..

Submitted by .. on 6 June, 2012 - 15:41

इथला मजकूर संपादित केला आहे. क्षमस्व .. .. .. .. ..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>शांतपणे बसून पी
Lol

वाईन म्हणजे हार्ड ड्रिन्क नव्हे. ते जिन, रम, व्होडका, व्हिस्की इ.
वाईन म्हणजे मदिरा तरी कुठे? Wink

..

Lol

स्ट्रिक्टेस्ट सेन्समधे बियर आणि वाइन हार्ड ड्रिंक्स नाहीत हो मवा! Proud (फरमेंटेशन प्रोसेसने बनतात, डिस्टिलेशनने नाही म्हणून.)

मवा, हा धागा उघडताना तू बहुतेक ग्रूप निवडायला विसरली आहेस. तो 'विरंगुळा' किंवा तत्सम योग्य त्या ग्रूपमध्ये हलवशील का ? धाग्याच्या 'संपादन' मध्ये जाऊन ग्रूप निवडता येईल Happy
किस्से फुरसतीत लिहिते Wink

अगो, गृप मी 'अवांतर' असा निवडला कारण विरंगुळा दिसलाच नाही. म्हणून मी शब्दखुणांमध्ये विरंगुळा लिहीले. कदाचित मी लेखनाचा धागा म्हणून सुरु केल्याने विरंगुळा गृप दिसत नाहीये. Uhoh

Happy

माझी लहानपणापासून किंवा कळत्या वयापासून इच्छा होती की एकदा दारु पिऊन टल्ली व्हायचं आणि त्यानंतर आपण कसे वागतो ते रेकॉर्ड करून ठेवायचं गम्मत बघायला .. :p

पण बियर, वाईन, कॉकटेल्स् सगळं ट्राय करून बघितलं पण काहिही घशाखाली उतरतच नाही .. तेव्हा माझी इच्छा अपूर्णच रहाणार ..

मवा Happy मग हार्ड रॉक कॅफे मधलं पिणं साबांना रिपोर्ट केलस का? Wink
बाकी सशल +१ त्यातल्या त्यात आर्बर मिस्ट ची ब्लॅकबेरी मर्लो ,मोहितो आणि बहामा मामा इतक्याच माझ्या उड्या.

मवा Lol

मी पण सुरवातीला बीअर, वाईन सगळ्यांना "दारू" ह्या एका छत्रीखाली आणून ठेवले होते. नवर्‍याने नंतर एकेकातला फरक चव घ्यायला लावून शिकवला. Happy

माझा प्रथम मदिराप्राशनाचा किस्सा लिहीन नंतर. पण त्याआधी प्रथम मदिरा खरेदीचा हा किस्सा.

लग्नानंतर इथे आल्यावर २-३ दिवसांनी दुपारी मी गावात पायी सगळीकडे हिंडायला जायचे. जेमतेम एक आठवडा झाला होता मला इथे येऊन. काय लहर आली अन मस्तपैकी पंजाबी ड्रेस घालून दुपारच्या भटकंतीला बाहेर पडले. मध्येच एका ठिकाणी नवर्‍याचा फोन आला. त्याने सहज विचारले कुठे आहेस वगैरे. तर मी आपलं सहज त्याला म्हणलं, अरे ते पर्ल स्ट्रीट वरचं लिकर स्टोअर आहे ना त्याच्यासमोर आहे आत्ता. नवर्‍याने लगेच ऑर्डर सोडली. तिथेच आहेस तर आत जाऊन एक बीअर्सचा क्रेट घेऊन ये. आली का पंचाईत? नाही आणणार वगैरेला वाव नव्हता. मी इतकी पण काही "ही" नाही असं कळायला (दाखवायला) नको नवर्‍याला? Proud भीत भीत ४ वेळा दाराशी गेले अन परत आले. ममव मन काही "दारूच्या दुकानात" पाऊल ठेवू देई ना. Proud
शेवटी हिय्या करून आत शिरले. दुकानातली सगळी लोकं माझ्याचकडे चमत्कारिक बघतायेत असं वाटायला लागलं. पंजाबी ड्रेस अजूनच काँप्लेक्स देत होता. आत आल्यावर बीअर कशी ओळखायची हे कुठे माहित? विचारावं म्हटलं तर तेही लाजिरवाणं. मग पुन्हा नवर्‍याला फोन केला. त्याला विचारलं , त्याने खाणाखुणा सांगितल्या आणि सापडला एकदाचा क्रेट.
काऊंटरपाशी गेले तर तिथली बया म्हणते "आयडी दाखव". हे ऐकल्यावर तर ब्रम्हांड आठवलं. तसच खरेदी न करता बाहेर पडावं वाटायला लागलं पण काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही असा बाणा जागृत झाला. आणि आल्या प्रसंगाला धीराने तोंड द्यायचं असं पक्कं ठरवलं. आयडी नाहीये सांगितलं तिला. मनोमनी म्हटलं, चला आयडी नाही म्हटल्यावर ही द्यायची नाही आणि आयती ब्याद टळेल. पण त्या सहृदय काकूंनी मला विना आयडी "दारू" खरेदी करू दिली. Proud बाहेर आले अन लक्षात आलं हातात ६ बीअर्स घेऊन जायच्या अश्या उघड्या? जाता येता कुणी पाहिलं तर म्हणतील, नवरा दुपारी हापिसात गेला की बायको "दारू" पीत बसते वाटतं घरी. Proud आत जाऊन पुन्हा पिशवी मागायचा धीर होईना. शेवटी कसंबसं ओढणीमध्ये लपवून इकडे तिकडे न बघता जे भराभरा घरी चालत आले. आणि हुश्श्य झालं.

