चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राईमवर बोनस बघितला. गश्मिर महाजनी, मोहन आगाशे, पुजा सावंत आहेत यात. गश्मिर इज आय कँडी Happy एकदम भारी दिसलाय. मराठीत तसे हिरो कमी आहेत गुड फिजिक असलेले . काम पण चांगले केले आहे. त्याची आणि पूजाची जोडी चांगली दिसते. गश्मिर श्रीमंत घरातला मुलगा असतो. आजोबा मोहन आगाशेंबरोबर पैज लावतो की १ महिना कमी पैशात जगून दाखवेल. त्यासाठी तो काय काय करतो कुठे राहतो याची कथा आहे. फार पिसं नाही काढली तर हलकाफुलका चांगला आहे मुव्ही.

२ छान चित्रपट पाहिले.
१. नेट्फिक्सवर ‘द मिरॅकल ईन सेल नं. ७‘ हा टर्कीश सिनेमा. प हा च इतकेच सांगेन. हिरोचे काम अप्रतिम आहे. छोटी मुलगीही अगदी गोड. सबटायटल्स पहातापहाता सहज पाहुन होतो. शांतपणे रात्री पहा. गडबडीत पाहु नका.

२. युट्युबवर ‘ये साली आशिकी‘. अमरीश पुरींचा नातु आहे. प्रेमकथा आहे/नाही. नक्की पहा. मस्त जमलाय. नवकलाकारांनी कामं छान केलीत.

"मस्का" हा मी पंधरा वीस मिन्टात सोडलेला सिनेमा आहे. मला काय झेपला नाही ब्वा. मग नंतर स्पॉयलर या मुलाचा मेलेला बाप त्याच्याशी बोलतो वगैरे हे मैत्रिणीकडून ऐकलं तर नकोच म्हटलं. शिवाय त्या मुलाचं ते लिव्हिन आणि ती त्यात ऑलरेडी एका लग्नाचा अनुभव घेतलेली आणि नीट प्रेमातही नसलेली. मनीषा काकू पण टिपीकल मॉमी.

ये साली आशिकी - जबरदस्त चित्रपट आहे...
ब्लॉकबस्टर होऊ शकला असता पण आपल्या इथे स्टार चे चित्रपट चालतात फक्त...

हॉटस्टार वर 'किसबाह' (Quissbah) नावाचा सिनेमा पाहिला. तसं तर तो कोणत्याच अँगल ने सिनेमा वाटत नाही. एकदम बकवास.

किसबाह ही एक जागा असते जिथे येण्यासाठी खास लोकांना आमंत्रण येतं. जगात सर्वत्र अश्या जागा आहेत (म्हणे). तिथे गेल्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगितली जाते आणि मग तुम्हाला निर्वाण / मोक्ष मिळतो.

शिणूमात हिरोच्या वडिलांना असा लिफाफा आलेला असतो आणि ते गायब झालेले असतात. त्याला त्या कन्सेप्ट वर लिहायचे असते. त्याविषयी तो त्याच्या घरात थारा दिलेल्या एका गे मित्राशी बोलत असतो.

एकीकडे त्याच्यावर सायकीक ट्रीटमेंट चालू असते. कारण त्याला सतत स्वप्न पडत असतं की त्याची बायको इतर कोणाबरोबर तरी सेक्स करतेय. (तिने लग्नाआधीच्या तिच्या अफेअर विषयी सांगितलेलं असतं त्याला. तर कुठेतरी अंतर्मनात ती भीती असावी बहुतेक).

बायको प्रेग्नंट असते आणि याच्या मते तो बाप बनायला मनाने तयार नसतो (ही प्रेग्नन्सी राहण्यासाठी तो बायकोबरोबर करतो तो आजतागायत मी पाहिलेला सगळ्यात विनोदी बेडसीन आहे. किमान पिसं काढायला तरी बघावाच). त्यामुळे तो तिच्याशी नीट वागत नसतो. तिची काळजी घेत नसतो.

