Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारच ईंटेलिजंट होता तो.
फारच ईंटेलिजंट होता तो. वेगळ्याच लेव्हलचा. फार वाईट झाले ">>>exactly... तो केवळ एक अभिनेता असता तर कदाचित इतकं वाईट वाटले नसते जितके आत्ता वाटतंय.. कारण तो केवळ एक अभिनेता नसून एक अफलातून असं multitalented व्यक्तिमत्त्व होतं.... जी व्यक्ती स्वतः ला रहाण्यासाठी फ्लॅट घेण्याआधी चंद्रावर जमीन खरेदी करण्याचं धाडस करू शकते, त्या व्यक्तीच्या स्वप्नांचा आवाका किती मोठा असेल... कदाचित आपल्या कल्पनाशक्ती पलीकडे... तो mirror writer होता, तो आध्यात्मिक होता, तो खगोलशास्त्राचा अभ्यासक होता, तो प्राण्यांवर, गोरगरीबांवर प्रेम करत होता... कोटींनी कमावत होता तसाच दानही देत होता... चांगल्या अभिनेत्यासोबतच तो बरंच काही होता आणि असा व्यक्ति गेला म्हणून फार फार वाईट वाटतंय... कधी कधी मनात येतं आपल्याशी कुठलंच नातं नसताना(मी सुद्धा सुशांत चा एकही चित्रपट पाहिला नाहिये पण तरीही त्याची exit चटका लावून गेली.) सुशांतचं जाणं इतकं दुःखदायक वाटतंय तर त्याच्या वडिलांची, बहिणींची काय अवस्था असेल?
सुशांतच्या अनेक फॅन्सना शंका
सुशांतच्या अनेक फॅन्सना शंका आहे की त्याचा खून झाला आहे. अनेक मुद्दे सोशल मीडियावर उपस्थित केले गेले आहेत. आत्महत्येला प्रवृत्त करणं ते थेट हत्या करून गळफास लावल्याचा भास निर्माण करणं यापैकी काहीही असु शकेल.
न्याय हवा आहे त्यामुळे याबद्दल बोललं जात आहे. न्याय मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे मान्य पण म्हणून बोलायचंच नाही का? इथे नाव घेऊन कोणावर स्पेसिफिक आरोप केलेले नाहीत. पण पोलिसही अनेक व्यक्तींना रोज पोलीस स्टेशनवर बोलवून interrogation करत आहेत. एखादा खून /अनैसर्गिक डेथ झाल्यावर सर्व संबंधित लोकांची चौकशी करावीच लागते, त्यांच्या भावना दुखावतील म्हणून सोडून देता येत नाही.
मला सुशांत 'पवित्र'च्या वेळी खूप आवडत होता पण त्याने ती मालिका सोडल्यानंतर मी काही त्याची diehard fan वगैरे नव्हते. त्याचं काम आवडायचं,इतकंच. माझ्यासारखे अनेक जण सुशांतच्या जाण्याने अस्वस्थ झाले आहेत. एक आठवडा उलटून गेला तरी त्याचा विसर पडत नाही. कदाचित यामागेही हे कारण असू शकेल की ही नैराश्यामुळे केलेली आत्महत्या नाही, हा कदाचित मर्डर किंवा कदाचित मानसिक छळ करून आत्महत्या करायला लावणे असा प्रकार आहे आणि म्हणून subconscious level ला इतके लोक इतक्या जास्त प्रमाणात अस्वस्थ आहेत. Something is not right and we 'feel' it.
ज्यांना खूप दुःख झाले आहे
ज्यांना खूप दुःख झाले आहे त्यांनी कमीत कमी दहा दिवस तरी जेवण त्याग केला पाहिजे.
दुःख झाल्याचे फक्त ढोंग घेत आहेत.
काही आयडी.
जेवण कोणीच सोडले नाही दुःख मुळे
हेमंत सर, तुम्हाला
हेमंत सर, तुम्हाला सैनिकांच्या हत्येचे दु:ख झालेच असेल. २० सैनिकांसाठी प्रत्येकी १० दिवस असे २०० दिवस जेवण त्याग करा .
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले.
