Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
च्रप्स, धोनी सिनेमा सुशांतने
च्रप्स, धोनी सिनेमा सुशांतने करारातुन बाहेर पडल्यावर केला.
, धोनी सिनेमा सुशांतने
, धोनी सिनेमा सुशांतने करारातुन बाहेर पडल्यावर केला. >> तेच म्हणतेय.
कलाकार,संगीतकार,कथा लेखक,आणि
कलाकार,संगीतकार,कथा लेखक,आणि बाकी मंडळी सिनेमा यशस्वी होण्यास जबाबदार असतात .
कलाकार फक्त सिनेमा यशस्वी करू शकत नाही आणि झाला तरी ते फक्त कलाकाराचे यश नसते.
आता बॉलिवूड चा दर्जा स्थानिक भाषेतील सिनेमा पेक्षा खूप खालच्या दर्जाचा आहे.
उत्तम कलाकार ,संगीतकार,लेखक बॉलिवूड
मध्ये नाहीत.
काही दिवसांनी बॉलिवूड अस्तित्व साठी धडपड करेल हे मात्र नक्की.
आता बॉलिवूड चा दर्जा स्थानिक
आता बॉलिवूड चा दर्जा स्थानिक भाषेतील सिनेमा पेक्षा खूप खालच्या दर्जाचा आहे.
>>>>
कुठल्या स्थानिक भाषा?
मराठी नसावा... मराठी चित्रपट
मराठी नसावा... मराठी चित्रपट अजूनही दर्जाहिनच आहेत...
मराठी नसावा... मराठी चित्रपट
मराठी नसावा... मराठी चित्रपट अजूनही दर्जाहिनच आहेत...>>>>>
आपल्या या लाडक्या कलाकाराचा
आपल्या या लाडक्या कलाकाराचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' आज hotstar disney वर रिलीज झाला. त्याच्या चाहत्यांनी नक्की पहा. वो नहीं उसकी यादे सही....
@सान्वी पोस्ट टाकताकाज?
@सान्वी पोस्ट टाकता का ?
जास्त लोकांपर्यंत जाईल!
ललितलेखनात चालेल की!
या चित्रपटाच्या नावाने
या चित्रपटाच्या नावाने आधीपासूनच एक धागा काढलेला आहे. पण त्यावर कोणी प्रतिसाद दिलेले नाहीत जास्त म्हणून इकडे टाकलं मी. हवं तर त्या धाग्यावर जाऊन पण टाकते.
https://www.lokmat.com/photos
https://www.lokmat.com/photos/crime/rhea-chakraborty-transacted-15-crore...
हे खूपच दुःखदायक आहे कि रियाने केलेल्या fraud आणि छळामुळे सुशांत ने हे पाऊल उचलले असेल..
खूपच भीतीदायक आहे हे
खूपच भीतीदायक आहे हे.डिप्रेशनमध्ये असलेल्या,लॉकडाऊन मुळे कुटुंबाशी डिस्कनेक्ट असलेल्या स्वतःच्याच प्रिय मित्राचा असा गैरफायदा घेतला असेल तर.हे खरं असेल तर तिला कडक शिक्षा व्हावी.
१७ कोटी काढले त्यांच्या
१७ कोटी काढले त्यांच्या अकाउंट मधून
Wtf !!
एवढं मोठं ब्लॅकमेल कोणत्या गोष्टी करता केलं असेल
Oh तुमच्या बातमीत १५ आहे
..............................................................................................
मागच्या वर्षी रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचं controversial photoshoot
झालेलं होत. काय माणूस आहे तो
म्हातारचळ एकच शब्द
सॉरी मी इतका मोठा नाहीये
पण... फोटोच तसले होते
अवांतरः
अवांतरः
लॉक डाऊन, एकंदर सगळीकडे जास्तीची कागदपत्रे यात 15 कोटी काढणे इतके सोपे कसे पडले?इथे 1 लाख असले तरी काढायला दुसऱ्याला पाठवलं तर बँक हजार प्रश्न विचारते. फोन करून खात्री करून घेते.
@मी अनु ते पैसे काढण्याचं
@मी अनु ते पैसे काढण्याचं जुने असण्याची शक्यता आहे
एक तर त्याच्या मॅनेजर ने देखील आत्महत्या केली होती.
काही तरी कनेक्शन असणारच की !!
