महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.
१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.
२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.
३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन
४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन
४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.
तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन
बिष्ट नेही स्वतःच्या केसेस
बिष्टनेही स्वतःच्या केसेस शून्य केल्या ना ?
https://www.indiatoday.in/india/story/yogi-adityanath-case-withdrawal-ag...
>>> कारण हा गंगा, यमुना,
>>> कारण हा गंगा, यमुना, सरस्वतिचा (उपमा) संगम आहे. >>>
वा! भुजबळ, अजितदादा, पवार, आव्हाड, उद्धव, थोरात, अशोक चव्हाण, पटोले इ. म्हणजे गंगा, जमुना, सरस्वतीचा संगम!!!
का, माँ गंगावर फक्त मोदींची
का, माँ गंगावर फक्त मोदींची मोनोपॉली आहे का?
>>वा! भुजबळ, अजितदादा, पवार,
>>वा! भुजबळ, अजितदादा, पवार, आव्हाड, उद्धव, थोरात, अशोक चव्हाण, पटोले इ. म्हणजे गंगा, जमुना, सरस्वतीचा संगम!!!
असू दे.
बाकीच्यांचं माहित नाही, पण दादांचे नाव घेतल्यावर तीर्थ, नद्या, संगम याला फारच वेगळे आयाम प्राप्त होतात.
ह्याच दादांना भाजपने
ह्याच दादांना भाजपने उपमुख्यमंत्री केले होते.
Sachin pagare ji hitting
Sachin pagare ji hitting sixer on googly as usual
त्रिवेणी संगमाचे कोणी
त्रिवेणी संगमाचे कोणी कार्यकर्ते, नेते वगैरे जर हा बाफ वाचत असतील तर कृपया "पगारे" ं ला महाशिववडापावआघाडीचा पीआरओ (पब्लिक रिलेशन ऑफीसर) बनवायचे मा. शरद पवार व मा. उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालावे ही नम्र विनंती.
ज्या तडफेने, तळमळीने, कळकळीने व हिरहिरीने लंगडी बाजु कुबड्यांवर चढवुन पळवत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक मा. शरद पवारांपेक्षा तसुभरही कमी होता कामा नये.
बादवे : सध्या "पगारे" घोषीत (स्वयंघोषीत) चाणक्यांनी मुलाखतीचा जो सपाटा लावलाय त्यात ते जे काही बोलत आहेत त्याने मुलाखत घेणारा "स्टन" होत असलेला दिसतो (माझ्यामते चाणक्य काय बोलत आहेत तेच समजत नसल्याने होत असावेत.)
>>> ज्या तडफेने, तळमळीने,
>>> ज्या तडफेने, तळमळीने, कळकळीने व हिरहिरीने लंगडी बाजु कुबड्यांवर चढवुन पळवत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक मा. शरद पवारांपेक्षा तसुभरही कमी होता कामा नये. >>>
सचिन पगारे चाहते संघटनेच्या सदस्यांचंही कौतुक करा.
>>> सध्या "पगारे" घोषीत (स्वयंघोषीत) चाणक्यांनी मुलाखतीचा जो सपाटा लावलाय त्यात ते जे काही बोलत आहेत त्याने मुलाखत घेणारा "स्टन" होत असलेला दिसतो (माझ्यामते चाणक्य काय बोलत आहेत तेच समजत नसल्याने होत असावेत.) >>>
इतरांचे जाऊ दे, आपण काय बोलतो हे या तथाकथित चाणक्यांना स्वत:ला समजलं तरी चालेल.
एक कळत नाही "पगारे" ं चे इतके
एक कळत नाही "पगारे" ं चे इतके (वेळेला भुछत्रीसारखे उगवणारे) पाठीराखे, मदतगार, अडचणीला हात नी संकटात साथ देणारे असुनही मायबोलीवरील त्यांच्या चाहत्यांची संख्या ३ च कशी ??????
"पगारे" तुमचे माबोवरील समर्थक तोंडपुजे/लाळघोटे व तुमच्या खांद्यावर दंबुक (:))) ठेवुन ठ्ठो करणारे नाहीत याची कृपया खात्री करुन घ्या ही नम्र विनंती. अन्यथा पुढील बाफ काढायला पुन्हा ५ वर्ष न लागो.
एकेकाळी भाजपात ही 2 च खासदार
एकेकाळी भाजपात ही 2 च खासदार होते, विसरले का ?