बास्स करा यार. जिथे तिथे का
बास्स करा यार. जिथे तिथे का खाजाऊन खरूज काढताय. एकतरी धागा सोडा बिना वादाचा. म्हणून मायबोलीवर लिहीत नाही कधी. पण हे जरा अती होतंय असं नाही का वाटत तुमच्या स्वतःच्या मनाला. खरंच बास्स करा .
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/sonu-nigam-new-video-on-bhushan...
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. तेव्हा सोनू निगमनेही व्हिडीओ पोस्ट करत संगीत क्षेत्रातही अशी मक्तेदारी सुरू आहे, याचा खुलासा केला होता. त्यावेळी त्याने कोणाची नावं घेतली नव्हती. मात्र नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने गायक अरमान मलिक, अमाल मलिक, निर्माते भूषण कुमार यांच्यावर टीका केली आहे.
ह्या सगळ्या विरोधी लोकांना
ह्या सगळ्या विरोधी लोकांना सुशांत मेल्यावरच समजले का की जोहर , चोपड़ा, नदीम , टी सीरीज , सलमान , शारुख वगैरे वाइट आहेत म्हणून ? हे लोक तर पूर्वीपासुनच वाइट होते ना ? मग पूर्वी हे लोक ह्यांच्याकडे का काम करत होते ? की आता त्यांच्याकडून येणार इनकम घटले ? त्यानी नवीन स्वस्त कलाकार शोधले ?
जोहर , चोपड़ा, नदीम , टी सीरीज
जोहर , चोपड़ा, नदीम , टी सीरीज , सलमान , शारुख वगैरे वाइट आहेत म्हणून ?
>>>>
शाहरूखचे नाव वगळा या पंक्तीतून. गैरसमज पसरतात उगच. त्याचा आणि घराणेशाहीचा काही संबंध नाही.
नाही कसे ? शाहरुख अन बच्चन
नाही कसे ? शाहरुख अन बच्चन आतापासुन चर्चा करताहेत अबराम आणि आराध्या ह्याची जोड़ी हिट होईल का म्हणून ?
शारुख ने एकदा एंकरिंग करताना सुशांत ची चेष्टा केली होती , म्हणून लोक त्याचेही नाव या यादीत घेताहैत
मग सलमानचं नावही वगळायला हवं.
मग सलमानचं नावही वगळायला हवं.
श्रद्धांजलीच्या धाग्यावर
श्रद्धांजलीच्या धाग्यावर सुद्धा काही विकृत लोकांच्या सुशांत विरोधातल्या सडक्या प्रतिक्रिया वाचून मनस्वी संताप आला. पण या प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या. सुशांतच्या आत्महत्येला लॉबी कारणीभूत आहे हे यावर या लोकांनी शिक्कामोर्तबच केले आहे असे म्हणायला हरकत नाही. मृत्युनंतर आता त्याला बदनाम करायचे यांचे उद्योग सुरु आहेत. हे सुद्धा नेहमीचेच.
हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, सिंधी, बंगाली, ब्राह्मण, मुस्लिम यांच्या लॉबीज आहेत. आणि त्या खूप पूर्वीपासून जोरदार सक्रीय आहेत. इतर जातीच्या कलाकारांना हे वर येऊ देत नाहीत. कोणी आलाच तर फारसे टिकू देत नाहीत. एखादा कलाकार प्रसिद्ध होण्यासाठी केवळ त्याच्या अंगची कला नव्हे तर त्याच्या प्रसिद्धीसाठी काम करणारी यंत्रणा सुद्धा असावी लागते. पैसा आणि मनुष्यबळ प्रचंड असते. आणि अशा यंत्रणा जाती/धर्माच्या आधारावरच काम करतात. कितीतरी उदाहरणे मी देऊ शकतो. हि काही प्रातिनिधिक उदाहरणे:
१. आलीय भट नावाच्या सुमार दर्जाच्या नवख्या अभिनेत्रीवर काही वर्षांपूर्वी विविध प्रकारचे विनोद बनवून तिला प्रसिद्ध केले गेले. लोकांच्या चर्चेत कशी राहील हे पाहिले गेले. कारण ती ठराविक लॉबीच्या दिग्दर्शकाची कन्या आहे. आजच्या घडीला अनेकांना आलीया भट स्टार म्हणून माहित असेल. पण सुशांत मात्र टीव्ही कलाकार म्हणूनच अधिक माहिती होता (आलीयापेक्षा खूप अनुभवी असूनही). त्याच्या विषयी बरीच माहिती त्याच्या मृत्यनंतरच अनेकांना कळली.
