सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुखी माणसाचा सदरा किमान ज्यांच्याकडे यश, सुबत्ता, रूप आहे अश्याना मिळालेला असावा अशी यातल्या सर्व किंवा काही गोष्टी नसलेल्याना कायम वाटत असते.सुशांत चे जाणे या आशेवर, श्रद्धेवर आघात असल्याने जास्त त्रास होत असावा.
+१
शिवाय तो कोणीही गॉडफादर नसताना संघर्ष करून यशस्वी झाला होता हेही लोकांना जास्त रिलेट होत असावे.
मला वाटते थोडासा पर्स्पेक्टिव्ह ठेवणे आवश्यक आहे.
दुर्दैवाने World is not fair.
असे हजारो तरुण तरुणी मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत संघर्ष करायला येतात. ९०% लोकांना आपल्याला सिद्ध करायची संधीच मिळत नाही.

सुशांत ने आत्महत्या केली आहे हे स्वच्छ आहे . "असा टॅलंटेड, यशस्वी व संवेदनाशील माणूस आत्महत्या कसा करेल ?" असा भाबडा प्रश्न विचारणार्‍यांना डिप्रेशन म्हणजे काय याची कल्पना नसते. नेड विझिनि हा एक टेलंटेड लेखक होता. त्याने स्वतः डिप्रेशन वर मात केली होती व त्या विषयावर तो भाषणेही द्यायचा. त्याच्या एक कादंबरीचे ब्रॉडवे वर नटकही झाले होते. त्यानेही सारे काही ठीक असताना अचानक आत्महया केली.

सुशांत गेल्यापासून त्याचे एका मागोमाग असे खूप व्हिडीओज पाहिले महिन्याभरात. एक अगदी कन्फेस करावंसं वाटतं की, त्यांच्याबद्दलची एवढी माहिती घेण्याची बुद्धी तो असेपर्यंत झाली नाही. नाहीतर कळलं असतं त्याच्या अफाट बुद्धीमत्तेबद्दल, त्याच्या विचारांबद्दल, स्वप्नांबद्दल, की तो किती विविधतेने भरलेला होता. त्याचे सिनेमे बघायला हवे होते चित्रपटगृहात जाउन. पण त्याच्या आत्महत्तेबद्दलचे विचार जात नाहीये मनातून. त्याचा हसरा चेहरा पहिला की गलबलून येतं. एवढी भक्कम विचारांची बैठक होती त्याच्याकडे, आणि बऱ्याचदा त्याने म्हटलं की मला सिनेमे नाही मिळाले तरी मी शॉर्ट फिल्म्स, थिएटर, वेब सिरीज, डान्स क्लास असं बरंच काही करू शकतो. मग का त्याने एवढा टोकाचा मार्ग निवडला असावा.
बरं आणि खून म्हणावा तरी असं लॉकडाऊन चालू असताना, त्याचे मित्र, स्टाफ घरी असताना तो करणं कसं शक्य आहे? खूप काहीतरी फिशी आहे, पण या क्षेत्रातील इतिहासानुसार सत्य बाहेर येण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि हा हसरा, आनंदी, बुद्धिमान अभिनेता का अचानक जग सोडून गेला हे आपल्याला कधी कळणार नाही.असं होऊ नये पण हेच होईल असं वाटतंय...

एक अगदी कन्फेस करावंसं वाटतं की, त्यांच्याबद्दलची एवढी माहिती घेण्याची बुद्धी तो असेपर्यंत झाली नाही. ~~ agree.
याला पेड मिडिया जबाबदार आहे. आता जेवढे येतात समोर तेवढे पुर्वी नव्हते येत.
दुर्दैवाने World is not fair.
असे हजारो तरुण तरुणी मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत संघर्ष करायला येतात. ९०% लोकांना आपल्याला सिद्ध करायची संधीच मिळत नाही. ~~ +123456789

