जेली शॉटस

Submitted by नीधप on 23 June, 2018 - 03:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१. वेकफिल्ड किंवा तत्सम कुठलेही बाजारात उपलब्ध असलेले जेली बनवायचे पाकीट. फ्लेवर आपल्याला हवा तो. पण एकदा कैरी फ्लेवर मिळाला होता तो सगळ्यात उत्तम लागला होता.
२. व्होडका (जी उपलब्ध असेल ती)
३. पुदिन्याची चार पाच पाने
४. लिंबाचे ७-८ थेंब
५. पाणी.
६. शॉट ग्लासेस किंवा जेली ज्यात सेट करायची ती भांडी.

क्रमवार पाककृती: 

एका धाग्यावर कुणीतरी विचारलं म्हणून ही पाकृ टाकते आहे. शेवटचे शॉटस करून ३-४ वर्ष झाली. फोटोही तेव्हाचेच आहेत.
जेलो शॉट्स हे नाव थोडं वेल्क्रो किंवा झेरॉक्ससारखे आहे. जेली शॉटस हे योग्य नाव.
अगार अगार पावडर वगैरे आणून उद्योग करायचे होते. पण त्याला मुहूर्त लागलेला नाही अजून. तस्मात तूर्तास हा शॉर्टकट प्रयोग गोड मानून घ्या.

१. जेलीच्या पाकिटावरच्या सूचना वाचा. त्यात किती पाणी घ्यायचे ते लिहिलेले असते. त्या क्वांटिटीच्या अर्ध्याइतकीच व्होड्का घ्या. स्ट्राँग करायचे म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायला गेलात व्होडका तर जेलीचा पचका होईल. खरोखरीचा. जे काही तयार होईल त्याला सॉलिड लिक्विड न म्हणता पचकाच म्हणावे लागेल.

पुदिन्याची ४-५ पाने लिंबाच्या रसात बारीक खलून घेऊन ते व्होडकामधे घाला. हे मिश्रण थंड करायला फ्रिजात टाका. थंडच करायचंय. बर्फ करायचा नाही. थंड करायला बर्फ व्होडकात घालू नका.

२. पाकिटात दोन पावडरी असतात. त्या दोन्ही एकत्र करून कोरड्या मिसळा

३. त्यावर पाणी घालून ते विरघळवा. किती पाणी हे सांगितलेले असते सूचनांमधे. त्याच्या अर्धेच पाणी घेऊन पावडरी विरघळवा.

४. गॅसवर चढवा. उकळी आली की गॅस बंद करून गॅसवरून उतरवा.

५. आता गार केलेली व्होडका बाहेर काढून या मिश्रणात हळूहळू ओता. एकिकडे ढवळत रहा.

६. यानंतर आपल्याला हव्या त्या डब्यात/ आकारात/ वाट्यांमधे वगैरे हे मिश्रण भरा. मी ते छोटेसे डिस्पोजेबल कप मिळायचे त्यात भरले होते आजवर. आता काहीतरी वेगळी सोय करावी लागेल.

७. भरून झाले की सगळे फ्रिजात टाका. तासभर लागतो जेली सेट व्हायला. पण फ्रिज सतत उघडला जाणार असेल तर जास्त वेळ लागेल. डीप फ्रिजात टाकू नका.

८. तासाभराने सेट झाली गिळा. (जेली ही खायची वा प्यायची गोष्ट नसल्याने. गिळणे क्रमप्राप्त)

1601002_774103112617316_335979792_n.jpg10176204_10152083623152151_6897786490314782963_n.jpg

एकाच डब्यात जेली सेट करून मग केक कापल्यासारखे त्याचे तुकडे करूनही खाता/पिता येईल हा शॉट किंवा वेगवेगळे कप भरूनही.
चव गोड लागते त्यामुळे कळत नाही किती व्होडका जाते पोटात ते. थोड्यावेळाने एकदम जाणवतं आपलं गणित गंडायला लागल्याचं. त्यामुळे जपून.

