चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुळू, न पटणं शक्य आहे.तिचा लढा, तिच्या मनात एक एक करून जमत गेलेली काडी आणि शेवटी एक थप्पड लास्ट स्ट्रॉ ठरून एक निर्णय घेणे.त्यावर इतरांच्या 'इतकं काय' टाईप प्रतिक्रिया.
मला थप्पड ची स्टोरी, पिक्चर सशक्त आहे हे पूर्ण मान्य आहे.आणि तरीही इतक्या डोक्याला ताप विषयावर 3 तास(अडीच तास) पिक्चर बघायला न आवडणे हे माझं वैयक्तिक मत.
अर्थात तोही परवडला असता.
तो हिरो राजवाडे नाही.राजवाडे डायरेक्टर आहे असं वाचलं. पेपर मध्ये त्याचा पहिला पिक्चर म्हणून अगदी संयत टीका केली आहे.बहुधा जे म्हणायचं होतं ते चांगलं होतं.पण बरंच काही म्हणायचं असल्याने विषय पोहचवताना गोंधळ झाला.त्यात कॉमिक पात्राचं नाव कॉपीराईट वादानंतर सगळीकडून कापावं लागल्याने मूळ पंच निघून गेला.
आजूबाजूच्या पब्लिकच्याही अश्लील वगैरे वगैरे ला याच रिऍक्शन्स होत्या.

Craps + 1.

शुम मंगल ज्यादा सावधान चांगला आहे. गाणी तेवढी उगीचच वाटली.

'नाळ' पाहिला. चित्रपट सुंदरच. पण अनेकांनी लिहिलंय तसं चैतन्य आणि बच्चन बोलतो तशी भाषा तिथल्या इतर कोणाच्याच (अगदी बच्चनच्या आईच्याही) तोंडी येत नाही हे फार खटकते. चैत्याच्या तोंडून मात्र गुळासारखी गोड वाटते ऐकायला Happy

कथेचा जीव फार छोटा असल्याने पार्वती अशी का वागते याचं स्पष्टीकरण देण्याचा फाफटपसारा वाढवला नाहीये हे एकप्रकारे बरंच वाटतं. प्रेक्षक सुद्न्य आहेतच.

सर्वांचाच अभिनय अप्रतिम.

“उजडा चमन“ पाहिला प्राइमवर. टक्कल विषयावरचा “बाला” आधीच पाहिल्यामुळे का माहित नाही पण पाहायलाच पाहिजे असा काही वाटला नाही. मला ती टिपिकल बाॅलिवुडी आवाज खेचून गायली जाणारी पंजाबी गाणी आवडत नाहीत त्यामुळे ती फाफाॅ. केली. आवडलं काय तर जिच्याशी त्याचं लग्न होतं ती नटी आणि तिचे वेगवेगळे कानातले. Wink

Amazon Prime वर "DNA" हा मराठी चित्रपट पहिला. इथे US मध्ये १००% शूट केलेला असा हा पहिलाच चित्रपट असावा .
कलाकार कोणी फेमस नाहीत. पण चित्रपट एकदम मनाला एकदम भावला, खूप आवडला . २.५ तासांचा आहे. कथा खूप छान आणि वेगळी आहे .

हो मी पाहिलाय तो खूप आधी. छान आहे मुव्ही. तो हृषिकेश साने आहे ना मेन लीड तो माझ्या मित्राकडे येतो नेहेमी . न्यू जर्सीमधलाच आहे बघुतेक

हो मी पाहिलाय तो खूप आधी. छान आहे मुव्ही. तो हृषिकेश साने आहे ना मेन लीड तो माझ्या मित्राकडे येतो नेहेमी . न्यू जर्सीमधलाच आहे बघुतेक

>> छान अंजली_१२ !!!
त्याची ऍक्टिंग छान आहे. सगळ्याच (४-५) कलाकारांचं काम छान झालं आहे. छोट्या बाळाचं आडनाव ही तेच आहे . मुलगी असावी त्याची बहुधा !!

मुक्ता बर्वेचा 'बंदिशाळा' बघितला.

थोडा सिंघम टाईप आहे. म्हणजे आयुष्यभर कायद्याचे रक्षक व्हायचे म्हणून प्रामाणिक पोलिसकी करून सिस्टीम मधल्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांशी पंगा घ्यायचा. आणि शेवटी त्यांना संपवायला बेकायदेशीर मार्गाची मदत घ्यायची. थोडक्यात आयरनीच्या देवा तुला..

पण जेव्हा सिस्टीमचा सिस्टीम भ्रष्टाचाराने बरबटलेली असते तेव्हा ती संपवायचे वेगळे मार्गही सापडत नाहीयेत आपल्याला. त्यामुळे सध्या तरी असा शेवट माफ.

