पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही त्या चिकट हलव्याला गोंदया हलवा बोलतो.. मला भयंकर आवडतो... कोणाला नको असेल तर कुरियर करावे मला

चेंबूर कॅम्प मधील झामा मिठाई वाला आहे त्याच्याकडे अप्रतिम मिळतो हा हलवा...
- आत्ता आजिबात जाऊ नका हो तिथे. मिठाई महागात पडेल. Lol Lol Lol
बाहेर जाण्यापेक्षा घरीच जमेल ते करुन खा सगळ्यानी. काळजी घ्या.

VB,
इडली, डोसे , अडई वगैरेत उकडा ब्राऊन तांदूळ वापरा.
अजून शाकाहारी पर्याय हवा असेल तर -
जंबालयासारखीच कृती मात्र चिकन, सॉसेज, चिकन स्टॉक वगैरे नॉनवेज घालायचे नाही. त्याऐवजी भिजवून उकडलेला राजमा घालायचा आणि रेड बिन्स आणि राईस करायचे.
केजून सिझनिंग ऐवजी टाको सिझनिंग घालून मेक्सिकन राईस करु शकता. ब्राऊन राईसला पाणी जास्त लागते आणि शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो.

इथे माहिमी हलवा आणि बदामी हलवा असे प्रकार असतात. >>> अगदी बरोबर.

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जी अपुले
तीच इडली ओळखावी, चव तेथेच जाणावी >>> अनु Lol

चीक अपडेटः आज चार दिवस भिजत घातलेले गहु सकाळीच मिक्सर मधून काढून व्हाइट पदार्थ सेपरेट केल्या गेला आहे व पाणी व साका सेपरेट व्हावा म्हनून फ्रिझात ठेवला आहे. कोंडा उरलेला कबुतरा स ठेवला आहे. खातात का बघू. दुपारी चीक ट्राय करेन. एक प्लास्टिकची पिशवी पण धुवून ठेवली आहे. आईचा सोर्‍या धुवून ठेवला आहे. खायचा एक वाटी चीक आणि उरलेल्या कुरडया घालेन असा दुपारुन प्ल्याण आहे.

अमा ऊन कडकडीत पाहीजे संध्याकाळपर्यंत वाळायला. नाहीतर बेत सकाळपर्यंत पुढे ढकला

अमाचे वाचून मीही भांडेभर गहू भिजायला घातले.ते भांडे पण इतक्या चोर अंगलटीचे की गहू भरपूर भिजले गेले.आज संध्याकाळी गहू वाटले.चाळणीतून रस काढला.नंतर यूट्यूबवर दाखवल्याप्रमाणे कपड्यातून गाळायला घेतले. अर्धेअधिक झाल्यावर थोडे सटकले.मस्त किचनभर्,ट्रॉलीमधे थोडासा सांडला.तो राडा पुसून काढेपर्यंत वाट लागली.पाणी घालून तो रस बाहेरच ठेवला आहे.
रच्याकने तो रस वस्त्रगाळ करावा लागतो का? उरलेल्या चोथ्याचे सांडगे करतात का? असल्यास कसे करतात?

व्हिबी , स्वाती२ म्हणतात त्याप्रमाणे चिकन किंवा सॉसेज न घालता नुसते कडधान्य घालून करता येईल.

देवकी, सांडगे करता येतील गिर्हाईक असतील तर Happy
अमाचं पाहून मलाही खूप इच्छा होत होती पण तो राडा आठवून बेत रहीत केला गव्हावाला. रवा दोन कि आणलाय.... आज स्वच्छ उन होतं उद्या भिजत घालावा म्हणतेय...
साबुदाणा दळून ठेवलाय बटाट्याचे पापड करायला. बिना सोडावाले तळणीचे पापड/कुरडया आवडतात.

संडग्यांची रेसिपी द्या ना.चोथा भरपूर उरला आहे.उद्या बघते चीक करायला जमतो ते का.मग पुढचे पुढे.घरातच वाळवणार.मग एसी chya बॉक्सवर ठेवणार.शेख महंमदीं विचार सुरू झाले.

