पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पा.भासोबत भेसळोत्सुक भाज्यांचं वाडगाभर सॅलड किंवा सूप द्यावं आणि पाभा खायची असेल तर हे गप खावं लागेल >>>> का? का? का? आनंदाने पाभा खाऊच द्यायची नसेल तर का? Proud

पावभाजीबद्दल उत्सुकतेने मागे जाऊन वाचले.
मीअनु, माझी तर बटाट्याशिवायही पावभाजी करायची एकदा धडपड चाल्ली होती पण पुर्णत्वास गेली नाही. Happy

बटाट्याशिवाय व्यवस्थित होते हां.बटाट्याचा कंटेंट काही अंशी फ्लॉवर ने पूर्ण करता येतो.
अगदीच उग्र(शेपू तोंडली वांगं इत्यादी) सोडून न्यूट्रल चवीचे जे काही अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घालता येईल ते ओरिजिनल घटकांचे प्रमाण जास्त आणि भेसळीचे प्रमाण कमी ठेवुन पावभाजीत घालावे हे माझे काही पाने पूर्वीचे मत परत एकदा नव्याने आग्रहाने मांडते ☺️☺️मुख्य म्हणजे व्हॉल्यूम वाढतो.
आता पर्यंत अगदी किंचित गाजर, अगदी किंचित बीट, अगदी किंचित ब्रोकोली, अगदी किंचित लाल भोपळा चवीत फरक न करता यशस्वीपणे खपवले आहेत.यापुढेही उजळ माथ्याने खपवणार आहे.
पान 36 पासून अमर्याद पावभाजी चालू आहे.त्याचा गरजूनी लाभ घ्यावा.

आता पर्यंत अगदी किंचित गाजर, अगदी किंचित बीट, अगदी किंचित ब्रोकोली, अगदी किंचित लाल भोपळा चवीत फरक न करता यशस्वीपणे खपवले आहेत.
>>>
images (1).jpeg

यस्स्स.... आमच्या घरच्या पावभाजीत ५ टक्के बटाटा व ९५ टक्के इतर भाज्या असतात (इतर भाज्यात मटार, गाजर, कॉर्न नसतात)... वांगे, कोबी पण घातले आहे.

Cheddar चीजची expiry date ४ एप्रिल होती.
जवळजवळ २०० ग्रॅम शिल्लक आहे. त्याला थोडासा घाम आला आहे.
सगळ्याचं एकदम काही करता येईल का?

आयांचा कै भरौसा नसतोय.. हे परत माममं सिद्ध केलंय! :इथुनपुढे आई पाभा करताना भाज्यांवर बारिक लक्ष ठेवणारी बाहुली:

Cheddar चीजची expiry date ४ एप्रिल होती.
जवळजवळ २०० ग्रॅम शिल्लक आहे. त्याला थोडासा घाम आला आहे.
सगळ्याचं एकदम काही करता येईल का?

नवीन Submitted by chioo on 15 April, 2020 - 22:31

>>>>
मीठ मिरपूड / चिली फ्लेक्स/ ऑरेगानो घालून स्टफ्ड चीज पराठे. एक वेळचे खाणे / ब्रंच नक्की होतो. पुरणपोळी सारखे लाटा. टॉमेटो सॉस जोडीला.
मेरे 69 से 96 kg का राज है ये. किसी को नै बतानेका. Happy

मेधावि, अतिचशय सहमत. क्वचित केल्या जाणार्‍या पावभाजीत कशाला पोषणमूल्य शोधायची? आणि नेहमीच्या पावभाजीतही भाज्या असतातच की. बाहेर पिझ्झा, बर्गर खाताना कुणी शोधतं का पोमू?

ग्रिल्ड पास्रा, होमे मेड मॅक्रोनि चिज, वर पाफा ने दिलेले पराठे पन मस्त होतात फक्त भाजताना जपुन, लगेच जळाजळी होते, थोडा उकडलेला बटाटा किवा पनिर घाला मिळून यायला.

मी पण वाटीभर गहू भिजत घालतेच.....>> उस्तवारच जास्त होइल त्यापेक्षा २-३ वाटया तरी घाल . एक वाटीचाच करायचा तर रव्याचा बेस्ट आहे वाटा घाटा नो झन्झट

चीक पुराण उपसंहार:

startif()
काल अजून एक किलो गहू खाण्यासाठी भिजत घातलेत.
endif()

आता या विषयाला, लूप मधे अडकवले. या प्रतीसादा बाहेर जायला नको.
Rofl

फक्त भाजताना जपुन, लगेच जळाजळी होते, थोडा उकडलेला बटाटा किवा पनिर घाला मिळून यायला.

Submitted by प्राजक्ता on 16 April, 2020 - 00:39

>>>>
म्हणूनच पुरणपोळी म्हणालो. कणीक तशी भिजवली असली की जळायची शक्यता कमी. बटाटा / पनीर ने चव बदलेल. पण ट्राय करा, नवीन चव.

चीज पराठ्यात कांदा छान लागतो. अनेक वेळा करून खाल्लेत. पण याने फार चीझ संपणार नाही.
https://www.tarladalal.com/Quicktime-Onion-Cheese-Parathas-12731r
आणखी एक कृती पाहिली त्यात स्टफिंग ऐवजी सगळं कणकेतच घालायचं आहे.

चीझ घालून कुकीजही करता येतील. चकली भाजणी + मैदा+ चीझ यांच्या कुकीज केल्यात. पण त्यात प्रोसेस्ड चीझ होतं.
https://www.tarladalal.com/Quicktime-Onion-Cheese-Parathas-12731r

vegetable au gratin
हा सर्च मारून पहा. बरचसं चीज खपवता येईल.

९५ टक्के इतर भाज्या असतात (इतर भाज्यात मटार, गाजर, कॉर्न नसतात)... वांगे, कोबी पण घातले आहे>>>

प्लिज पावभाजी को पावभाजीही रेहने दो, उसका भरता ना बनाओ......

घरात चक्क 4 वाट्या गहू सापडला.

लगे हाथ भिजत घातला. आता बस्स... चीक खाऊन कसे वाटले हे बघायचे. कधीही खाल्लेला नाही, त्यामुळे नो नोस्टॉजिया...

कोंड्याच्या वड्याची रेसिपी इथेच कुठेतरी आहे बहुतेक. तेही करून बघेन.

अवांतर भाज्या खपवून पौष्टीक केलेली पाभा आणि मकाचं हे सुरांनो हे एकाच लेव्हलचं अॅडल्ट्रेशन आहे. Happy दिवे घ्यावेत.

अवांतर भाज्या खपवून पौष्टीक केलेली पाभा आणि मकाचं हे सुरांनो हे एकाच लेव्हलचं अॅडल्ट्रेशन आहे. >>>>>>

9999999999999 *999999999999 Lol

मेधावि, Happy
गाडी परत ...... कुरडई मी रवा भिजत घातला....

बापरे! चीक प्रकरण लैच चाललंय.
पण हे असलं का खायचं ? Lol
पावभाजीत इतर भाज्या घालुन काय साध्य करतात लोक? पौष्टिकता? मग पोळी आणि पौष्टीक भाजीच खायची.

मुलांना त्यांच्या नकळत पौष्टिक खायला घातल्याचं समाधान ,
जंक फूड खाल्ल्याचं गिल्ट कमी

वाढवा यादी

Pages