चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द बॉडी

फ्रेम टु फ्रेम , कॉपी एक साउथ मूवी आहे, त्यात हीरोइन मनीषा कोइराला आहे
कौन है कातिल की असे कायतरी नाव आहे,

https://youtu.be/q774HvT9sZ4

द बोडिचा ट्रेलर बघुनच समजले होते , ह्याची कॉपी असेल, म्हणून गेलो नाही

The Body -> El Cuerpo या स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे.
बदला -> The Invisible Guest ज्याचा होता तोच दिग्दर्शक.

कसला फुसका सस्पेन्स आहे बॉडी चा...

स्पॉईलर अलर्ट --------
या सगळ्या ड्रामा ची काय गरज होती... आलरेडी स्कॉच मधून औषध दिलेच होते हाश्मी ला... आलाच असता हार्ट अट्याक घरी.....

कसला फुसका सस्पेन्स आहे बॉडी चा...>>+१

या सगळ्या ड्रामा ची काय गरज होती... आलरेडी स्कॉच मधून औषध दिलेच होते हाश्मी ला... आलाच असता हार्ट अट्याक घरी.....>> हो पण मग आपण काय बघायचे

बॉडी मध्ये ऋषि ची बायको मनीषा कोइराला आहे का ? एक्सिडेंच्या सीन मध्ये जराशी दिसली आहे.

त्या तमिल सिनेमात ती ओपोझिट रोल मध्ये आहे,
Proud

बॉडी पाहिला , लव्ह स्टोरी गाणी बोअर होती, मोबाईलवर पाहिला आणि लौकर फाफट पसारा ना लावता संपला म्हणून आवडला. थिएटरमध्ये जाऊन 300 देऊन पाहिला असता तर श्या द्यायला लागल्या असत्या

इथे वाचून मी पण पाहीला काल. ठिकच आहे. इम्रान हाश्मीने काम चांगलं केलं आहे. ऋषि कपूर पण छान. बाकी बाया ठिकच होत्या.
प्लॉट मात्र सो सो. वर च्रप्स नी लिहीलेल्या स्पॉयलर अ‍ॅलर्टला अनुमोदन.

> 'वीरें दी वेडिंग' तर 'पैसे कुठे कुठे आणि कसे खर्च करावेत बरं' असा प्रश्न पडणाऱ्या अति गडगंज श्रीमंत लोकांचा सिनेमा आहे. स्त्रीला ओपन किंवा लिबरल दाखवण्यासाठी तिने स्मोकिंग आणि ड्रिंकिंग केलेलं दाखवावंच लागतं का हा प्रश्न पुन्हा एकदा डोक्यात येऊन गेला. असो..>
What Do They Do: Why Don’t Female Characters Have A Career Path? बरेली की बर्फी, तनु वेड्स मनु आणि विरे दि वेडींग बद्दलची ही ब्लॉगपोस्ट वाचताना पियूची कमेंट आठवली.
===

How The Male Gaze In Bollywood Has Created A Culture Of Casual Sexism हीपण चांगली पोस्टय.

Career path असला तरीही लग्न झोकात आणि हौस (अर्थात ऐपतीप्रमाणे) पूर्ण करुन करायला पाहिजे. करियर चा आणि लग्न झोकात करायचा काय संबंध! आणि लग्नात काय फक्त मुलीच्या हौसा-मौजा पूर्ण होत नाहीत तर मुलं पण घोड्यावर/ बग्गीत बसणार, छत्र-चामरे असं करून घेतात, उगाच मान्यवर विराट कोहलीला पैसे देत नाही.
मुलींनी/ बायकांनी त्यांच्या आपापल्या स्वभावधर्मानुसार वागलं तर काय फरक पडतो! एखादीला आवड नसताना साडी नेसायला सांगणं / आग्रह करणं जितकं वाईट तितकंच एखादीला तशी कपडे, नटण- मुरडण आवड असताना ते केलं /करते म्हणून नावं ठेवणं वाईट.

ए पॅच ऑफ फॉग - एक बर्‍यापैकि यशस्वी पण क्लेप्टमेनियाकची हि कथा आहे. त्याच्या या व्याधीमुळे तो कसा गोत्यात येतो, त्यातुन चलाखीने कसा बाहेर पडतो, पुढे काय होतं याचं चित्तथरारक चित्रण सुंदररीत्या केलेलं आहे. नेफिवर आहे...

