महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वामी आले परदेशातुन?
८ वर्ष परदेशात होते.का?

१९६९ सालीचा परत आले.

आपण काळाच्या ५० वर्षे मागे आहात.

In July 1965, immediately after obtaining his PhD in economics from Harvard, Swamy joined the "Department of Economics" at Harvard Faculty of Arts and Sciences as an assistant professor.[7][13] In 1969, he was made an associate professor.[14] As associate professor, he was invited by Amartya Sen[5] to occupy the chair on Chinese studies at the Delhi School of Economics.[6] He accepted the offer, and indeed he even travelled to India to take up the position, but his appointment was cancelled at the last minute due to his views on India's economic policy and also its nuclear policy.[5] At that time, India was still partially oriented towards Socialism and the "command economy" model instituted by Nehru, and Swamy was a believer in market economy.
Thereafter, Swamy moved to the Indian Institute of Technology, Delhi and he was a full Professor of Mathematical Economics there from 1969 to the early 1970s.[13][15] He was removed from the position by its board of governors in the early 1970s but was legally reinstated in the late 1990s by the Supreme Court of India.

@ BLACKCAT
आमच्या पणजोबांची शेती होती त्यातील बरीचशी कुळकायद्यात आणि काही कोकण रेल्वेत गेली.

काही शेती ( एक एकरच्या आसपास ) आमच्या वडिलांकडे वारसाहक्काने आली आहे आणि त्यामुळे सरकार दरबारी ( कागदोपत्री) आम्ही शेतकरी आहोत. (शेतजमीन विकत घेण्यासाठी हे आवश्यक आहे).

मग फडणवीस असे असले तर तुम्हाला इतकी जळजळ का होते?

निदान पाकिस्तानशी साटेलोटे करून देशावर हल्ला करणाऱ्या काँग्रेसी सारखे देशद्रोही तर नाहीत.

निदान पाकिस्तानशी साटेलोटे करून देशावर हल्ला करणाऱ्या काँग्रेसी सारखे देशद्रोही तर नाहीत.

Proud

आर्मीत असताना माहीत नव्हते का ?

सर्व नागरिकांच्याबद्दल सरकारला माहिती असणे यात चूक काय आहे हेच मला समजत नाही.
जगातील सर्वच प्रगत देशात आपले नागरिक कोण याची सरकारला माहिती असते. त्यात गैर काय आहे? आणि ज्यांच्याबद्दल माहिती नाही उदा. आदिवासी त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यात चूक काय आहे?
त्यांच्या नावाने जे लोक "पैसे खात होते" किंवा "त्यांना बाटवायचे"आहे अशा लोकांनी विरोध करणे समजू शकतो.

सुज्ञ नागरिकांनी याला विरोध का करावा?

की अरविंद केजरीवाल यांच्या सारखे स्वच्छ भारत योजनेला विरोध म्हणून रस्त्यावर टमरेल देऊन बसायचं?

वर्गात प्रत्येक वर्गाचे रजिस्टर असते

आता शाळेला एकत्र रजिस्टर ठेवायचे आहे तर ते त्यांनी परस्पर गोळा करायचे की पोरांना आय कार्ड घेऊन रांगेत उभे करायचे ?

जनगणना , पेन कार्ड , आधार कार्ड , जन्म नोंद मृत्यू नोम्ड , लग्न नोंद सगळे सरकारकडे जमा असतेच , त्यांनी करावे गोळा आणि ठेवावे रजिस्टर , नको कुणी म्हटले आहे ?

आणि नागरिकत्वाचे एक रेकॉर्ड ठेवावे , जसे आधार आहे तसे ,

NRC महाराष्ट्रात लागु करणार नाही यावर ठाम-- माननिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.
>

एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला असे निर्णय घ्यायचा अधिकार असतो काय ?

एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला असे निर्णय घ्यायचा अधिकार असतो काय ?)))))))) ते घेतायत.
राज्यांच्या मदतीशिवाय nrc लागु होणे कठीण आहे.

https://youtu.be/BM06_w3SCfI
https://youtu.be/RfnAuRADJdQ
https://youtu.be/a7oaGsKzdV0

काँग्रेसचे तीन दिग्गज एन आर सी आणि एन पी आर चे श्रेय घेताना दिसत आहेत.
आणि आता मुसलमानांच्या मतांसाठी त्यालाच विरोध करताना दिसतात.
खोटारडेपणा दुटप्पीपणा यात यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
यावर चर्चा करायची असेल तर अगोदर कृपया तिन्ही व्हिडीओ पूर्ण पाहून घ्या

सुबोध खरे यांनी टाकलेल्या लिंक्स काँगि वतावघळांची बोलती बंद करायला पुरेशा आहेत, वर कागलकराने केलेली व्हॉट अबौटगिरी त्याचा पुरावा आहे.

काँग्रेसचे तीन दिग्गज एन आर सी आणि एन पी आर चे श्रेय घेताना दिसत आहेत.
आणि आता मुसलमानांच्या मतांसाठी त्यालाच विरोध करताना दिसतात.
खोटारडेपणा दुटप्पीपणा यात यांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
यावर चर्चा करायची असेल तर अगोदर कृपया तिन्ही व्हिडीओ पूर्ण पाहून घ्या))))))))))))
काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे CAA,NRC यातील त्यांच्या तरतुदीत फरक असल्या शिवाय ते विरोध करणार नाहीत..

