तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

झकास लिहिलंय रश्मीनतेज.. आणि धन्यवाद.

शास्त्रीय संगीतासोबत पिण्यातदेखील एक वेगळीच धुंदी आहे. माझ्या आवडत्या गाण्यात "याद पिया की आये", काटा रूते कुणाला.. एकदा तर निर्गुणी भजनेसुद्धा ऐकली आहेत. बऱ्याचवेळा देवानं गाता गळा दिला नाही या गोष्टीची खंत वाटते, पण ऐकता कान दिलाय हे ही नसे थोडके!

भक्तीगीते अन पिणे! भारी असतंय Wink

बर्‍याचदा काहि संस्क्रूत (हे कसं लिहायच?) श्लोकांचे यु ट्युबवर रिमिक्सपण ऐकलेत! मजा येते! उगाच नाय आपले शहाणे पुर्वज, सोमरस घेत एन्जॉय करायचे!

हा हा हा, जबराट
Happy

दोन दिवसात श्रावण संपतोय पण बाप्पा पण येऊ राहिलेत
तोवर चहा कॉफीच Happy

पण बाप्पा पण येऊ राहिलेत
तोवर चहा कॉफीच Happy
>>>>>

बाप्पांनाही आवडत नाही म्हणजे भक्तांनी मद्यपान केलेले Happy

बाप्पांनाही आवडत नाही म्हणजे भक्तांनी मद्यपान केलेले
>>>>

नई बायकोला, ती खूप बोलते मग
आता तुझं ही लग्न झालं म्हणतोयस तर तुलाही अनुभव असेल बायकोचे ऐकण्यात शहाणपण असते ते

ऊन खूप आहे>>>>

कुठल्या भागात, आमच्या इथे तुंब्या पाऊस पडायलाय

नई बायकोला, ती खूप बोलते मग
>>>>
बायको बाप्पांचे आगमन झाल्यावरच का बोलते? याचा अर्थ बाप्पांनाच आवडत नाही ना भक्तांनी मद्यपान केलेले. मग का नाही वर्षभर ऐकावे बाप्पांचे Happy

ते आता बाप्पा आणि बायको बघून घेतील ना
आपण कशाला पडावं त्यात
ती नको म्हणाली की नको
आण म्हणाली की आणायचं
विषय संपला

त्यांची बायको माबो वाचत असेल... कशाला त्रास देतोय तू ऋन्मेष...
आणि हे उदाहरण पुरेसे आहे... दारूचे व्यसन न लागताही दारू एन्जॉय करता येते... अक्खा श्रावण नाही पिली आशु यांनी आणि आता ते गणपतीत पण पिणार नाहीयत...

पीटर स्काॅट कशी आहे ......? व आन दि राॅक्स किंवा नीट प्यावी का..?>> अहो कोणी तरी महेशकुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाचंही उत्तर द्या.

पीटर स्कॉच विषयी स्पेसिफिक माहीत नाही, पण शक्यतो व्हिस्की मधे काही अ‍ॅड करू नये असं माझं मत आहे. अगदीच खूप स्ट्राँग वाटली तर थोडसं पाणी/सोडा/बर्फ घालून बघा.

पीटर स्कॉट बद्दल पास
कधी नाही वाट्यास आली त्यामुळे सांगू शकणार नाही
पण सिंगल malt आहे त्यामुळे ऑन द रॉक्स बेस्ट लागेल

नुसती हार्ड व्हिस्की असेल तर करावं मिक्स
शक्यतो सोडा आणि बर्फ

जेवढी प्रीमियम तेवढी स्मूथ आणि मग काही मिक्स करायची गरज नसते
त्यांना अंगभूत स्वाद आणि गंध असतो
त्यात भेसळ केली तर मजाच जाते
एकेक सिप घेत आस्वाद घ्यावा

शास्त्रीय संगीतासोबत पिण्यातदेखील एक वेगळीच धुंदी >>
बर्‍याचदा काहि संस्क्रूत (हे कसं लिहायच?) श्लोकांचे यु ट्युबवर रिमिक्सपण ऐकलेत! मजा येते! उगाच नाय आपले शहाणे पुर्वज, सोमरस घेत एन्जॉय करायचे!>>
अक्खा श्रावण नाही पिली आशु यांनी आणि आता ते गणपतीत पण पिणार नाहीयत...>>
बाकी काही म्हणा.. सगळ्यात जास्त रसिक व सय्यम बाळगणारे लोक ह्याच धाग्यावर बघितलेत.. बाकी धागे तो बस चाय कम पानी है Wink

च्यायला माझ्या त्या मित्राच्या, एक दिवस दारू पाजली तर एवढा घोळ झाला.. तुमच्या कुणाकडे पार्टी असली तर कळवा मी येईन.. शुभ्रा पण डोक्याला शॉट आहे, लै डोकं फिरवते, तिच्यामुळे दारू प्यावी लागणार मला.. असो, कळवा नक्की,

-बबड्या cool उर्फ सोहम कुलकर्णी फ्रॉम अगगबाई सासूबाई!

बाटलीतून पेल्यात घ्यावी.
नंतर पेल्यात आणि बाटलीत पाणी ओतावे.
बाटलीला बुच आणि तोंडाला पेला लावावा
बाटली कपाटात आणि दारू पोटात जाऊ द्यावी

मी पण बर्फ च घेतो आणि सगळ्यात आधी दोन आणि मग नंतर एकेक ऍड करत जातो ड्रिंक संपेपर्यंत
दोन पेग च्या मध्येही एक ते दोन भांडे भरून नुसते पाणी पितो
पिणे संपल्यानंतर ही भरपूर
एकूण लिटरभर पाणी ढोसतो
त्याने दुसरे दिवशी अजिबात हंग ओव्हर किंवा पित्त होत नाही
रम घेत असेन तर मग अजून प्रमाण वाढवतो
जितके ड्रिंक हार्ड तितके जास्त पाणी

Pages