पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रव्याच्या चीकाच्या कृतीसाठी. Happy
ही चव सगळ्यांसाठी नाही. एकदम मोठेपणी खाल्ला तर न आवडायची शक्यता जास्त.
लहानपणीच आवडतं आणि मोठे झालं की लहानपणाची आठवण करून देतं.

वरती कुणीतरी रव्याचा चीक करायचा असा उल्लेख केलाय. लग्गेच पाकृ द्या बरं.... चीक खाऊन जमाना लोटला. प्रचंड आवडतो. पण आमच्याकडे कुणाला आवडणार नाही बहुतेक. तेव्हा स्वतःपुरता असा शॉर्टकट करता आला तर खूप बरं होईल

वरदा, बारीक रवा भरपूर पाण्यात भिजवायचा मोठ्या पातेल्यात. दुसर्या दिवशी पाणी बदलायचं. तापमान जास्त असेल तर दोन दिवस भिजवला तरी चालेल. शिजवायच्या आधी पूर्ण पाणी काढून टाकायचं. एका मोठ्या पातेल्यात साधारण अंदाजे दुप्पट पाणी उकळवायला ठेवायचे. अर्ध पाणी काढून ठेवायचं. गॅसवरच्या पाण्यात मीठ टाकायचं अर्थात चवीनुसार. आता ह्या पाण्यात एका फुलपात्रात रवा घेऊन त्याची धार सोडायची व दुसर्या हाताने स त त ढवळआयचे जेणेकरून गुठळी होणार नाही. घट्ट वाटलं तर काढून ठेवलेलं पाणी टाकायचं आपल्याला हवी तशी कन्सिटन्सी येईपर्यंत. दणकून वाफ काढायची झाकण ठेवून मंदआचेवर.

गव्हाचा चीक ही एका विशिष्ट प्रांताची खासियत आहे व दुसऱ्या विशिष्ट प्रांताला तो अजिबात आवडत नाही >>> मी अपवाद बहुदा Lol

किंवा तांदुळाची उकड फार आवडत असल्याने हाही आवडला असेल. खूप वर्ष झाली खाऊन, श्रीरामपूरवाल्यांचा अति आंबूस नव्हता, तेल तिखट मीठ घालून छान लागायचा.

अय्यो भारीच “चिकचिकाट” झाला की इथे Happy
मै, आॅफरचं क्युपाॅन जपून ठेवते Lol

इथे मला न आवडणारे पदार्थ या धाग्याचं पोटेंशियल आहे. तो धागाकाढू हण्म्या वाचायच्या आत हे सत्कर्म करा कुणीतरी. Wink

प्राणिज दूध न वापरता चहा कसा करता येईल ? सोया , almond , नारळ ह्या पैकी कोणते दूध योग्य राहील ?
गरम करताना काय काळजी घ्यायची ?

Submitted by पिन्कि ८० on 5 April, 2020 - 13:01

बटाटा वड्याचे कव्हर जाड आणि खुसखुशीत हवे असल्यास बेसन पीठ थोडे दाट करून घ्यावे, फेटताना थोडेसे जड गेले पाहिजे. गोल आणि खोल डब्यात चांगले फेटले जाते. कमीतकमी दहा मिनिटे डब्याच्या कडेला बेसनाचे मिश्रण दाबत न थांबता जोरजोराने फेटावे. सोडा टाकायची गरज पडणार नाही. गरम तेलात तळून घ्या. पहिले एकच वडा तळा. पहिला वडा बऱ्याचदा मनासारखा तळला जात नाही. दुसरा घाणा कढईचा आकार आणि तेलाचे प्रमाण ह्यांच्या अंदाजाने काढा. अगदी विकतसारखे वडे होतात.
हातगाडीवरील वड्यासारखी चव आवडत असल्यास बेसन पिठात थोडे (20-25% )वाटण्याचे पीठ टाका. दुसरेही स्वस्त पर्याय आहेत,परतू ते आरोग्यास अपायकारक असल्याने देत नाही. त्याकरिता रस्त्यावरील चवदार असले तरी बटाटेवडे खायचे टाळा.

साखर आणि वेलची किंवा केसर टाकलेला गव्हाचा चीक मला प्रचंड आवडतो. आम्ही गुढीपाडवा झाला की गव्हाचा चीक करतो. खाण्यासाठी जास्त, कुरडया साठी कमी.
एकदा माझ्याकडे देशावरचा मित्र आला होता, त्याला मी घरी केलेले दोन साजूक तुपाची धार सोडलेले उकडीचे मोदक खायला दिले,एक मोदक त्याने कसाबसा खाल्ला आणि दुसऱ्याला हातही लावला नाही. गिळगिळीत लागतात म्हणाला. आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक खाऊन बघ,मस्त खुसखुशीत असतात म्हणाला. तळणीचे
मोदकही मला स्वतःला आवडतात, परंतू उकडीच्या मोदकाशी केलेली तुलना पटली नाही.
एका मित्राने केळ्याचा हलवा बघूनच खायला नकार दिला. त्याने न खाण्याचे कारण इथे मी सांगितले तर बऱ्याच जणांना किळस वाटेल. त्याच मित्राने एकदा आम्हाला घरी जेवायला बोलावले होते. शेंगोळ्याची आमटी केली होती, शेंगोळ्यांचा आकार मला पोटातल्या जंता सारखे वाटल्याने मी त्या आमटीला हातही लावला नाही.

प्राणिज दूध न वापरता चहा कसा करता येईल ? सोया , almond , नारळ ह्या पैकी कोणते दूध योग्य राहील ?
गरम करताना काय काळजी घ्यायची ?
<<
कोरा चहा प्यायला काय प्रॉब्लेम आहे?
मुळात चहात दूध घालायची आयडिया वर्जिनल चहावाल्या देशांची नव्हेच.

