Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांड की आंख बघितला.
सांड की आंख बघितला.
कथा म्हणून आवडला. पण casting एकदम बकवास.
त्या दोघीमुळे कंटाळा आला.
खरच कोणीतरी म्हातार्या हव्या होत्या .
खरच कोणीतरी म्हातार्या हव्या
खरच कोणीतरी म्हातार्या हव्या होत्या .
>> +१ म्हणजे त्या भुमीच्या चेहेर्याला बारीक रेती फासावी लागली नसती.
हॉटस्टारवर पंगा बघितला. मस्त
हॉटस्टारवर पंगा बघितला. मस्त आहे. कथेचा जीव लहान आहे. पण छान घेतली आहे स्टोरी.
कंगना बरीच नॉर्मल वागली आहे यात. तिच्या नवर्याचेही काम छान आहे.
'पंगा ' पाहिला कंगना राणावतचा
'पंगा ' पाहिला कंगना राणावतचा hotstar वर... मस्त आहे... गाणे पण आवडले..
मलाही आवडला पंगा. चांगला आहे.
मलाही आवडला पंगा. चांगला आहे.
हॉटस्टारवर पंगा बघितला. मस्त
हॉटस्टारवर पंगा बघितला. मस्त आहे. कथेचा जीव लहान आहे. पण छान घेतली आहे स्टोरी. ~~~ +१२३४५६
आणि जरा रियलीस्टिक गोष्टी पण दाखवल्या आहेत.. म्हणजे तुलनेने नवीन टीम मधे सिलेक्शन.. नवर्याच्या मिश्र भावना.. तरीही छान सपोर्ट.. सिलेक्शन कमिटी चा स्वार्थी पणा.. इ.
कंगना ने ईतकी मस्त साकारली आहे एक dedicated mother.. वा.. दिसते ही मस्त.. तिचे कपडे पण छान साधे आहेत. तिची आणि मीनू ची मैत्री पण आवडली.
मीपण पंगा बघितला. एकदम
मीपण पंगा बघितला. एकदम सहजसाधा.
जास्त कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत म्हणून तिच्या नवऱ्याला आईबापच नाही दाखवलेत.
नवरा आणि मुलगा अतिप्रचंड प्रमाणात समजूतदार. त्या वाघोबा प्रसंगात तर डोळ्यातून पाणी काढलं.
नवरा नुसताच गालात हसत राहतो बघावं त्या शॉट मध्ये. मान्य आहे हे आयुष्यात आनंदी, तृप्त असण्याचं लक्षण आहे. पण जरा जास्तच झालं.
मिनू आवडली. एवढ्यातच मसान बघितलेला असल्याने ती तीच हे लगेच लक्षात आलं. बाकी ती बहुतेक खरंच यूपीची असावी. भाषा एकदम छाप आहे.
Hollywood चित्रपटासाठी कोणता
Hollywood चित्रपटासाठी कोणता धागा आहे?
,you tube वर पाहता येतील का?
सध्या घा रात असल्याने वेळ
सध्या घरात असल्याने वेळ होता तर तानाजी व पानिपत बघितला.
खरे सांगायचे तर मला पानिपत आवडला. तानाजी मनापर्यंत पोहोचलाच नाही.
म्हणजे समोर समुद्र दिसत असून आपण तहानलेलेच राहावे तसे वाटले.
काजोल नाही आवडत, इथे ही नाही आवडली. तिचे ते लव्ह सीन उगीच वाटले. त्या काळातल्या नसल्या तरी काही दशके पुर्वीच्या स्त्रीया पाहतेय. उंबरठ्याच्या बाहेर त्या यायच्या नाहीत. ते 'बाय बाय' करणे वगैरे अतीच!
शरद केळकर आवडला फक्त!
गंमत म्हणजे अजिंक्य देव ते 'चुलत्या चुलत्या' म्हणतो ते आधी मला नीट कळलेच नाही. 'चुxxx' असे ऐकू आल्यावर काही क्षण आँ झाले होते.
पॅरासाईट प्राईम वर आलाय.
