चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

404 पाहिला ... जबरदस्त आहे... हॉलिवूड च्या तोडीस तोड सस्पेन्स... अप्रतिम...
धन्यवाद अज्ञातवासी रेकमेंड केल्याबद्धल....

The Extraction - नेफिवर बघितला. एंगेजिंग आहे. ढाका शहराचे चित्रीकरण अस्सल वाटते.

क्लिट ईस्टवूडचा The Mule पाहिला. पिक्चर ओके आहे पण क्लिण्ट इस्टवूडचा रोल त्याच्या नेहमीच्या रोल्सपेक्षा एकदम वेगळा आहे त्यामुळे आवडला.

प्राईम वर लिटिल विमेन बघितला, बिलकुल नाही आवडला. पुस्तक सुरेख आहे. पण कास्टिंग पासून कथेचा ओघ सगळंच गंडलं आहे.

इथे अवांतर होईल कदाचीत पण इथेच विचारते, युट्यूब टिव्हीवर पाहण्यासाठी मोबाईल टिव्हीला कसा कनेक्ट करावा.टिव्ही सँमसंग led tv series ४ आहे.

जोकर आलाय prime वर. कोणी पाहिला का? कसाय? ~~ Dark as hell म्हणतात तसा आहे अगदी.. नायक अक्षरशः जगला आहे आर्थर ची भूमिका.. नक्कीच बघावा असा. आहे.
थोडा disturbing पण आहे.

चक्क ‘४०४ एरर’ तितका भावला नाही. सिनेमा वाईट अजिबात नाही पण एखादा सिनेमा पाहिल्यावर जी ‘वा वा काय सिनेमा होता हा‘ अशी जी भावना मनात येते तसे वाटले नाही. कुठेतरी काहीतरी जरासे कमी आहे हे टोचत होते. काय ते कळत नाही. पण एखादी निर्मिती पहातापहाता आपोआप आतपर्यंत पोचते तसा पोचला नाही.
पण एकदा पहायला हरकत नाही. ङ

जोकर - अत्यंत आवडला होता. विशेषतः जोकरचा अभिनय. पण उदास करणारा सिनेमा आहे. तसा चालत असेल तर पहा.

काल प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेचा आम्ही दोघी पाहिला.
प्रिया बापटच कॅरेक्टर सावी पटलं नाही.
ती तिच्या बॉय फ्रेंड सोबत live in मध्ये राहत असते आणि तीची लग्न करायची तयारीही नसते तरी तिच्या बॉयफ्रेंड (भुषण प्रधान )नी लग्न केल्याच कळल्यावर तीला शॉक वगैरे बसतो असं दाखवलंय..
तसंच सेम तिच्या वडिलांची डेथ झाल्याचं कळवलं नाही म्हणून ती sad वगैरे दाखवणं पटलं नाही ती घर सोडताना "कायमची "चाललीय असंच दाखवलंय.
शेवटचा मुक्ता बर्वे आणि तिचा सीन छान आहे.
अम्मी ज्या पद्धतीने तीला समजावते ते छान आहे फार...

ती तिच्या बॉय फ्रेंड सोबत live in मध्ये राहत असते आणि तीची लग्न करायची तयारीही नसते तरी तिच्या बॉयफ्रेंड (भुषण प्रधान )नी लग्न केल्याच कळल्यावर तीला शॉक वगैरे बसतो असं दाखवलंय..>>>>

काल पर्यंत लिव्ह इन मधलेला बॉयफ्रेंड आज लग्न करून समोर आला तर शॉक बसणारच..
असो, मी चित्रपट पाहिला नाही त्यामुळे ब्रेकअप झाल्यावर लग्न की आधीच लग्न हे माहीत नाही पण आधीच लग्न केले तर नक्कीच शॉक बसेल.

