सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरच.. एक महिना झाला. दु:ख, हळहळ कमी होणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=8LlO7ncRoZo सुशांतचा थोडा वेगळा हसता खेळता, कदाचित most recent पण छान interview. ऐकताना मजा आली.
हा तोच सुशांत ??? Wish he was alive. ईश्वर आत्म्यास शांती देवो .

< आज एक महिना झाला. दु:ख, हळहळ कमी होणार नाही.

खरं आहे .. त्याची कमी कधीच भरून निघणार नाही . आपण कधीही त्याला न भेटून पण इतकं दुःख कुठल्याच सेलेब्रेटी साठी आजवर झालं नव्हतं ..

सिरियसली ! खूप वाईट वाटतंय अजूनही, अगदी आतून तुटल्यासारखं वाटतंय. मी पण काही त्याची फॅन वगैरे नव्हते आवडायचा तो एक चांगला अभिनेता म्हणून. पण आता चकवा लागल्यासारखं जवळपास रोज त्याचे व्हिडिओ, मुव्हीज बघतेय. जीव हळहळतो आहे. तो खरंच अश्या पद्धतीने इतक्या लवकर मरायला नको होता. खरं काय ते लवकर समोर यावं.
आजकाल यु ट्यूब वर त्याचे पूर्वीचे खूप व्हिडीओज बघायला मिळत आहेत.

https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajput-changed-si...

"सुशांतच्या घरात सुसाइड नोट मिळाली नाही, घराची बनावट चावीसुद्धा सापडत नाहीये आणि त्याने महिन्याभरात ५० वेळा सिमकार्ड्स बदलले होते. त्यामुळे सुशांतची आत्महत्या हे काही साधंसोपं प्रकरण नाही असं मला वाटतं", असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. सुशांतने जरी आत्महत्या केली तरी त्याच्या आत्महत्येमागे दोषी असलेल्यांना शोधून काढावं आणि सुशांतला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद निर्माण झाला. या वादावर बोलताना ते पुढे म्हणाले, "शाहरुख खान आणि माझ्याशिवाय सुशांतच असा व्यक्ती होता ज्याने टीव्हीपासून सुरुवात केली आणि मोठ्या पडद्यावर यश मिळवलं. बड्या कलाकारांच्या अहंकाराकडे सुशांतने कधीच लक्ष दिलं नव्हतं. अनेकांच्या डोळ्यांत ही गोष्ट खुपली असेल."

पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे असं म्हणत शेखर सुमन यांनी कोणाचीही नावं न घेता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

शाहरुख खान आणि माझ्याशिवाय सुशांतच असा व्यक्ती होता ज्याने टीव्हीपासून सुरुवात केली आणि मोठ्या पडद्यावर यश मिळवलं.
>>> सिरियसली??? शेखर सुमन स्वतःला शाहरुख आणि सुशांत शी कंपेयर करतोय??? कसले यश मिळवले शेखर सुमन ने?? लोल ...

कसले यश मिळवले शेखर सुमन ने?? लोल ...
>>>>

त्याला छोट्य प्डद्यावरचा अमिताभ बोलायचे जेव्हा त्याचा मूवर्स ॲण्ड शेकर्स तसेच ईतर काही कार्यक्रम जोरात चालायचे.

बाकी त्याचे सर्वात मोठे यश म्हणजे रेखासोबत उत्सव Happy

पण सर्वानी ही आत्महत्या होती हे इतके सहज कसे आणि का मान्य केलेय?
जर कोणी आत्महत्या करणार असेल तर नक्कीच आपल्याला काय त्रास झाला याबद्दल लिहिलच!
मला तर यात नक्कीच काळबेर वाटतय पर्टिक्युलरली ज्या व्यवसायात तो होता त्यामुळे आणि याआधि त्याच्या एक्स मॅनेजरच्या आत्महत्येमुळे.

आजकाल आत्महत्या लोक सहज मान्य करतात. एपस्टिनने जेल मध्ये एवढ्या कडक सुरक्षेत "आत्महत्या" केली त्याच्याकडे मोठं मोठ्या
लोकांची नावे असणारच. तो असा सहज आत्महत्या का करेल?

कोणी कुठे काहिच प्रश्ण विचारताना दिसत नाही. सगळे सहज मान्य करतात. थोडे विषयांतर आहे पण संशयास्पद आत्महत्या आजकाल सहज जास्ति तपासाशिवाय पास केल्या जात आहेत.