पॅरासाईट प्राईम वर आलाय.
Parasite बद्दल च लिहायला आले
Parasite बद्दल च लिहायला आले होते. आजच पहिला, मागे लोकसत्ता मध्ये परीक्षण वाचलं होतंच. आणि ऑस्कर विनर आहे म्हणून पहायचाच होता. Prime वर unexpectedly आला. आवडला, Dr. कसंबे यांनी मागे लेख लिहिला आहेच त्यामुळे स्टोरी बद्दल काही लिहायची गरज नाही.
मस्का पहिला नेटफ्लिक्स वर ...
मस्का पहिला नेटफ्लिक्स वर ... आवडला...
'लव्ह सोनिया' बघितला. कुठून
'लव्ह सोनिया' बघितला. कुठून बघितला असं झालं. ह्युमन ट्रॅफिकिंग वर आहे. त्यातही मायनर मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावण्यावर आहे.
१.मला शेवटपर्यंत कळलं नाही की प्रीती मुंबईत सोनियाला भेटते तेव्हा प्रीती आर्थिकदृष्ट्या खूप सधन कशी काय दिसते? ती अजिबात या व्यवसायातली दिसत नाही.
२. रेश्मा टीव्ही बघत असताना त्या बाबूला काय सांगते ज्यामुळे तो सोनिया आणि प्रीतीची भेट घडवतो? मी 2 वेळा रिवाईंड करायचा प्रयत्न केला पण ऍप बंद पडत होतं. शेवटी ते स्कीप मारून पुढे गेले.
३. चायना / कोरिया ला आणल्यानंतर आधी सोनियाचे कसले ऑपरेशन करतात?
४. सोनिया तिच्या बापाला माफ का करत नाही? त्याने तिला तर नसतं विकलेलं. आणि जिला विकलेलं असतं तिला तर काहीच पडलेली नसते हिची.
५. सोनियाचा एक कस्टमर तिला मोबाईल फोन देतो. त्याचा पुढे काहीच रेफरन्स आला नाहीये. मग तो मोबाईल देण्याचा भलामोठा सीन कशासाठी?
६. का कोण जाणे पण ते लोक हिला आणि त्या NGO वाल्याला परत शोधून काढून मारतील असं वाटत राहतं.
असो. वस्तुस्थितीवर आधारित आहे. त्यामुळे हे सगळं फार भीषण आहे हे जाणवतं आणि त्यांची कणव येत राहते. पण दुसरीकडे सोनिया स्वतःच्या वेडेपणामुळे इकडे अडकली आहे / होती हेही मनातून जात नाही. तिला एकदा हॉटेलमध्ये आणि एकदा NGO चा माणूस छापा मारतो तेव्हा दोन्ही वेळेला बाहेर पडणे शक्य होते असे वाटून जाते.
Disney चा 'डम्बो' बघितला. मला
Disney चा 'डम्बो' बघितला. मला पूर्ण सिनेमात फक्त 5 ते 10 मिनिटं डोळ्यात पाणी आलं नाही. सगळा रडायचा सिनेमा आहे (मी तरी पूर्णवेळ रडत होते). लहान मुलं बघताना कसली घाबरत असतील या अश्या वियोगाला..
पंगा छान आहे आवडला. जयाचा
पंगा छान आहे आवडला. जयाचा नवरा सारखा मंद स्मित का करत असतो. वेडाच वाटतो त्यामुळे तो. कीती प्रसंगात तर तो काही न बोलता नुसता वेड्यासारखं स्माईल देतो, त्यामुळे त्याच्या डोक्यात काही शिरतंय की नाही तेच कळत नाही. मुलगा गोड आहे पण फार आगाऊ वाटतो, एकुलता आणि अति लाडका असल्यामुळे असेलही. मिनूचा मुलगा बघायचा प्रसंग अफाट आहे, फुकरेची आठवण आली. स्मिता तांबे सरप्राईज आहे, चांगला रोल मिळाला तिला पण मला ती त्या भूमिकेसाठी वयाने मोठी वाटली. एकीकडे जयाला बुढी वगैरे म्हटलंय पण जया स्मितापेक्षा लहान आणि फिट दिसते. स्मिता जयाला टोमणे मारत असते पण तेव्हडी सक्षम ती दिसत नाही. नीना गुप्ता छान आहे आई म्हणून. शेवटी चक दे इफेक्ट वापरला आहे असे वाटते.