आपण जो चहा पितो तो बेसिकली "डिकाशन"असतो. (decoction) यात आपण चहा उकळ उकळ उकळतो. मूळ टी सेरिमनीवाले गाळण्यात चहाची पानं टाकून त्यावर उकळतं पाणी टाकून पितात. तो बेसिकलि तितका कडू लागत नाही. थोडा लिंबू वगैरे पिळून छान लागतो.

ऑफ कोर्स. अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे. यात नॉस्टालिजिया नाही. पण, ओरिजिनल दूध नसेल तर उगं 'वनस्पतीजन्य दूध" घालून काहितरी सोयाबीनचं मटण करण्याचा उद्योग मला तरी आवडत नाही.

<<आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक खाऊन बघ,मस्त खुसखुशीत असतात म्हणाला. तळणीचे
मोदकही मला स्वतःला आवडतात, परंतू उकडीच्या मोदकाशी केलेली तुलना पटली नाही.>>
माझा असंच झालंय. माहेर घाटावरचा, आई एकदम नाजूक कळीचे गव्हाचे तळणीचे मोदक करते, म्हणजे तसेच करतात तिकडे! तर सासूबाई कोकणी, एक नंबर उकडीचे मोदक करतात.
बरं दोघीना एकमेकींच्या पद्धतीने करताहि येत नाही आणि आवडतहि नाही.
मला मात्र दोन्ही आवडतात आणि दोन्ही प्रकार खाण्यायोग्य करता येतात Happy

त्याचा हलवा पण करता येतो. तोच तो, दाताला चिकटणारा व पारदर्शक.>> रश्मी, रश्मी अग बॉम्बे हलवा म्हण ग. कित्ती कित्ती तो अनरोमँटीकपणा. Lol
आरारा, पाफा जबरी फोटो आहे. Sad

आरारा कोरा चहा असा लगेच सवय नाही होणार ना.
शोधक, सोया मिल्क त्यातल्या त्यात बरं लागेल. अर्थात चहा अतिशय आवडीने पिणार असाल तर सोया मिल्कची सवय होण सुद्धा कठीण आहे.

ओह नुसतं टाकायचं तर मी सोया आणि आमंड दोन्ही दूधं वापरली. मला चालतो तसा चहा पण मी थंड दूध घालते कपात आणि वर चहा ओतते. फारच थंड वाटलं तर मावेमध्ये ३० सेकंद गरम करते. मला आधी वाटलं नुसता दुधाचा चहा काही लोकं पितात तसा करायचा आहे का काय?

अरारा, लॅक्टोस वगैरे प्रश्न असतील तर गाईचं/म्हशीचं दूध चालत नाही. Happy

फारच पाहिजे असेल तर नॉन डेअरी क्रिमर पण चालतील चहा मध्ये. पण खुप जास्ती नको घालायला. आणि अजिबात गरम न करता घालायचे. नुसता गरम चहा घ्यायचा आणि त्यात थोडा रंग येई पर्यंत क्रिमर घालायचे.

मी करते बदाम दूधाचा चहा; बदामाचं दूध घरीच काढते.
उकळत्या चहात टाकायचे.
किंवा गरम केले तरी चालते दूध, फक्त उकळायच्र नाही.
बाहेरच्य दूधात काय नै काय टाकतात... ती चव बेक्कार लागते.
घरचे करून बघा जर अगदी गरजेच आहे चहा पिणं..

बदाम भिजवून वाटतानाच आलं घालून वाटायचे आणि दूध गाळून गरम करून बाटली भरून ठेवते ; थंड झाले कीफ्रीजमध्ये.
आलं चहात हवेच असल्याने , हे असं बरे वाटते.

धन्यवाद आग्या1990, वाटाणे ऍड केले लगेच वाणसामानात.
मला तेच हातगाडीवरचे वडे अपेक्षित होते.
रच्याकने - ते तुमच नाव लिहितांना जरा बर नाही वाटत,असा id का म्हणे.

वाटाणे म्हणजे पांढरे वाटाणे , नैतर वडा हिरवा होईल
Proud

बाजारातले जे जे क्रिस्पी , चविष्ट , चवदार लागते , त्यात खेसरी डाळ ची भेसळ असते, पण ही डाळ अपायकारक आहे, त्याने ल्याथरिझम नावाचा रोग होतो

एक किलो उकडीचे ब्राऊन तांदूळ आहेत घरी, कुणाला त्याची पाकृ माहीत असेल तर सांगा प्लिज. थोडे नेहमीसारखे शिजवून बघितले, जे बिलकुल आवडले नाहीत.

इडली पिठात अर्धा उकडा तांदूळ अर्धा नॉर्मल तांदूळ अश्या इडल्या मस्त हलक्या होतात.
जे जे तांदूळ आपल्याला नीट खाणेबल भात देत नाहीत त्यांची इडली बनवायची
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जी अपुले
तीच इडली ओळखावी, चव तेथेच जाणावी

इथे माहिमी हलवा आणि बदामी हलवा असे प्रकार असतात. बदामी हलवा म्हणजे गव्हाचे सत्त्व शिजवून केलेला पारदर्शी बदामी रंगाचा(बाहेरून रंग न घालता) आणि वर बदाम पिस्त्याची भरपूर पेरणी असलेला चिकट पदार्थ. माहिमी हलवा म्हणजे एकावर एक रचलेले अगदी पातळ नाजुक गोड स्लाय्सेस, चौरस आकाराचे, टिश्यूत गुंडाळलेले.

अनु☺️, ईडल्या चांगला पर्याय आहे.

धनि, चांगली रेसिपी आहे पण त्यात चिकन आहे Uhoh

अजून एखादी शाकाहारी पाकृ सांगा प्लिज

Pages