चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

To जिज्ञासा,
माझ्या वरच्या प्रतिसादावर साधना नामक आयडीने चित्रपट न बघताही प्रतिक्रिया देत बसल्यात.
तसंही मी माझ्या मताला फारकत घेण्याबद्दल बोलतच नाहीय.
फक्त त्यासाठी भाषा योग्य असावी.
मुळात चित्रपट न बघता प्रतिक्रिया द्यायचीच का??
आणि मला दिवे द्यायला हवेत की आणखी काही हे सांगणाऱ्या तुम्ही कोण??
मुळात माझा प्रतिसाद ज्यांनी माझ्या प्रतिसादावर -ve (yes i will कॉल it negative) tyanच्यासाठी होता.
मग तुम्ही कशाला मध्ये पडताय??
तुमचा काय संबंध इथे???

कुठून कुठून येतात एकेक लोक??
आणि माझ्या प्रत्येक प्रतिक्रियेवर -ve कंमेंट देण्याशिवाय काही येत नाही का लोकांना ??
असतील एकेकाची मतं म्हणून वाचा आणि पुढे चला ना..
काही काही लोकांना इतरांना त्रास दिल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही वाटत..
How mean it cud b!!!

आणि आम्ही दोघी चित्रपटाबद्दल अजूनही न पटणाऱ्या गोष्टी सांगते हा...
प्रिया बापट त्या भुषण प्रधान च्या गर्ल फ्रेंड विषयी जे खिल्ली उडवून बोलते तेही मला आवडलं नाही.
ती स्वतः खूप शिकलेली असली तरी तिच्यामानाने कमी शिकलेल्या मुलीची असं खिल्ली उडवणं मला आवडलं नाही..
मला मुळात प्रिया बापट च जे टोकाचं practical, इंसेन्सिटिव्ह कॅरॅक्टर दाखवलंय त्यामुळे ह्या जगात ती वडील, अम्मी, भूषण प्रधान ह्यापैकी कोणीही तिच्या सोबत राहत नाही आणि शेवटी ती एकटीच राहते असं दाखवलंय ते एका अर्थानी अश्या टाइप च्या लोकांसोबत कोणीही राहू शकत नाही असंच दाखवलंय असं मला वाटलं.
आता ज्यांना माझ्या प्रत्येक प्रतिक्रियेवर नाकारत्मकच प्रतिक्रिया द्यायची असते असे सगळे यथेच्छ इथे येऊन धुडगूस घालू शकतात हा..

आणि हो ज्यांनी चित्रपट पाहिला ही असे पण लोक येऊन आपली मते मांडा हा.
शेवटी काय पुढच्याला त्रास देणे हा उद्देश साध्य झाला पाहिजे.....

दोघी सिनेमा च्या संदर्भात वरच्या कमेंट्स, वाचल्या. त्यात कोणीच वाद घालतंय असं वाटलं नाही. जिज्ञासाचं पण पटलं.

इथे येऊन कोणी आपले मत (अनुकूल किंवा प्रतिकूल) मांडले आणि ते विरोधी असेल तर असूदे की. त्यात काय एवढं?

खरंच जाऊ दे! मी_ऋचा, तुम्हाला शुभेच्छा! यापुढे इग्नोरास्त्र वापरण्यात येईल!

हे लिव इन मध्यमवर्गात आणि उच्च मध्यमवर्गात कोण करतात का?
आजकाल यावर बरेच चित्रपट निघतात पण प्रत्यक्षात असे करणारे दुरुनही कोण माहित नाहित.
असो
गुड न्युझ पाहिला ओके आहे.
इन्विजिबल मॅन अमेझॉन वर विकत घेतला. यात फक्त
एकच कळत नाही, तो इन्विजिबल मॅन दहा बारा ट्रेन्ड सिक्युरिटी गार्ड्स् ना सहज मारतो पण हिरॉइनी बरोबर नेहेमी खुप वेळ फाय्टिन्ग करत असतो.
शिवाय कधी कधी खुप हुशारीने अनेक गोष्टी करतो पण इन्विजिबल होउन फोन स्विच ऑफ न करता फिरणे व फोन नम्बर न बदलणे.
एक्स्ट्रा ड्रेस असाच घरात ठेवणे तो चोरिला गेला हे कळल्यावर पण काहिच उपाय न करणे. त्यामुळे तो हुशार आहे का मन्द हे कळत नाही.

