महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१९९३ मुंबई साखळी बॉम्ब स्फोटात शेकडो निरपराध मुंबईकरांची हत्या करण्यात आली.

ह्या बॉम्बस्फोटामागचे मुख्य सुत्रधार #दाऊद व #याकुब_मेमन होते....

याकुब मेमनला पकडण्यात पोलिस यशस्वी.

न्यायालयाने याकुब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली.

त्यानंतर अनेक तथाकथित मानवाधिकार वाल्यांना याकुब मेमनचा पुळका आला होता...

मुंबई बॉम्बस्फोट हत्याकांडातील सहआरोपी याकुब मेमनची फाशी रद्द व्हावी म्हणून #अस्लम_शेख या काँग्रेसच्या आमदाराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना पत्र लिहिले.

याकुब मेमनला फाशी झाली.

याकुब मेमनची फाशी रद्द करावी अशी विनंती करणाऱ्या #अस्लम_शेख यांचा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात समावेश झालाय....!

पाठीचा कणा मोडलेल्या माणसाला हवं तेवढं वाकवता येतं.....!

छान.

तुमच्याकडे एम आर आय पण होतो ?

बाकी , आपला माणूस खड्ड्यातून वर काढू पहाणारे ताठ कण्याचे म्हणायचे की खड्ड्यात पडलेल्याला तसेच पडू देऊ देणारे ताठ कण्याचे म्हणायचे ?

उद्या तुम्हाला तुरुंगात घातले तर अ भा ब्रा संघ , असे पत्र लिहितील का ?

( हा जनरल प्रश्न आहे , मेमनचे समर्थन नाही)

विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिलेल्या आणि त्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेल्या दहशतवाद्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत असे जनता समजते.

त्याला सोडा असे बोलले नव्हते, फाशी ऐवजी जन्मठेप बोलले ना ? त्या लेटरमध्ये तर राम जेठमलाणींचेही नाव आहे ,

पाहिले का ?

आणि आहेत देशद्रोही तर शहांना सांगून जेलात घाला

सुबोधजी, राजकारणात हे चालायचेच शेवटी..जाउ द्या.

हो ना आपला तो बाब्याच असतो.
शहीद इशरत जहांच्या नावाने रुग्णवाहिका काढणाऱ्या श्री जितेंद्र आव्हाड याना पण मंत्रिपद द्यावे लागले आहे. David Headley, a Pakistani-American terrorist who had collaborated with the LeT, later said that Ishrat Jahan was an operative of the LeT.
In February 2016, Headley testified before a Mumbai court, via video from the US, that Ishrat Jahan was a member of Lashkar-e-Taiba.

रुग्णवाहिकेस नाव श्री तुकाराम ओंबळेंचे किंवा श्री करकरे यांचे का दिले नाही?

शिवसेनेने हिंदुत्व वादाची गाय सोडून मुस्लिम लांगुलचालनाची बकरी पाळायला घेतली आहे

"सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला" असे मी एकदा लिहिले आहे ते प्रत्यक्षात येताना दिसतंय

अंधारपण पायजेच की
नायतर एक्स रे कसा निघेल ?

त्या लेटर मध्ये राम जेठम्लाणींचे नावपण आहे, दिसले का?

म्हणून तर बोललो , अंधारपण पाहिजे म्हणून .

------

नुसते हा त्याला बोलला अन तो ह्याला बोलला,

मग कपूर आयोगाचा मास्टरमाइंड रिपोर्ट खरा मानायचा का ?

सुबोधजी, तुम्हाला जाउ द्या तो विषय सांगितले पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही.
आता एक सांगा तुम्ही ही प्रतिक्रिया दिलिय.

'विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिलेल्या आणि त्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेल्या दहशतवाद्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत असे जनता समजते'

फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेल्या दहशतवाद्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत असे जनता समजते


हे वाक्य मला फार आवडले..

नथुराम गोडसेलाही सर्वोच्च न्यायालयाने फाशिची शिक्षा दिली होती त्याचे अनेक सोशल साईटसवर कौतुक केले जाते. अनेक नेत्यांनीही त्याचे कौतुक केले आहे.

ते सारे तुमच्या मते देशद्रोही आहेत का?

दहशवादी आणि हत्या करणारा यातील मूलभूत फरक आपल्याला समजतो का?
नसेल तर तो समजून घ्या मग चर्चा करू.

