महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अन तू इथे हिंदुत्वाची भांग खाऊन सभ्य लोकांबद्दल ओकार्‍या काढतो आहेस. त्याच्यात दम तरी आहे ओपनली पंगा घ्यायचा. तुझं काय?

सत्तेची लाचारी सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल, तर ती काय कामाची? हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचं दैवत, आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, पण सावरकरांवर बोलू द्यायलाच हवं, राहुल गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील - देवेंद्र फडणवीस

घ्या. यांनी हिंदू हृदयसम्राट आणि महाराष्ट्राचं दैवत हे दोन्ही बदलले.

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवणार्‍या महाराजांना मूर्ख ठरवणारा माणूस आता महाराजांऐवजी यांचं दैवत.

शिवसेना भाजपा बरोबर २०१४-२०१९ मध्ये सत्त्येत राहुन विरोधी पक्षा ऐवजी स्वःताच्या राज्य सरकार व केंद्र सरकार विरुद्ध दुगाण्या झाडत होते.
आता त्याच विरोधी पक्षाबरोबर घरोबा केल्यावर वाघाचा ऊंदीर मामा झालाय.
शिवसेना ज्या मुद्यावर झगडत होती त्यावरच कच खाउ लागलेली आहे .

शिवसेना ज्या मुद्यावर झगडत होती त्यावरच कच खाउ लागलेली आहे .

नवीन Submitted by युनिस on 16 December, 2019 - 14:34 >>

सम्भाळुन ! कॉन्गी बुणगे तुमच्यावर तुटुन पडतील !

यांनी हिंदू हृदयसम्राट आणि महाराष्ट्राचं दैवत हे दोन्ही बदलले. >>

बाळासाहेबांची स्वतःला दिलेली हिन्दुहृदयसम्राट ही पदवी शिवसेनाच काही दिवसांनी सोडुन देईल.
आणि महाराष्ट्राची अनेक दैवते असु शकत नाहीत असे समजायला अब्राहमीक एकेश्वरवादी झालात की काय ?

राहुल गांधींना बरळायची सवय आहे.. त्यांचे बालीश चाळे नित्याचेच आहेत. त्यांचे एकवेळ समजू शकतो कारण गटाराचे झाकण उङ्घडले की घाणच येणार हा नियम आहे. पण ज्यांना स्वातंत्र्य संघर्षाचा ईतीहास माहित आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला त्यांनी देखिल या बाजार बुणग्यांच्या नादी लागून सावरकरांबद्द्ल प्रश्ण ऊपस्थित करावेत हे त्याहीपेक्षा जास्त वेदनादायक आहे. त्यातले काही तर ईथेच आहेत.. हे असले गटाराच्या घाणीवर वळवळणारे कीडे कसल्याच व कुणाच्याही ऊपयोगाचे नाहीत. जिकडे जिकडे अशी गटारे वाहतात तिकडे हे किडे आढळून येतात. यावर ऊपाय एकच असतो: यांच्यावर अनुल्लेखाची धार सोडा. आपले आप मरतील.
हे राहुल बाबा महाराष्ट्रात आले असते तर बाळासाहेबांच्या शिवसैनीकांनी त्ञांना अक्षर्शः जोड्यांनी मारले असते. ज्या बाळासाहेबांनी, मणीशंकर अय्यर ला सावरकरांविरुध्द अपशब्द वापरले म्हणून महाराष्ट्रात पाऊल टाकाल तर याद राखा असे खडसावून सांगितले होते. ही तीच शिवसेना आहे का? का सत्तेसाठी लाचार शेळीसेना झाली आहे... कीव येते. थोडा जरी राष्ट्राभिमान व परंपरेची चाड असेल तर शिवसेनेने ने सरकार मधून बाहेर पडावे. किंवा हिंमत असेल तर राहुल गांधींवर खटला दाखल करावा.
या सर्वावर गेल्याच महिन्यात जन्माला आलेले चाणक्य आणि त्यांची शेंडी सांभाळणारे ईथले न्हावी कसे चिडीचूप आहेत बघा. हे यांचे खरे रूप आहे.
तेव्हा किमान ईथल्या या कीड्यांचा व तळीरामांचा संपूर्ण अनुल्लेख करा अशी सर्व सुजाण वाचकांना नम्र विनंती.

सावरकरांनी ब्रिटिशांची अनेकवार माफी मागितली एवढंच तर सांगितलं , त्यावर इतका थयथयाट?
खोटं आहे का ते?

योग,

राणेंच्या मुलांनी देखील सावरकरांबद्दल अपशब्द वापरले होते. फसवणीसनी त्यांना सन्मानाने पक्षात घेतले, तिकीट पण दिले. मग फसवणीसना गटार,कीडा वगैरे म्हटलं का भाजप समर्थकांनी? ही वरच्या पोस्टमधील भाषा योग्य नाही.

राहुल गांधींचे मध्येच सावरकर वगैरे ट्रॅकवर निघून जाणे भाजपच्या पथ्यावर पडते. ते नक्की कोणासाठी काम करतात प्रश्नच पडतो.