मी जे काही वाचल आहे हे किव्वा
मी जे काही वाचल आहे हे किव्वा जे व्हिडीओ बघितले आहेत त्यानुसार महेश भट आणि सलमान खानला पोलिसांनी नोटीस बजावली आहे अशी बातमी आहे . महेश भट काल का परवा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आले . महेश भट्ट ने रिया चक्रवर्तीला बरोबर सुशांतच्या आत्महत्या किंवा खुनाच्या आधी एकच आठवडा त्याच्या घरातून बाहेर पडायला का सांगितलं हा प्रश्न आहे . असं का त्यांनी रियाला सांगितलं कि तू त्या घरातून बाहेर पड . त्याला ( भट ला ) त्याच्या खुनाबद्दल आधीच काही माहिती होती का ? सलमान खानने सुशांतला " तुझं करियर बरबाद करेन अशा धमक्या दिल्या होत्या म्हणून त्याला पण पोलिसांनी बोलावलं आहे
सुशांतच्या पब्लिक रिलेशन सेक्रेटरीने १५ दिवस का एक महिना आधी आत्महत्या केली होती अशी बातमी होती पण असं म्हणतात ती आत्महत्या नव्हती . तिला बिल्डिंग मधल्या तिच्या उंचावरच्या फ्लॅट मधून ढकलून दिल गेलं. आणि तिने वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली अशी बातमी सांगितली गेली पण या सगळ्या मागचं खर कारण पण समजलं आहे "ती एका फिल्मी पार्टीमध्ये गेली होती . ज्या पार्टीत सुशांत चा संदीप सिंग नावाचा मित्र + सद्याच्या तिघाडी सरकार मधला एक महत्वाचा नेता + आदित्य पांचोलीचा मुलगा आणि दोन तीन जण ( सुशांतला माहित असलेले/ सुशांत ज्यांना ओळखत होता असे ) पण सामील होते . त्या पार्टीत त्याच्या सेक्रेटरीवर जबरदस्ती झाली असं त्या सेक्रेटरीचा म्हणणं होत . ती गोष्ट तिने सुशांत ला सांगितली. सुशांतने त्याच्या मित्राला फोन करून काय प्रकार आहे ?असं विचारल. आणि त्यात कोण सहभागी होत हे जर मला कळलं तर मी त्याच्या विरुद्ध आवाज उठवेन असं सुशांत ने त्याला सांगितलं . त्यानंतर लगेच दोन दिवसात त्याच्या सेक्रेटरीने आत्महत्या केली अशी खबर आली आणि त्या नंतर सुशांतला धमक्या यायला सुरवात झाली कि "या बाबतीत काही बोललास तर तुझी पण तिच्या सारखीच अवस्था करू "म्हणून त्याने ( त्या धमक्या ) टाळण्यासाठी एका महिन्यात ६० सिमकार्ड बदलले आणि तो बरेचदा तो त्याच्या गाडीतच झोपत होता असं त्याच्या नोकरांकडून समजलं आहे .
सुशांत च्या आत्महत्ये नंतर किंवा त्याला मारल्यानंतर त्याला सकाळी ज्यूस देणाऱ्या त्याच्या घरच्या नोकराकडे २५-३० लाख रुपये सापडले आहेत म्हणे . ते कुठून आले असं विचारलं असता तो बोलत नाहीये अशी बातमी आहे . ते पैसे त्याला तोंड बंद करण्यासाठीच दिले असावेत असा होरा आहे. आणि त्याच पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांना पण काही कोटी रुपये मिळाले आहेत अशी एकंदर बातमी आहे . सीबीआय ची चौकशी महाराष्ट सरकारला नको आहे कारण सुशांतची सेक्रेटरी ज्या पार्टीत गेली होती आणि तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली अशी तिने सुशांत कडे तक्रार केली त्या पार्टी मध्ये तिघाडी सरकारमधला एक नेता उपस्थित होता म्हणून महाराष्ट सरकारला सीबीआयची चौकशी नको आहे . चौकशी आम्हीच ( म्हणजे पोलीस ) करतो असं ते म्हणताहेत .
सुशांत वर उपचार करणाऱ्या मानसोपचार डॉक्टरांची पण चौकशी करण्यात आली आहे . त्यांचं असं म्हणणं पडलं कि तो ट्रीटमेंट घेत होता हे मान्य आहे पण त्याची मानसिक स्थिती इतकी काही टोकाची बिघडलेली नव्हती कि तो आत्महत्येसारख पाऊल उचलेल.
लास्ट म्हणजे कंगना राणावत ला धमक्या मिळायला सुरवात झाली आहेच
This is just LOL
This is just LOL
कोणत्याही स्टेटमेंट च्या शेवटी " म्हणे" हा शब्द जोडला की सत्यासत्यता, पुरावे वगैरे काहींच्या भानगडीत न पडता हवी ती गोष्ट पसरवता येते .
असो...
