महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिलाच निर्णयः-आरे कार शेड चुलीत घातली आहे

चला म्हणजे सुरुवात केलीच आहे, पुर्ण मेट्रो प्रोजेक्टच चुलीत घालणार तर !!

भाजपला २०२४ पर्यत सक्षम विरोधी पक्ष बनण्याची संधी आहे.
जबरदस्त सचिन पगारेजी, तुम्हाला राजकारणातच असायला पाहीजे होते.
शरद पवारांनंतर जी पोकळी निर्माण होणार ती भरुन काढण्याची क्षमता तुमच्यात आहे. भाजपा सारख्या पक्षाला तर तुम्ही एका बोटाने हरवु शकाल !

पंकजा मुंडे भाजपा सोडणार का? यावर न्यूजमध्ये चर्चासत्र चालु आहे. अर्थात येणारा काळच ते सांगेल. पण ह्या सरकारने भाजपला सावरायची संधी न देता दणादण दणके हाणत रहायला हवे. पाच वर्ष सत्तेवर रहायचे तर सपोर्टर आमदारांची संख्या वाढवायला हवी.अपक्ष आमदार हे जास्तकरुन सत्ताधारी पक्षाच्या बाजुने असतात ज्यांनी आधीच भाजप सरकार येणार या आशेने त्यांना सपोर्ट दिला ते आमदार आता अस्वस्थ असणार ते आमदार सत्ताधारी आघाडीकडे वळणार यात शंका नाही.पालिका, परिषदा यावरही महाविकास आघाडीने लक्ष केंद्रीत करायला हवे।

>>> शहाने शब्रिमाला प्रकरणात सुप्रीम कोर्टाला चूल दाखवली होती ना ? >>>

तुझ्या राजीवने शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला *** दाखविली होती.

>>> पण ह्या सरकारने भाजपला सावरायची संधी न देता दणादण दणके हाणत रहायला हवे. पाच वर्ष सत्तेवर रहायचे तर सपोर्टर आमदारांची संख्या वाढवायला हवी.अपक्ष आमदार हे जास्तकरुन सत्ताधारी पक्षाच्या बाजुने असतात ज्यांनी आधीच भाजप सरकार येणार या आशेने त्यांना सपोर्ट दिला ते आमदार आता अस्वस्थ असणार ते आमदार सत्ताधारी आघाडीकडे वळणार यात शंका नाही.पालिका, परिषदा यावरही महाविकास आघाडीने लक्ष केंद्रीत करायला हवे। >>>

हाच खरा चाणक्य! पवारांनी नक्कीच याची शिकवणी लावली असणार.

>>>>>>>> शहाने शब्रिमाला प्रकरणात सुप्रीम कोर्टाला चूल दाखवली होती ना ? <<<<<<<<<<<

वॉर्ड बॉय !! त्याच सु कोर्टाने सबरीमाल्ला प्रकरणात सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांची चौकशी सुरु करुन तुमच्या
पार्श्व भागात पाचर मारुन ठेवलेली आहे !!

कसली चौकशी ?
हाजी अलीला स्त्री पुरुष जातात
चरचमध्ये सगळे आत जाऊ शकतात

धर्मस्थळ वैगरे गोष्टींवर लक्ष डायवर्ट करुन जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जनतेचा विकास हा मुख्य मुद्दा असायला हवा.

पहिलाच निर्णयः-आरे कार शेड चुलीत घातली आहे

चला म्हणजे सुरुवात केलीच आहे, पुर्ण मेट्रो प्रोजेक्टच चुलीत घालणार तर !!

Submitted by युनिस on 2 December, 2019 - 10:27

परत चालू करतील

मेट्रो चा कट जुन्या सरकारला गेला आहे ,आता नवीन सरकारला पाहिजे असणार
हैदराबाद मध्ये मेट्रो ३ वर्षात झाली पण असाच प्रसंग आला होता ,असेम्ब्ली जुनी वस्तू म्हणून परवानगाई नाकारली होती

http://www.railnews.in/hyderabad-metro-to-re-align-metro-route-at-assemb...

पंकजा मुंडे भाजपा सोडणार का? यावर न्यूजमध्ये चर्चासत्र चालु आहे. अर्थात येणारा काळच ते सांगेल. पण ह्या सरकारने भाजपला सावरायची संधी न देता दणादण दणके हाणत रहायला हवे. पाच वर्ष सत्तेवर रहायचे तर सपोर्टर आमदारांची संख्या वाढवायला हवी.अपक्ष आमदार हे जास्तकरुन सत्ताधारी पक्षाच्या बाजुने असतात ज्यांनी आधीच भाजप सरकार येणार या आशेने त्यांना सपोर्ट दिला ते आमदार आता अस्वस्थ असणार ते आमदार सत्ताधारी आघाडीकडे वळणार यात शंका नाही.पालिका, परिषदा यावरही महाविकास आघाडीने लक्ष केंद्रीत करायला हवे।

