सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राइट विंगर्सवाले आदित्य ठाकरेचा दिशा पाटनीसोबतचा फोटो फिरवून म्हणताहेत, हा बघा रिया बरोबर कोण? म्हणूनच म पो सुशान्तच्या मृत्यूची चौकशी करत नाहीए.

पद्मावतच्या वेळी कर्णी सेनेने तोडफोड, धमकीबाजी असले प्रकार केले होते तेव्हा सुशान्तने त्याचा निषेध म्हणून "मी आपल्या नावातून राजपूत हटवतो," असे घोषित केले होते. तेव्हा सुशान्तवर जोक आणि असभ्य कमेंट करणारेच आज त्याच्या मृत्यूची चौकशी करा म्हणुन कालवा करताना दिसताहेत.

समजा आत्महत्ये मध्ये रिया चा काहीही संबंध नाही, मुंबई पोलिसांनी पण तिचा आत्महत्ये मध्ये काही संबंध आहे किंवा नाही असे म्हटले नाही, पण मीडिया , समाज माध्यमे आणि काही राजकीय नेते हे तिच्यावर दोषारोप करत आहेत.
ह्या सर्वां मुळे तिला dipression येऊन तिने स्वतः आत्महत्या केली तर दोष कोणाला द्यायचा.

बंगाली लोकांना चेटूकविद्या येते हे ओपन सिक्रेट आहे खरे.
______________
बाकी सुशांतला कदाचित पॅरॅनॉइया असावा व र्‍हिआ व तिच्या आईला भूतबाधेचा संशय असावा. बरेचदा मेंटल इलनेस कळला नाही की लोक भूतबाधा म्हणुन लेबल करतात. स्वानुभव.

काहीपण.

आता गे लोक म्हणत आहेत की त्याचे लैगिक शोषण होत असल्याने त्याने आत्महत्या केली

In my personal experience with bong chiks didn't find any chetuk-fituk in them but they are quite hot Wink

> त्याच्या बॅंकेतून १५ कोटी गायब आहेत
सत्य पायात चपला चढवेपर्यंत असत्य पृथ्वीची एक फेरी पूर्ण करून येते अशी जुनी म्हण आहे. पंधरा कोटी ही संख्या सुशांत च्या वडिलांनी केलेल्या आरोपात आहे. (वचने किं दरिद्रता) म्हणजे आजच्या घडीला हा फक्त आरोप आहे. त्याची कोणतीही शहानिशा झालेली नाही. आपल्या अपत्याने आत्महत्या केली की इतर अनेकांवर बेछूट आरोप करणे हेही एक एस्केप मेकॅनिझम किंवा कोपिंग मेकॅनिझम आहे. सुशांत आजारी होता व रियाने त्याला शक्य तेवढी साथ दिली हे त्याच्या डोक्टरचे मत आहे. शिवाय पंधरा कोटी वर त्याच्या सी ए नेही खुलासा केला आहे. आधी खाणावळ, मग के जो व आता आणखी कोणी असे बळीचे बकरे शोधण्याच्या नादात मानसिक आजार ही एक समस्या आहे व त्यवर योग्य उपाय केले जावेत हे कटू सत्य दबून जाईल. सर्व काही आलबेल असताना अतीव डिप्रेशन ने एखाद्याला आत्महत्या करावीशी वाटू शकते हे स्वीकारणे इतके अशक्य आहे का ? शिवाय जादू टोना वगैरे आरोप करून एका राज्याच्या राहिवाशांचे स्तिरिओटायपिंग खरेच आवश्यक आहे का?

आपणच असे स्तिरिओटायपिंग करत असू तर हिंदी सिनेमात मराठी पात्रे केवळ पोलिस(तेही फार तर हवालदार)), घरगडी, मोलकरीण, अशाच भूमिकात दिसतात याचे वाईट कोणत्या तोंडाने वाटून घेणार ?

