Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुशांत बाजीराव दिसला असता का
सुशांत बाजीराव दिसला असता का ?
राबता म्हणून पीरियड फ़िल्म होती, फ़िल्म मेलि
राबता अत्यंत कंटाळवाणा प्रकार
राबता अत्यंत कंटाळवाणा प्रकार होता..
धाग्याचं नाव बदलून बॉलिवुड
धाग्याचं नाव बदलून बॉलिवुड गॉसिप ठेवा.
बाजीराव आणि पद्मावत मधील
बाजीराव आणि पद्मावत मधील भूमिका रणबीर सिंग अक्षरशः जगाला आहे , त्याच्या ऐवजी दुसरे कोणी त्या भूमिका उत्तम करूच शकत नाही .
पण ७८६ गॅंग चे बॉलीवूड वर वर्चस्व आहे हे मानावेच लागेल .
गल्ली बॉय सारख्या टुक्कर सिनेमा , रणबीर ला
अजुन मोठे करण्या साठी गीत संगीत चा पत्ता नसताना पोते भरून अवॉर्डस घेवून जातो आणि केसरी सारखा उत्तम कथा गीत संगीत असताना साईड लाईन केला जातो , नेपोटीजम चे या पेक्षा मोठे उदाहरण दिसणार नाही .
कंगना आणि करण जौहर दोघानाही
कंगना आणि करण जौहर दोघानाही पदमश्री 2020 साली मोदी सर्कारनेच दिली आहे.
सुशांतचा खून कर्णने केला , है सिद्ध नाही केले तर कंगना तिची पद्मश्री परत करणार आहे
नेपोटीज्म मध्ये चुकीचे काय
नेपोटीज्म मध्ये चुकीचे काय आहे?चित्रपट धंदा आहे..>>>>
भारतातील बहुतेक धंदेवाईक लोक आपल्या मुलांना धंद्यात खेचण्याचा प्रयत्न करतात, मुलांची लायकी व रस असो नसो. त्यामुळे जे असे करत नाहीत त्यांच्याबद्दल लोक बोलतात. मुकेश अंबाणीची तिन्ही मुले पंचविशीतच डझनभर कंपन्यांचे डायरेक्टर होतात तेव्हा कोणाला आश्चर्य वाटत नाही पण आनंद महिंद्राच्या मुली वेगळा मार्ग निवडतात व कंपनी एम डी म्हणून बाहेरचा माणूस निवडते तेव्हा ती बातमी होते.
चित्रपट हा एक धंदा आहे आणि कलाही आहे. यात प्रचंड पैसा लागत असल्यामुळे कोणाला घ्यायचे, कोणाला टाळायचे ह्या गोष्टी पैसे असलेल्याला सहज शक्य होतात.
एखाद्या चांगले काम करण्याची क्षमता असलेल्या माणसाची गळचेपी करणे इथे सहज शक्य आहे. चांगल्या कामाचे गाजर दाखवून नंतर ते काम हिसकावून घेतले तर कलाकार म्हणून माणूस खचू शकतो. चांगले काम हातातून गेले तर खूप धक्का बसू शकतो. सुशांतची अशीच गळचेपी करण्यात आली असावी. याआधीही कित्येकांनी चांगली कामे त्यांच्या हातून गेल्याची उदाहरणे दिलेली आहेत.
हिंदी चित्रपटाला स्वतःच्या खांद्यावर चित्रपट पेलणारा हिरो हवा असतो पण हिरोईन नको असते. माधुरी, श्रीदेवी यांनाही हा त्रास शेवटीशेवटी झालाय, कंगणाला आताच होतोय कारण तिला चांगले चित्रपट मिळाले ज्यातून तीने तिची कलाकारी फार लवकर दाखवली. ती खानावळीसोबत काम करणे दूर, खानावळ तिच्यासोबत काम करायला उत्सुक नसणार. प्रत्येकाला स्वतःवर फोकस हवा असतो.
लोकहो कृपया सरसकट खानावळ शब्द
लोकहो कृपया सरसकट खानावळ शब्द वापरू नका.
