Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस्तू मला पण खूप आवडला. धरलं
अस्तू मला पण खूप आवडला. धरलं तर चावतं अन...अशी मनस्थिती असते इराची!
त्यात ती इला भाटेला भेटते, दोघींतले संभाषण डोळे पाणावून गेले.
तो नचिकेत पूर्णपात्रे, बिग
तो नचिकेत पूर्णपात्रे, बिग बॉस वाल्या नेहा शितोळे चा नवरा आहे.
बाकी मायबोलीचे मास्तर उर्फ
बाकी मायबोलीचे मास्तर उर्फ चिनूक्स उर्फ चिन्मय दामले यांचीही ह्या चित्रपटात भूमिका आहे >> कुठल्या भूमिकेत आहे ते पण सांगा
@Maitriyee
@Maitriyee
असं काही नाही की ५ व्या महिन्यापासून बाळाची हालचाल जाणवते. मला माझ्या पहिल्या गरोदरपणात ८ वा महिना लागला होता तरी बाळाची काहीच हालचाल जाणवत नव्हती. पाचव्या महिन्यापासून दर चार दिवसांनी जाऊन डॉक्टरला विचारत असे.
प्लॅसेंटा कुठे आहे त्यावर
प्लॅसेंटा कुठे आहे त्यावर असते. बेबी move करत असतो पण कळत नसते.
गुड न्यूज मध्ये दिलजीत ने
गुड न्यूज मध्ये दिलजीत ने सर्वात छान अभिनय केला आहे...
नवा, ‘इन्विजिबल मॅन’ आवडला.
नवा, ‘इन्विजिबल मॅन’ आवडला.
अस्तू मला पण खूप आवडला. धरलं
अस्तू मला पण खूप आवडला. धरलं तर चावतं अन...अशी मनस्थिती असते इराची!>>+१
अमेझॉन प्राईमवर Love you जिंदगी पाहिला. मुळात पहिल्या भेटीपासून प्रिया सचिनच्या गळ्यात का पडते कळले नाही. सचिनचा कॉमेडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून जाम कंटाळा आला. त्यावर उतारा म्हणून ते आठ दिवस पाहिला. पण तोही बोर होता. एक वर्षाची मुलगी, घर सोडून रेणूका कामानिमीत्त परदेशी जाते. मग डायरेक्ट तिच्या लग्नासाठीच येते. त्यात ती मराठी कसे बोलतात तेही अधूनमधून विसरत असते
सांड की आंख बघितला. सत्यकथा
सांड की आंख बघितला. सत्यकथा आहे हे बघून अंगावर काटा आला. कसं काय त्या बायकांनी त्या काळी इतकी हिम्मत दाखवली असेल हे बघून कमालीचा आदर वाटला.
बाकी तापसी आणि भूमीचा मेकप अजिबात आवडला नाही. भूमीला तर चेहऱ्याला वरून बारीक वाळू चिकटवली आहे असं काहीतरी वाटत होतं. त्यापेक्षा खरेच सिनियर अभिनेत्री घ्यायला काय हरकत होती?
अजून एक म्हणजे इतक्या पहिल्या झटक्यात चौघी चौघींनी मेडल जिंकत सुटणे खरेच घडले होते की केवळ सिनेमॅटिक लिबर्टी ही शंका चाटून गेली.
नवाजुद्दीन सिद्दीकी चा
नवाजुद्दीन सिद्दीकी चा 'हरामखोर' बघितला. खूप त्रास झाला बघताना. विशेषतः लहान मुलांशी संबंधित असल्याने अजूनच. शेवटचं गाणं ऐकून फार रडायला येतं. देव करो आणि यातलं काहीही कोणाच्याही बाबतीत घडू नये. असे शिक्षक जगात कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत.
चोरीचा मामला आलाय प्राईमवर.
चोरीचा मामला आलाय प्राईमवर. मराठी चित्रपट एक दिवस तरी असतात का थिएटरला
मसान पाहिला.
मसान पाहिला.
मला अजून आश्चर्य (आणि खंत) वाटतंय की मी हा सिनेमा इतक्या उशिरा का पाहिला.
सुंदर !!!
ता.क. मसानविषयीची जुनी परीक्षणे वगैरे वाचली. मला छोटू या व्यक्तिरेखेच्या उल्लेखशिवाय ती अपूर्ण वाटली इतका त्याचाही अभिनय सहजसोपा झाला आहे.