Also I forgot ki Timb kase kaaDhaayache. Purwee mee .N karat ase. aata te chalat naahee.

जोकर पाहिला शेवटी.. खूप उदास वाटला, चित्रीकरण पण मुद्दाम असं डल केलंय. नायकाचा अभिनय अत्यंत सुंदर...
अजून एक इंग्लिश मुव्ही पहिला प्राईम वर , flight. जबराट...

काल ख्रिस हेम्सवर्थचा Extraction पाहिला. मला वाटतं जो रुसो Endgame च प्रमोशन करायला आला तेव्हा आपल्या इकडची marvel आणि thor ची क्रेझ बघुन त्यानं भारतातल मार्केट ओळखलं आणि मुद्दाम हा सिनेमा भारतात सेट करून कथा लिहिली आणि तो produce केला. भारतातलं जे मार्केट marvel ने ओळखलं ते DC ओळखू शकलं नाही..
बाकी स्टोरी कशीही असली तरी Extraction मधली अँक्शन मात्र john wick स्टाईल ची आहे आणि म्हणून दमदार आहे.

Arjun reddy आणि kabir singh मधले सगळे दमदार सीन्स flight बघून ढापलेले आहेत..

प्राईम वर लिटिल विमेन बघितला, बिलकुल नाही आवडला. पुस्तक सुरेख आहे. पण कास्टिंग पासून कथेचा ओघ सगळंच गंडलं आहे>>>>>>>>

@सुह्रुद, अगदी अगदी. १००% अनुमोदन तुम्हाला. लिटिल विमेन काय सुरेख पुस्तक आहे! ह्या चित्रपटात नुस्ता बट्ट्याबोळ केलाय त्याचा. आणि यु आर राईट. कास्टिन्ग मेज्जर गंडलय. मला एम्मा वॉटसन आवड्ते पण मेग म्हणून अगदी शोभत नाही. एमी थोराड आणि लॉरी १४ वर्षांचा दिसतो. एमिच्या चेहर्यावर जराही भाव नाहित. चेहर्यात अजिबात गोडवा नाही. आणि ज्यो? वेल , नो कमेन्ट्स!

आज शुभमंगल ज्यादा सावधान बघितला..
आयुष्मान खुराणा वाला..
एवढा नाही आवडला.. ठीक ठीक..

बरं मला एक सांगा.. यूपी साईडला सगळं एवढं फ्रॅंक असतं का? मोतीचूर चखनाचुर, शुभमंगल सावधान 1 व 2, बाला वगैरे मुव्हीजमध्ये आईवडील आणि मुलं यांच्यात जसे संवाद आहेत (किंवा वडीलधाऱ्यांचे आपसातले संवाद) तसे मराठी कुटुंबात इमॅजिन पण करू शकत नाही मी. (की मीच एकटी मागास कुटूंबात राहते?)

युपीसाईडला चित्रपटात दाखवतात तसं फ्रॅक अजिबात नाहीये.. पण चंदीगढ, दिल्ली, अमृतसर, पटीयाला ह्या शहरात गेलात तर तुम्हाला असले फ्रॅक मम्मी डॅडी थोड्याप्रमाणात नक्कीच पाहायला मिळतील...dont worry you are not from मागास कुटुंब... Happy

वर उल्लेखलेल्या सगळ्या up वाल्या मुव्हीज मध्ये हुंड्याचे संदर्भ आहेत आणि तो ही जब्बर थोडा थोडका नाही. खरंच अशी परिस्थिती आहे का तिथे अजून? हुंदविरोधी कायदा वगैरे नाही का? तसं असेल खरंच तर मग अवघड आहे. त्या मुलींवर आणि तिच्या पालकांवर कसला दबाव असेल लग्नापर्यंत. आताच पाहिलेल्या पंचायत मध्ये पण असंच हुंड्याविषयी दाखवलंय, मुलाच शिक्षण आणि पगार यावर हुंडा अवलंबून...