बहुसंख्य हिंदू देशात खान सुपर्रस्टार आहेत असे सांगून धार्मिक ध्रुवीकरण करायच्या सडक्या राजकीय हेतूने हा शब्द आला आहे. त्यांचा हेतू साध्य होऊ देऊ नका. चोप्रा जोहर भट कपूर मंडळी खान नाहीयेत हे लक्षात घ्या.
गल्ली बॉय सारख्या टुक्कर
गल्ली बॉय सारख्या टुक्कर सिनेमा , रणबीर ला
अजुन मोठे करण्या साठी गीत संगीत चा पत्ता नसताना पोते भरून अवॉर्डस घेवून जातो
>> आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड.. संगीत बद्धल... गल्ली बॉय ची गाणी आणि संगीतच तर त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते... रॅप हा संगीताचा एक प्रकार आहे... अपना टाईम आयेगा आणि मेरे गली में गाणी उत्तम दर्जा आहेत.. त्या सिंगर ला अवॉर्ड मिळाले हे बरे झाले... तो सिंगर धारावी मधून वर आलाय... रॅप बॅटल तर इतकी जबरदस्त घेतली आहे.. पैसे वसूल..
रणवीर ची ऍक्टिंग गली बॉय मध्ये चाबूक आहे... पूर्ण चित्रपट भर तो मुरादच वाटलाय ... रणवीर वाटलाच नाही...
त्याच्या लेव्हल ची ऍक्टिंग ( किंवा थोडीशी जास्त सरस ) शाहिद ची होती त्या वर्षी- कबीर सिंग मध्ये... imo
उद्योग पती चा मुलगा म्हणून
उद्योग पती चा मुलगा म्हणून कंपन्या मध्ये पूर्ण अधिकार दिले जात नाहीत .
त्यांना दुसऱ्या अधिकारी लोकांच्या हाताखाली पूर्ण प्रशिक्षण ghave लागते.
कोणतेच अधिकार नसतात.
जसे जसे ते सक्षम होतात तसे अधिकार दिले जातात.
गली बॉय चांगला आहेच.त्याबद्दल
गली बॉय चांगला आहेच.त्याबद्दल शंका नाही.मुख्य म्हणजे कुठेही अतिरंजित नाहीये.
पण त्याला ऑस्कर नामांकन 'धारावी आणि भारतीय स्लम्स पिक्चर मध्ये बघण्याबद्दल समृद्ध देशांची जिज्ञासा/रुची' यामुळे जास्त मिळालं असावं असं वाटलं.
मला स्वतःला वेगळी कथा म्हणून तुंबाड किंवा अंधाधून ला मिळालेलं जास्त आवडलं असतं.
समोरची टीम खेळत असताना इतक्या
समोरची टीम खेळत असताना इतक्या निगेटिव्ह कमेंट पास करा की त्या प्रेशर ने समोरच्याची प्रेशर कुकर शिट्टी वाजली पाहिजे. मग जीत आपलीच, त्यासाठी मिल्क शेक चे आमिष दाखवून टीम गोळा करा
.... छिछोरे चित्रपटात सुशांत असे करतो ना ?
कोणता हा चित्रपट ? त्यात सुशांत व दूसरा कसलातरी खेळ खेळत असतात , टेनिस , फुटबॉल वगैरे
आणि सुशांतचे मित्र विरोधी खेळाडू खेलायला लागला की ओपन युवर चड्डी हा हा हा , वगैरे ओरडत असतात
.... छिछोरे चित्रपटात सुशांत
.... छिछोरे चित्रपटात सुशांत असे करतो ना ?
डॉक्टरसाहेब शुभेच्छा !!!!!!
नेपोटीझम बद्दल सुशांत पण काही
नेपोटीझम बद्दल सुशांत पण काही इंटरव्ह्यूमध्ये बोलला आहे की हे सगळ्याच फिल्ड मध्ये आहे. प्रॉब्लेम केव्हा होतो जेव्हा दुसऱ्या चांगल्या टॅलेंट्स ना फक्त outsider असल्या कारणाने चांगले चित्रपट ऑर बॅनर मिळु नये अशी व्यवस्था केली जाते तेव्हा. तो म्हणाला होता की अशाने इंडस्ट्री ला काही future नसेल. जे अगदी बरोबर आहे.