"ह्यांचा काही नेम नाही"चा
"ह्यांचा काही नेम नाही"चा संवादलेखक असलेल्या प्रियदर्शन जाधवचा सिनेमा म्हणजे "चोरीचा मामला". कथावस्तू जवळपास सारखीच फिरणारी.. स्नायपर हा फॅक्टर वगळला तर जवळपास तोच एका रात्रीचा गोंधळ आहे सिनेमात.. निखळ मनोरंजन!
ह्यांचा काही नेम नाही कुठे
ह्यांचा काही नेम नाही कुठे बघायला मिळेल... इंटरनेट वर मिळत नाहीय....
ह्यांचा काही नेम नाही कुठे
ह्यांचा काही नेम नाही कुठे बघायला मिळेल... इंटरनेट वर मिळत नाहीय....>>>
घ्या.....
https://einthusan.tv/movie/watch/5250/?lang=marathi#
Invisible man कसा आहे
Invisible man कसा आहे
चोरीचा मामला आलाय प्राईमवर.
चोरीचा मामला आलाय प्राईमवर. मराठी चित्रपट एक दिवस तरी असतात का थिएटरला-> हो ना. कथावस्तू जुनेच आहे पण मस्त आहे.
इथे कुणी मनफकिरा बघितला का?
इथे कुणी मनफकिरा बघितला का?
चोरीचा मामला प्रचंड कंटाळवाणा
चोरीचा मामला प्रचंड कंटाळवाणा आहे. एक दोन ठिकाणी हसायला येतं पण त्यासाठी पूर्ण चित्रपट बघणे हे स्वतःला शिक्षा करून घेण्यासारखे आहे. अनिकेत छान दिसतो मिशीत आणि स्वतःला फिट ठेवलं आहे त्याने. हेमंत पण छान दिसतो. जितेंद्र जोशी कायच्या काय जाडा झालाय. खानविलकर बाई चिपाड दिसतात. मॅड कॉमेडी न होता अतिशय मंदपणे भरकटलेला झाला आहे चित्रपट.
कामयाब. संजय मिश्रा.. निव्वळ,
कामयाब. संजय मिश्रा.. निव्वळ, अशक्य, अफाट, महान, वगैरे वगैरे, इत्यादी इत्यादी
मसान मलाही पाहायचा होता पण
मसान मलाही पाहायचा होता पण राहून गेलेला. इथले वाचून पर्वा जिओवर पाहिला. सुन्न झाले पाहून. शोकात्मक तरीही आशावादी... परवाच आमच्या इथे एका विशीही न गाठलेल्या तरुणाने प्रेमात अपयश आले म्हणून आत्महत्या केली. ती बातमी डोक्यात होती आणि हा चित्रपट पाहिला. आयुष्यच मसान झाले अश्या मानसिक स्थितीतही परत उभे राहायची ताकद दाखवणारी यांच्यातली पात्रे खूप आवडली. विकी कौशलने तुफान अभिनय केलाय. रिचा चद्धाही खूप भारी.
कानाला खडा
कानाला खडा
माती खाल्ली
चूक झाली
तोंडावर पडले
दात पडले
अश्लील उद्योग मित्र मंडळ बघायला स्कार्फ ने चेहरा झाकून(नवऱ्या बरोबर) गेले.
बुकमायशो चे दात पाडायला हवेत.त्यांनी फिलिंग फास्ट दाखवून मला फसवलं.इथे फक्त लाऊंज चेअर चा 1 रो आणि खाली 4 बायका इतकंच पब्लिक आहे.त्यातले बरेच पिक्चर मध्ये काहीतरी बघायला मिळेल या हेतूने आलंय.पिक्चर मध्ये 'ते' तर नाहीच(युए आहे ना रेटिंग.13 वर्षावर पॅरेंटल गायडन्स.) पण स्टोरी पण नाहीच.त्यात तो आंघोळ न केल्यासारखा चरसी दिसणारा हिरो.त्यात डॉक्युमेंटरी सारखे संवाद.त्यात बालक पालक चं थोडं ऍडल्ट व्हर्जन रिसायकल.ती पर्ण आणि साडीवाली सई ताम्हणकर जरा चांगली दिसतेय आणि एक कोल्हापूर डायलेक्ट वाला माणूस चांगला अभिनय करतोय इतकंच.
पिक्चर लोकांना आवडेलही.त्याबद्दल काही म्हणणं नाही.पण बुकमायशो ने 90% रिकाम्या शो ला फिलिंग फास्ट का म्हटलं हे कोडं आहे.नवरा थप्पड पाहू म्हणत होता त्याला 'हा काय 3 तासाच्या पिक्चर चा विषय आहे का' म्हणून दडपलं.