२. अभिजित सावंत हे नाव आज कोणालाही आठवत सुद्धा नसेल. पण हा गायक भारतातला पहिला इंडियन आयडॉल म्हणून प्रसिद्ध झाला होता. पण त्याला पुढे संधी देणारी तसेच त्याला घडवणारी व प्रसिद्धस आणणारी कोणतीही यंत्रणा त्याच्या पाठीशी नसल्याने आज तो कुणाच्या खिजगणतीत सुद्धा नाही. तीच गोष्ट बौद्ध समाजाच्या अभिजित कोसंबी ची आहे. दमदार आवाजाचा हा गायक आज बाजूला पडलाय.
३. ग्रेट इंडियन लाफ्टर च्यालेंज मधून प्रथम आलेला सुनील पाल हा अत्यंत हरहुन्नरी कॉमेडीयन. आज त्याच्या पेक्षा अधिक राजू श्रीवास्तव प्रसिद्ध आहे. हा श्रीवास्तव खरे तर दुसरा कि तिसरा आला होता. कारण श्रीवास्तव ला घडवणारी व त्याला प्रसिद्धी देणारी जी काही यंत्रणा आहे. त्यांनी पारधी समाजाच्या सुनील पाल साठी काम केले नाही. पर्यायाने सुनील पाल आज गुणवत्ता असूनही प्रसिद्धीपासून फार फार दूर पडलाय.
बाकी "एक साधा अभिनेता. त्याला काय इतके महत्व द्यायचे" हि बुद्धी त्या लताबाई दवाखान्यात होत्या तेंव्हा कुठे गेली होती? त्या तेंडूलकर बाबत कुठे जाते? फळकुट घेऊन चेंडू हाणायला फार अक्कल किंवा धाडस लागत नाही, गल्लीबोळात कित्येक जण असतील. हिरे खूप असतात. पैलू मात्र आपल्या जातीचा पाहूनच पाडले जातात. एक साधी गायिका यापलीकडे लताबाईला माझ्या लेखी महत्व नाही. कितीतरी गायिकांचे करियर तिने देशोधडीला लावले. तिच्याविषयी आदर बाळगण्यासारखे कोणतेही कारण नाही. उद्या अशाच एखाद्या धाग्यावर "एक साधी गायिका होती तिला कशाला महत्व देता" असे वाक्य या लोकांकडून येण्याची अपेक्षा आहे.
इनामदार छान लिहिलेत!
इनामदार छान लिहिलेत!
काही आठवडेच जुन्या असलेल्या आय डी येऊन फालतू वटवट करतात त्याला फार महत्व दिले पाहिजे अस मला वाटत नाही..
कामधंदे नसलेली , विकृत मनोवृति असलेली , मुद्दाम दंगल घडवणारी माणसे यव्यतिरिक्त त्यांची वेगळी ओळख नसते.
इतके सर्वजण समजवून सांगत असताना या लोकांना ऐकायचे च नसते कारण त्यांना मुद्दाम अशांतता पसरावयला आवडते...
सर्वानी इग्नोर करायला चालू करणे उत्तम अश्या लोकांना
एकेकाळी जीवाभावाची असलेली
एकेकाळी जीवाभावाची असलेली मायबोली हल्ली नको शी वाटू लागलिये असल्या या थर्ड क्लास लोकांमुळे... एडमिन ही लक्ष का देत नाहीत पूर्वी प्रमाणे कोणास ठाऊक
भारतात वर्षाला 400 सिनेमे
भारतात वर्षाला 400 सिनेमे येतात
मोठ्या ब्यानर चे हार्डली 50 असतात, उरलेल्यात काम केले तर चालत नाही का ? आत्महत्या कशाला करायची ?
मला ही तोच प्रश्न पडलेला
मला ही तोच प्रश्न पडलेला
इतका टैलेंटेड माणूस , दूसरे मूवी मिळाले च असते. पण क़ाय माहित त्याने असे का केले. ते कारण त्याच्यासोबत च गेले
आय आय टी , एम्स मिळाले नाही
आय आय टी , एम्स मिळाले नाही तरी लोक डॉक्टर इंजीनियर होतातच की
जातीयवादी आयडी कडून विखारी
जातीयवादी आयडी कडून विखारी प्रतिसाद येऊ लागले आहेत. आत्महत्येला जातीय रंग देण्याची काय गरज?