पद्मावत आणि बाजीराव दोन्ही रणवीर ने उत्तम च साकारले यात काही शंकाच नाही पण सुशांत ने पण चांगलेच साकारले असते. तो अत्यंत अभ्यासू आणि मेहनती नट होता. प्रत्येक भूमिकेसाठी त्याने अचाट परिश्रम घेतले आहेत.त्यामुळे वर कोणीतरी म्हटलंय की सुशांत शोभला असता का वगैरे तर मला नाही वाटत असं. उलट आता त्या भूमिका म्हटल्यावर जसा रणवीर नजरेसमोर येतो तसा सुशांत आला असता. खुद्द संजय भन्साळीला तो हवा होता या भूमिकांसाठी यातच सगळं आलं. त्याच्यातल्या क्षमता सगळे ओळखून होते म्हणूनच तर त्याला कंगना म्हणतेय तसं side ला केलं गेलं. काही लोक चिवट असतात तगून जातात, काही बिचारे उन्मळून पडतात.
खुप वाईट वाटलं तो व्हिडीओ पाहून, असं वाटलं आपण इतक्या सडक्या मनोवृत्तीच्या लोकांचे चित्रपट पूर्वी डोक्यावर घेऊन नाचलो होतो....
छिछोरे की कोणता तो चित्रपट ?
छिछोरे की कोणता तो चित्रपट ?
बाजीराव आणि पद्मावत मधील
बाजीराव आणि पद्मावत मधील भूमिका रणबीर सिंग अक्षरशः जगाला आहे >>>> पद्मावत बद्दल काही हरकत नाही, पण बाजीरावांच्या भूमिकेबद्दल मी सहमत नाही. पेशव्यांच्या संबंधित आणि त्या काळाचं बरंच साहित्य वाचल्यावर मनात पेशव्यांची एक व्यक्तिरेखा तयार झाली होती, त्याच्याशी रणवीर सिंगचं व्यक्तिमत्त्व आणि अभिनय अगदीच विसंगत वाटला. त्या सिनेमानन्तर बाकी कर्तृत्व विसरून (जे चित्रपटात फारसं दाखवलं नाही) फक्त बाजीरावांची नकारात्मक इमेज तयार झाली.
रणवीर सिंग मला टपोरी रोल्समध्ये आवडतो, तो अभिनय सुद्धा चांगला करतो, पण त्याला रॉयल लुक्स नाहीत, तो नेहमीच टपोरी उडानटप्पू दिसतो. बाजीराव म्हणून पहायला हृतिक रोशन किंवा सुशांत सारखं व्यक्तिमत्त्व आवडलं असतं.
पण भन्साळी ने कुठे डिस्क्लोज
पण भन्साळी ने कुठे डिस्क्लोज केलय की तो बाजीरावाच्या भूमिकेसाठी सुशांत ला घेणार होता म्हणून? त्या सिनेमात घ्यायचा विचार होता इतकेच म्हणालाय. बाजीराव मधे चिमाजी अप्पा आणि पद्मावत मधे तिचा नवरा असा दुय्यम रोल पण असू शकेल ना
एकदा दीपिका आणी रणवीर ची जोडी इतकी हिट झाल्यावर तो टायटल रोल मधे त्यांनाच घेणार.