असा टॅलंटेड, यशस्वी व संवेदनाशील माणूस आत्महत्या कसा करेल ?" असा भाबडा प्रश्न विचारणार्‍यांना डिप्रेशन म्हणजे काय याची कल्पना नसते. ~~ 100% agree. क्रिती सँनन ने लिहिले आहे त्याच्याबद्दल की your ur brilliant mind was your best friend and a worst enemy.. म्हणजे सगळ्यांना च त्याचा हुषारी ची कल्पना होती..
Severe depression or schizophrenic आजार असल्याशिवाय ईतका भारी माणूस असे विचार करणार नाही.
I personally miss him terribly.. खूप चटका लावून गेला.. खरच अजून एक महिन्यानंतर ही विश्वास ठेवावा वाटत नाही यावर.. खूप खूप वाईट आहे हे.. Sad

हो, असंच वाटतंय की त्यानेच स्वतःला संपवलं असावं. Sad
पण हे नैराश्य का आलं याची उकल निदान जवळच्या माणसांना व्हावी. वैयक्तिक काही गोष्टी असतीलही यामागे पण २०१३ पासुन बॉलीवुड मधे असल्यावर त्या क्षेत्रातल्या कोणत्याच गोष्टी त्याच्या नैराश्याला कारणीभुत नसतील हे शक्यच नाही. आणि त्या गोष्टी बाहेर येणार नाहीत कधीच. Sad

सुशांत ला कोण आणि कशाला संपवेल हे समजत नाही, आणि हिथे सलमान , करण जोहर आणि भट्ट यांना दूषणे देऊन काय होणार आहे. मला वाटत नाही की सुशांत मुळे त्यांच्या career काय धोका होता.आणि दुसरें म्हणजे भट्ट काय किंवा करण जोहर काय त्यांना आपल्या movies मध्ये कोणाला घायचा हा अधिकार फक्त आणि फक्त त्यांचाच आहे. बॉलीवूड हे काही goverment जॉब आहे का, की कॉलेज चे ऍडमिशन आहे की 99% ची कट लिस्ट लावली आणि बाकी लोकांना ऍडमिशन नाही
दुसरे म्हणजे मुंबई पोलिसांनी पण ह्या मध्ये काहीही काळबोर नाही असे मीडिया मध्ये सांगत आहेत. मला वाटत नाही की एकाच वेळी ताच्या घर चा नौकर, त्याचा फ्लॅट मध्ये असलेला मित्र, सोसायटी ची security , पोस्ट mortom करणारे डॉक्टर आणि मुंबई पोलीस ह्यांना एकाच वेळी manage करून तो पचवणे शक्य आहे.
त्याने स्वतः च डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या करण्याची शक्यता जास्त वाटतेय.

त्याने स्वतः च डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या करण्याची शक्यता जास्त वाटतेय.>>>> शक्यता आहे. पण काय होते की काही वेळेस या गुणी कलाकारांचे पिक्चर जरी नाही चालले तरी चर्चा तर होतेच. अगदी सामान्यांपासुन सिने अ‍ॅवॉर्डस मध्ये पण होते. मग बाबा रे आम्हाला सगळ्यांना आडनावे आहेत, तू फक्त तुझ्या बाबांचेच का नाव लावतो असे उपस्थित हजार - पाचशे आणी देशभर हा सोहळा पहाणारे लाखो- करोडो लोक अशांसमोर काही माजोरडे विचारतात. ज्याला हा प्रश्न विचारला गेला आहे त्याला त्याचे वाईट वाटते. हे असे बर्‍याच जणांबरोबर होते. या माजोरड्यांसाठी अक्षय कुमार सारखा तडफदार माणुस पाहीजे, ज्याने करण जोहरच्या आगाऊ पणे विचारलेल्या पांचट प्रश्नांना त्याच्याच सडेतोड भाषेत उत्तर दिली होती.