Submitted by सचिन पगारे on 2 December, 2019 - 11:5

>>>>>>>>

पंकजा मुंडे ह्यांचा स्वभाव अकांड तांडव व शोबाजी करणारा दिसत आहे
भगवानगडाचे भांडण ,निवडणुकीच्या वेळी बाकी मुद्दे सोडून भावा वर आरोप

महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण
भ्रष्ट पक्षांच कडबोळ सरकार येउन खादाडीची सुरुवात केलेली आहे. SmartSelectImage_2019-12-03-10-04-48.png

>>> अशी किती कंत्राटं गुजराथेत गेली असतील?
खाल्लेलं ओकायला लावलं पाहिजे. >>>

ज्या संस्थेला हे कंत्राट दिलं होतं त्या संस्थेला कुंभ मेळा व इतर महोत्सव आयोजित करण्याचा अनुभव आहे व ज्या सरकारने हे कंत्राट दिले त्यात शिवसेनेचे अनेक मंत्री होते.

शिवसेना आता योग्य वळणावर येतेय. तिच्या मतांचा आधीच्या सरकारवर काही प्रभाव नव्हता. पहिली तो गुजरातसाठी असलेला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बंद करायला हवा

मंत्रिमंडळ विस्तार बहुधा दोन दिवसात होईल. जितेंद्र आव्हाड सारख्या कार्यकर्त्याला राकाँने डावलु नये अशी अपेक्षा.

>>>>>>>>> सुखद निर्णय. गुजरातच्या कंपनिला दिलेल काँट्रँक्ट रद्द <<<<<<<<<<<<<

ह्या बातमी ला कश्याचा आधार ? फेस बुकचा रेफेरेंस ??? अरेरे , ग्रो अप !!
Biggrin

बुलेट ट्रेन विषयी गरळ ओकणार्या अक्कलशुन्य गाढवांसाठी...

https://www.financialexpress.com/archive/india-japan-to-study-high-speed...

ज्या मुम्बै -अहमदाबाद मार्गावरुन गरळ ओकणे चालु आहे त्या मार्गाची निवड युपीए सरकारने बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी का केली होती, हे एखादा गुलाम सांगेल का?

२०१० ते २०१३ नुसती चर्चा चाललेला तो प्रकल्प मोदींनी मुर्त स्वरुपात आणला ही त्यांची चुक आहे का ?

हा बाफ विनोदी वर हलवायला हरकत नाही...
>>बुलेट ट्रेन विषयी गरळ ओकणार्या अक्कलशुन्य गाढवांसाठी...
गेली अनेक वर्षे ईथल्या काही आयडींची अवस्था ही तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी होती. आता अचानक तोंड उघडायची मुभा मिळाल्यने अक्षरशः वाट्टेल ते बरळत सुटलेत.. वाकोल्हास! Proud
दुर्लक्ष करावे

फडणवीसांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता उद्धव ठाकरे बोलत असतांना. तसेच काहींचे चेहरे झालेत इथे. फडणवीसांना चेह-यावर स्मायल्या आणायला फारच कसरत करावी लागत होती. इथे काहींचे चेहरे खिडकीआड आहेत आणि रेडीमेड स्मायल्या आहेत दिमतीला. बरी सोय झाली.नाहीतत्र वैफल्यग्रस्त म्हणजे काय हे मुलांना सांगण्याची सोय झाली असती.

नेमकं कोण पाच वर्षं तोंड बंद करून बसलं होतं बरं?

जो पक्ष जिंकतो त्याच्याच पाठिराख्यांनी बोलायचं, हरलेल्या पक्षाच्या पाठिराख्यांनी गप्प बसायचं अशी तुमची लोकशाहीची कल्पना दिसते आहे. तिला मूर्त रूप यायला अजून बरंच काही, वाईट ते भयंकर, घडावं लागेल.

रोज मु.मां ना तिकडी सरकार मधिल मान्यवरां कडून नव नविन मागण्या येत आहेत, हे पहा.
भिमा कोरगाव दंगलीत नोंदवलेले गुन्हे मागे घ्या- धनंजय मुडे
https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-leader-dhananjay-munde-dem...

थोडक्यात काय तर प्रत्त्येक सरदाराचे असे अनेक चेले चपाटे आता पुन्हा मोकाट सुटणार... आणि सत्तेची खुर्ची शाबूत रहावी म्हणून अशा सर्व मागण्या मान्य कराव्या लागणार. किती ती सुखद वळणे ... छान!

महाविकास आघाडीचे सरकार विचार करुनच सर्व निर्णय घेत असणार.कारण हा गंगा, यमुना, सरस्वतिचा (उपमा) संगम आहे. जुनेजाणते अनुभवी नेते आणी पवार साहेबांचे उत्क्रुष्ट मार्गदर्शन यांचा हा सुंदर मिलाफ आहे.
फडणविसांसाठी मुख्यमंत्रिपद नविन होते व साथिदारही सत्ताधार्याच्या रुपात नवखे त्यामुळे जुन्याजाणत्यांनी निर्णयांची समिक्षा करणे रास्त आहे.

Pages