Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@श्रद्धा - It chapter 2
@श्रद्धा - It chapter 2 प्राईम वर आला आहे!
Thanks!
Thanks!
इंग्रजी - कॉपीकॅट प्राईम वर
इंग्रजी - कॉपीकॅट प्राईम वर - पोलीस इन्वेस्टीगेशन आवडत असेल तर नक्की बघा.
कॉपीकॅट मधल्या फिमेल लीडचा. यु अगेन - हा नेटफ्लिक्स वर
हिंदी -. शानदार प्राईम वर. मेजर टाइमपास आहे. गाणी आणि बोर सीन्स पळवत बघाल तर 2 तासात संपेल.
यु अगेन आणि शानदार लाईट मुव्हीज आहेत. कॉपीकॅट छान थ्रिलर आहे.
अन्ग्रेजी मिडियम पहिला इरफान
अन्ग्रेजी मिडियम पहिला इरफान वरच्या प्रेमापोटी. छान आहे, ती नवीन नायिका पण चांगली आहे, पण इरफान आणि दीपक दोबरीयाल हेच लक्षात राहतात. कथेत तसं नावीन्य नाही पण तरी बघणेबल आहे. फर्स्ट हाफ धम्माल आहे, काही पंचेस तर प्रचंड हसवतात, नंतर थोडा स्लो जातो. मी तरी फक्त इरफान साठी त्याने ज्या परिस्थिती मध्ये तो पूर्ण केला यासाठी त्याच्या मेहेनातीसाठी पहिला. मी जबरदस्त चाहती आहे इरफान खान ची. देव त्याला लवकरात लवकर बरे करो.
प्राईमवर २ छान चित्रपट पाहिले
प्राईमवर २ छान चित्रपट पाहिले. दोन्ही इंग्लीश व रहस्यपट. जरा वेग कमी वाटेल पण ते योग्य वाटते. एका दमात पाहिल्याशिवाय उठवत नाही....
आय सी यु
आणि
अॅन इन्स्पेक्टर कॉल्स.
गश्मिर महाजनीचा मराठी सिनेमा बोनस पण मस्त आहे. देखणा नायक व मस्त आवाज.
कॉपीकॅट पहायला पैसे आहेत ना
कॉपीकॅट पहायला पैसे आहेत ना प्रईमवर?
अंग्रेझी(जी?) मिडीयम पाहिला.
अंग्रेझी(जी?) मिडीयम पाहिला. कलाकार छान आहेत. कामं मस्त केली आहेत सगळ्यांनी. पण पटकथा भरकटत जाते. खूप अतर्क्य, अचाट गोष्टी घडत जातात. कदाचित लांबी कमी केली असती तर जास्त नेटका झाला असता.
मिशन मंगल, अगदी बाळबोध आणि
मिशन मंगल, अगदी बाळबोध आणि बालिश.
छपाक चांगला आहे पण दीपिका अगदीच शोभत नाही मालती म्हणून. हिरो छान आहे. गाणी मस्त आहेत. भरकटल्यासारखा वाटतो मध्येच. मालतीला जास्तच वाव दिला आहे, बाकी सगळे नवीन आहेत म्हणून कदाचित.
रोशन व्हिला बघताना सजेशनमध्ये
रोशन व्हिला बघताना सजेशनमध्ये अनवट आला होता तो पाहिला. चांगलाय. आदित्य आणि ऊर्मिला कोठारे, मकरंद अनासपुरे, भार्गवी आणि किशोर कदम आहेत. पण शेवट थोडा गंडलेला वाटला.जुनी गाणी का वापरली कळलं नाही, पण त्या त्या सीनमध्ये चपखल वाटली.
जन्म हा मराठी चित्रपट पण बघितला , कथाबीज खूप छान आहे, रिमा लागू, वीणा जामकर, आनंद अभ्यंकर असे तगडे कलाकार आहेत पण दिग्दर्शक आणि संकलक दोघांनीही चित्रपट रटाळ बनवलाय.
प्राईमवर A beautiful mind
प्राईमवर A beautiful mind छान आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल विजेते जॉन न्याश यांच्यावर आधारित.
बोनस पाहीला.. आवडला.
बोनस पाहीला.. आवडला.
स्पॉईलर अलर्ट : तो परत घरी जायला निघालेला असतो पण परत का येतो याचं कारण कुठेच कळत नाही.
तो परत घरी जायला निघालेला
तो परत घरी जायला निघालेला असतो पण परत का येतो याचं कारण कुठेच कळत नाही. >>>> +१
प्लॉट आणि कास्टींग चांगलं आहे. सुरूवात पण चांगली होते पण दुसर्या हाफमध्ये गंडतोच चित्रपट.
कॉपीकॅट पहायला पैसे आहेत ना
कॉपीकॅट पहायला पैसे आहेत ना प्रईमवर? >>>> सिंगापुरात तरी नाही. अंग्रेझी मिडीयम कुठे बघितला?
हरामखोर बाबत चंपा आणि चर्प्स
हरामखोर बाबत चंपा आणि चर्प्स ला अनुमोदन.
अंग्रेझी मिडीयम कुठे बघितला?
अंग्रेझी मिडीयम कुठे बघितला? >> hotstar
वा वा मसान...
वा वा मसान...