ज्यांना पोहता येत नाही त्यांनी पाण्यात उतरू नये.
आपला वापर कोण करून कोणी घेत असेल तर वेळेत सावध झाले पाहिजे.
एवढी अक्कल तर असावी.
एका अगदी कमी शिकलेली बंगाली बाई चे विचार ऐकले आणि धन्य झालो
सिंपल लॉजिक आहे.
बंगाल मधून मुंबई मध्ये ठराविक हेतू नी आल्य नंतर टार्गेट फिक्स करणे जी लोक हेतू साध्य करण्यास मदत करू शकतात त्यांच्या शी जवळीक साधने.
रिया नी पण तेच केले पण सुशांत च्या ते लक्षात आले नसेल.
इथे मोठा चाणाक्ष माणूस लागतो.

ओह हे बंगाली काळी जादू या प्रकरणात आहे होय
गेले काही दिवस नुसते मिम्स बघतोय काही रेफरन्स लागत नव्हता

नवीन Submitted by vijaykulkarni on 2 August, 2020 - 19:54 > सौ टकेकी बात ! मी अर्णब आणि सुशांत दोघांनाही कधी फॉलो केलेलं नाही पण मला दोन दिवसांपासून युट्युबवर अर्नबचे व्हिडीओ सजेशन्स येतायेत स्क्रीनमध्ये. कोणी गुन्हेगार असलाच तर येईलच कधीतरी बाहेर पण आधी नेपोटीजमच्या नावाने साऱ्या बॉलीवूडचा उध्दार केला आता त्या रिया आणि तिच्या घरच्यांचं कॅरॅक्टर असासिनेशन सुरु आहे. अर्नबीइतका गणंग पत्रकार आख्या जगात नसेल. दिल्लीच्या त्या जसलीन कौर- सर्वजीत सिंग प्रकरणाची आठवण येतेय. मीडिया ट्रायल आणि त्या एन्टम पोरीने सर्वजीतच्या चांगल्या आयुष्याची वाट लावली. मीडिया ट्रायलचे असे बरेच किस्से आहेत. बिहारच्याच मुझ्झफरपूर बालिका कांड - ते शेकडो कोटींचा पुल वाहून गेला तिथं लोकांनी एवढं डोकं लावलेलं दिसलं नाही.

Jeffrey Epstein ने पण अतीव नैराश्यामुळे कोठडीत आत्महत्या केली, हो ना विकु?

पंधरा कोटी ही संख्या सुशांत च्या वडिलांनी केलेल्या आरोपात आहे.
>>>>

आज नात्यातील एका उच्चपदस्थ पोलिसाशी भेट झाली. म्हटले मामा सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनमी होतेय.
असे चिडले ते हाण हाण शिव्या घातल्या असे आरोप करणारयांना.
एकूणच यामागे जे बिहारी राजकारण चालूय त्याचाही उद्धार केला.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा (?) राजकीय वापर करणारयांनाही जाम शिव्या हासडल्या.
महाराष्ट्रात शेकडो शेतकरी आत्महत्या करत असताना सुशांतची आत्महत्या उचलून धरत जे आपली राजकीय पोळी भाजत आहेत हे गेले दोन तीन दिवस सलग न्यूज बघून आता मलाही वाटू लागलेय

सुशांतला न्याय जरूर मिळावा असे आताही वाटते
पण कोण्या नालायकांची पोळी त्यावर भाजली जाऊ नये.

महाराष्ट्रात शेकडो शेतकरी आत्महत्या करत असताना///

अजूनही या आत्महत्या चालूच आहेत का? आर यू शुअर?

महाराष्ट्रात शेकडो शेतकरी आत्महत्या करत असताना सुशांतची आत्महत्या उचलून धरत जे आपली राजकीय पोळी भाजत आहेत हे गेले दोन तीन दिवस सलग न्यूज बघून आता मलाही वाटू लागलेय>>>>

महाराष्ट्रात शेकडो मृत्यू कोरोना ने होत असताना केवळ अमिताभ आजारी पडला म्हणून काळजी आणि प्रार्थना करणारे याच प्रकारात मोडतात का?

आशुचँप Happy

महाराष्ट्रात शेकडो मृत्यू कोरोना ने होत असताना केवळ अमिताभ आजारी पडला म्हणून काळजी आणि प्रार्थना करणारे याच प्रकारात मोडतात का?
>>>>>

उद्देश !