जर कोणी आत्महत्या करणार असेल तर नक्कीच आपल्याला काय त्रास झाला याबद्दल लिहिलच!
>>> त्याला चर्चा नको असेल म्हणून त्याने नोट ठेवली नसेल. आणि
आपण तेच करतोय... चर्चा...

त्याला चर्चा नको असेल म्हणून त्याने नोट ठेवली नसेल. आणि
आपण तेच करतोय... चर्चा...>> सहमत! कधी कधी सेलेब असण्याची फार जास्त किमत चुकवावी लागते का? माझ्यामते तरी या सगळ्या चर्चाना पुर्णविराम द्यावा, होतय काय की त्याच्या आत्महत्येच खर कारण माहित नसताना लोक उगाच सेन्शेशन निर्माण करुन स्वतःलाच सोशल मिडियावर पॉप्युलर करुन घेत आहेत. नेपोटिझम इतकच हेही उबग आणणार आहे.

त्याला चर्चा नको असेल म्हणून त्याने नोट ठेवली नसेल.
>>>

१) ती आत्महत्या आहे हे सुद्धा तुम्ही गृहीत धरत आहात.

२) जर आत्नहत्या नसेल तरीही आपल्या मुद्द्याशी काही अंशी असहमत.
कारण नोट ठेवली असती तर चर्चांना तिथेच पुर्णविराम मिळाला असता. किंवा एका दिशेत चर्चा झाली असती. उलटसुलट नाही.
नोट न ठेवल्याने अशी चर्चा होतेय.

लोक उगाच सेन्शेशन निर्माण करुन स्वतःलाच सोशल मिडियावर पॉप्युलर करुन घेत आहेत.
>>>>
लोकांच्या हेतूला असे जनरललाईज नाही करू शकत.
एक उदाहरण आमच्या घरात आहे. माझी बायको गेले महिनाभर दोनच गोष्टी बघतेय. एक पाककृती चॅनेल आणि एक या सुशांतची केस.
अध्येमध्ये ती मलाच हे सांगत असते. कुठेही सोशलसाईटवर ती काही लिहीत नाही ना साध व्हॉटसप स्टेटस यावर ठेवते.
त्यामुळे मी हे समजू शकतो की काही लोकांना खरेच वईट वाटले आहे. अजूनही वाटत आहे.

'चर्चा नको' म्हटल्यावर झालेच ना सगळे सोपे. कोणतेही प्रकरण लगेच दबुनच जाणार.

लोक सुशांतवर मनापासुन प्रेम करत होते. त्याच्या अशा जाण्याने खरंच प्रचंड दु:खी आहेत म्हणुन हे झालं आहे. स्वतःपुरतं सांगायचं झालं तर मी कधीही ट्वीटरवर गेले नव्हते ते केवळ याकरता जाऊन पहाते हल्ली कधीकधी. असंख्य लोक 'आपल्या घरचं एक माणुस गेलंय' या भावनेने दु:ख प्रगट करत आहेत. यात त्या लोकांचा काहीही स्वार्थ नाही.

पण यामुळे जे बिग बॅनर्सवाले, गाण्याच्या इंडस्ट्री मधे जे माफिया राज्य चालले आहे, की 'मी प्रोड्युस करतो म्हणजे मी इतरांना दाबायला मोकळा', 'मी म्हणतो म्हणुन तुझ्या सिनेमात त्याला घे, याला काढून टाक', 'त्याला रिलीज करायला थेटर देऊ नका', किंवा 'मी म्हणतो तीच गाणी संगीतकाराने तयार करायची', 'मी म्हणतो तेच गायक घ्यायचे' असा जो अ‍ॅटिट्यूड बाहेर येतोय वेगवेगळ्या लोकांकडुन ऐकायला, त्यात बदल झाला तरी खुप मोठी गोष्ट असेल. (याकरता नियतीने सुशांतचा बळी दिला असेच मी म्हणेन).

नाहीतर सतत दबंग, चेन्नई एक्स्प्रेस, रावडी राठोड, त्या जोहरचे जे येतात ते असलेच नुसतेच हाईप केलेले सिनेमे पहावे लागतील जे पुन्हा कोणी पहाणार नाहीत व खुराना, कौशल अशा मुलांचे सिनेमे क्वचित येतील वा सिद्दिकी सारख्या प्रतिभावान कलाकारांना संधी मिळुन ते वर येईतोवर ते व त्यांची पिढी दोघेही म्हातारे झालेले असतील.