शेवटी तो त्याच्या आईला भेटायला जातो. एकदम मॉड व फॉरेन रिटर्न आई दाखवली आहे जिने नवऱ्याचं गायब होणं अगदी कॅज्युअली स्वीकारलं आहे. ती त्याला बायकोची काळजी घे सांगते आणि तो लिफाफा त्याला दाखवते. तिच्यामते तो कोरा असतो. हा तो लिफाफा बघतो आणि एकदम कट टू त्या किसबाह जागेत डोक्यावर वाईट जखम घेऊन पडलेला दिसतो. तिथे असलेला माणूस त्याचं नाव आणि त्याला जी गोष्ट ऐकवायची आहे तिच्या लेखकाचं नाव अश्या दोन चिठ्ठ्या एका रक्तसदृश काहीतरी असलेल्या बरणीत ठेऊन बरणीचं झाकण लावतो आणि सिनेमा संपतो.

इतका विचित्र सिनेमा मी आजतागायत पाहिला नव्हता. Sad

Hotstar वर free solo ही bio-documentary पाहिली. भयंकर आवडली आहे. बिना दोराचे प्रस्तरारोहण करणाऱ्या अलेक्स ची कथा आहे. काहीतरी रिअल life वेगळं म्हणून नक्की बघण्यासारखी आहे. पूर्ण सिनेमा बघताना माझ्या न कळत माझा श्वास रोखला जात होता. चित्रिकरण मस्त केलंय. बऱ्यापैकी भाग त्याने केलेल्या योसेमिटी मधल्या El-cap summit चढाई चा आहे. भयंकर सुंदर प्रकरण आहे. Tom Cruise ची mission impossible मध्ये फ्री solo करताना entry आहे त्यापेक्षा हे कितीतरी सुंदर आहे.

Is it ethical to film someone when he is risking his life...

डोकमेंटरी बनवताना... हा व्हिडिओ पाहताना, निर्मातीला पडलेला हा प्रश्न ऐकून स्वतःला हा प्रश्न विचारणारे लोक आहेत याचे आश्चर्य वाटले. इथे रस्त्यावर लोक मरत असताना त्यांना मदत करायची सोडून विडिओ चित्रित करणारे लोक आहेत.

अजून एक documentary दोन-तीन दिवसांपूर्वी पहिली होती. बहुतेक पेरू मधल्या मायन संस्कृतीवर. आता नाव आठवत नाही आणि कोणत्याच app वर सापडत नाहीये Sad मायन लोकांचं पवित्र तळे आणि त्यांचा रक्षणकर्ता पर्वत, त्याच एक्सप्लॉरेशन करणारा. त्याच्या टीम मधील सहकारी तळे एक्सप्लोर करताना खाली गेला तो वरच आला नाही, त्याचा मृतदेह पण मिळाला नाही. एकदम scary!
तळं, पर्वत, निसर्गाची पूजा, हे जे काय दाखवत होते ते इतकं आपल्या पुरातन संस्कृतीच्या जवळ जाणारं होतं की बघताना एकदम deja vu feeling येत होतं. कित्येक वर्षांपूर्वी सगळीकडेच जगभर आपल्या संस्कृती सारखी संस्कृती अस्तित्वात होती हे बघायला एकदम mesmerising वाटलं होतं.
इजिप्त ची documentary बघितली तेव्हा पण हेच जाणवलं होतं त्यांची सूर्याची पूजा, त्यांची सगळ्यांच्या जेवणाखानाची- अन्न धान्याची काळजी घेणारी Idol. किती साम्यस्थळे!

जे मिळतेय त्याबद्दल कृतज्ञता हा कित्येक वर्षांपूर्वीच्या माणसाचा स्वभाव असावा. रात्री अंधारात माणसाला दिसत नाही, प्राण्यांना दिसते. सूर्य हा आपला तारणहार हे आपोआप लक्षात आले असावे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची माणसे जे आयुष्य जगत होती त्यात साम्यस्थळे खूप असावीत.