नथुरामचेही भरपूर चाहते आहेत, पण साध्वीला हाकलून काढले ( त्या समितीत पवार मात्र आहेत म्हणे )
बीसी (म्हणजे ब्लॅककॅट हं)
बीसी (म्हणजे ब्लॅककॅट हं)
कुठे भाजप आणी कुठे "पगारे".....त्यांना इतकपण डाग्रे करु नका. न जाणो संयुक्त महाराष्ट्राचे पुढील गृहमंत्री झाले तर.
<< इतरांचे जाऊ दे, आपण काय
<< इतरांचे जाऊ दे, आपण काय बोलतो हे या तथाकथित चाणक्यांना स्वत:ला समजलं तरी चालेल. >>
----- मोदी यांच्या बाबत हे अगदी चपखल बसते. चाणाक्य आहेत का नाही माहित नाही. howdy modi मधे त्यांनी अबकी बार ट्रम्प सरकार असा मंत्र ५०,००० च्या संख्येच्या सभेला दिला...
देशाच्या इतिहासात प्रथमच भारताचे पंतप्रधान पदावरिल व्यक्तीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी प्रचार केला...
>>> देशाच्या इतिहासात प्रथमच
>>> देशाच्या इतिहासात प्रथमच भारताचे पंतप्रधान पदावरिल व्यक्तीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी प्रचार केला... >>>
५० मिनिटांच्या भाषणात मोजून ५ शब्द बोलले तर तो प्रचार असतो? आणि ते सुद्धा निवडणुक दीड वर्षे लांब असताना? मग कॉंग्रेसी पाकिस्तानात जाऊन मोदींना हटविण्यासाठी पाकिस्तानची मदत मागत होते त्याला काय म्हणणार? आणि ही मदत एकाहून जास्त वेळा मागितली.
त्यांचे फॉरीन फ्रेंड जेलात
त्यांचे फॉरीन फ्रेंड जेलात चाललेत म्हणे
नेत न्याहू भ्रष्टाचारात सापडले,
ट्रम्प महाभियोग,
ह्यांचा नंबर कवा?
विदूषक, राजमाता आणि
विदूषक, यंत्रंमानव, राजमाता आणि राष्ट्रजामातानंतर.
11 वर्षे झाली की
11 वर्षे झाली की
राज्यामध्ये सत्तेत आल्यापासून
राज्यामध्ये सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने आधीच्या भाजपा सरकारच्या काळातील अनेक निर्णयांवर फेरविचार सुरु केला आहे. मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. या निर्णयानंतर आता राज्य सरकारने भाजपा सरकारचा अजून एक निर्णय रद्द केला आहे. गुजरातमधील एका कंपनीला दिलेलं कोट्यावधींचे कंत्राट राज्य सरकारने रद्द केलं आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) गुजरातमधील लल्लूजी अँड सन्स या कंपनीला घोड्यांसंदर्भातील एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या आयोजनाचे कंत्राट दिले होते. मात्र यामध्ये मोठी आर्थिक अनियमितता असल्याचे सांगत सरकारने हे कंत्राट रद्द केलं आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार २६ डिसेंबर २०१७ रोजी एमटीडीसीने अहमदाबादमधील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीबरोबर करार केला होता. ३२१ कोटी रुपयांच्या या करारानुसार नंदूरबारमध्ये होणाऱ्या सारंगखेडा चेतक उत्सावाच्या आयोजनाचे सर्व काम या कंपनीला देण्यात आले होते. यामध्ये अगदी उत्सावाची रुपरेखा आखणे, डिझाईन करणे, त्याचे सर्व व्यवस्थापन पाहणे या सर्व कामांचा समावेश होता. २८ नोव्हेंबरला महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रमुख सचिव अजॉय मेहता यांनी हा करार रद्द करण्याचे आदेश दिले.
फडणवीस सरकारने गुजरातमधील या कंपनीला कंत्राट देताना केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता असल्याचे आढळून आल्याची माहिती पर्यटन विभागाचे अवर सचिव एस. लंभाटे यांनी दिली आहे. एमटीडीसीच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात घोड्यांच्या उत्सावाचे आयोजन केले जाते. देशातील प्राण्यांच्या उत्सवापैकी एक असणारा हा उत्सव मागील तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केला हातो.