खर्‍या ताकदवान कलाकाराचे १-२ सिनेमे पडले तरी तो बाहेर फेकला जायची शक्यता खूप वाढते.
पण.....
अभिषेक बच्चन - ६० च्या वर सिनेमात काम मिळालंय त्याला ज्याचा पहिल्या सिनेमापासुन, शेवटचा सिनेमा फ्लॉपच होता.
तुषारकपूर - किमान ३०-४०
सोनम कपुर - २०-२५
सोनाक्षी सिन्हा - किमान २५
ते सोडा उदय चोप्रा, फर्दिन खान, झायेद खानला पण २०-२२ सिनेमे मिळालेत.
ही यादी संपत नाही.

या लोकांना इतके सिनेमे फ्लॉप झाले तरी सिनेमांवर सिनेमे मिळत रहातात. का? त्या सिनेमांचा वकुबपण मग गरीबच रहातो. तेच सिनेमे जर खर्‍या कलाकारांना मिळाले असते तर त्यांनी त्याचे सोने केले असते, सिनेमा अजुन ताकदवान बनवला गेला असता.

हे जेव्हा माफियांना कळेल तेव्हा त्यांच्याकडुन पुन्हापुन्हा पहाण्यासारखे सिनेमे बनू लागतील व प्रेक्षकांचे सुदैव जागेल.

अभिषेक बच्चन - ६० च्या वर सिनेमात काम मिळालंय त्याला ज्याचा पहिल्या सिनेमापासुन, शेवटचा सिनेमा फ्लॉपच होता.
तुषारकपूर - किमान ३०-४०
सोनम कपुर - २०-२५
सोनाक्षी सिन्हा - किमान २५
ते सोडा उदय चोप्रा, फर्दिन खान, झायेद खानला पण २०-२२ सिनेमे मिळालेत.
ही यादी संपत नाही.>>

हे सिनेमे पैसे कमावताहेत आणि ज्यांना चांगले कलाकार म्हटले जातेय त्यांचे सिनेमे आले गेले तरी कळत नाही हेच अंतिम सत्य आहे. यांचे सिनेमे पैसे कमावतात कारण हे पहिल्या आठवड्यात शहरातील सर्व सिनेमागृहात झळकतात पण नाव नसलेल्या निर्मात्या/डिस्ट्रीब्युटरला एका गृहात एक शो मिळवणे पण कठीण जाते. नेपोटीझमच म्हणायचा तर तो सर्वत्र आहे.

तुम्ही चांगले/वाईट लोक/सिनेमे असे कितीही भेद मांडले तरी जोवर करण जोहर व सलमानचे चित्रपट पैसे कमावताहेत तोवर त्यांच्या चित्रपटांना मरण नाही.

आत्महत्या करणार्याने स्वतःसाठी नाही तर त्याच्या जवळच्यासाठी तरी नोट लिहून ठेवायला हवी, निदान त्यांना एक क्लोजर तरी मिळते की अमुक एका गोष्टीसाठी याने हे पाऊल उचलले म्हणून. नाहीतर ते आयुष्यभर तळमळत राहतात.

सुशांतच्या बाबतीत त्याला मानसिक आजार होता यावर आता विश्वास बसू लागलाय.

लोक सुशांतवर मनापासुन प्रेम करत होते.
>>> ते आत्ता ... आधी त्याचे चित्रपट थेटरात जाऊन पहिले का कोणी?? राबता , सोनचिरिया कधीaआले कधी गेले कळलेही नाही...

सुशांत चा केदारनाथ आणि छिछोरे आवडला.त्यापूर्वी तो पिके मधला पाहुणा कलाकार म्हणून लक्षात होता(एम एस धोनी खूप नंतर पाहिला)
मूळ फरक पेप्सी कोक आणि एखादे लोकल सॉफ्ट ड्रिंक असा आहे.खेड्यात एकवेळ इंटरनेट रेंज नसेल पण छोट्या दुकानात फ्रीजमध्ये पेप्सी नक्की.पेप्सी कोक तुम्हाला थिएटरमध्ये सगळीकडे घ्यावे लागणार.डोमिनो पिझ्झा हट मध्ये इवलूसे ग्लास पाणी(तेही आधी नसायचे) आणि मोठा टंपर कोक पिऊन पिझ्झा घशाखाली ढकलावा लागणार.आणि तरीहि त्याला ग्लॅमर. बाहेरगावी गेल्यावर बाकी हॉटेल ची खात्री नाही म्हणून हायवेवर डॉमिनो किंवा मॅकडी.
हे पिक्चर श्रीमंत नातेवाईकाने नुकत्याच गोष्टी लिहायला शिकलेल्या मुलासाठी छापलेले वर छान फोटो असलेले गुळगुळीत आर्ट पेपर चे मासिक असते.फॉरीन लोकेशन,सुबत्ता,हिट गाणी,कपडेपट. साहजिक स्टॉल वर आधी ते उचलले, विकले जाते.