ओरिजिनल काँग्रेसी लोक हे सावरकर विरोधी नाहीत. इंदिरा गांधींनी सावरकरांच्या स्मृती जपण्यासाठी बरंच काय काय केलं. पवारांचं सावरकरांवरचं ओघवतं भाषण युट्युबवर आहे. महाराष्ट्रात पाठयपुस्तकांत सावरकरांची माहिती, त्यांचं लेखन काँग्रेसनेच समाविष्ट केलं. सावरकर या व्यक्तीबद्दल एक बेसलाईन आदर असायला त्यांचा प्रत्येक विचार पटलाच पाहिजे ही गरज नाही. (मलाही पटत नाहीत सर्व विचार पण योगदानाबद्दल आदर नक्कीच आहे.)

बाकी स्वतःला काँग्रेसचे स्पोक्सपर्सन समजणाऱ्या आणि दिवसभर काय करायचं प्रश्न असल्यानुसार रोज प्रत्येकच खुसपट काढून इथे वाद घालणाऱ्या ट्रोलकडे दुर्लक्ष करायला हवं हे मान्य.

>>ही वरच्या पोस्टमधील भाषा योग्य नाही.
ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत समजावावं लागतं. किंबहुना तसे न समजावल्यानेच हे ऊपट्सुंभ माज्ले आहेत... CAB च्या विरोधात पेटवून आणली जाणारी निदर्शने व दंगे हा याचाच परिणाम आहे. हे लातों के भूत आहेत...! यांच्यापुढे शब्दांचा काहिही ऊपयोग नाही.
तेव्हा पोस्ट मधिल भाषा जरा सौम्यच झाली.. वॅप वर फिरणारे संदेश पोस्ट केले तर बहुदा जगबुडीच होईल मग! Proud
तेव्हा तुम्हाला ज्या भाषेत व्यक्त व्हायचे ते व्हा, पण मी कुठली भाषा वापरावी ते कृपया मला ठरवू देत.

>>>>>>स्वतःला काँग्रेसचे स्पोक्सपर्सन समजणाऱ्या आणि दिवसभर काय करायचं प्रश्न असल्यानुसार रोज प्रत्येकच खुसपट काढून इथे वाद घालणाऱ्या ट्रोल.......<<<<<<<

Biggrin

>>>>>>>>>ईथल्या या कीड्यांचा व तळीरामांचा संपूर्ण अनुल्लेख करा अशी सर्व सुजाण वाचकांना नम्र विनंती. <<<<<<<<
१०००० % मान्य

>>हो, आम्हाला सावरकरांची थोरवी काँग्रेसने छापलेल्या शालेय पुस्तकातून समजली
आमच्याकडे एक म्हण आहे: Even a BlackDog doesn't give xxxx about BlackCat. Proud
[यात कुणाचेही नाव साधर्म्य आढळल्यास निव्वळ coincidence बरं का!]

खरं तर अभूतपूर्व वळण तेव्हा येईल जेव्हा महाविकास चे चाणक्य या मर्कट्लीला करणार्‍याला 'हुड्ड' करतील आणि त्यायोगे पक्ष राजकारणापेक्षा राज्य व राष्ट्राची अस्मिता जपत लोकांचीही मने जिंकतील. पण सध्ध्या तरी महाराष्ट्रात पक्षाचे पोट चालते आहे म्हटल्यावर जीभ जड झाली आहे.

>>> घ्या. यांनी हिंदू हृदयसम्राट आणि महाराष्ट्राचं दैवत हे दोन्ही बदलले. >>>

गांधी आडनाव असलेले कोणीही ज्यांचे हृदयसम्राट व दैवत आहेत, ते कधीही आपले हृदयसम्राट व दैवत बदलत नाहीत.

पोलिसांचे पगार आता एसबिआय ह्या सरकारी बँकेत येणार. मविआ सरकारचा नवा निर्णय..शेतकर्यांना सरसकट २ लाखापर्यतची कर्जमाफी तीही विनाअट.NRC राज्यात लागु होणार नाही. जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्र लढणार. सुखद निर्णयांची बरसात. सरकारचे अभिनंदन.

पण पोलिसांचे पगार ऍक्सिस बँकेत नेण्याचा निर्णय यु पी एच्या काळातच (२००५) झाला होता (श्री फडणवीसांच्या बायकोचा काहीही संबंध नसताना)
a senior official of Mumbai Police said that Axis Bank was handling these accounts since 2005, much before Fadnavis became chief minister.
https://www.business-standard.com/article/pti-stories/police-salary-acco...

अर्थात आता सर्वच सौदे पुनरीक्षणासाठी परत तपासले जात आहेत. अर्थपूर्ण वाटाघाटींनंतर हा निर्णय परत ऍक्सिस बँकेला अनुग्रहित केला जाईल अशी शक्यता आहेच.

पोलिसांचे खाते अँक्सिस बँकेतुन ट्रान्सफर करणार. म्हणजे अँक्सिस बँक जवळपास २ लाख खात्यांना मुकणार.

The state government decided to disburse the salaries through nationalised and private banks in 2005, and UTI Bank was among the 16 banks selected for this purpose, he said.

मी चार पाच बोललो होतो , तुमच्या बातमीत 16 दिले आहे

हो ना?
मग आताच त्या बँकेतून खाती दुसऱ्या बँकेत बदली करण्याचे काय कारण आहे?

Pages