{{{ लोकहो कृपया सरसकट खानावळ
{{{ लोकहो कृपया सरसकट खानावळ शब्द वापरू नका. }}}
कितीही नाकारलं तरी खान खान मौसेरे (किंवा चचेरे / ममेरे - फुफेरे असे जे काही असेल ते) भाई हे कटू वास्तव आहे. कादर खानला जेव्हा २०१९ मध्ये पद्मश्री मिळाली तेव्हा त्याने जाहीर नाराजी व्यक्त केली की आपल्या आधी अनुपम खेर सारख्या कनिष्ठ व अक्षम अभिनेत्याला हा पुरस्कार कसा काय मिळाला? मान्य आहे की कादर खान हा कसलेला अभिनेता होता आणि त्यासोबतच तो एक हुशार संवाद लेखक आणि उत्कृष्ट प्राध्यापक देखील होता. तर दुसरीकडे अनुपम खेरने कुछ कुछ होता है मधील शाळाप्रमुखा सारख्या शेकडोंनी टूकार भूमिका केल्या आहेत. आता उलट बाजूने पाहिले तर अनुपम खेरने सारांश, १०८४ की मां, मैने गांधी को नही मारा, द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सारख्या सिनेमातून दमदार अभिनयाचे दर्शनही घडविले आहे आणि कादर खाननेही बाप नंबरी बेटा दस नंबरी सारख्या असंख्य चित्रपटांतून शक्ती कपूरच्या जोडीने त्याच्या तोडीस तोड बीभत्स शब्दाला लाजवेल असा अभिनय केला आहे. जितेंद्रच्या अनेक चित्रपटांसाठी अत्यंत गलिच्छ संवादलेखनही केले आहे. थोडक्यात कादर खान आणि अनुपम खेर या दोघांनीही चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या गुणांचे टोकाचे प्रदर्शन केले आहे त्यामुळे कोणाचा दर्जा उच्च आणि कोणाचा हीन असा प्रश्न उद्भवू नये. राहता राहिला प्रश्न सिनिअरीटीचा तर तो मुद्दा बरोबरच आहे की कादर खान हा अनुपम खेर पेक्षा बराच सिनीअर आहे तेव्हा कादर खानला पुरस्कार आधीच मिळायला हवा होता.
पण कादरखान पेक्षा ज्युनिअर असूनही पद्मश्री आधीच मिळविणारा अनुपम खेर हा काही एकटाच कलाकार नाहीये. सैफ अली खानला तर तो फारच आधी मिळाला आहे. अनुपम खेरने निदान टूकार भूमिकांसोबतच अनेक चांगल्याही भूमिका केल्यात पण सैफने तर केवळ टूकारगिरीच केलीये. कादर खानला जर अनुपम खेरच्या पद्मश्रीबद्दल आक्षेप होता तर तो सैफ अली खानच्या पद्मश्रीबद्दल का नव्हता? कारण स्पष्ट आहे सैफ देखील खान आहे आणि कादर देखील खानच आहे. सैफला पद्मश्री काँग्रेस सरकारने दिली तर अनुपम खेरला पद्मश्री भाजप सरकारने दिली. पण कादर खानला इतका कॉमन सेन्स नव्हता की ज्या भाजप सरकारने अनुपमला त्याच्या आधी पद्मश्री दिली म्हणून तो त्यांना दोष देतोय त्या भाजप सरकारने निदान कादरलाही अनुपम नंतर का होईना पण पद्मश्री दिली तर खरी. काँग्रेस सरकारने तर कादर खानला तेवढीही दिली नाहीच की.
माझ्या डोक्यात आताच विचार येत
माझ्या डोक्यात आताच विचार येत होता की दिपीका चा नवरा, शाहिद कपूर वाल्या भुमिकेत सुशान्त सिन्ग चान्गला बसू शकला असता (मला चुकीच्या अनुस्वारान्करता क्षमा करा या पोस्ट पुरती.)
भाजप सरकारने कादर खान ला
भाजप सरकारने कादर खान ला मरणोत्तर पद्मश्री दिली.
बाजीराव रोल निगेटिव्ह/ग्रे च
बाजीराव रोल निगेटिव्ह/ग्रे च होता की. त्यामुळे रणवीरने बरोबर न्याय दिला.
पण भन्साळी सुशांतला chase करत होता हे सत्य असावं कारण पोलिसांनीही त्याचं स्टेटमेंट घेतलं आहे आणि शेखर कपूरने पण बरंच काही उघड केलं आहे.