हळूहळू लोक हे गुळगुळीत मासिक फक्त कव्हर किंवा छपाई बघून न उचलता थोडे चाळून बघून मग विकत घ्यायला शिकलेत.चांगले दिवस नक्की येणार.

सुनिधी, पोस्ट पटली.
मी माझ्यापुरतं फक्त ठरवलं आहे (कारण तेव्हढंच हातात आहे) की या लोकांना (पक्षी: बॉलिवूड) सोशलवर आणि इतर कुठेच फॉलो करायचं नाही. सध्या करोनामुळे मुव्ही थिएटरला जायचा तर प्रश्नच नाही पण नंतरही यांचे मुव्हीज बघावेसे वाटणार नाहीत. बाकी click bait पद्धतीनुसार न्यूज साईट्स उघडल्या की बॉलिवूड न्यूज दिसत राहतात आणि आपण प्रतिक्षिप्त क्रियेसारखं क्लिक करतोही पण त्याबाबतही माईंडफुल राहण्याचा प्रयत्न करत आहे. जस्ट नो मोअर इंटरेस्टेड.
पायल रोहतगीचे युट्युब व्हिडियो मात्र अजूनही पाहते. रेनड्रॉप मिडियाबद्दल अलीकडे ती बोलली आहे.

सोनचिडीया, सोनचिरिया नव्हे.

सोनचिडीया हा पूर्णपणे बुंदेली बोलीत बनलेला गंभीर चित्रपट आहे. कलाकृती म्हणून त्याचा दर्जा उत्तम असेलही, अर्थात त्यामुळे सगळ्यांनी जिवंत अभिनय केला असणार. पण हे सगळे पाहणार कोण? आठवडाभर आयुष्य ओढून गांजलेल्या लोकांना विकांताला मल्टिप्लेक्सला जाऊन हातात दीडशे रुचे पॉपकॉर्न घेऊन पडद्यावर चकचकाटी विनोद बघत कुटुंबासोबत हसत दोन घटका घालवायच्या असतात. सोनचिडीयाचे पोस्टर बघून तिथेच त्यावर काट मारली जाते.

सिनेमा हाही कलेचा आविष्कार आहे असे मानणारे थोडेसे लोक असतात, बाजारात एखादी चांगली कलाकृती आलीय हे कळले तर ते बघायला जातातही. बाकी जनरल पब्लिकला मनोरंजन हवे असते, कला वगैरे नंतर बघू.

मी माझ्यापुरतं फक्त ठरवलं आहे (कारण तेव्हढंच हातात आहे) की या लोकांना (पक्षी: बॉलिवूड) सोशलवर आणि इतर कुठेच फॉलो करायचं नाही>>>

आधीतरी का करत होता? आधी हे लोक अशी काय विचार मौक्तिकें प्रसवत होते की त्यांना फॉलो करायचे? आणि त्यांनी प्रसवली तरी त्याप्रमाणे काय घडले किंवा कोणी केले असे होत होते का?

आणि नुसते बोलून आणि ऐकणार्याने ऐकून काय होते? जे ऐकले त्याप्रमाणे तुम्ही कृती करत असाल तरच फरक पडेल.

कृपया व्यक्तिशः घेऊ नका.

सलमान खान , कर्ण जोहर , यश चोपड़ा वगैरे नावे आल्याने हिन्दूवाल्याना नेपोटीजम बद्दल फारच कळवळा आलाय

बघा बघा, कसे बॉलीवुड , नेहरू ह्यांनी नेपोतीझम आणले,

सावत्र मुलाला वनवासात ढकेलणे , लहान मुलाला बापाच्या माण्डीवरून जंगलात ढकलणे , शनवार वाड़ा .....