तो तिला लग्न करणार असल्याचं अजिबात सांगत नाही जे तो मित्र या नात्याने सांगू शकत होता असे सावीला वाटते आणि तो अशा मुलीशी लग्न करतो जी सावीच्या दृष्टीने अति सामान्य असते. अम्मी आणि तिच्या वडिलांचे लग्न झालेय हे तिला माहिती नसते त्यामुळे तिच्या दृष्टीने ती तिच्या वडिलांची एकमेव रक्ताची नातलग असते. किती झालं तरी तिचे वडील असतात त्यामुळे तिला धक्का बसतो. मला तरी काही न पटण्यासारखं वाटलं नाही.

ओह्ह.. nice to see everyone pouring their heart out on my comments.... !!
चित्रपट पाहून प्रतिक्रिया द्या..
न बघून कशाला लिहायचं???
मी माझे मत मांडलं.. कुणी ते पटवून घ्या असं नाही म्हाणालीय
वरती प्रत्येकानीच प्रत्येक चित्रपट पाहून आपापली मते मांडलीयेत.
Its ok folks... एवढं हिरिरीनं विरोध करण्यासारखं काही लिहिलं नसताना कशाला लोक उगाच लिहतात काय माहिती Happy
Oscar winning मूवी पण न आवडता राहू शकतो
त्यात एवढं वाद घालण्यासारखं कायेय????

मी ऋचा, अहो वाद कुणी घातलाय? तुम्ही तुमचा दृष्टिकोन मांडलात बाकीच्यांनी त्यांचा! यात वादाचा मुद्दा कुठे आला?
हे तर मायबोलीवरचं साधंसुधं संभाषण आहे! तुम्हाला खूप दिवे घ्यायला हवे आहेत! म्हणजे lightly घ्या सगळ्या कॉमेंट्स!

सुनिधी - 404 मी पाहिलंही नसता पण अज्ञातवासी रेकमेंड करणारे चित्रपट मला तरी निराश नाही करत.
तो जुना चित्रपट आहे 2011 बहुतेक आणि लो बजेट aahe.
त्यात बॅकग्राऊंड संगीत दर्जा वयवस्थित नाहीय.
चित्रपट संपला कि wow असे नाही आले पण ट्विस्ट छान होता...

स्पॉईलर अलर्ट - प्रोफेसर स्वतः आजारीaआहे आणि ती कॉन्फ आणि रिसर्च प्रेझेन्टेशन ... ते श्रोते सगळे फेक आहे...
बाहेरून त्याची बायको आणि सतीश कौशिक त्याला स्पीच देताना बघतात तेंव्हाचे एक्सप्रेशन्स चेक करा...

404 ला मी मास्टरपीस वगैरे म्हणणार नाही, पण खरंच, इट्स गुड मुवि टू वॉच.
Ratsasan नंतर एक सायकॉलॉजीकल थ्रिलर ची कमी याने नक्कीच भरून काढली.
१. प्लस पॉईंट्स-
एक वेगळाच अप्रोच, आणि वेगळीच कथा.
शेवटपर्यंत न सुटणार रहस्य, जे शेवट झाल्यावरही सुटलंय का नाही माहीत नाही.
निशिकांत कामतचा अभिनय. (यात कधीकधी मला इरफान खानची झलक दिसली.) इतर कलाकार सुद्धा त्यांच्या जागी परफेक्ट आहेत.
प्रत्येक गोष्टीच यथायोग्य स्पष्टीकरण.
चित्रीकरण, आणि नो गाणी, नो रोमान्स, नो अदर मसाला.

मायनस पॉईंट्स
ये फिल्म सब्र का इमतेहान लेती है. संथ मांडणी.
Cliffhanger वाटणारा शेवट.

एक्सट्रॅक्शन पाहिला. जबरी आहे अ‍ॅक्शन चेसिंग सिक्वेन्सेस. रणदीप हुडा भलताच वेगळा दिसतोय. दुसर्‍या भागाला वाव आहे. ब्रीजवरचा गोळीबार आता बास असं झालं शेवटी.