रॅगिंग् ला शरण जाऊन आत्महत्या करायची नसते तर लढायचे असते मुन्नाभाईसारखे.

त्यात वाइट क़ाय आहे ?

सांगायचे , आजोबाचे नाव आदनाव म्हणून वापरले

डॉक्टर, तुमच्या लक्षात येत नाहीये का? काही लोकांना वेळेवर फटकन उत्तर द्यायला जमते. पण काही लोक ते मनाला लावुन घेतात, कारण सरळ साध्या वातावरणात वाढलेल्या लोकांच्या अंगात छक्के पंजे नसतात. किंवा काही लोक इतके संवेदनशील असतात की ते आतल्या आत कुढतात.

नाव वापरताना मुद्दाम बाप , आजोबा इतकी नावे का जोडायची ?

आणि त्याचेही तसे पराक्रम होते , हीरो होऊन डायरेक्टर , म्युजिकवाला, गायक सर्वावर स्वतःची मर्जी गाजवायचा म्हणे
म्हणून कोलले त्याला.

हाउसफुल 4 मध्ये तर तिन्ही नावे कबूतरांची ठेवून दिली
Proud

आणि त्याचेही तसे पराक्रम होते , हीरो होऊन डायरेक्टर , म्युजिकवाला, गायक सर्वावर स्वतःची मर्जी गाजवायचा म्हणे
म्हणून कोलले त्याला.>>>> असेलही, पण या टवाळांना कोणी अधिकार दिला त्याचा? निदान चार लोकात तरी बोलु नये. जर हा त्यांच्या वाटेला गेला नव्हता तर त्यांनी तरी का असे करावे? सुशांत बाबत पण तेच झाले.

अर्थात, दुसर्‍याकरता खड्डे खणणारे त्यात पडतातच म्हणा, अजून यांचे ते दिवस यायचे असतील, येतील.

आता हे थांबायला हवे... तो अपयशी ठरला... त्याने आत्महत्या केली... उगाच इतरांना दोषी ठरवण्यात काय पॉईंट आहे??
सोशल मीडिया वर ऱ्हिया चक्रवर्ती, सोनम, आलिया यांना बलात्काराच्या धमक्या देतायत लोक...
इथेही तेच... करण जोहर, रणवीर सिंग , आणि इतर गॅंग ला दोषी डिक्लेर केलेले आहे... हे चुकीचे वाटत नाही का???
सुशांत ने आत्महत्या प्रेमात अपयशी ठरल्यामुळे केली असे असू शकते... उगाच बाकीच्यांना दोषी का ठरवतोय सगळे...

आता हे थांबायला हवे... तो अपयशी ठरला... त्याने आत्महत्या केली>> तुम्हाला कसं माहित?

या घटनेनंतर लोक सिनेमे नीट पारखून बघायला शिकले तरी खूप झालं..माझापुरतं मी ठरवलं आहे की सिनेमा अतिशय चांगला - विषय, अभिनय आणि कथानक असल्या शिवाय अजिबात बघायचा नाही...
say no to mediocre movies and actors.

लोक विसरली सुशांत सिंग ला
20 लाख view Kangna chya video la मिळाले ह्याचा अर्थ सुशांत सिंग आणि कंगना व्हिडिओ बघणारे फॅन आहेत असा त्याचा अर्थ नाही.
गॉसिप लोकांना आवडत त्या मुळे लोक बघतात.
आणि अजुन वर्ष भर जरी तो व्हिडिओ राहिला तरी 20 लाख पर डे ह्या आकड्यात view वाढणार नाहीत जास्तीत जास्त 50 लाख पर्यंत जाईल.
130 करोड मधील 50 लाख म्हणजे त्या gosip मध्ये पण कोणाला जास्त इंटरेस्ट नाही.