बाकी चित्रपटाची कथा एकदम सरळसोट आहे. सस्पेन्स काही नाही. मुक्ता बर्वेचा अभिनय आवडत असेल खास कोणाला तर बघावा. समहाऊ मला एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने (जी दिवसाला इतके सारे गलिच्छ गुन्हेगार, रेपिस्ट, खुनी हँडल करते) तिने बलात्कार झाल्यावर इतके खचून जाणे डायजेस्ट झाले नाही.

ट्रेन टू बुसान पाहिला नेफ्लिवर. फारच भारी आहे. झॉम्बि मूव्ही आहे, कोरियन आहे. मस्त आवडला एकदम.

बलात्कार ही कोणत्याही बाईला शारीरिक पेक्षा अधिक मानसिक धक्का देणारी गोष्ट आहे कदाचित. मुक्ता सक्षम पोलीस अधिकारी आहे पण ती त्याक्षणी काही करू शकत नाही हे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे बदला घेण्यासाठी स्त्रीवर शारीरिक अत्याचार करणे हे न समजण्यापलीकडचे आहे बायकांसाठी. चित्रपट फार विशेष नाही. मुक्ताला हाही जॉनर हाताळायला मिळावा म्हणून बनवला आहे असे वाटते.

हॉटस्टार 2 दिवसांपासून हॉटस्टार डीझनी झालं. और अपुन खुश हुवा.

डीझनी चे लायन किंग वगैरे तर आलेतच. पण पिक्सार चे फार न गाजलेले मुव्हीज पण दिसताहेत.

माझे 'अ बग्ज लाइफ' आणि 'द लॉस्ट वर्ल्ड ऑफ अटलांटिस' बघून झाले. पैकी बग्ज लाईफ ने फार मजा आणली.

गिल्टी पाहिला. एकुण विषय हाताळणी जमलीये पण शेवट पुर्ण नाटकी वाटतो म्हणुन गांभिर्य निघुन जाते.

Disney चा 'कोको' पाहिला. खूप हसवतो. खूप रडवतो. खिळवून ठेवतो. ज्यांनी थेटर मध्ये बघितला ते शेवटच्या 'ना भुलना' (इंग्रजीत बघणाऱ्यांना 'रिमेम्बर मी') ने वाईट रडवलं असणार नक्की.

कोरोना मुळे घरी असणाऱ्यांनी आपापल्या मुलांसोबत नक्की बघा. hotstar VIP वर आहे. मुख्य म्हणजे हिंदी, तमिळ, तेलगू मध्येसुद्धा आहे.

मन फकिरा - किमान मनोरंजन. साधी गोष्ट. कामे छान. अंजली पाटील सगळ्यात छान.
अ उ मि मं - लेखकाने मारलेला सिनेमा. Visually फार मस्त आहे. पण खोटारडे, प्रीची संवाद, एकाच वेळी शंभर विषयांना हात घालण्याची खोडी. महाजन बेस्ट, अमेयचा वापरही छान. पर्ण पेठे महाबोर आहे, पुण्यात जन्म झाल्याने, आधी कुणाची तरी मुलगी म्हणून आणि आता बायको म्हणून इतक्या लिमिटेड व्यक्तीला सतत प्रेक्षकांच्या माथी मारले जाते तेंव्हा कंटाळा येतो.

पुण्यात जन्म झाल्याने, आधी कुणाची तरी मुलगी म्हणून आणि आता बायको म्हणून इतक्या लिमिटेड व्यक्तीला सतत प्रेक्षकांच्या माथी मारले जाते तेंव्हा कंटाळा येतो>>+111 अगदी अगदी.. असंच वाटत

पर्ण पेठे , आलोक राजवाडे, मृनमयी गोडबोले- ही तीन नावं दिसली की शक्यतो ते काम बघितलं जात नाही मग मुव्ही असो वा वेबसिरीज. भाडीपात सारंग आणि पॉला जितके आवडतात तितकेच हे लोक बोअर होतात.
राजवाडे तर स्पष्ट बोलू पण शकत नाही 'स' वगैरे.

मृण्मयी गोडबोले आजारी दिसते. पण काम आवडते मला तिचे. आलोक राजवाडे "मी आई आणि ... " मधे आवडतो. बाकी त्याचे काम मी पाहिलेले नाही. आणि पर्ण पेठे फाफे मधे आवड्ली होती. पण बाकी नाही आवडत मला.

मृण्मयी गोडबोले आजारी दिसते. पण काम आवडते मला तिचे. >>> भा डी पा मधे आवडते. आलोक पण आवडतो त्यात, सारंग पण. आई तर best.

मधे याव्यतिरिक्त दुसरी टीम बघितली एकदा, ती नव्हती आवडली.

Pages