अनिश्का,
अनिश्का,
"...एकेकाळी जीवाभावाची असलेली मायबोली हल्ली नको शी वाटू लागलिये असल्या या थर्ड क्लास लोकांमुळे... एडमिन ही लक्ष का देत नाहीत पूर्वी प्रमाणे कोणास ठाऊक..."
अंशतः संम्मत! काही असेही प्रतिसाद टाकणारे आहेत जे की पटत नाहीत. पुर्वीच्या प्रगल्भ चर्चा, लेख, मते मतांतरे आठवतात. बरंच काही चांगलं कुठंतरी कधीतरी हातातून निसटुन गेल्याची जाणीव होते....पण...
शेवटी 'माय' बोली आहे! कुणीतरी जाणून्बुजून तिला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर दोष त्या व्यक्तिचा आहे माय्बोलीचा नाही, असे मला वाटते.
यक्ष दोष मायबोली चा नाही पण
यक्ष दोष मायबोली चा नाही पण मायबोली वर येऊन घाण करणाऱ्यांचा आणि त्यांना ती घाण करताना काही कारवाई न करता एकप्रकारे त्यांच्या वागण्यला पाठिंबा देणाऱ्यांचा आहे....
म्हणून मी इथे काही लिहिणे बंद केले आहे.... पण आज थोड़ अती झालं
अ
इथले काही कमेंटस वाचून राहून राहून वाटतं, काही लोक सर्वत्र मोजपट्टी सोबत घेऊनच फिरतात बहुतेक...आणि 'तेरड्याचा रंग तीन दिवस' हे मोजण्याच्या नादात, रंगातल्या विविधतेचा आस्वाद घेणं राहुनच जातं त्यांच...दोष त्यांचा नाही, दोष शिक्षण पद्धतीचा नि समाज व्यवस्थेचा....काय बोलणार...सुशांतला श्रद्धांजली
अरे बस करा... गेलाय तो... तो
अरे बस करा... गेलाय तो... तो प्रेमात अपयशी झाला म्हणून गेला कि काम मिळत नव्हते म्हणून गेला हे फक्त त्यालाच माहित...
त्याने नोट लिहिली नाहीय... त्याला त्याबद्धल चर्चा नको असेल म्हणून त्याने नोट ठेवली नाही... हे समजून घ्या... He didnt want to be talked about this... got it...
lets respect his last wish...
उगाच कोणाचा कोणाशीही संबंध जोडू नकोयत आपण....
RIP !!!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=QUzZehjLQk4&t=10s
पायल रोहतगीचा सुशांतच्या संशयास्पद मृत्युबद्दल व्हिडियो. २ दिवसातच या व्हिडियोला २.८ मिलियन व्ह्यूज आणि २२,००० हून जास्त कमेंट्स भेटले आहेत.
कोण आहे ही पायल रोहतगी. पोलीस
कोण आहे ही पायल रोहतगी. पोलीस तपास चालू असताना असे विडिओ बनवायला परवानगी वगैरे नाही लागत का.
Craps+1
Craps+1
इनामदार ह्यांना एकच विचारायचे
इनामदार ह्यांना एकच विचारायचे.
बॉलिवूड ही सरकारी मदती वर चालणारी इंडस्ट्री आहे का.
निर्माते स्वतःचे पैसे लावतात ते वसूल झाले पाहिजेत हाच त्यांचा उध्येष असतो
इथे ब्राह्मण,सिंधी पंजाबी असेल तर त्या समाजातील निर्माते असतील म्हणून त्यांची लॉबी असेल.
तुम्ही निर्माते बना कोणी अडवले आहे का.