अशी हतबुद्धता तिकीट काढून मिस्टर या मिस पाहिल्यानंतर पहिल्यांदा येते आहे.
फीलिंग फास्ट मध्ये मागच्या एक
फीलिंग फास्ट मध्ये मागच्या एक दोन तासाचा फीलिंग रेट बघत असतील
मन फकिरा आवडला.
मन फकिरा आवडला.
सर्वांचा उत्तम अभिनय आणि चित्रपट लिहिलाय छान.
अंजली पाटील बेष्ट आहे.
फिलिंग फास्ट
फिलिंग फास्ट
:खिक:
दाढीवाला चरसी आलोक राजवाडे का. त्यांच्या टीमचा फोटो आलाय लोकसत्तेत पण वाचलं नाही मी काही. उन्हाळ्याच्या सुट्टीतला उद्योग म्हणून काढला असेल त्यांनी चित्रपट
हाहा अश्लील उद्योग चा
हाहा अश्लील उद्योग चा रिव्ह्यू वाचून हसूच आलं. Woke आहे ती सगळी टीम. शाहीन बागेत प्रोटेस्ट करण्याच्या घाईत चित्रपटाचा दर्जा वगैरे क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष झालं असेल.
मन फकिरा चा ट्रेलर आवडलाय. प्राईमवर लवकर आला तर बघेन. तान्हाजी पण आलाय हॉट स्टार वर.
दर्जा बिर्जा पण जाऊदे.एकसंध
दर्जा बिर्जा पण जाऊदे.एकसंध स्टोरी हवी की नको?अनेक विषय हात घातल्या सारखे दाखवून वाऱ्यावर सोडून दिलेत.
पिक्चर जिथून ज्या हेतूने चालू होतो त्यात एक वेगळीच लाईन येते.हिरो कायम स्टोनड असल्या सारखा दिसतो(हा त्या गुणी सतीश राजवाडे चा नातेवाईक आहे का?)अमेय वाघ चांगलं काम करतो त्याला एका चिंधी रोल मध्ये वाया घालवलाय.सई च्या वाट्याला जे सूक्ष्म काम आलं ते तिने चांगलं केलं.पर्ण पेठे गोड आहे.तिला मिळेल ते काम चांगलं करते. मध्ये मध्ये पद्मिनी कोल्हापूरे सारखी दिसते.
तो दाढी वाढलेला अंघोळ न केल्यासारखा मुलगा पण चांगला ऍक्टर असेलही.कथा भंगार असल्याने त्याचा नाईलाज झाला असेल.
(कोण्या तरी माणसाला बसल्या बसल्या त्या कार्टून पात्राचं नाव वापरून गर्दी खेचता येईल असं वाटल्याने टॅक्स बेनिफिट घ्यायला काहीतरी चिंध्या एकमेकांना जोडून त्यात ते पात्र 15 मिनिट टाकून बनवलेला पिक्चर वाटला.कदाचित ही एखादी 20 मिनिटांची शॉर्ट फिल्म बनू शकली असती.)
मसान पाहिला.
मसान पाहिला.
संजय मिश्राची मुलगी त्या मुलाच्या घरी जाते तेव्हा कॅमेरा घराच्या बाहेरच ठेऊन आतले संवाद ऐकवले आहेत. दोनवेळा पाहूनही एक शब्दही कळला नाही ...
तरीही फारसे अडले नाहे.
सर्वांचा उत्तम अभिनय , आणि गंगेच्या पार्श्वभूमीचा अतिशय परिणामकारक वापर !
हिरो कायम स्टोनड असल्या सारखा
हिरो कायम स्टोनड असल्या सारखा दिसतो >>>>>> आलोक राजवाडे ' कासव' आणि 'रमा माधव' मध्ये होता. पर्ण पेठेशी लग्न केलय त्याने.
थप्पड पाहू म्हणत होता त्याला 'हा काय 3 तासाच्या पिक्चर चा विषय आहे का' म्हणून दडपलं. >>>>>>>> सॉरी अनू, पण हे पटल नाही. ह्या चित्रपटाची स्टोरी वाचली असती तर तुम्ही अस म्हणाला नसता.
बादवे, कोणी ' थप्पड' पाहिला आहे का? कसा आहे?
थप्पड पाहू म्हणत होता त्याला
थप्पड पाहू म्हणत होता त्याला 'हा काय 3 तासाच्या पिक्चर चा विषय आहे का' म्हणून दडपलं.
if a woman thinks like this then no comments...
>>> seriously
Pages