बरेच लोकांकडून छान असे ऐकून पिक्चर पाहिला. पण ठिकठाकच निघाला. नसता बघितला तरी आयुष्यात काही मिसलं नसतं. ओल्ड फ्याशन कलात्मक समांतर काय म्हणतात तसे आशयघन पण त्याचवेळी फार काही मालमसाला नसलेला एखाद्या समाजावर डोक्युमेंटरी बनवावी तसा चित्रपट आहे. यापेक्षा मस्त ड्रामा क्राईम पेट्रोलच्या रिअल स्टोरीत असतो. शेवटाने तर फारच निराश केले. काही शेवट झालाय असे वाटलेच नाही. कॉलेजातल्या पिरीअडची वेळ संपली अन प्राध्यापकांचा लेक्चर संपला तसे वाटले. दोन वेगळे कथानकांची शेवटपर्यंत कुठेच सांगड घातली नाही हे आणखी डोक्यात गेले. सैराटच्या वळणाने जाणारया लव्हस्टोरीला तर उगाचच असे संपवले की जसे डेलीसोपमधील एखादा कलाकार सोडून गेला तर जसे कथानकच बदलून त्याचा रोल कापून टाकतात. पैसा वापस दे दो भाई फिलींग आली...
असो, उद्या आणखी लिहेन. वेळ वाया गेल्याचा त्रास म्हणून मुद्दाम मायबोलीवर मसान सर्च मारून हा धागा शोधून हलका झालो. आता हिच पोस्ट आणखी एका धाग्यावरही कॉपीपेस्ट करतो म्हणजे हलके होणे द्विगुणित होईल.
तुर्तास शुभरात्री ....
प्राईमवर प्रेमसूत्र पाहिला.
प्राईमवर प्रेमसूत्र पाहिला.
संदीप कुलकर्णी, पल्लवी सुभाष, इ.
छान आहे. खरे प्रेम, आकर्षण ...वगैरे.
प्रेमसूत्र म्हणजे व्हेज
प्रेमसूत्र म्हणजे व्हेज बिर्याणी सारखे वाटते. किंवा टोमॅटो ऑम्लेट
फा
फा
मग पाहायचा का ?
आॅलिंपस हॅज फाॅलन आला आहे नेफिवर. तसा शेवटी मसाला आहे पण ओवरआॅल वाईट नाही. ते द्रोण अटॅक वगैरे (घरातल्या) मोठ्या स्क्रीनवर पाहयला चांगलं वाटलं.
"प्रेमसूत्र म्हणजे व्हेज
"प्रेमसूत्र म्हणजे व्हेज बिर्याणी सारखे वाटते. किंवा टोमॅटो ऑम्लेट " -
ऋ
ऋ
रच्याकने, हॉटस्टार आणि मॅक्स
रच्याकने, हॉटस्टार आणि मॅक्स वरचा चित्रपट किंवा सिरीज स्क्रीन मिररने मोठ्या टीव्हीवर बघता येत नाही. चित्रपट सूरू होईपर्यंत व्यवस्थित पण चित्रपट किंवा सिरीज सुरु झाली की ब्लँक. प्राईम दिसते. घरातल्या बाकीच्या मोबाईल वरून प्राईमसुद्धा मिरर होत नाही. नाईलाजाने माझा मोबाईल द्यावा लागतो. का होत असावे असे. काही उपाय आहे का.
मिरर करायची काय गरज?अँड्रॉइड
मिरर करायची काय गरज?अँड्रॉइड टीव्ही असेल तर थेट ऍप टीव्ही वर टाकून बघता येईल.
अन्ग्रेजी मीडियम हॉट स्टार वर 1 तास पाहिला.एकंदर राजस्थानी डायलेक्ट वगैरे ठिके, पण मला व्हॉइस कालिटी खराब वाटत होती.इरफान खान चे निम्मे डायलॉग कळतच नव्हते.शेवटी कंटाळून बंद केला.कधी मूड असेल तेव्हा इथे त्या पिक्चर वर वेगळा धागा निघाला तर आधी चर्चा वाचून मग पाहीन.
शेवटी खूप दिवसापासुन पहायचे
थँक्स आभा.
शेवटी खूप दिवसापासुन पहायचे ‘सर्चिंग’ व ‘एस्केप रूम‘ पाहिले. सर्चिन्ग मस्तच.. एस्केप रूम पण छान पण सर्चिन्ग जास्त आवडला. हे दोन्ही प्राईमवरुन स्टारझी वर पाहिले.
एन्जल फॉलन व त्याचा भाग१, दोन्ही मस्त आहेत.
अंगरेजी मीडियम मी चक्क चक्क
अंगरेजी मीडियम मी चक्क चक्क थेटरात बघितला होता. खरंच हिंदी मीडियमच्या तुलनेत भ्रमनिरास झाला. ठीकठाक एवढंच म्हणेन.
पंकज त्रिपाठी आणि इरफानला एका फ्रेममध्ये बघून मात्र डोळ्याचे पारणे फिटले. राधिका मदन सपशेल गंडलेली वाटली. बाकी ठीकठाक.
वन टाईम वॉच. हिंदी मीडियम कितीदाही बघू शकतो.
सध्या नेटफ्लिक्स एक महीना
सध्या नेटफ्लिक्स एक महीना फ्री आहे, तेच बघतेय.
लॉस्ट इन स्पेस छान आहे. स्ट्रेन्जर थिंग्ज चारी सीझन पाहीले. आवडली
मॅक्स प्लेअर वर भौकाल बघतेय. मोहीत रैना आवडता आहे. मालीका आवडतेय.
प्राईमवर भूत आला आहे. विकी
प्राईमवर भूत आला आहे. विकी कौशलचा तो जहाज वाला. कोणी पाहिला असेल तर कसा वाटला सांगा.
भूत पाहिला. ठिक आहे. विशेष
भूत पाहिला. ठिक आहे. विशेष नाही वाटला.
गर्लफ्रेंड पण आलाय सई अमेयचा
गर्लफ्रेंड पण आलाय सई अमेयचा प्राईमवर. कसा आहे. मागची पाने पलटून शोधायचा कंटाळा आला आहे.
मलातरी आवडला होता. टाईमपास
मलातरी आवडला होता. टाईमपास झाला.
Pages