा वीकेंड ला घरी पिताना असा फारसा प्रश्न येत नाही, पण पार्टी ला वगैरे चार मित्रांबरोबर पीत असलो (अगदीच इतिहासातली घटना वाटतेय आता ही.... जाने कहाँ गये वह दिन.. Uhoh ) तर अधून मधून पाणी पित रहावं.

बाकी चहात मिक्स करायच्या गोष्टींची यादी पाह्यल्यावर दारू अजून आपलं सोवळं बरंच टिकवून आहे असं म्हणावं लागेल. Wink Happy

बाकी चहात मिक्स करायच्या गोष्टींची यादी पाह्यल्यावर दारू अजून आपलं सोवळं बरंच टिकवून आहे असं म्हणावं लागेल.>>>>

कडक Happy

ऑ..!! चहाच्या धाग्यावर प्रतिसाद उडवले जात होते आता दारुच्या धाग्यावरपण तोच प्रकार. एक माणुस रागावलं वाटतं.

स्टोन्स फ्रीझर मधे असतात आणी ड्रिंक डायल्यूट न करता, पुरेसं गार करतात, ह्याचा अनुभव आहे. >>> आभारी आहे, एक सेट आणून try करायला हवं. मला उगीचच वाटत होतं की प्लास्टिक आईस क्युब्ज पेक्षा स्टोन्स लवकर वॉर्म होतील आणि ड्रिंक तितकंसं गार रहाणार नाही. भरपूर पाणी पिण्याबद्दल सहमत. नाही तर डिहायड्रेशन आणि डोकेदुखी नक्कीच.

अजिंक्यराव, तो धागा इथे आणण्यासाठी आभारी आहे. फार भन्नाट लागतात हे जेली शॉट्स. व्होडका फॅन्सना विशेषच आवडतात.

ओरिजिनल क्यूब्स म्हणजे तेच असतात
पण ती नदी स्कॉटलंड मधली पाहिजे
आपल्या नदीत इतकं प्रदूषण आणि कचरा असतो की ते गोटे दारूत घालून प्यायच्या कल्पनेनेच कसे तरी होते
आल्यावर चांगले खळखळून उकळून घेतले तर

बाकी त्या धाग्यावर लॉंग आयलंड ची कृती वाचून बिग बँग थिएरी आठवली ज्यात पेनी शेल्डन ला चहा म्हणून हा चहा पाजते आणि नंतर तो असला धुमाकुळ घालतो Happy

का म्हाळसा?

मानव - मंडळात बरीच कामे असतात म्हणून थकवा घालवायला उपाय असतो तो...

आमच्याकडे आजपासूनच नो दारू, नो नॉनव्हेज, नो कांदा लसूण नियम लागू झालाय
आणि इतक्या वर्षांच्या लग्नानंतर नियम न मोडण्यात शहाणपण आहे हे शिकलोय Happy

आशुचॅंप आले धाग्यावर आले ..
आता “कुणी तरी येणार येणार गं“ गाणं म्हणायला हरकत नाही
..
गुरू हो जा शुरू

ऑ अहो ते गाणं वेगळ्या प्रसंगाचे आहे Happy
आमच्या घरी कुणीतरी येऊन आता 13 वर्षे झाली
आणि आमचं दुसरं पिल्लू चार पायवाल आहे
तो आता आठ महिन्यांचा आहे

बकर्डी ब्लॅक भरपूर लिंबू पिळून सोबत कोक
थोडा बर्फ
केळा वेफर्स, चितळे बाकरवडी आणि मक्याचे उकडलेले चाट मसाला मिक्स दाणे

Pages