सगळी नेपोटिझमची अति प्राचीन आद्य उदाहरणे ह्यांच्याच पुस्तकात दिसतात

काय बघितलं पाहिजे काय नाही हेच आपल्याला कळत नाही. टॉप 5 कलाकारापैकी एक उचलायचा, अर्धनग्न आयटम सॉंग घुसडायचे आणि जाहिरातीचा प्रचंड मारा केला की पिक्चर हिट होतो. हाच फॉर्म्युला आजकाल सगळे वापरताहेत. सुशांतचा डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी हा बॉलिवूड मधल्या एका अप्रतिम चित्रपटांपैकी एक आहे. किती जणांना या चित्रपटाबद्दल माहीत आहे.

@बोकलत सुशांंत हा तसा फेमस अ‍ॅक्टर होता.
या केसचा निकाल यायला जेवढा वेळ लागतोय तेवढाही तोसामान्य नव्हता
मग अस का? फेमस लोकांच्या पण मृत्यु(खुन) दाबला जातो का आत? फाईल क्लोज करून.
सुशांतने जेव्हा शुद्ध देसी रोमांस हा चित्रपट केला तेव्हा मला वाईट वाटल होतं
त्याची प्रतिभा नक्कीच उजवी होती ना!! :\

सुशांतचाच ड्राईव्ह हा पिक्चर पहिला.तो टिपिकल 'रेस' बेस क्लास चा पिक्चर आहे.मिनीड्रेसीय(याचा पुढच्या शब्दाशी डायरेक्ट संबंध नाहीये) निर्बुद्ध दिसणाऱ्या आणि हिंदी नीट न बोलणाऱ्या बेब्स, गाड्या वगैरे.सर्व कलाकारांना असे पिक्चर करावे लागतच असतील.अभिरुचीपूर्ण, अतिशय दमदार कथेचा पण प्रेक्षकांना न झेपल्याने थिएटरमध्ये आपटलेला एक पिक्चर करायचं धाडस आणायला जवळ 5 फॉर्म्युला पिक्चर चं यश आणि आत्मविश्वास लागत असेल.
(बक्षी पाहिला.चांगला पिक्चर आहे.पण शेवट करताना जरा गोंधळ झालाय असं वाटतं.शिवाय शेवटी फार बीभत्स हिंसा वाले सीन आहेत.पिक्चर ची मुख्य कल्पना फारच सॉलिड आहे.)

सावत्र मुलाला वनवासात ढकेलणे , लहान मुलाला बापाच्या माण्डीवरून जंगलात ढकलणे , शनवार वाड़ा .....

सगळी नेपोटिझमची अति प्राचीन आद्य उदाहरणे ह्यांच्याच पुस्तकात दिसतात>>>>> अग्गोबाई ! ढग्गोबाई !! मग औरंग्या ने त्याच्या वडिलांना,सख्ख्या भावाला मारले ते कोणत्या भूतदयेतून ? मुघल शासक किती दयावान, प्रेमाळु- कृपाळु होते ना, उग्गीच बाई आमच्या महाराजांना दर्‍या- खोर्‍यातुन हिंडुन स्वराज्य निर्माण करावे लागले. Proud

तुम्ही काही म्हणा हो. पण कायम आपल्या तो बाब्या नको. ही माझी शेवटची पोस्ट. इथे तो वाद नको.

सत्य काय देवाला माहीत, पेपर मध्ये रोज बातम्या येतात. पण सुशांतचे जाणे चटका लावुन गेले हेच खरे. तो सेलेब्रेटी असो वा नसो, पण कोणाचा तरी मुलगा होता, कोणाचा भाऊ तर कोणाचा मामा !

आत्महत्या करणार्याने स्वतःसाठी नाही तर त्याच्या जवळच्यासाठी तरी नोट लिहून ठेवायला हवी, निदान त्यांना एक क्लोजर तरी मिळते की अमुक एका गोष्टीसाठी याने हे पाऊल उचलले म्हणून. नाहीतर ते आयुष्यभर तळमळत राहतात.>> पण ती त्याची आत्महत्या नसेलच तर ? कशी काय नोट लिहून ठेवली जाईल ? . त्याच्या मानसिक आजाराचं आत्महत्येसाठी कारण दिल जात आहे पण ती आत्महत्या नाहीये असं बोलल जातंय