'मेड इन चायना' बघितला. सो सो वाटला. थोडा विनोदी आहे.. गाणी छान आहेत. पण ठीक ठीक. पोस्टरवर ती हिरोईन मेघा धाडेसारखी दिसते असं (आश्चर्य) वाटून मुव्ही लावला होता.

अवांतर: मध्यंतरी मेघा धाडेचा 'बजरंगा' की सिमीलर नावाचा मराठी सिनेमा पाहिला. तिचा रोल एकदम बकवास आणि कचकड्याची बाहुली वाटते पूर्ण सिनेमात.

मी आयुष्यात येवून हाश्मीचा पिक्चर बघितला नाही अस व्हायला नको म्हणुन अगदी आवर्जुन 'बॉडी 'बघायला गेले. Lol अक्षरशः वैताग आला.
ओरिजिनल स्पॅनिश पिक्चर नक्कीच चांगला असणार आहे इन्व्हिजिबल गेस्ट सारखा असा अंदाज.

बॉडी पाहिला. मला तरी आवडला. फास्ट आहे पटपट संपला. इमरान हाश्मीचा पहिलाच मुव्ही पाहिलाय. मला ती माया हिरॉईन जी कोण आहे. आज्जिबात आवडत नाही. काहीतरीच बोबडं बोलते ओठाचा चंबू करून. बरंय जास्त रोल नव्हता ते.

बॉडी पाहिला. मला पण आवडला.

>>या सगळ्या ड्रामा ची काय गरज होती... आलरेडी स्कॉच मधून औषध दिलेच होते हाश्मी ला... आलाच असता हार्ट अट्याक घरी.....
>> अरे पण हाशमीला कळले नसते कोणी मारले तर रिव्हेन्ज कसा झाला असता ?
आणि २ जण काही दिवसात अ‍ॅटॅकने मेले म्हणजे चमत्कारिकच ना ? रीषीची मुलगी पकडली गेली असती.
आता रीशी कपुर बोलु शकतो की इमरान हाशमी ने पकडला गेला म्हणुन सेम औषध पिउन आत्महत्या केली.

*** स्पॉयलर अलर्ट ***

>>अरे पण हाशमीला कळले नसते कोणी मारले तर रिव्हेन्ज कसा झाला असता ?<< +१
करेक्ट! तो एक क्लोजर (मानसिक समाधान) मिळवण्याचा प्रयास आहे. उदाहरण कदाचित अप्रस्तुत असेल, तरिहि - व्हाय डु टेररिस्ट्स टेक रिस्पाँसिबलिटि आफ्टर अ‍ॅन अटॅक. सेंडिंग ए मेसेज इज नॉट दि ओन्लि थिंग दे वांट टु अ‍ॅकंप्लिश...

Ala Vaikunthapurramuloo नेटफ्लिक्स वर आलाय , अल्लू अर्जुन चा टिपीकल मसाला आहे

अमेझॉन प्राईमवर अस्तु पहिला . छान चित्रपट आहे . एका संस्कृत पंडिताला झालेला अल्झायमर आजार , त्या अनुषंगाने मी कोण ही तात्विक चर्चा , माणसांचे पूर्वग्रह , परिस्थितीला तोंड देण्याची प्रत्येकाची वेगवेगळ्या क्षमता या सगळ्यांचा ताळमेळ विचार करायला भाग पाडतो . मध्ये मध्ये थोडा जड वाटतो पण ते तेवढ्यापुरते . शेवटची 35 ते 40 मिनिटं फार गलबलून आणणारी आहेत .ह्याच क्रेडिट दिग्दर्शक , मोहन आगाशे आणि अमृता सुभाष यांच्यासंयत अभिनयाला द्यायला हवं.

