पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु Lol

बरं, मला एक माहिती हवी आहे, कुणाला माहीत असेल तर द्या. हॉटेल मध्ये चीज सँडविच मधले किंवा चीज्+चेरी+पाईनॅपल या डिश मध्ये वापरलेले चीज ( जे जाडसर असते जसे टॉम अँड जेरी मध्ये दाखवतात तसे ) कुठले असते? आणी कुठे मिळते? अमुलचे आहे की वेगळा ब्रँड आहे? सध्या लॉक डाऊन मुळे २ महिने तरी किराणाचे शॉर्टेजच दिसते. तरी एक माहिती म्हणून हवेय.

( जे जाडसर असते जसे टॉम अँड जेरी मध्ये दाखवतात तसे )
जे जेरीला आवडते ते इमेंटल पिवळ्या रंगाचे स्वीस मधले मध्यम कडक चीज आहे.

अलमंड मिल्क गरम करता येते. उकळु नये (जळलेली चव येते.) शक्यतो गरम मायक्रोवेव्ह मध्ये करताना कमी पॉवर वर .. अलमंड मिल्क फार पटकन जळते (अ‍ॅक्चुअली ते जळते म्हणुन फाटल्यासारखे दिसते. ) म्हणुन हाय फ्लेम वर ठेवू नये.
घरी कॉफी नेहमी सारखीच करतो. काळी कॉफी (कुरिगची) आणि त्यात अलमंड मिल्क फ्रीजमधेले. जर नेस कॉफी करायची असेल तर अलमंड मिल्क मायक्रोवेव्ह मध्ये ५० सेक तापविते.( एक कप) आणि बाहेर काढून नेस कॉफी घालुन परत १०-१२ सेकंद.
स्मुदी मध्ये वगैरे डायरेक्ट फ्रीजमधल काढुन.
मुलगी तेच वापरते कारण तिला नेहमीचे दुध चालत नाही.

धन्यवाद जेम्स बाँड, लंपन आणी मैत्रेयी. Happy

लंपन, सध्या लॉक डाऊन मुळे नाही पण सगळे ओके झाल्यावर नक्कीच बघेन. आता किराणावाल्याकडे सुद्धा अमुल मिळत नाहीये.

काही महिन्यांपूर्वी गावाहून आलेला गव्हाचा चीक (पावडर) कसं खातात? मी ते पाण्यात शिजवलं तर मला महाभयंकर वास येतो असं वाटलं. मी स्वतः आधी कधीही हा प्रकार खाल्ला नाहीये. आता तो शिजलेला चीक तसाच फेकावा की काही घालून घातात?
ज्या मेंबरांनी हा प्रकार खाल्लाय त्यांनी आधी गूळ घालून मागितला पण तरीही फार काही खाल्ला नाही. खराब झाला असेल तर कसं कळतं किंवा ही पावडर योग्य तर्हेने कशी शिजवतात/ खातात हे सांगेल का कुणी? (मी तसंही खाणार नाहीच्चे पण ज्यांच्यासाठी तो खाणं मस्ट Wink आहे त्यांना करून देईन बापडी)

जरा जास्त पान्यात मिक्स करुन ठेवा, जरावेळाने साका खाली बसला की वरच पानी फेकुन द्या, साक्यात परत चान्गले पानी घालुन मिसलुन साधारण इडलीच्या पिठासारख करा त्याच्या दुप्पट पानी उकळायला ठेवा मग बारिक धार ओतुन एकत्र धवळत रहा, थोडा हिन्ग, मिठ, आव्डत असेल तर जिर घालायला हरकत नाही ( कुरड्याच्या चिकात घालत नाहित) त्याने जरा उग्र चव कमी होइल घट्ट उकडीसारख झाल की जरा खा.
दुसरा प्रकारात चिक शिजत आला की साखर घाला आणी वरुन दुध घालुन खातात.

मी ते पाण्यात शिजवलं तर मला महाभयंकर वास येतो असं वाटलं>> गहु ३ दिवस भिजवुन आबवुन केल्याने मुळातच चिकाला आन्बुस वास येत असतो तो ज्याला आवडतो (मला तर इथे लिहता लिहताच उकल्या फुटतायत) त्याना त्या वासानेच आता कधी एकदा कुरड्य घडतात याची स्वप्न पडतात बाकी आधिपासुन कधी खाल्ला नसेल तर न्तर चव डेव्हलेप होण अवघड असत.
गव्हाचा चिक रात्री खाउ नये पचायला जड असतो आणि अ‍ॅसिडिटी होवु शकते.

हो चिकाचा एक खास वास असतो. छान असतो तो . पण खूपच दिवस पडून असले तर ते नीट आहे का ते बघून घ्या. एक ट्रायल बॅच घ्या.
इथे सुपर मार्केटात गहु मिळत आहेत. आज आणून करून बघते पाच दिवस जातील आरामात त्या उस्तवारीत.