आजच थप्पड आलाय prime वर. मला पहायचाच होता, बरंच वाचलं होतं आणि तापसी पण माझी आवडती आहे, तीची भूमिकांची निवड खूप आवडते मला.
तर थप्पड पण आवडला, सगळ्यात जास्त आवडली ती कथेची संयमित आणि वास्तववादी मांडणी. कुठेही मेलोड्रामा नाही( स्कोप असुनही) आणि सगळ्या कलाकारांचा सहजसुंदर अभिनय. वरवर सगळ्यांना छोटीशी वाटणारी एक गोष्ट एखाद्या माणसाला आतून कशी तोडून टाकते हे तापसिने खूप सुरेख मांडलंय. पहिला नसेल तर एकदा नक्की पहा.

हो मलापण शुभमन्गल ज्यादा सावधान अजिबातच नाही आवडला , अग्रेजी मिडियम विषयी वर लिहलेल्या बहुतेक मताशी सहमत, पहिला हाफ मस्त आहे एकदम, करिना -डिम्पल च्या स्टोरिला उगाच घुसडलय अस वाटत.

हंपी पहायचा होता कधीपासून तो यूट्यूबवर पाहिला. कथा काहीच नवीन नाही, बॉय मीट्स गर्ल अ‍ॅन्ड ऑल. पण लोकेशन फारच छान आहे. हंपी पहायची प्रचंड इच्छा झाली. सोकु ज्यु. आवडते पहिल्यापासून. तिचा हेअरकट, वॉर्डरोब मस्त आहे. स्वभावातला कडवट, निराशावादी सूर चांगला दाखवलाय. प्राजक्ता माळी आणि ललित आपापल्या भूमिकेत योग्य आहेत.

थप्पड बघायचाच होता.

फार आवडला. आवर्जुन बघावा असा.

सान्वी +१.

फक्त मला एक की दोन ठिकाणी थोडा मेलोड्रामा वाटला. पण दोन चार मिनिटेच.
चित्रपट आवडला. चित्रपटगृहात पहायला हवा होता.

गर्लफ्रेंड पण आलाय सई अमेयचा प्राईमवर. कसा आहे. मागची पाने पलटून शोधायचा कंटाळा आला आहे.>>>>>» चंपा, मला तरी अजिबात आवडला नाही अमेय वाघ आहे म्हणून खुपच अपेक्षेने बघितला होता. कोणाचीच कामं खास नाही वाटली.

मुरांबा खुपच छान होता ह्या पेक्षा. सगळ्यांची कामं लक्षात राहाण्यासारखी

कुठून कुठून येतात एकेक लोक??
आणि माझ्या प्रत्येक प्रतिक्रियेवर -ve कंमेंट देण्याशिवाय काही येत नाही का लोकांना ??
असतील एकेकाची मतं म्हणून वाचा आणि पुढे चला ना..
काही काही लोकांना इतरांना त्रास दिल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही वाटत..
How mean it cud b!!!-------}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}

हे फार वाइट आहे... असो... शुभेच्छा! आणि jidnyasa ने लिहिले आहे - हलके घ्यायला खरे च शिका

थप्पड आजच पाहिला.
खरं तर थोडा ताणलेला वाटला.त्यातला मूळ मेसेज कळला.
At what cost are you winning the war असं काहीसं शेवटी डोक्यात आलं.पण त्याचबरोबर अमू च्या वडिलांचं वाक्यही पटलं.

Pages