इंडस्ट्री मध्ये काही खान लोकांची दादागिरी चालते त्यामुळे पोलिसांवर इंडस्ट्री मधल्या काही वजनदार लोकांपासून केस क्लोज करण्यासाठी प्रेशर आणलं जात आहे असाही बोलबाला आहेच . खान लोकांच्या केस कशा दाबल्या जातात हे काही वेगळ सांगण्याची जरुरी नाहीये . सुनिधीची कळकळ पोचली

खरच.. एक महिना झाला. दु:ख, हळहळ कमी होणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=8LlO7ncRoZo सुशांतचा थोडा वेगळा हसता खेळता, कदाचित most recent पण छान interview. ऐकताना मजा आली.
हा तोच सुशांत ??? Wish he was alive. ईश्वर आत्म्यास शांती देवो .>>>>>>खरंय. त्याचा विचार मनातून जात नाही. स्नेहा_०४ धन्यवाद हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल. किती अनौपचारिक लाईव्हली आहे ही मुलाखत.

खरच.. एक महिना झाला. दु:ख, हळहळ कमी होणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=8LlO7ncRoZo सुशांतचा थोडा वेगळा हसता खेळता, कदाचित most recent पण छान interview. ऐकताना मजा आली.
हा तोच सुशांत ??? Wish he was alive. ईश्वर आत्म्यास शांती देवो .>>>>>>खरंय. त्याचा विचार मनातून जात नाही. स्नेहा_०४ धन्यवाद हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल. किती अनौपचारिक लाईव्हली आहे ही मुलाखत.

त्याचं आय आय टी मधलं भाषण पाहिलं होतं.
निदान मुलगा मधला काही काळ तरी आनंदी, खुश होता हे जाणवून त्यातल्या त्यात बरं वाटलं।
सुशांत सिंग सारखेच फिल्म इंडस्ट्री ने अकाली बरेच कलाकार गमावलेत.पण तरीही आता त्याला पिक्चर मध्ये पाहिलं की आत कुठेतरी हलतं हेही खरं.
सुखी माणसाचा सदरा किमान ज्यांच्याकडे यश, सुबत्ता, रूप आहे अश्याना मिळालेला असावा अशी यातल्या सर्व किंवा काही गोष्टी नसलेल्याना कायम वाटत असते.सुशांत चे जाणे या आशेवर, श्रद्धेवर आघात असल्याने जास्त त्रास होत असावा.

च्रप्स, सोनचिडियाबद्दल किंचीत गणित शोधले.
मुळात हा सिनेमा तयार झालाय व आता रिलीज होणार हे लोकांना माहिती होतं का? त्याची पब्लिसिटी केली नव्हती त्यामुळे १-२दा कोणी बोलुन हवा तयार झाली नसणार. (जी चकचकीत सिनेमांची केली जाते). याला एक कारण असेल की पैसे नसतील ते करायला वा काही इतर कारणे असतील. सुशांतने सरळसरळ लिहिले होते की 'माझा सिनेमा पहा नाहीतर मी बाहेर जाईन, मला गॉडफादर नाही, तुम्ही आहात' असे काहीसे. ते पुरेसे झाले नाही कारण कितीजण ट्वीटरवर जातही नसतात. बरं चॅनलवाल्यांना फक्त बडे निर्माते, तारे यांचीच बातमी द्यायची असते. त्यामुळे ते ही काही लिहिणार, सांगणार नाहीत.
त्यामुळे सोनचिडिया कसाबसा ७०० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, २०० भारताबाहेरच्या चित्रपटगृहात. त्यातही मोठ्या शहरात किती ठिकाणी झाला हा आकडा मला मिळाला नाही.
आता त्याचवेळी आसपास अजुन २ सिनेमे प्रदर्शित झाले. गल्लीबॉय, कलंक.
पैकी गल्लीबॉय ३०००-३२०० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ७००-८०० भारताबाहेरील चित्रपटगृहात . आणि 'कलंक' तर जवळजवळ ५२००-५३०० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. व २००० भारताबाहेरील चित्रपटगृहात.
हे आकडे सांगतात की लोकांनी सिनेमा का पाहिला नसेल. आठवड्याभरात तो पडद्यावरुन खाली पण आला असेल. काय चालणार सिनेमा?
इतका भयंकर फरक का असेल आकड्यात?
गंभीर सिनेमा असेल तरी चालु शकतो जर त्याला प्रदर्शित व्हायची योग्य दिशा मिळाली तर. नेटफिक्सने किंवा प्राईमने आणावा तो आता.

Pages