अमिताभ आवडीचा त्याची काळजी करणे
कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही

त्यासोबत ईतर जणांना कोरोना झाला आहे त्याचीही काळजी आहेच. माझ्यापरीने जमेल तशी मदतही केली आहे. जी अमिताभला केलेली नाही..

पंधरा कोटी रुपये बॅंकांच्या अकाउंट्मधे होते? साध्या अकाउंट्मधे? की ते कुणीही खोटी सही मारून अथवा धाक दपटशाने सही घेऊन लंपास करावे? इथे पन्नास हजारांच्या वर पैसे काढायचे किंवा ट्रांस्फर करायचे तर दहादा विचार करावा लागतो आमच्यासारख्या बिचाऱ्या ममव ला. हिशेब ठेवावा लागतो टोटल विथ्ड्रॉवल्स कोणत्या महिन्यात किती वगैरे .. आणि पंधरा कोटी रुपये हातोहात लंपास?

अजूनही या आत्महत्या चालूच आहेत का? आर यू शुअर?
>>>

येस्स
ते तसेच म्हणाले

तुम्ही आकडे आणा
मी चेक करतो

>अर्नबीइतका गणंग पत्रकार आख्या जगात नसेल.
जरा जपून हं. तो आजच्या रुलिंग एस्टॅब्लिशमेंट च्या गळ्यातला ताईत आहे. हजारो किलोमीटर पायपीट करत घरी परतणार्‍या मजूरांसाठी सुप्रीम कोर्ट कडे वेळ नाही पण पालघर प्रकरणात नसलेला जातीय रंग देण्यार्‍या आर्णव साठी वेळ आहे.

गुन्हा मुंबई महाराष्ट्र मध्ये घडला आहे आणि चोकशी दुसऱ्या राज्यातील पोलिस करत आहे.
हे राज्यं घटनेत बसत का?.
सीबीआय चा अधिकारी सुद्धा राज्य सरकार ची परवानगी नसेल तर अशी चोकशी करू शकत नाही.
मध्ये तेलंगणा नी सीबीआय ला राज्यात प्रवेश देण्यास मान्यता दिली नव्हती.
महाराष्ट्र नी देशप्रेम चे अती प्रेम कमी करावे आणि बिहार पोलिस ना बाहेरचा रस्ता दाखवावा.
सुशांत नी दक्षिण भारतातील राज्यात ,किंवा बंगाल मध्ये आत्महत्या केली असती तर बिहार पोलिस ना entry ch दिली नसती .
चोकशी लांब ची गोष्ट.

अमिताभ आवडीचा त्याची काळजी करणे
कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही>>
अमिताभ आजारी पडल्यावर होमहवन करणार्यांना काळजी वाटत होती की प्रसिध्दी मिळवायची होती हा संशोधनाचा विषय आहे.

>>>>>>>आपणच असे स्तिरिओटायपिंग करत असू तर हिंदी सिनेमात मराठी पात्रे केवळ पोलिस(तेही फार तर हवालदार)), घरगडी, मोलकरीण, अशाच भूमिकात दिसतात याचे वाईट कोणत्या तोंडाने वाटून घेणार ?>>>>>> आपण स्टिरीओटायपिंग केले नाही तर जग सुधारणार नाही. ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स. आधी सिनेसृष्टीत ढिगभर मराठी नावे दिसत आता ती सृष्टी या दिखाउबाज पंजाब्यांनी खाउन टाकलेली आहे. अतिशय गोड बोलणारे व भपकेबाज असतात हे पंजाबी आणि एका एका समाजाची वैशिष्ट्ये असतात ब्वॉ. अनुभव आहे - सिंधी पैशाच्या मागे धावणारे - आहे एक मैत्रीण तशी, कर्नाटकी मैत्रीण ही कर्नाटकी म्युझिक मध्ये आहे. माझ्या मुलीचे अरंगेत्रम नव्हेंबरात तुझ्या मुलीचे कधी - अशाच गप्पा या मैत्रिणींमध्ये होताना ऐकते मी. गुजराथी मैत्रीण व तिचा नवरा बिझनेस मध्ये महाहुषार आहेत खरे . तमीळ सहकारी - गर्व फार होता त्याला तमिळ असण्याचा.
एकेक स्वभाववैशिष्ट्ये आहे.

Pages