वाढणी/प्रमाण: 
एका पाकिटात साधारण १५ शॉट ग्लासेस (३/४ एवढे) भरले जातात.
अधिक टिपा: 

व्होडकाऐवजी जिनपण चालते. मी हुर्राकचा प्रयोग केला होता. खास झाला नाही.
इतर सफेद दारवाही चालायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट व प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगबेरंगी जेलो शॉटचे फोटो मस्त दिसत आहेत .

फेसबुकवर टिप्सी बारटेंडर नावाचे पेज आहे . तो माणूसही भन्नाट बनवत असतो . कलिंगडचे जेली शॉट्स बनवलेले त्याने . मस्त असतात त्याचे व्हिडीओ .

गेल्या वर्षी टिप्सी बारटेण्डर बरेच दिवस फॉलो केलं. पण मग त्याची सगळी कॉकटेल्स सिरप, मिल्क, चॉकोलेट वगैरेवाली यायला लागल्यावर बोर झालं. मग थांबवलं. पण त्याने काही काही खूप भारी दाखवली होती.
घोळ असा होतो की त्यातले अर्ध्याहून अधिक घटक इथे मिळत नाहीत. अर्थात हौस असेल तर शोधाशोध करता येतेच एकेक नाव घेऊन.

Thanks. वाह क्या बढीया दिन चुना है । शनिवार संध्याकाळ स्पेशल कशी करायची हे सोप्यात जमून गेलं. मी विकफिल्डची जेली नेहमीच करते, त्यामुळे हे शॉट्स बनवणं, अगदीच जमून जाईल. फक्त माझ्या जेली मेकिंगमध्ये दोन स्टेप्स वेगळ्या आहेत. 1. कोरड्या पावडर्समध्ये मी उकळते पाणी ओतते. तू सांगितलस तस गार पाणी घालून मग ते मिश्रण उकळत नाही. 2. उकळते पाणी ओतल्यावर मिश्रण थंड होताना जेली सेट होते, मग मी ती रेफ्रिजरेटरमध्ये थंड करते, (एकदा गरम मिश्रण लवकर सेट होण्यासाठी लगेच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यावर जेली फ्लॉप झाली होती. )

थोडासा माझ्या सवयीचा रेसिपी मधला फरक करून आज व्होडका शॉट्स बनवणार. शनिवार संध्याकाळ आहे, जास्त शॉट्स पिऊन / खाऊन / गिळून गंडायच ठरवलं आहे हे नक्की.

बेस्टच बघा!!

मीच तो प्रश्नकर्ता होतो बघा.

तुमचे खूप खूप आभार.

कळते पाणी ओतल्यावर मिश्रण थंड होताना जेली सेट होते, << अगं हो थंडगार व्होडका मिक्स करणे, छोट्या छोट्या शॉट ग्लासेसमधे भरणे यात ते सेट व्हायला लागतेच. जाम घाई करावी लागते ते भरताना.
परत बहुतेक कुठली कशी हवा आहे त्याचा फरक पडत असावा. मुंबई दमट असते त्यामुळे मला वेळ मिळाला.

22683859-03A2-4E28-A934-0D4FE209AACF.jpeg
मधे एका पार्टिला कुणीतरी ग्रेपफ्रुट्स मधे सेट करुन आणले होते शॉटस , आम्ही न पिणारे असल्याने चविची आयडीया नाही पण तुकडा कापुन चोखायचा अस चालल होत मन्डळिच

नॉन अल्कोहोलिक पन होते शॉर्ट यात पण मागे एक्दा ऑज्युस मधे टकिला का काहितरी पारदर्शक मिसळेले ग्लास चुकुन एक्स्चेन्ज झाल्याने माझ जाम डोक उठल होत.
तुझे फोटो पण भारी आहेत कलरफुल! पानी पुरीचे ही शॉटस करतात अस एकल पण त्यात काय मिसळतात ते नाही माहिती.
टेस्टी वर पण खुप व्हिडियो आहेत.

पाणी पुरी शॉटस म्हणजे पापुचं जे पाणी करतात त्यात व्होड्का असते. मी कधी केले नाही. पापुमधे काहीही मिसळणे हे व्होडक्यात इतर काही मिसळण्यापेक्षा मोठे पाप आहे. Proud