मला वाटलेलं हे सगळं थ्रिल "बीअर ही काही दारू नव्हे" असं म्हणून नवरर्‍याने एका क्षणात घालवून टाकलं तो भाग निराळा. Proud

बिल्वा, Lol

का कुणास ठाऊक, श्रीदेवीचं, कुठल्याश्या सिनेमातलं "कोन्याक शराब नही होती" आठवलं.

...

Lol बिल्वा,मवा. भारी किस्से आहेत तुमचे.
बिल्वा , इथे नविन असताना ,ग्रोसरी आणताना एकदा क्रेट आणताना असेच झालेले माझे.
कॅशिअर म्हणाली ID दाखवा , मी तिला समजावून सांगु लागले "पण मी पिणार नाही आहे. घरातल्यासाठी आहे. I 'm a Good Girl. बिलिव्ह मी. " Proud दिला नाही तिने तरी तो क्रेट.
(त्याच कॅशिअरला curd कुठे मिळेल हे विचारुन कन्फ्युज करुन टाकलेले मी. कशी बिलिव्ह करेल ती माझ्यावर.)

मवा, ते वाईन , बिअर सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. एक टकिलाचा शॉट पिला कि लक्षात येते.(म्हणे घरातले इतर सदस्य) Proud

माझी दारुची चव फारशी डेव्हलप झाली नाही याचे कारण ती कडु लागते म्हणुन कि रणचंडिकेसारखी गरागरा डोळे फिरवित "आई" डोळ्यासमोर दिसते म्हणुन हे अजुन कळले नाही. Proud
असो. पार्टीजमधले किस्से नंतर लिहिते. ऐकण्यासारखे आहेत. Wink

I 'm a Good Girl. बिलिव्ह मी. >> सीमा Rofl नाहीच त्या बयेने विश्वास ठेवला ना तुझ्यावर!

आमच्या घरी १९८० च्या सुमारास फार गंमत झाली.
माझ्या मित्राचे सासू सासरेभारतातून आलेले होते. मित्र व त्याची बायको पितात, मीहि पितो व सासरेहि पितात हे माहित होते. मी सासर्‍यांसाठी, माझ्यासाठी नि मित्रासाठी स्कॉच ओतली, मित्राच्या बायकोला वाईन हवी होती ती दिली. सासूबाई वयाने मोठ्या, त्यांना दारू कशी विचारायची, म्हणून मग मी भीत भीत विचारले की वाइन हवी का? नको म्हणाल्यावर विचारले, काही कोका कोला, लिंबू सरबत वगैरे, त्यालाहि नको म्हणाल्या. मग आम्ही पिण्याचा कार्यक्रम सुरु केला. जरा दहा मिनिटे झाल्यावर, सासूबाई मला म्हणतात - अहो मला पण थोडी स्कॉचच द्या! मी ताडकन उडालोच!! मग बराच वेळ त्यांची क्षमा मागत बसलो होतो.

>>स्ट्रिक्टेस्ट सेन्समधे बियर आणि वाइन हार्ड ड्रिंक्स नाहीत हो मवा! <<
आमच्या मते स्काच, वाडका, रम सुद्धा नाहि. हि सगळी उत्तेजक पेयं आहेत; मित्रमंडळीं बरोबर घ्यायची. Happy

Pages