महाविकास आघाडी सरकारने मागील काही दिवसांमध्ये मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरे आंदोलक, नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. आधीच्या सरकराच्या सर्व व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
नवी दिल्ली: एसपीजी
नवी दिल्ली: एसपीजी विधेयकानंतर आता संसदेत नागरिकता सुधारणा विधेयकावरून संसदेत हंगामा होण्याची शक्यता आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक पुढील आठवड्याक संसदेत सादर केले जाणार आहे. या विधेयकात शेजारी देशांमुळे आश्रयासाठी आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ईसाई समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एनडीचा विरोधक बनलेल्या शिवसेनेने या विधेयकाला कडाडून विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे. हे विधेयक भारतीय राज्यघटनेच्या तत्वांच्या विरोधात असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. नागरिकांमध्ये त्यांच्या श्रद्धेच्या आधारे भेद केला जाऊ शकत नाही, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र भाजपात नाराज
महाराष्ट्र भाजपात नाराज नेत्यांत अस्वस्थता अशी बातमी न्युज चँनल चालवत आहेत...
हे महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरु शकते.
भाजपात ओबिसी नेत्यांवर अन्याय
भाजपात ओबिसी नेत्यांवर अन्याय ..
जेष्ठ भाजपा नेते एकनाथराव खडसेंचा घणाघात
बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणे
बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणे हे योग्य पाउल ठरेल
https://www.facebook.com/100001627989375/posts/2725270647537175/
बुलेट ट्रेन रद्द करायला तो
बुलेट ट्रेन रद्द करायला तो काय कुणाच्या बापाचा प्रकल्प आहे?
उद्या असले काही प्रयत्न झालेच तर उद्धव ठाकरेच सरकार बरखास्त करणे हेच योग्य पाऊल ठरेल.
<< भाजपात ओबिसी नेत्यांवर
<< भाजपात ओबिसी नेत्यांवर अन्याय ..
जेष्ठ भाजपा नेते एकनाथराव खडसेंचा घणाघात >>
------ भाजपाचा वैचारिक पाया जात/ धर्म/ पाक/ मुस्लीम यांचा पराकोटीचा द्वेष यावर आधारलेला आहे. सबका साथ घेत केवळ काहीं निवडकांचाच विकास हे भाजपाचे तत्व आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प हा
बुलेट ट्रेन प्रकल्प हा कुणाच्याही बापाचा नाही त्यामुळे तो रद्द करायला कुणाची हरकत नसावी. ह्या प्रकल्पात जर इथल्या जमिनी संपादित करुन इतर राज्यातील व्यापार्यांचे हित पहाण्यात आले असेल तर रद्द करायला अडचण कसली.
बुलेट ट्रेन रद्द करायला तो
बुलेट ट्रेन रद्द करायला तो काय कुणाच्या बापाचा प्रकल्प आहे?>> बरोबर. मग तो देशाबाहेर फेकून द्या. आणि वाईट वाटत असेल तर जिकडे फेकाल त्या जपान किंवा चीन मध्ये चालते व्हा.
कशाला एवढं भांडताय सगळे? चिल
कशाला एवढं भांडताय सगळे? चिल करा.
यथावकाश सगळे प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील. प्रोजेक्ट हेडस, कॉन्ट्रॅक्टर लोक मातोश्रीवर जाऊन पावन झाले की लगेच. आठवा ती गर्जना, " एन्रॉन ला अरबी समुद्रात बुडवून टाकू." मग ती रिबेका मार्क ताई मातोश्रीवर जाऊन आल्या आणि एन्रॉन की गाडी निकल पडी.
त्या लोकांसाठी आपण कशाला भांडायचे? काही दिवसांनी सगळे एक व्हायचे.
त्या सरसकट कर्जमाफिचे काय
त्या सरसकट कर्जमाफिचे काय झाले ?
<< यथावकाश सगळे प्रोजेक्ट
<< यथावकाश सगळे प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील. >>
----- सहमत... खाणारे बदलतील...
आधीच्या सरकारने केलेली कंत्राटे, आर्थिक व्यावहार आणि त्यामुळे येणारे side effects हे देशाचे वाटोळे लावणारे होते. आताही खूप मोठ्या आशा नाही आहेत.... पण कमी वाटोळे असेल...
चिडू नका
चिडू नका
खास लोकांसाठी आता एक नवीन खास राष्ट्र बेटावर उपजले आहे म्हणे,
https://timesofindia.indiatimes.com/india/all-you-need-to-know-about-nit...
कुठे आहे म्हणे हे ?
बीसी,
बीसी,
तुम्ही पण करा स्पेशल देश कुणी अडवलय हुं......
Pages