तुम्ही 2 किलो रव्याच्या करणार! Bapre!

तिखट मीठ तीळ फक्त. कलिंगडाची सालं असतील तर ती टाकता येतील. पूर्वीच्या ग्रुहिणी काही वाया जाऊ द्यायच्या नाही आणि मला वाटतं पौष्टिकतेबद्दल जास्त ज्ञान होतं. ...
मागच्या पानावर टीपा दिल्यात.

देवकी, माझा लास्ट मिनिट फेल गेला प्रयत्न. सर्व नीट गाळून घेतले. पण मग वेळ होता म्हणून लगेच्च करायचे ठरवले. असे करू नका. तो घट्ट व्हाइट साका भांड्याच्या तळाशी साठला पाहिजे व वरचे क्लिअर पाणी टाकून द्यायचे. मग मीठ चवीपुरते घालून शिजवायचे. तर मी पाण्यासक ट माप घेतले व इक्वल पाणी व मीठ घातले व ते उकडायला ठेवले. ते फार वेळ उकडले तरी घट्ट झाले नाही. खळ सदृश्य प्रकरण झाले. पापड्या पण होइनात. आता परत प्रयत्न करणार आहे. पातेलं भर खळ झाली निव्व ळ. ती चिकटवयला पण काही नव्हते. चीक रिमेन्स अ ड्रीम अ‍ॅज ऑन डेट.

शेवटी एकदाचा चीक संपन्न होऊन कुरडया वाळत पडल्या.जर्रा अजून व्हायला हवा होता असं आता वाटते.पण करताना उजवा हात खांद्यातून निखळून चिकाच्या भांड्याला चिकटेल अशी भिती वाटली.तेव्हा चीकाचा गॅस बंद केला आणि कुरड्या घातल्या. मुळात सुबकपणा नसल्याने जशा आल्या तशा केल्या.(आमच्यात अशाच करतात म्हणायचे)

राहिला भाग म्हणजे चीक! मुलाला खायला दिला.मी तेल+तिखट+मीठ(जरा अळणी झालेला) घालून खाल्ला.पण अहाहा वगैरे नाही झाले खरे.

इथे चीक बहुधा 200 प्रतिसाद चालणार ☺️☺️ कात्रीने पाव कापणे, खीर, पावभाजीत इतर भाज्या या सगळ्या विषयांचा रेकॉर्ड ब्रेक.

अनु Lol

कुणीतरी दुसरं काहीतरी शोधा बरं. Wink आणि हवं तर चीक डिस्कशनचा वेगळा धागा काढा. तुमच्या चर्चा वाचून त्याची गरजही असावी असं वाटतंय.

नवी चर्चा:(नव्यानेच जुनी चर्चा) पावभाजीत नेहमी च्या घटकांबरोबर बिन सालीचा लाल भोपळा, गाजर, बीट, किंचित शेवगा शेंगांचा गर(बिया न घालता), रताळं घालून मूळ व्हॉल्यूम आणि पोषणमूल्य वाढवण्या बद्दल आपले काय मत आहे?कोणती भेसळ न्याय्य कोणती अन्यायी? ☺️☺️

अळीव (आणि थंडी) अ‍ॅक्च्युअली घरी आहेत (असा नवा शोध लागला आहे) पण ते नक्की अळीव आहेत का ते पाठवणार्ञांबरोबर कन्फर्म झालं की सांगते. आधीची चर्चा असेल तर माझ्या विपुत डकवा.
ओके आता सांगुनच टाकते मला एक कामधेनू ब्रँडचं खरवस पाकिट मिळालं आहे. सो आय अ‍ॅम हॅप्पी Happy

लोक पोषणमूल्य वाढवण्याच्या नावाखाली चांगल्या पदार्थाची चव घालवतात. पावभाजीत मुळीच भेसळ करू नये. पा.भासोबत भेसळोत्सुक भाज्यांचं वाडगाभर सॅलड किंवा सूप द्यावं आणि पाभा खायची असेल तर हे गप खावं लागेल अशी विनंती करावी. हाकानाका.

Pages