मूलभूत फरक आपल्याला समजतो का?>>
जाऊ द्या हो खरे साहेब त्यांना आपण काय सांगत आहात याचा बोध होत नसून ते खोटे लिहित आहेत. Wink

कसला मूलभूत फरक ?
दोन्ही केस मध्ये एकाच सुप्रीम कोर्टाचा अपमान होतो ना ?

@BLACKCAT
एका व्यक्तीची हत्या आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारण्या साठी सामान्य जनतेत दहशत माजवणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे आपण समजत असाल तर आपल्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान हा शब्द कुठे आला आहे?

@Blackcat
अंधारपण पायजेच की
नायतर एक्स रे कसा निघेल ?

एक्स रे अंधारात हरवतात की काय? का तिरके जातात?

तुमच्या मोडक्या पायाचा एक्स रे तुम्हाला अंधारात ठेवून काढला की काय?

की तिसऱ्याच पायाचा काढला

ज्यासाठी तुम्हाला धनगराचं औषध घ्यावं लागलं?

सुबोधजी, ती व्यक्ति जागतिक स्तरावर प्रसिध्द होती. हत्येचे पडसाद जगभर उमटले.मोठ्या प्रमाणावर त्या व्यक्तिच्या हत्येनंतर देशभरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, जाळपोळ झाली.. स्वतंत्र भारताला मिळालेला तो एक धक्का होता..त्या हत्येतल्या आरोपीबद्दल मी म्हणत आहे.
आणी त्या व्यक्तिला सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिली . त्याच्या समर्थकांना तुम्ही देशद्रोही म्हणु शकता का?

दहशवादी आणि हत्या करणारा यातील मूलभूत फरक आपल्याला समजतो का?
नसेल तर तो समजून घ्या मग चर्चा करू

मूळ विषय काय आहे. दहशतवाद्याला समर्थन देणारे मंत्रिमंडळात सामील केले गेले आहेत हे आहे.

त्याला फाशी देऊ नका, असे पत्र लिहिले म्हणजे दहशत वादास समर्थन कसे होते ? तो तर तुरुंगातच रहाणार होता.

त्या लेतरवर जेठ, चेही नाव आहे, ह्यांना शोधून द्या

सुबोधजी, हत्या कुणाची केली यालाही महत्व आहे. त्या हत्येमुळे महाराष्ट्रात दंगली माजल्या होत्या. एकप्रकारचा दहशतवाद निर्माण झाला होता.अनेक कुटुंबे परागंदा झाली होती. त्या हत्येला केवळ एका व्यक्तिची हत्या म्हणुन मोडीत काढता येणार नाही.ती हत्या ही दहशतवादाचेच रुप होती.
वर तुम्हीच लिहलेय सर्वोच्च न्यायालय, जनता, देशद्रोही म्हणुन विषय निघाला.
जाउ द्या तुमच्या भावना समजु शकतो. ह्या विषयाला पुर्णविराम देउ या..
आणी महाराष्ट्रात बिजेपीला धोबिपछाड देउन सत्तेवर आलेल्या ठाकरेंचे अभिनंदन करुया.

देशद्रोही आणि गुन्हेगार यात मूलभूत फरक आहे. नथुराम गोडसेंचा महात्मा गांधींच्या विचारणा विरोध होता हे समजू शकते पण विचारांचा विरोध हा विचारानेच करायला हवा होता. त्याची हत्या करणे हा गुन्हाच आहे म्हणून नथुराम गोडसे हे देशाचे गुन्हेगार आहेत. परंतु ते विचाराने देशप्रेमीच होते यात शंका नाही. त्यांचे अखेरचे वक्तव्य वाचून पहा.
नेताजी सुभाष बाबू आणि डॉ आंबेडकर यांचा सुद्धा गांधीजींच्या विचाराला प्रखर विरोध होता म्हणून त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणणार का?

गांधीजींची हत्या हा गुन्हाच आहे आणि कोणीही देशप्रेमी त्याचे समर्थन करणार नाही. परंतु नथुराम गोडसेना भारत तेरे टुकडे हो इंशा अल्लाह इंशा अल्लाह म्हणणाऱ्यां च्या पातळीवर आणणे हा देश द्रोह होईल

Pages