NRC ला तरतुदी स्पष्ट असल्याशिवाय विरोध करणेच योग्य राहील..डाँक्युमेंटस सर्वांकडे नसणार.

आमच्या नाशिकला कुंभमेळ्यात लाखो साधु व नागा साधु येतात त्यांच्याकडे डाँक्युमेंटस असण्याची शक्यता शुन्य आहे. कालच एक परडी घेउन कुटुंबासह फिरणार्या डोंबार्याला सहज म्हणुन विचारले त्याला काय माहितही नाही आणी डाँक्युमेंटसही नाहीत.

डाँक्युमेंट नसणाऱ्यांना घाबरायचे कारण नाही. त्यांनी खोटे लिहून द्यायचे की ते मुस्लिम सोडून इतर धर्मीय असून त्यांच्यावर पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानात अत्याचार झाले होते. आता आसाम मधील NRC प्रक्रियेत जे हिंदू सापडले आहेत ते हेच करणार आहेत. आणि नवा CAA कायदा त्याचसाठी केला आहे. Wink

आमच्या पणजोबांची शेती होती त्यातील बरीचशी कुळकायद्यात आणि काही कोकण रेल्वेत गेली.
<<>
मूळ दु:ख सापडले.

Proud

तुम्ही सोनोग्राफी करून गाठ , मूळ व्याध , 'अपेंडी' वगैरे लिहून दिले की आ. रा. रा. साहेब ते कापून काढायचे काम करतात

बरं

भाजपला महाराष्ट्रात धोबीपछाड देणे हे भविष्यात शिवसेनेच्या फायद्याचे ठरणार आहे. राष्ट्रिय राजकारणाच्या दिशेने हे शिवसेनेचे पहिले पाउल पडेल. भविष्यात भाजपाविरोधी जी आघाडी उभी राहील तिच्यात शिवसेनेचा महत्वाचा रोल राहील.
शिवसेनेचा महाराष्ट्रात वापर केला गेला. भाजपाला केंद्रात एकनिष्ठतेने साथ देउन त्यांना अवजड खात्यापर्यत मर्यादित ठेवले गेले..भाजपाशी युती करुन शिवसेनेला नेहमी दुय्यम भुमिका साकारावी लागली असती. केंद्रात अवजड मंत्रीपद नि महाराष्ट्रात सत्तेत दुयँयम भुमिका..
शिवसेनेचा हा निर्णय त्या पक्षासाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.

हो पण शिवसेनेच्या मुळ विचारसरणीला तिलांजली दिली आहे. सुरुवातीला बाळ ठाकरे आम्हाला सत्ता नकोय तर समाजकारण करायचं म्हणत होते. हळूहळू मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतोय दाखवत हिंदुत्वाची शाल पांघरली. नंतर सत्तेची एवढी चटक लागली की खुर्ची साठी वाटेल तश्या कोलांट्या मारु लागले.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लवकरच राकॉं किंवा सोकॉं मध्ये मर्ज होतील.

शिवसेना ही कात टाकतेय. शिवसेनेला उज्वल भविष्य आहे..मराठी माणसांचा मुद्दा हा क्षेत्रिय होता त्यातुन शिवसेना पुढे आली. त्यानंतर दुसरा टप्पा हिंदुत्वाचा होता तो त्यांनी घेतला पण तरीही ती व्यापक होउ शकली नाही कारण भाजपला त्यांची गरज महाराष्ट्रापुरतीच होती.. भाजपा हा ही विचारसरणी वैगरेचा मोठा आव आणत असला तरी सत्तालोलुप पक्ष आहे. त्यांनी खरतर शिवसेनेला इतर राज्यात स्पेस द्यायला हवा होता कारण शिवसेना हिंदुत्ववादु विचारांवर ठाम होती पण भाजपला सर्व स्वतालाच हवे होते. पण प्रकरण तेव्हा गंभिर झाले जेव्हा महाराष्ट्रातही भाजपा शिवसेनेला संपवु पाहु लागली..बाळ ठाकरेंच्या काळात पक्ष फुटला शिवसेनेची ताकत कमी झाली तेव्हा भाजपाने लगेच धावतपळत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला. ती पहीली ठिणगी होती..पण राजकिय परिस्थितीमुळे शिवसेनेला योग्य संधी मिळत नव्हती. वाजपेयींच्या काळात केंद्र तुमच्याकडे राज्य आमच्याकडे असे बाळ ठाकरे बोलत पण शिवसेनेच्या एकमेव कार्यक्षेत्रात भाजपने पाय पसरायला सुरवात केली तेव्हाच शिवसेनेच्या लक्षात आले की आपण विचारसरणीवर ठाम आहोत पण भाजपा आपल्याला दुय्यम स्थानावर ढकलतेय..शेवटी योग्य संधी आता मिळाली व सेनेने त्याचे सोने केलेय.
आता ते राजकारणाच्या तिसर्या टप्प्यावर म्हणजे सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास येथे पोहोचले आहेत.
आणी हा टप्पाच त्यांचे राजकिय अस्तित्व योग्य दिशेने नेईन.

घोडा मैदान जवळच आहे. भारत एक हिंदू राष्ट्र होणार. हिंदूविरोधी पक्ष /विचारांचे लोक अल्पमतात जातील. हे लिहून घ्या. हिंदूंचा द्वेष करणारे वंचित अतिवंचित होणार.

Pages