आता कृतज्ञता वगैरे सगळे खड्ड्यात. ओरबाडणे हाच एक नियम. फटका बसतोय.

७, रोशन व्हिला पाहिला. सगळ्यांचे अभिनय छान. पण अगदी प्रेडिक्टेबल आहे.+111
पण मला तेजस्विनी प्रचंड आवडली. तिला नेत असताना शेवटी ती 'पप्पा फॅक्टरीत जाते' म्हणते ते ईतके रियल वाटलं, आणि नंतर शेवटी परत तोच डायलॉग ती उच्चारते जामच आवडलं.

हरामखोर बघितला आणि अजिबात नाही आवडला. नवाज वर कोणी शाळेत जाणारी, बरी दिसणारी पोरगी प्रेम करू शकते (फक्त वासना असेल तरीही), तेही त्याचं लग्न झालेलं असताना हे पटतच नाही. नवाज विकृत दाखवलाय पण लहान गावात असं घडू शकतं. मुलंही काही कमी नसतात. तो शक्तिमान का कोण, त्याचं प्रयोजनच कळलं नाही. बघून उदास वाटतं. असे मारणारे शिक्षक असतीलही.

पण मला तेजस्विनी प्रचंड आवडली. तिला नेत असताना शेवटी ती 'पप्पा फॅक्टरीत जाते' म्हणते ते ईतके रियल वाटलं, आणि नंतर शेवटी परत तोच डायलॉग ती उच्चारते जामच आवडलं.>>>>>>
येस! मला एवढी नाही आवडत तेजस्विनी पण ह्या सिनेमात आवड्ली.

मस्का मलापण कंटाळवाणा वाटला. मनिषा कोईरालाने फारच कंटाळा आणला. खुपच खोटी पारसी दिसते,बोलते. दिग्दर्शन इतकं रटाळ... विषय नवा नव्हता पण असा आहे की त्यावर चांगली वाहती कथा गुंफली तर तरीही छान सिनेमा बनु शकतो. भावनांचे बदल कसे हलकेच बदलवलेले दाखवायला हवेत. म्हणजे एक सीनमधे कोणतरी कामकरी उगाच भावुक होऊन काही बोलतो... १०% भावना बदल. मग २ मिनिटानी मम्मी काहीतरी भावुक बोलते... अजुन १०% भावना बदल... असे सीन वर सीन व शेवटी... १००% भावना बदल.
भावना ३०% बदलल्यावर मग पळवत, थांबवत पाहिला.

खुप दिवसांपासुन मर्दानी२ पहायचा होता तो एकदाचा पाहिला. बराच बरा आहे. फारच उत्तम असेल वाटले होते, तितका वाटला नाही. राणी मुखर्जीने, शेवटी ती हाणते... ते काम चांगले केले आहे. बाकी ठिकाणी बरेच चांगले, ठीकठाक वगैरे... म्हणजे मुलाखत देताना अक्षरशः रट्टा मारल्यासारखे बोलणे वगैरे. पण एकुण प्रौढ वयात ती आल्याने बालीश वाटत नाही रोलमधे. वेग आहे सिनेमाला. व्हिलन बराच बरा आहे. क्राईम पट्रोल मधे छोटेमोठे काम करणारा मुलगा आहे. डायरेक्ट मुख्य व्हिलनचा रोल ही चांगली प्रगती आहे.

अजुनही कायकाय पाहिले पण काय पाहिले त्याची नावे आठवत नाहीत म्हणजे चांगले नसावेत. Happy

Lol सुनिधी

हाॅटस्टारवर “इरादे“ नावाचा जरा हटके (आणि जड) सिनेमा पाहिला. बरेच दिवसांनी अर्शद वारसीचा सिनेमा पाहिला. तो सिरियस भूमिका थोड्या लाइट ॲंगल ने करतो किंवा त्या भूमिका तशा लिहिल्या जातात असंही असेल. आम्हाला आवडला.
लुधियानाचा कॅंसर बेल्ट आणि एका केमिकल कंपनीचा मालक, त्याच्याविरोधाची सगळी कथा विषण्ण करते. सध्याच्या वातावरणात नको वाटत असेल तर पाहू नका. नसिरूद्दीन आणि इतर कलाकारांची कामं पण चांगली आहेत. शेवटाला एक बाॅलिवुडी धक्का पण आहे.