“एक सांगायचंय“ प्राइमवर
“एक सांगायचंय“ प्राइमवर पाहिला. थोडा जड विषय आहे. मी टप्प्या-टप्प्याने पाहिला. मुलांच्या आत्महत्या आणि पालकत्व असा जड विषय. मी मराठीत के के मेनन म्हणून खरं सुरू केला आणि त्याने निराश केलं नाही. पार तुटलेला बाप अतिशय ताकदीने उभा केला आहे. त्याच्या आवाजाचं मराठी डबिंग कुणी केल्यासारखं वाटलं नाही.
Parasite is ok and definitely
Parasite is ok and definitely not Oscar worthy. Joker was faaar better than Parasite. Oscar juries are really dumb.
पॅरासाईट बघितला. खूप आवडला.
पॅरासाईट बघितला. खूप आवडला.
जयाचा नवरा सारखा मंद स्मित का
जयाचा नवरा सारखा मंद स्मित का करत असतो. वेडाच वाटतो त्यामुळे तो. कीती प्रसंगात तर तो काही न बोलता नुसता वेड्यासारखं स्माईल देतो, त्यामुळे त्याच्या डोक्यात काही शिरतंय की नाही तेच कळत नाही.
>> याच्याशी सहमत
हिरो मोठा स्टार झाला की
हिरो मोठा स्टार झाला की त्याच्या समोर नवनवीन सुंदर्या पदार्पण तर करतातच पण established हिरॉइन्सपण आनंदाने कामे करतात. तेच हिरोईन मोठी स्टार झाली की तिच्यासोबत established स्टार हिरो काम करायला तयार नसतो. तिला मग असे मंद, नाव नसलेले व चित्रपटात फारसा वाव नसलेले हिरो चालवून घ्यावे लागतात.
Sahmat
Sahmat
लव्ह सोनिया' बघितला. कुठून
लव्ह सोनिया' बघितला. कुठून बघितला असं झालं. ह्युमन ट्रॅफिकिंग वर आहे. त्यातही मायनर मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावण्यावर आहे. >>>>>>>>>>>
मी पण पाहिला. खूप डिप्रेसिंग वाटला.
१.मला शेवटपर्यंत कळलं नाही की प्रीती मुंबईत सोनियाला भेटते तेव्हा प्रीती आर्थिकदृष्ट्या खूप सधन कशी काय दिसते? ती अजिबात या व्यवसायातली दिसत नाही. >>>>>>>>>>>>> असा अंदाज तिला मनोज वाजपेयीने दुसरीकडे धंद्याला लावले. ती दिसायला चांगली असल्याने तसे राहायला भाग पाडत अस्तील. ड्रग च्या अमलाखाली वाटली तेव्हा.
२. रेश्मा टीव्ही बघत असताना त्या बाबूला काय सांगते ज्यामुळे तो सोनिया आणि प्रीतीची भेट घडवतो? मी 2 वेळा रिवाईंड करायचा प्रयत्न केला पण ऍप बंद पडत होतं. शेवटी ते स्कीप मारून पुढे गेले.>>>>>>> रेश्मा म्हणते सोनियाला दुसरीकडे हलवायची वेळ आली आहे. मला खूप त्रास देते ती. बाबू तिला जायला सांगतो. नंतर त्याचा आणी त्या बहिणींची भेट घडवून आणायचा सबंध मलाही नाही कळला.
३. चायना / कोरिया ला आणल्यानंतर आधी सोनियाचे कसले ऑपरेशन करतात? >>>>>>> सील बंद.