हे ति बोलत नाही
मोदीने दिलेले पद्मश्री बोलत आहे

मैं खान के साथ काम नही करना चाहती

करू नकोस , राजेश खन्ना , बच्चन , अक्षय , ऋतिक रोशन , दारासिंग , अमरीश पुरी , अनुपम खेर .... शेकडो अ-खान बसलेत , त्यांच्याबरोबर कर

Black cat इथे मोदी च काय संबंध.
खान मंडळी त्यांचे काय गुण उधळत आहेत हे सर्वांना माहीत च आहे.
पण कंगना मोठी सभ्य आहे असे पण नाही.

130 करोड मधील 50 लाख म्हणजे त्या gosip मध्ये पण कोणाला जास्त इंटरेस्ट नाही.
>>>

मी तो विडिओ पहिला नाही
पण मला सुशांतला न्याय मिळावे असे वाटते.
एकाच दिशेने काय विचार करत आहात..

खान मंडळी त्यांचे काय गुण उधळत आहेत हे सर्वांना माहीत च आहे.
>>>>
सरसकट खान मंडळी बोलायचे हा राजकारण्यांनी सडके राजकरण क्रत केलेले ध्रुवीकरण आहे.
प्लीज याला बळी पडू नका. प्रत्येक खान कलाकाराबद्दल स्वतंत्र
आणि प्रामाणिक मत बनवा.

पण या मुलीमध्ये गट्स आहेत यार खरंच, हे तर मानावच लागेल. इंडस्ट्रीतील इतक्या मोठ्या पॉवर हाऊसेस च्या विरोधात इतक्या आत्मविश्वासाने बोलायचं म्हणजे सोपं काम नाही. तिलाही भविष्याबद्दल भीती वाटत असेलच ना. तरी एवढ्या धाडसाने ती पुढे येतेय हे खूप कौतुकास्पद आहे.

तिच्या चित्रपटात ती हिरो असते जे असंही मोठया स्टार्सना पटत नाही त्यामुळे ते कधी तिच्याबरोबर काम करणार नाहीत. त्यांना सगळा फोकस स्वतः वर हवा असतो जे हिच्या बरोबर काम करून शक्य नाही. लहान वयात तिने स्वतः च्या जीवावर बराच मोठा पल्ला गाठला आहे जे कौतुकास्पद आहे. त्यात ती अगदीच सरळ मार्गाने गेली असेल असे नाही पण तिच्यात स्पार्क आहे.

कंगणा रानावत बाबत +७८६
तिचे गट्स या धाग्यावर बघू शकता.

गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!
https://www.maayboli.com/node/54014

दोन कोटींची जाहीरातीची ऑफर धुडकावलेली Happy

गट्स आहेत पण उगाच सगळ्यांना एकाच तराजूत तोलण्यात पॉईंट काय?
नेपोटीज्म मध्ये चुकीचे काय आहे?चित्रपट धंदा आहे..

उद्या एक टीव्ही वरचा स्ट्रगलर ऍक्टर चा चित्रपट आला तर कोण बघायला जाईल? त्याच चित्रपटात त्याऐवजी शाहरुखपुत्र आर्यन असेल तर प्रचंड प्रमाणात लोक बघायला जातील त्याचा पहिला चित्रपट म्हणून...

चंपा आणि सान्वी +१

कंगना अगदी स्पष्ट आणि नावं घेऊन सडेतोड बोलली आहे हे मला आवडलं.

एखाद्याला आपल्या मुलाला / नातलगाला घेऊन चित्रपट काढायचा असेल तर हरकत नाहीच.
पण तिथे थांबत नाही. तर दुसर्‍याना पध्दतशीर , कट करुन मागे खेचलं जातं. तिथे प्रॉब्लेम होतो.
आदित्य चोप्राने सुशांतला भन्सालीचे रामलीला व बा़जीराव करु दिले नाही कारण तिथे सोनम कपूरचा मावसभाऊ रणवीर सिंग (इंडस्ट्री बॉय) याला प्रमोट करायचं होतं. पथेटिक माणूस आहे तो चोप्रा.

Pages