सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज ट्विटरवर नवी चर्चा. सुशांतच्या पवित्र रिशता मालिकेचे सर्व भाग युट्युबवर मोफत बघायला आधीपासूनच उपलब्ध होते. 2009 साली सुरू झालेली मालिका 2020 मध्ये फार कोणी बघत नव्हते- अगदी लॉकडाऊन असला तरीही.
पण सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी 'पवित्र' अगदी पहिल्या भागापासून बघायला सुरुवात केली. युट्युबवर मालिकेला भरपूर नवीन प्रेक्षक मिळाले. आता झी टिव्हीने ही मालिका एका फटक्यात युट्युबवरून उडवली आहे. सर्व भाग उडवले. आता जर मालिका बघायची असेल तर झीचं app वापरूनच बघावी लागेल. त्यामध्ये युट्युबच्या तुलनेत जास्त जाहिराती असल्या, त्याचा युझर इंटरफेस युट्युबइतका सोपा व चांगला नसला तरीही.
म्हणजे सुशांतच्या मृत्यूचा, त्यातून उसळलेल्या शोकाच्या लाटेचा वापर झी टीव्ही आपलं app monetise करायला वापरत आहे. कालपर्यंत अनेक वर्षे युट्युबवर फुकट असलेले एपिसोड मुद्दाम काढायचे म्हणजे किती टोकाचा कोडगेपणा आहे.

प्रेक्षकांचा देखील कोडगेपणाच ना... तो होता - व्हिडीओ फ्री होतं तर बघत नव्हते... आता सुशांत गेला तर बघायला पाहिजे...
जिवंत असताना त्याचे चित्रपट थेटर ला जाऊन बघायचे होते...

सुशांतच्या बाबतीत खरे काय झाले कोणालाच ठाऊक नाहीये आणि कदाचित हाय प्रोफाइल केस म्हणून माहित होणारदेखील नाही. परंतु बॉलिवूड मध्ये नेपोटीजम आहे हे नक्की ज्यामुळे खरंच चांगल्या कलाकारांना योग्य संधी मिळतेच असे नाही. हे थांबवायचे असेल तर किमान एक ते दोन वर्ष तरी बिग बॅनर चे आणि सो कॉल्ड सुपरस्टार आणि स्टारकिड्स चे चित्रपट थिएटरात जाऊन पाहणे थांबवावे. असे करून चित्रपट पडल्यास टीव्ही वर लवकर येतो तेंव्हा पाहावा किंवा अगदीच वाटले तर नंतर डीवीडी आणून पाहावा.

याच धाग्यावर मागे कोणीतरी सैनिकांच्या श्रद्धांजलीचा विषय काढला होता तेंव्हा चित्रपटातून वाचलेले पैसे सरळ सैनिकांच्या परिवारासाठी खरेपणाने काम करणाऱ्या संस्थेत किंवा भारत के वीर अथवा नॅशनल डिफेन्स फंडात जमा करावेत. हीच सुशांत आणि सैनिकांसाठी खरी श्रद्धांजली असेल. माझ्यापरीने तरी मी हा निर्णय घेतला आहे. अनेक जणांनी ठरवून केले तरच चित्र बदलू शकेल नाहीतर काही दिवसांनी हे सर्व शांत झालं की पुन्हा तेच दुष्टचक्र सुरु.

इथे भावनिक स्तरावर विचार करायला कोणाला वेळ नाही जग व्यवहारिक पना वर चालत.
झी टीव्ही त्यांचा फायदा बघणार,न्यूज वाले त्यांचा कशात फायदा आहे हे बघून न्यूज देणार,निर्माते त्यांना कोण पैसे कमवून देवू शकते ते बघणार.
थिएटिर वाले जास्तीत जास्त तिकीट दर आणि समोसे चे दर वाढवणार.
आणि राहिला प्रेक्षक तो तिकीट परवडेल का हा विचार करून theatre madhye janar.
He असेच असते.
आणि अभिनेता,अभिनेत्री त्यांची प्रसिध्दी कॅश करणार.
कले वर प्रेम असेल तर ते खूप कमी percent madhye aste