प्राजक्ता+१०१,
पाफा, उगाच जळवायला फोटु डकवु नये पाप लागत.

म्या पामरानं आगुदरच सांगीतलं हाय, जळवायला नगं म्हनून फोटो नवता डकवला, पन विषय निगाला व्हता, म्हणलं घेऊ हात धुवून.

तशिबी आजकाल, येताजाता हात धुतूया. न्हाई हात धुतले तर कारभारीन लई कावती.

Rofl

वेका, प्राजक्ताने बरोबर लिहीले आहे. बाय द वे, चीक ( गव्हाचा ) किंवा त्याची पावडर ताजी असेल तर त्याचा हलवा पण करता येतो. तोच तो, दाताला चिकटणारा व पारदर्शक. साखरेचा एकतारी पाक करुन मंद गॅसवर ठेवायचा. एकीकडे हा ताजा चीक कींवा त्याची पावडर थोड्या पाण्यात पेस्ट करुन घ्यायची. ती पेस्ट किंवा ओला चीक आणी साजुक तुप असे आलटुन पालटुन थोडे थोडे त्या पाकात ओतत ढवळत रहायचे. मग उरलेले तुप घालुन ( मला प्रमाण माहीत नाही ) घालुन घोटायचे. मधून थोडी वेलची पूड घालायची. मग मिश्रणाच्या कडा सुटल्या की तुप लावलेल्या थाळीत ओतुन थापायचे, आणी गरम असतांनाच बदाम व पिस्ते काप वरुन थापुन वड्या पाडायच्या. वड्या जाड असल्या पाहीजे.

चीकाची पावडर जर जुनी असेल तर त्या हलव्याला कुजकट वास येतो.

पाफा Lol

बादवे चिकाची पावडर मिळते हे माहितीच नव्हत..

@Chioo, हि घ्या रिक्षा.
https://www.maayboli.com/node/49082

पा फा जबरी फोटो, उचलून खावंसं वाटतंय.

आमच्याकडे कुरडया करत नाहीत पण मला चिक आवडतो, श्रीरामपूरला मिळायचा बरेचदा खायला.

ओके लोक्स मी माझ्याकडची पावडर फेकणार आहे. काल केलेली ट्रायल बॅच फारच वासमारू होती त्यावर अजून मेहनत करायला वेळ नाही. मला वाटलं होतं हेल्दी नाश्ता वगैरे होऊ शकेल. आता इथे सग्गंसग्गं मिळतं म्हणून आमच्या बॅगा/दिवाळीत येणारे फराळ यासोबत असे आयटम्स कुणी न कुणी टाकत असतं. यापुढे नव्या गोष्टी आणल्या आणल्या ट्राय केल्या पाहजेत. उगा अन्न फुकट घालवण्याची टोच नको.
यानिमित्तान् इथल्या लोकांना कामाला लावायचं श्रेय घेते Wink

अरे काऽय तुम्ही!
रेडिमेड चिक मिळालाय अन फेकून देताय? अरेरे!

मस्त शिजवा, त्यात वरून तेल, तिखट, मीठ अन जिरेपूड.

गरम गरम फारच भारी ळागतो.

आजच केला होता. घ्या!

cheek.jpg
सोबत लसणाचं तिखट आहे.

ज्यांनी पाठवला होता त्यांनीच सांगितलं की बहुतेक जास्त जुना झाला असेल. फुकट डाॅक्टर लोकांची आणि फार्मसीची कामं नको वाढवायला Happy
मी तर इतरवेळीही खाईन असं वाटत नाही. मग ज्याने छान छान म्हणून हे प्राॅडक्ट मागवलं त्याच्या घशाततरी कुठे घाला. मला तर वरच्या फोटोंनी पण काही होत नाही Wink
आय विश मी इन्स्ट्न्टेड खरवस पावडर (कामधेनू) मागवली असती.

आ रा रा भारीच दिसतोय चिक
आमच्याकडे आइ २ किलो गहु फक्त खायचा चिक कारायाला वेगले भिजत घालायची त्याच्या वाटाघाटित (आणि एरवी पण ) सगळ करायची आम्हा भावन्डाची तयारी असायची अट एकच त्याची एकही कुरडै घालायची नाही म्हणजे कल्हइच पातेल माळ्यावरुन काढुन देणे, गहु दळुन देणे, दोन पाणयात तो चिकटा काढने, सगल धुवुन पुसुन ग्राइन्डर परत जिकडुन आणाला त्याला देणे , सकाली लवकर उठुन तगादा लावणे.

आय विश मी इन्स्ट्न्टेड खरवस पावडर (कामधेनू) मागवली असती.>> हे बरय तुझ ! म्हणजे आधी चिक कमी होता त्यावर अजुन खरवसाची आठवण काढुन जळवतेय.

Pages