Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोप्पा केक, सोप्प पुडिंग
सोप्पा केक, सोप्प पुडिंग यानंतर चिकाची साथ आली मायबोलीवर
धन्यवाद सगळ्यांना. या रेसिपी
धन्यवाद सगळ्यांना.
या रेसिपी थोड्या थोड्या करूनपन चीक मार्गी लागेल.
शिळ्या भातापासून जीलेबीची रेसिपी कुठे मिळेल?
chioo,
chioo,
चेडर चीज फ्रीज का करत नाही? ठोकळा असेल तर तसाच फ्रीज करा. गरज लागेल तसा किसून घ्यायचा. किसलेले चीज असेल तर ते देखील फ्रीजरमधे छान रहाते.
स्वाती२, ही आयडीयापण मस्त आहे
स्वाती२, ही आयडीयापण मस्त आहे की.
काही प्रयोग करून उत्साह ओसरला की उरलेला ठोकळा फ्रीजरमधे ढकलेन.
शिळ्या भातापासून जिलेबी करतात
शिळ्या भातापासून जिलेबी करतात? खरंच? का पण?
बहुतेक पीठ पटकन आंबते म्हणून.
बहुतेक पीठ पटकन आंबते म्हणून.
नसेल होत तर दुसरे काहीतरी करेन.
हे मागे कधीतरी कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते आहे.
आता मला शंका येते आहे.
चिऊ, शिळ्या भाताचा,फोडणीचा
चिऊ, शिळ्या भाताचा,फोडणीचा भात झकास होतो.जिलबी नाही संपली तर परत शिळी करून खाऊ नका.
काय?कशी?
काय?कशी?
भाताची चकली ऐकलंय पण जिलबी?पिठं पण वेगळी आहेत.
साधना,https://www.maayboli
साधना,
https://www.maayboli.com/node/49081
देवकी, येस्स्स.. फोडणीचा भात
देवकी, येस्स्स.. फोडणीचा भात कायम आवडतो. आता वेळ आहे तर काहितरी वेगळं.

मी_अनु, मग बहुतेक चकली असेल. :)) चुकिचं लक्षात राहिलेलं दिसतंय.
मग चकलीची रेसिपी कुठे मिळेल?
तेलकटच हवंय का? इतर बरेच
तेलकटच हवंय का? इतर बरेच पर्याय आहेत शिळ्या भाताचे ते नकोत का? Arancini balls ची recipe बघा, तुमचे leftover cheese पण संपेल
तेलकट पण होईल 
नाही नाही, तेलकटच हवंय असं
नाही नाही, तेलकटच हवंय असं नको.
पण काहीतरी वेगळं करायचं आहे.
Arancini balls मधे भात आणि चीज दोन्ही संपत असेल तर मस्तच.
पर्वा शिळा भात मिक्सर मध्ये
पर्वा शिळा भात मिक्सर मध्ये फिरवून त्यात मिरची आलं लसूण वगैरे घालून केलेली धिरडी बघितली मधुराज रेसिपी वर . छानच दिसत होती.
खूप उरला भात आणि फो च्या भाताचा कंटाळा आला असेल तर करून बघू शकता.
उरलेल्या भाताची कांदा भजी -
उरलेल्या भाताची कांदा भजी - सं जीव कपूर
जिन्नसांत कांदा लिहायला विसरलाय.
शिळा भात मिक्सर मध्ये फिरवून
शिळा भात मिक्सर मध्ये फिरवून त्यात मिरची आलं लसूण वगैरे घालून केलेली धिरडी बघितली >>> हा माझा आवडता प्रकार आहे .
हव तर थोडसं गव्हाच पीठ , बेसन , ज्वारी पीठ , उरलेली कोबीची भाजी असा सगळा काला करून थालीपीठ लावावीत .
फोडणीच्या भाताच एक वेरिअशन मी अपघाताने केलेलं . शिळा भात , थोड्याश्या बटर वर परतून त्यामध्ये ओरिगॅनो किन्वा हर्ब मिक्स घालून परतून घ्याव .
लागलं तर थोडं मीठ.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/20814
भाताचे वडे
शिळ्या भाताचे फोभा व्यतिरिक्त
शिळ्या भाताचे फोभा व्यतिरिक्त काही करायला जात असाल तर डिस्क्लेमर - तो जो काय पदार्थ घडणार असेल तो भयंकर जास्त तेल/तूप पितो. फायनल यिल्ड शक्यतो तेलकटच होतं अस शिळ्या भातापासून बनवलेलं थालीपीठ अन आप्प्यांचा अनुभव आहे. चकल्या करून मग त्या वाळवणे बिन्नेस मेको नय जमता सो ते नाय कधी ट्राय मारलं.