मोहन आगाशेनी विस्मृतीत जाण्याऱ्या , त्या आजाराने त्रस्त असण्याऱ्या डॉ चक्रपाणी शास्त्रीची भूमिका सुरेख वठवली आहे . अमृता सुभाषला जेव्हा ते आई हाक मारतात तेव्हा गलबलून येतं. त्यांच्याइतक कोणीही त्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही इतके त्या रोलमध्ये फिट बसलेत . इरावती हर्षेची इराही लक्षणीय . मिलिंद सोमणही आहे ह्यात आणि डॉक्टरच्या भूमिकेतही भारी दिसतोय . अभिनयही जमलाय चक्क Lol

द बॉडी कसला फालतु आहे खरच, काहीही येडपट सस्पेन्स Biggrin

अजुन एक बहुचर्चित ‘ गुड न्युज ‘ पाहिला, गुड सब्जेक्ट वेस्टेड !
आजकाल ट्रेलरमधे सगळे पंचेस दाखवून टाकतात, अ‍ॅक्चुअल मुव्हीमधे त्यापेक्षा काही वेगळे नसते, तसच झालं गुड न्युज बघताना !
सुरवातीला चांगला वाटला , नंतर अगदीच उथळ.. , उगीच ताणलाय !
अक्षय कुमारचा ओव्हरडोस झाला, त्या दलजीतला अजुन स्कोप द्यायला हवा होता.
करीना आवडते मला , इथेही चांगली वाटली .

मी पण पाहिला गुड न्यूज. डीजेसारखेच साधारण वाटले. सुरुवातीला टिपी आहे. बर्‍यापैकी फनी वाटला. नंतरचा हाफ धड फनी नाही अन धड सिरियस नाही अशी हाताळली आहे स्टोरी. चारही अ‍ॅक्टर्स चांगले वाटले. दलजीत ला त्याने अक्षय ला ओवरपावर केले तर काय घ्या म्हणून मुद्दम कमी फुटेज दिले असावे.
बायदवे सातव्या महिन्यात पण करीना ला बेबी ची मूव्हमेन्ट जाणवत नाही हे झेपले नाही? बाळाची हालचाल पाचव्या महिन्यापासून जाणवते की.

धन्यवाद चिनुक्स. आता आठवलं की अमृता त्या हत्ती वाल्याची बायको दाखवली आहे ना जी हरवलेल्या मोहन आगाशेची काळजी घेते.

चंपा , तुम्ही कोणता अस्तु बघितला नक्की Lol Biggrin
अमृता सुभाषची भूमिका कळीची आहे अस्तुमध्ये. तिलाच आई म्हणून हाक मारतात मोहन आगाशे .

बाकी मायबोलीचे मास्तर उर्फ चिनूक्स उर्फ चिन्मय दामले यांचीही ह्या चित्रपटात भूमिका आहे . पहिल्यादा लक्षात आल्यावर अरे हा मुलगा कोणसारखा तरी दिसतो अस वाटलं , त्यांनतर रिवाईंड केलं तर मास्तरांसारखा दिसतो हे मत बनल. नंतर मग मास्तरांना विचारून तो मुलगा तेच आहेत हे पक्के केलं Lol Biggrin

मोहन आगाशेनी विस्मृतीत जाण्याऱ्या , त्या आजाराने त्रस्त असण्याऱ्या डॉ चक्रपाणी शास्त्रीची भूमिका सुरेख वठवली आहे . अमृता सुभाषला जेव्हा ते आई हाक मारतात तेव्हा गलबलून येतं. >>>>>>>>>>>>> अगदी अगदी मीही तोच प्रसंग मोहन आगाशेंना ते इथे अस्तुच्या प्रिमिअरला आले असताना सांगितला की मला गलबलून आले तो सिन पाहताना. तो हत्तीवाला अ‍ॅक्टर माझ्या ओळखीचा आहे नचिकेत पूर्णपात्रे Happy

गुड न्युज बद्दल मै आणि डिजेला मोदक, करिना आणी अक्षयची वय स्क्रिन्वर ठळकपणे जाणवायला लागलियेत, करिनाचा चेहरा ओढग्रस्त दिसतो तरी दोघात भुमिका तिनेच चान्गली केलिये, अक्षय मला पहिल्यादाच रटाळ वाटला, त्याची कॉमेडी बोअर वाटत होती. ट्रेलर मधे दिसलेले जोक्स मुव्हि बघताना बोअर वाटले.
दिलजित आणि कियारा छान फ्रेश एनर्जी आणतात स्क्रिनवर, मुव्ही ठिकठाकच

Pages