कदाचित डायरेकट मर्डर नसेल
कदाचित डायरेकट मर्डर नसेल किव्वा असेलही पण इंडस्ट्रीतल्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार घालून त्याचा मानसिक स्वास्थ बिघडवल आणि त्या डिप्रेशन च्या भरात त्याने जर हे टोकाचे पाऊल उचलले असेल तर त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याबद्दल पण संबंधित लोकांवरच गुन्हा सिद्ध होऊ शकेल का ? डिप्रेशन च्या भरात त्याने आत्महत्या केली असं कारण देऊन ? एखाद्या विवाहितेने काही वर्षांच्या आत जर आत्महत्या केली तर तिला आत्महत्या करायला प्रवूत्त केल्याबद्दल तिच्या सासरच्या लोकांना शिक्षा होऊ शकते. इथे पण तेच कारण देऊन बिहार मध्ये एका वकिलांनी इंडस्ट्रीतल्या दोन /तीन जणांवर वर गुन्हा दाखल केला आहे अशी बातमी आहे
हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, सिंधी, बंगाली, ब्राह्मण, मुस्लिम यांच्या लॉबीज आहेत. आणि त्या खूप पूर्वीपासून जोरदार सक्रीय आहेत. इतर जातीच्या कलाकारांना हे वर येऊ देत नाहीत. कोणी आलाच तर फारसे टिकू देत नाहीत >> आता हे काय नवीन ? याला म्हणतात कुठलाही विषय चालू असेल तरी मध्ये काहीतरी जुनाच पण सनसनाटी जातीपातीचा मुद्दा का घुसडतात लोक्स ? काही कळत नाही

सर्व प्रतिसाद नीट वाचले तर
सर्व प्रतिसाद नीट वाचले तर लक्षात येईल जे चाहते आहेत त्यांनीच धागा भरकटवला आहे.
कोणी गर्लफ्रेंड विषयी बोलतेय,कोण फिल्म इंडस्ट्रीत अन्याय कसा झाला हे सांगतेय,कोण party,social life hya विषयी बोलतेय .
काही नी तर खरे कारण शोधून आरोप पण सिद्ध केले आहेत.
काही नी तर जातीवाद कसा चालतो हे पण सांगायला सुरुवात केली होती.
पण ती एक इंडस्ट्री आहे आणि नफा तोटा ह्याच तत्व वर चालते हे समजून घेतले नाही.
त्या मुळे जे चाहते नाहीत त्यांनी bharkatvala ह्या आरोपात काही तथ्य नाही.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/karan-johar-now-follows-just-8-...
करण जौहर आपल्या ट्विटर अकाउंटवर १०८ कलाकारांना फॉलो करत होता. यामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, दीपिका पादूकोण, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा असे कलाकार होते. विशेष म्हणजे यांपैकी अनेक कलाकारांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. यापैकी अनेकांना स्वत: करणनेच लॉन्च केले होते. मात्र या सर्वांना आता त्याने अनफॉलो केलं आहे. आता केवळ तो अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा आठच कलाकारांना फॉलो करत आहे.
अभिनेता गोविंदाचा मुलगा
अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन अहुजा याच्या गाडीचा मुंबईतील जुहू परिसरात अपघात झाला. यशवर्धनच्या कारला दुसऱ्या एका कारने धडक दिली. अपघातावेळी गोविंदाचा मुलगा यशवर्धन गाडी चालवत होता आणि दुसरी कार कंपनीचा चालक चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या अपघातात कोणीच जखमी झाले नसून यशवर्धनच्या कारच्या हेडलाइटचं नुकसान झालं आहे.
गोविंदा यांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. लॉकडाउनच्या काळात ते कुटुंबीयांसोबतच वेळ घालवत आहेत. यशवर्धनने लंडनमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चर्चा आहे. मात्र अद्याप त्याबाबत काही ठोस माहिती नाही.
https://www.loksatta.com/manoranjan-news/govinda-son-yashvardhan-ahuja-m...
गोविंदाही सलमानच्या नावाने ओरडत होता, माझी फिल्म लावू देत नाहीत म्हणून.
आणि ह्याच्या मुलाला लॉन्च कोण करणार आहे ? सलमान खानच ना ? त्याच्या कोणत्या तरी सिनेमाचा सिकवल बनतोय त्यातून ना ?
https://m.timesofindia.com/videos/entertainment/hindi/govinda-seeks-salm...
सलमान गॉडफादर आहे
सलमान गॉडफादर आहे
त्याची हुजरेगिरी करत राहाल तर टिकाल अन्यथा तुमचा निकाल
असे साधारण चित्र आहे
Pages