४. सोनिया तिच्या बापाला माफ का करत नाही? त्याने तिला तर नसतं विकलेलं. आणि जिला विकलेलं असतं तिला तर काहीच पडलेली नसते हिची.>>>>>>>> बहिणीला घेऊन गेल्याचा राग असावा बहुधा.
५. सोनियाचा एक कस्टमर तिला मोबाईल फोन देतो. त्याचा पुढे काहीच रेफरन्स आला नाहीये. मग तो मोबाईल देण्याचा भलामोठा सीन कशासाठी?>>>>>>. तो फोन वापरूनच बहुतेक ती पुढची मदत घेते.
६. का कोण जाणे पण ते लोक हिला आणि त्या NGO वाल्याला परत शोधून काढून मारतील असं वाटत राहतं.
असो. वस्तुस्थितीवर आधारित आहे. त्यामुळे हे सगळं फार भीषण आहे हे जाणवतं आणि त्यांची कणव येत राहते. पण दुसरीकडे सोनिया स्वतःच्या वेडेपणामुळे इकडे अडकली आहे / होती हेही मनातून जात नाही. तिला एकदा हॉटेलमध्ये आणि एकदा NGO चा माणूस छापा मारतो तेव्हा दोन्ही वेळेला बाहेर पडणे शक्य होते असे वाटून जाते.>>>>>>>>>>> हो शक्य असते पण ती का जात नाही माहित नाही. त्या बहिणीला तर हिच्याबद्दल एवढं काही वाटतही नसतं. सोनिया तिच्याच मुर्खपणामुळे आणी मंदपणामुळे अडकते.
धन्यवाद अंजली. सिनेमा
धन्यवाद अंजली. सिनेमा पाहिल्यावर इथे आवर्जून उत्तरं शोधायला मदत केल्याबद्दल.
'एक सांगायचय' वेकाची पोस्ट
'एक सांगायचय' वेकाची पोस्ट वाचून पाहीला. खूप चांगला विषय मांडलाय. आई बाप व मुले दोन्ही बाजू संतुलीतपणे मांडल्यात.
के के मेनन मला आजपर्यंत अजिबात आवडला नाहीये. पण ह्या सिनेमात चांगला वाटला. मुलांची कामे पण छान झालीत.
सॉ सीरिज बघा (saw ) त्यानंतर
सॉ सीरिज बघा (saw ) त्यानंतर हिल्स हॅव्ह आईज बघा
नेटफ्लिक्सवर 'मस्का' बघितला.
नेटफ्लिक्सवर 'मस्का' बघितला. बरा आहे. वन टाईम वॉच.
बघून झाल्यावर डोक्यात आलं, ह्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स मुळे हे असे लहान सिनेमे आपल्यापर्यंत आज येऊ शकतात. हा सिनेमा मी थिएटरमध्ये जाऊन कधी बघितला असतं असं वाटत नाही आणि मुळात थिएटरमध्ये किती टिकला असता तेही माहीत नाही.
२०१९ च्या लोकसत्ता दिवाळी अंकात ह्याबद्दल छान सदर आहे.
इथे वाचून पूर्णा , एक
इथे वाचून पूर्णा , एक सांगायचंय पाहिले. दोन्ही छान आहेत.
साधना.. परफेक्ट लिहीलय.
साधना.. परफेक्ट लिहीलय.
लव सोनिया नाही बघत आता..खूप डार्क असेल तर.
पॅरासाईट मी पण पाहिला.. चांगला आहे. वरवर कितीही चांगल दिसलं तरी प्रत्येक घराची/फँमिली ची आतली गोष्ट वेगळी च असते.
Class discrimination खूपच हायलाईट केल आहे.
पॅरासाईट बघितला . आवडला. जबरी
पॅरासाईट बघितला . आवडला. जबरी भाष्य आहे सामाजिक , आर्थिक ,मानसिक परिस्थितीवर
*parasite छान आहे.
*parasite छान आहे.
* बदल म्हणून ‘नीवेवारो’ (तेलुगु) ची हिंदी आवृत्ती पण छान.
आदी, तापसी मुख्य भू.
Pages