बरेच सल्ले मिळालेत त्यात माझे
बरेच सल्ले मिळालेत त्यात माझे ..... साबुदाण्याची खिचडी सारखी भाताची करायची ... बरेच दिवस झाले केली नाही. उद्या भात जास्त करावा म्हणते..
उद्या भात जास्त करावा म्हणते.
उद्या भात जास्त करावा म्हणते..>>>> मलाही फो.भा खावासा वाटू लागलाय.
योकु+१
योकु+१
भाताच्या वाळवणीच्या चकल्या मस्त होतात, मिठ्+जिरेपुड्+ तिखट घालुन चान्गल मळुन घ्या, चकल्या करुन उन्हात वाळवा.
मला फोडणीचा भात खूप आवडतो आणि
मला फोडणीचा भात खूप आवडतो आणि मी एकदम साग्रसंगीत करते-कांदा/टोमॅटो-कॉर्न-मटार सगळं घालून. माझ्या सासूबाई एक instant फोडणीचा भात करतात, तेलात मोहरी, लाल तिखट आणि बारीक चिरलेल्या लसणीच्या पाकळ्यांची फोडणी. भातावर ही फोडणी ओतायची आणि कालवायचे. लसणी किती खरपूस भाजायची हे टेक्निक एकदा जमलं की हा भात awesome लागतो. मला त्यांच्या इतका टेस्टी जमत नाही हा प्रकार करायला.
योकु बरोबर , आत्ता जाणवलं ती
योकु बरोबर , आत्ता जाणवलं ती मधुराची शिळ्या भाताची धिरडी ही खूपच तेलकट वाटत होती.
तसं ही जनरली शिळ्या पदार्थांवर जास्त मेहनत घ्यायला आणि नवीन ताजे पदार्थ घालून ते आणखी वाढवायला मला नकोच वाटत.
प्लिज पावभाजी को पावभाजीही
प्लिज पावभाजी को पावभाजीही रेहने दो, उसका भरता ना बनाओ...... >>>. हाहा. पण लोकहो, फक्त बटाटा जास्त घातली म्हणजेच पावभाजी चांगली होते हा गैरसमज आहे बरे.
पाभात बटाटा हा बाकी गोष्टी
पाभात बटाटा हा बाकी गोष्टी मिळून यायला हव्यात इतपत वापरल्या जायला हवा. अर्थात बटाटा + बटर मुळेच पाभा सिल्की व्हायला मदत होते. अर्थात हे माझं मत नेहेमीप्रमाणे.
योकु, +१
योकु, +१
त्या स्वयंपाका चॅनेल वर पाभा
त्या स्वयंपाका चॅनेल वर पाभा केलेय न बटरच नाही वापरलं. मी कमेंट मध्ये विचारलं तर ऑप्शनल आहे म्हणे. पाभात बटर ऑपशनल?? आर यू किडींग मी... सीरीअसली...
भातात तिखट, मीठ, कच्चं तेल
भातात तिखट, मीठ, कच्चं तेल आणि कच्चा कांदा घालून मस्त लागतो. वर फरसाण/शेव/ चिवडा असेल तर वाहवा नसेल तरी वाहवा. मला असा भात प्रचंड आवडतो.
देवकी, येस्स्स.. फोडणीचा भात
देवकी, येस्स्स.. फोडणीचा भात कायम आवडतो. आता वेळ आहे तर काहितरी वेगळं. Happy
जिलेबीच्या ऐवजी चकली लक्षात राहिलं? 

मी_अनु, मग बहुतेक चकली असेल. :)) चुकिचं लक्षात राहिलेलं दिसतंय.
मग चकलीची रेसिपी कुठे मिळेल? Happy>>>>
भातापासून जिलेबी वाचल्यावर मला कित्ती आशा होती आता रेसीपी येईल म्हणुन.
तो भात आणि चीज एकदम संपवायचे
तो भात आणि चीज एकदम संपवायचे असेल तर खोटा रिसोटो करता येईल.
https://youtu.be/i1tUOzvLkJw
https://youtu.be/i1tUOzvLkJw
He baghaa kaay saapadalaa
Pages