लाडक्या राणावत बाईंनी नवीन
लाडक्या राणावत बाईंनी नवीन आघाडी उघडली आहे , पहिलीत की नाही,
आलीया ने तिच्या लहानपणीचा फोटो ट्विट केला, तो viral झाला, मग लगेच कंगना बैंन्नी SSR चा लहानपण चा फोटो ट्विट करून ही मंदबुद्धी अभिनेत्री आणि ओलिम्पियाड विनर SSR मधले जास्त cute कोण आहे ते तुम्हीच ठरवा म्हणून ट्विट केले आहे ( वय वर्षे 2-3 चे फोटो पाठवताना तिला ओलिम्पियाड चा संदर्भ का द्यावासा वाटला ते तीच जाणो)
(No subject)
सुजा यांनी लिहिलंय त्यावर
सुजा यांनी लिहिलंय त्यावर सिनेमा किंवा वेबसिरीज होऊ शकेल.
कास्टिंग ठरवायला घ्या.
टास्कन्ड फाईल्स 2
टास्कन्ड फाईल्स 2
लालबहादूर शास्त्री अन ह्या केस मध्ये बर्याच सिमीलेरिटी आहेत ना ?
लोकांनी राणावत बाईंच्या
लोकांनी राणावत बाईंच्या मुलाखती, भाषणाचे जुने video काढले. ते बघून त्यांचे भक्त म्हणतात, "मधल्या काळात त्यांना असे अनुभव आले असतील "किंवा " त्यांची मतं बदलू शकत नाहीत का?"
आधी त्यांना गलीबॅयमधलं रणवीरचं काम आवडलेलं
नेपॉटिझम चालायचंच, एवढं काय त्याचं?
इ.इ.
हिचा पहिला सिनेमा भट नेच
हिचा पहिला सिनेमा भट नेच काढला ना ?
कंगना म्हणजे कृष 3 मधली साप सरडा ना ?
रिया आणि तनुश्री दोघी बंगाली
रिया आणि तनुश्री दोघी बंगाली
रिया आणि तनुश्री दोघी बंगाली.
सुशांत बिहारी.
मराठी लोक विनाकारण ह्या मध्ये स्वतः ल सामील करून घेत आहेत.
जे महाराष्ट्र पोलिस वर विश्वास ठेवत नाहीत सारखे सीबीआय नी चोकशी करा असा घोशा लावतात.
आणि fir mumbai मधे दाखल न करता बिहार मध्ये करत आहेत.
तरी मराठी लोक विनाकारण त्या मध्ये सामील होत आहेत
बापरे भयानक आहे हे. सुशांत
बापरे भयानक आहे हे. सुशांत च्या वडिलांनी केलेले आरोप तर खरंच गंभीर आहेत. तरी वाटत होतंच की हे काही साधं प्रकरण नाही म्हणून. चित्रपट न मिळणं किंवा नेपोटीझम यासारख्या गोष्टींमुळे जीव देण्याइतका सुशांत लेचापेचा नव्हता. या बाईने त्याची सगळ्या बाजुंनी कोंडी केली त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असावे. हे आरोप सिद्ध होणं मात्र अवघड आहे कारण तिच्यामागे भट कॅम्प आणि बाकी मंडळी आहेत, याची बाजू सिद्ध करणारं कोणी नाही.
सुशांतच्या वडिलांनी मुळात हे पाऊल उचलायलाच किती दिवस लावले. त्याच्या बहिणींनी पुढे येऊन वडिलांसोबत साक्ष द्यायला हवी. एका चांगल्या हुशार मेहनती माणसाचा, अशा सडक्या वृत्तीच्या लोकांमुळे हकनाक बळी गेला.
केस cbi कडे न सोपवण्याची सरकारची भूमिकाही नक्कीच संशयास्पद आहे. त्याला मरणोत्तर तरी न्याय मिळावा हीच इच्छा...
काहीही सिद्ध होणार नाही
काहीही सिद्ध होणार नाही
वर्षांवर्षें खटला चालत राहील
वकील आणि मीडिया ची सोय होईल
यापलीकडे काही नाही
फुटपाथवर गाडी घालून माणसे चिरडणारे राजरोस स्टार म्हणून मिरवतात इथे
महाराष्ट्र सरकार सुशांत ला
महाराष्ट्र सरकार सुशांत ला न्याय का देणार नाही ?
वरची सुजा यांची पोस्ट वाचा
वरची सुजा यांची पोस्ट वाचा
लॉकडाउनमध्ये पार्ट्या
लॉकडाउनमध्ये पार्ट्या
एका जबरदस्ती साठी 2 खून होतील
एका जबरदस्ती साठी 2 खून होतील असे वाटत नाहीये.भारतात (सर्व वेगवेगळ्या पक्षांच्या)सबळ नेत्यांकडून झालेल्या अश्या घटना खून करावा न लागता त्यांना दाबता आल्या आहेत.
Pages