गौरी सावंत पुन्हा एकदा...अफलातून कविता....
'वाईन' असते वायोलिन सारखी...
वेदनेच्या तारा हळुवार छेडणारी...!.
श्वासामध्ये विरघळून काळजाला भिडणारी...
उदास उदास कातरवेळी...
वर वर बिनधास्त...आत आत हळहळणारी...!
'रम' असते तबल्यासारखी....
सगळ्या संवेदना क्षणात जागवणारी..!
एका नादखुळया स्पर्शानेच...
धरेवरुन आभाळात झेपावणारी...!
रात्रभर तालाच्या आवर्तनात घुमून ...
पहाटे पहाटे समेवर येणारी !
'बिअर' असते मंदधुंद बासरी...
ओठांनी स्पर्शिली की ओठांपेक्षाही लाजरी..!
नसानसांतून वाहणारी, अलगद आणि लहरी..!
'शँम्पेन' असते मँच जिंकल्यावर निनादनारा उस्फुर्त बिगुल...
कुणी दखल घेतली तर ठीक,..नाहीतर आपल्यातच मश्गुल..!
'जीन' असते अस्सल जातिवंत संवादिनी...
सुरात जमली तर गझल नाहीतर गूढ विराणी !
'वोडका' मात्र जरा जपून...जुन्या पियानो सारखी...
नव्या चवीत हरवलेल्या ..खरया रसिकाला पारखी..!!
'स्कॉच' म्हणजे झटका देणारी गिटार ...
कलत्या रात्री, भलत्या क्षेत्री, झुलत्या चंद्राबरोबर...
प्रत्येक ठेक्याला डोक्यात चढणारा थरार..!
मद्य नसेल तर वाद्यांचा नुसता कोलाहल...
वाद्य नसेल तर मद्य जाचक, जहरी हलाहल...
दोन्ही नसतील तर अवघे जगच सुनी सुनी मैफल...!!!
......गौरी सावंत,कणकवली
छान आहे आवडली
छान आहे आवडली
छान पण विदेशीच्या नशेत देशीला
छान पण विदेशीच्या नशेत देशीला विसरलात वाटत?
(मस्करी केली)
शशांक , ही कविता नक्की गौरी
शशांक , ही कविता नक्की गौरी सांवतचीच का ?
होय ...गौरी सावंत च वय जास्त
होय ...गौरी सावंत च वय जास्त नाहिये...माझ्या एवढच असाव...
सुंदर कल्पना. दोन्हींची एक
सुंदर कल्पना. दोन्हींची एक नशा असते, त्यामुळे साम्य नक्किच आहे.
छान!!!आवडली.
छान!!!आवडली.
वाह वाह... इस बात पे एक एक
वाह वाह... इस बात पे एक एक पेग हो जाये

अजून एक असेच आठवलेले
संसार उध्वस्त करी दारू
म्हणून म्हणतो संसार नका करू
चला एक एक पेग मारु
चविष्ट,नादिष्ट कविता!
चविष्ट,नादिष्ट कविता!
अहा
अहा