स्पॉयलरः शेवटी ओवी पाण्यातून वर येतो तेव्हा त्याला तिथे कोणीतरी उभे आहे पूलसाईडला असं दिसतं ना?

मीसुद्धा आताच extraction संपवला. खूप खूप खूप मारामारी झाली आणि शेवटी बस करा रे बाबांनो, असं झालं.
रणदीप आणि chris hamesworth(थॉर) मात्र जबरदस्त. पंकज त्रिपाठीला ओवी महाजन नाव का दिलंय कळलं नाही. कुठल्याही अँगलने ते नाव त्याला शोभत नाही.
ढाका भारी दाखवलंय.

पंकज त्रिपाठीला ओवी महाजन नाव का दिलंय कळलं नाही. >> उत्तरेकडचा महाजन असावा. बहुधा काश्मिरी. आणि ओवी महाजन व ओवी महाजन सिनीयर अशी प्रचलित नावे भारतात बघितली नाहीत. बहुधा मूळ इंग्रजी कॅरेक्टर्स वरून नावे तशीच ट्रानस्प्लॅण्ट केली आहेत.

स्पॉयलरः शेवटी ओवी पाण्यातून वर येतो तेव्हा त्याला तिथे कोणीतरी उभे आहे पूलसाईडला असं दिसतं ना? >>> हो. तो भाग बहुधा अंधुक मुद्दाम सोडला आहे.

एका बाबतीत ७०ज बॉलीवूड लॉजिक आहे. शंभर लोक वेगवेगळ्या बाजूनी हीरो वर गोळीबार करतात, ते ही कसलेले मिलीटरी, कमांडोज, पोलिस ई. पण त्यांचे नेम अगाध असतात. मात्र हीरो ची प्रत्येक गोळी कोणालातरी उडवूनच जाते.

ती हीरॉइन नेम धरून एकाला शेवटी उडवते तो सीन चांगला जमला आहे.

एका बाबतीत ७०ज बॉलीवूड लॉजिक आहे. शंभर लोक वेगवेगळ्या बाजूनी हीरो वर गोळीबार करतात, ते ही कसलेले मिलीटरी, कमांडोज, पोलिस ई. पण त्यांचे नेम अगाध असतात. मात्र हीरो ची प्रत्येक गोळी कोणालातरी उडवूनच जाते.
ती हीरॉइन नेम धरून एकाला शेवटी उडवते तो सीन चांगला जमला आहे.>>>>>>>>> +++१११११११

च्र्प्स, हो ४०४ चा ट्विस्ट जरा वेगळा होता.

काही पाहिलेल्या जुन्यापैकी:
‘क्रेझी रीच एशियन्स‘ मजा आली पहाताना. आता ‘ग्रीक फॅट वेडिन्ग‘ पण पहायचा राहिलाय (बहुतेक) तो पाहुन घेणार.

‘ट्रेमर्स’ चे सगळेच्या सगळे भाग आवडले. हॉरर कॉमेडी मजा आली बघताना.

‘डिसेन्ट’ चे सगळे भाग आवडले. हॉरर आहेत.

अर्थात हे सगळे आत्ता नाही पाहिले. गेल्या ६-७ महिन्यात पाहिले नाहीतर म्हणाल किती सिनेमे पहाते Happy

उत्तरेकडचा महाजन असावा. बहुधा काश्मिरी. आणि ओवी महाजन व ओवी महाजन सिनीयर अशी प्रचलित नावे भारतात बघितली नाहीत. बहुधा मूळ इंग्रजी कॅरेक्टर्स वरून नावे तशीच ट्रानस्प्लॅण्ट केली आहेत.
>>>
असू शकेल. पण लुक्स वरून सुद्धा जस्टीफाय होत नाही Proud
आणि हे सिनियर ज्युनियर तर अगदी शॉकिंग होतं.
Another Durwa Ranade style shock.

Pages