झी5 ची स्ट्रॅटेजी पाहून डिस्टरब झालेत लोक Happy
पाकिझा च्या रिलीज च्या जवळपास मीना कुमारी वारली तेव्हा आता पाकिझा नक्की हिट होणार म्हणून आनंदित झालेले लोक.
माणूस गेला की त्याच्याबद्दल उमाळा येणे हे पूर्वीपासून चालत आलेले लोकांचे भावनिक वर्तन आहे.
तस्मात, हे SSR बद्दल स्पेसिफिक नाहीये, हा इंडस्ट्री चा नॉर्मल कारभार आहे

पाकीझा आधी रिलीज झाली. प्रिमियरला मीनाकुमारी हजर होती. चित्रपटाला थंडा रिस्पॉन्स मिळाला. मग मीनाकुमारी गेली आणि चित्रपट सुपरहिट झाला

फिजीकसात मार्क पडले
हवे ते कॉलेज मिळाले
मग डिग्री पूर्ण न करताच सिरीयल मिळाली म्हणून हिरो
मग सिरीयल सोडून लहान सिनेमे
मग मला मोठे बेनरच हवेत आणि ते घेत नाहीत
एक गर्ल फ्रेंड केली , ती सोडली
मग दुसरी गर्ल फ्रेंड
मग पश्चात्ताप , आता परत पहिलीच पाहिजे.
मोठ्या बेनरमध्ये काँट्रॅकट नको म्हणे.

जोहर , चोप्राने ह्याला घेतले जरी असते तरी तेही सोडून आता मला हॉलिवूड मध्ये घेत नाहीत , म्हणून फेसबुकवर आले असतेच,

फिजिक्स च्या भाषेत ह्याला ब्राऊनियन मोशन म्हणतात ना ? अशा रेंडम व्हेकटर्सची सम ही अशीच 0 , मायनस , नैतर तो आडवा इंग्रजी आठ वगैरेच निघणार ना ?

दुसरी सोडली. तिसरी केली.
तिसरीने फुल त्रास दिला.
पहिलीला सोडल्याचा पच्छाताप.

हे राहिले....

नेपोटिसम वर वेगळा धागा काढा... नेपोटिसम वगैरे काही नसते... जर कलाकार व्यवस्थित नसेल तर काही होत नाही... लॉन्च व्हाल पण नंतर काही नाही होत...
राजीव कपूर
शशी कपूर चा मुलगा
कुमार गौरव
सनी देवल चा मुलगा
पुरु राजकुमार
कित्येक उदाहरणे आहेत...

१५ दिवस होऊन गेले सुशांत ला जाऊन तरी अजून विसरत नाहीये .. असा वाटत आहे कोणीतरी घरातील व्यक्ती गेली आहे.. त्याचा गाणं पाहिलं तरी खूप रडू येत आहे. .. का ते समजत नाही कि काय connection आहे.. त्याला जस्टीस मिळायला हवा ज्या मुळे त्याने हे पाऊल उचलले आहे Sad

सुशांत सिंग च्या आयुष्यातील 50 फॅक्टस असा एक व्हिडिओ नुकताच पाहिला. खूप चांगल्या प्रकारे त्याच्या आयुष्याचा आढावा घेतला आहे. तो व्हिडिओ च त्याच्या वेगळेपणा बद्दल खूप काही सांगून जातो. अशा माणसाने असं अचानक आयुष्य संपवणे खूप भयंकर आहे.
https://youtu.be/ukvVhgHjEns
इतके दिवस होऊनही त्याबद्दल अस्वस्थ वाटतंय.

हॉटस्टार वर आहे...
>>
मी तिथेच पाहिलेला..
थिएटरला बघायलाही आवडला असता. छान मूवी आहे. थ्री ईडियटसची आठवण येते बरेचदा. फिल्म फेअर ॲवार्डस मध्ये याच्या वाट्याला काही आले नाही आणि गल्लीबॉयला नऊ ॲवार्डस मिळाले म्हणून कंगणाही चिडलेली पाहिले एका विडिओत.