रिहा चक्रवर्ती सुशांतचं
रिहा चक्रवर्ती सुशांतचं क्रेडिट डेबिट कार्ड वापरत होती असं चौकशी दरम्यान समोर आलंय.
सुशांतच्या आत्महत्येचे
सुशांतच्या आत्महत्येचे अनावश्यक पोस्ट मॉर्टेम सुरू आहे असे एकूण धागा वाचून वाटत आहे
क्षमस्व
मला तर हा खून वाटतोय.
मला तर हा खून वाटतोय.
सुशांतच्या आत्महत्येचे
सुशांतच्या आत्महत्येचे अनावश्यक पोस्ट मॉर्टेम सुरू आहे असे एकूण धागा वाचून वाटत आहे>>> मागे मी एक लेख वाचत होतो त्यात फक्त फोटो बघून सुशांतचा खुनी कोण आहे हे लोकांनी ओळखलं होतं. ते ही पुराव्यासह.
सुशांतच्या आत्महत्येचे
सुशांतच्या आत्महत्येचे अनावश्यक पोस्ट मॉर्टेम सुरू आहे असे एकूण धागा वाचून वाटत आहे
>>>
आवश्यक की अनाव्श्यक कोणी ठरवावे?
अर्थात आपण ती शंभर टक्के आत्महत्याच आहे हे ठरवले असेल तर अनावश्यक ठरवणे काही कठीण नाही.
कोणता हा चित्रपट ? त्यात
कोणता हा चित्रपट ? त्यात सुशांत व दूसरा कसलातरी खेळ खेळत असतात , टेनिस , फुटबॉल वगैरे
आणि सुशांतचे मित्र विरोधी खेळाडू खेळायला लागला की ओपन युवर चड्डी हा हा हा , वगैरे ओरडत असतात
Submitted by बिपीन चन्द्र हर.
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 21 July, 2020 - 18:56
>>>>>
कादर खानवर एवढं का लिहिलं ? आय मीन मुद्दा तरीही कळला नाहीच.
Submitted by BLACKCAT on 21
Submitted by BLACKCAT on 21 July, 2020 - 19:42 >> छिछोरे चित्रपट
ओके
ओके
. त्या सिनेमानन्तर बाकी
. त्या सिनेमानन्तर बाकी कर्तृत्व विसरून (जे चित्रपटात फारसं दाखवलं नाही) फक्त बाजीरावांची नकारात्मक इमेज तयार झाली >>>>
नाही हो !!
बाजीराव पेशवे आणि शनिवार वाडा त्या काळी सर्वाधिक सर्च मध्ये होते .
आणि लोकांनी बहिष्कार चे केलेले आव्हान विसरून मी दोन वेळा तो सिनेमा बघितला , प्रत्येक वेळी बाजीराव पेशवेंचे रूप उलगडतच गेले .
मला तरी त्यात कुठेही नकारात्मक इमेज बनविली आहे असे वाटले नाही , ना कुठे तसे वाचनात आले नाही .
उलट दर्जाहीन चित्रपटांच्या रांगेत हा इतिहास वर आधारित सिनेमा प्रेषक आणि समिक्षकांचे लक्ष वेधून घेत होता .
शिवाय सलग ४० विजय प्राप्त करणार बाजीराव पेशवा नामक योद्धा कसा असू शकेल याचा प्रत्यय प्रेक्षकांना
सिनेमा पाहताना आला .
या उलट महान व्यक्ती ची भूमिका करण्यासाठी आज पर्यंत सर्वात मोठी झालेली चूक म्हणजे फर्जंद सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिके साठी खांदे ओघळालेल्या चिन्मय मांडलेकर ची निवड होय !!
चिन्मय कसाच महाराजांच्या भूमिके ला न्याय देवू शकला नाही , मुळात अडात च नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? आणि तो दिगपाल लांजेकर पुन्हा चिन्मय ला त्याच भूमिके साठी पुन्हा घेवून जंग जोहर घेवून येतोय !!!!!
त्या मानाने रणबीर ने बाजीराव पेशवे नक्कीच उठावदार केला आहे .
Pages