अर्शदचा विषय आला आहे म्हणून त्याचा एक जुना सिनेमा पण सुचवते. तो जाॅन अब्राहमसाठी पण पाहता येईल Wink “काबुल” गाणी आणि सिनेमा दोन्ही छान आहेत. पाहिला नसेल तर कुठेतरी मिळवा. आम्ही कोणे एकेकाळी डिवीडी इं. ग्राे. मधून रेंटवर आणून जर्सीतल्या एका मित्र कंपनीकडे पाहिला होता. गुडोल्ड डेज Happy

चोरिचा मामला पाहिला ! परत एकदा ट्रेलर सुपरहिट पण मुव्ही ओके ओके असा अनुभव आला(,गुड न्युज, ड्रिम गर्ल च्या वेळेस पण सेम वाटलेल) आजकाल ट्रेलरच इतका भारी बनवतात सगळे मेन पचेस तिथेच वापरुन टाकतात वाटत.
तरी प्रियदर्शनने मेहनत घेतलिये, लिहलाहि चान्गला आहे कामही ओके आहेत सगल्याची पन कॉमेडी अजुन हवी होती , क्षिति जोग, जितु जोशी ,हेमन्त तर मुरलेले आहेत पण तो अनिकेत विश्वासराव नाही आवडला, तो पोस्टर गर्ल मधे आवदला होता, अम्रुता तिच्या भुमिकेत व्यवस्थित वावरलिये.

क्राईम पट्रोल मधे छोटेमोठे काम करणारा मुलगा आहे.>>
महाराणा प्रताप मध्ये अकबर चा आणि संकटमोचन हनुमान मध्ये बाली चा रोल केलेला त्याने. पेशवा बाजीराव मध्ये पण होता तो.

इरादे तू नळी वर पहिला.फोटो आणि नाव अंदाधुंद होते,म्हणून पाहायला सुरवात केली,पण एकदम वेगळाच सिनेमा सुरू झाला.पण नन्तर शेवटपर्यंत पहिला.आवडला.

समई Proud तूनळी अशी बऱ्याच वेळा फसवते म्हणून मी आधी कंमेन्ट वाचते. तुम्हाला फसवले गेल्याचा राग न येता तुम्ही जो सिनेमा दाखवला तो गोड मानून बघितला आणि तुम्हाला तो आवडला हे भारी आहे.

बाला बघितला आणि फार आवडला. केसांवर केलेले प्रयोग, बालाचा भाऊ, आजोबा, वडील सगळे मस्त. लतिकाची काकू(?) फारच रोकठोक आणि प्रॅक्टिकल आणि गोड. ते टिकटॉक बनवतात, बालाला ती सहज पटते वगैरे थोडं अविश्वसनीय वाटत होतं पण नंतर ती सोडून गेल्यावर जे स्पष्टीकरण देते ते फारच आवडले. मनाचा मोठेपणा वगैरे दाखवून परत आली असती तर खोटं वाटलं असतं. सीतामैय्यां मेरी अग्निपरीक्षा मत लेना हा संवाद किती चपखल आहे. लतिकाला तो मुलगा फसवेल व ती बालाशी लग्न करेल असं वाटत होतं पण तसंही झालं नाही. झालं असतं तर शेवटी लूक्स महत्वाचे असतात हा संदेश गेला असता जो अगदीच टाळलाय. त्याचे वडील त्याच्या डोक्याला शेण थापत असतात तेव्हा तर खूप हसले. आयुष्मान परत एकदा खूप खूप आवडला.

Pages