हो पिक्चरही खूप छान आहे. मी पाहिलेला त्या वर्षातील सर्वोत्तम होता. पण कंगना सुशांतच्या मृत्युनंतर टिका करताना म्हणाली ते दिले

अर्थात फिल्म फेअर ॲवार्ड सेट असतात हे शेंबडा पोरगाही सांगू शकेल. शाहरूख दरवर्षी कुठलातरी एक घेऊन जायचा. एखादा डिजर्व्हिंग कलाकार नाराज होऊ नये म्हणून त्याला क्रिटीक ॲवार्ड सदरात बसवायचे. तर. गल्लीबॉयला नऊ देतानाही सेटींग असू शकेलच.

फिल्मफेअर अवॉर्डस ही गुणवत्तेवर दिली जात नाहीत तर लोकप्रियतेवर दिली जातात. म्हणून नंतर क्रिटिक अवॉर्ड दिले जायला लागले जे देणाऱ्यांच्या मते गुणवत्तेवर असते. गुणवत्ता ही सापेक्ष असू शकते, त्यामुळे त्याचे मोजमाप आपल्या सोयीचे करता येते.

फिल्फेअर अवॉर्ड हे आजचेच नाही तर पुरातन काळापासूनचे scam आहे. जेव्हा सामान्य जनता त्यातील फॉर्म भरून लोकप्रिय नट, चित्रपट निवडायचे तेव्हाही काही आधीचे लोकप्रिय पण नंतर खाली घसरलेले नट एकगठ्ठा अंक विकत घेऊन स्वतःला निवडून आणायचे असा बोलवा होता.

त्यामुळे अशा अवॉर्डसना गुणवत्तावाल्यांनी का महत्व द्यावे?

दिल बेचाराचा ट्रेलर पाहताना खूप वाईट वाटतेय. पडद्यावर इतका उमदा, हसरा, आनंदी दिसणारा माणूस आतून इतका कोसळलेला असावा याचे वाईट वाटतेय, संताप येतोय, हताश वाटतेय आणि भीतीही वाटतेय.

माझ्या जवळची व्यक्तीही आतून इतकी हताश, कोसळलेली असू शकते आणि तरीही ती वरवर असाच आनंदी मुखवटा घेऊन राहात असेल, आत काय चाललेय त्याचा पत्ता लागू देत नसेल या विचाराने भीती वाटते. आपण कितीही हात पुढे केला तरी जो त्रासात आहे त्याने तोंड उघडल्याशिवाय काही खरे नाही. आणि तोंड उघडायचे की नाही हे शेवटी तोच ठरवणार.

"गल्लीबॉय मधला रणवीर चा अभिनय छान आहे.... " ----> त्याला त्याची वर्जिनीटी सॅक्रिफाईज करावी लागलीय करण जोहर सोबत.
त्यामुळे तो तरला... सुशांत बिचारा ऑनस्क्रिन बोल्ड सीन्स , किसिंग सीन्स देऊनही...गेला!
नुसता बोल्डनेस काफी नाहीये... बरेच काळे धंदे आहेत बॉलिवुड मध्ये

हा! हा! हा! भरत भाऊ
ए आय बी नाही बघत मी ओय
पण कुठून पाहील/वाचलं/ऐकलं हे नाही सांगु शकत इथे
"पॉडकास्ट!"

सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण हे त्याचं डिप्रेशन असल्याचं सांगितलं जात असून याच्याच उपचारासाठी ते हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. सुशांतनं आत्महत्याच केली असून हत्येचा कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या का केली याचंही उत्तर आम्हाला जवळजवळ मिळालं आहे, असंही ते म्हणाले. डिप्रेशनचे दोन भयावह आजार आहेत ज्यांनी सुशांतला ग्रासलं होतं.या दोन मानसिक आजारांनीच त्याचा जीव घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पॅरानोया आणि बायपोलक डिसऑर्डर या दोन आजारांनी सुशांत ग्रासला होता. या आजारांवर हिंदुजा रुग्लालयात त्यानं आठवडाभर उपचार घेतले होते.

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...

आज एक महिना झाला. दु:ख, हळहळ कमी होणार नाही.
>>>>
चार महिन्यांनी होईल, सहा महिने.. वर्ष भराने होईल.
आपल्या सिस्टममधील सर्वात मस्त पळवाट हिच आहे. वेळ काढा लोकं विसरतात.

Pages