महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@blackcat
नथुराम गोडसे याना फाशी सर्वोच्च न्यायालयाने दिले नव्हती किंवा शिक्का मोर्तबही केलेला नव्हता.
जरा इतिहास वाचत चला.

बाकी इशरत जहाँ च्या नावाने रुग्णवाहिका चालू केली तर नथुराम गोडसेंचा नावाने रुग्णालय चालू केले तर लोकांना चालेल का?

आणि ए क्स रे बद्दल काय?
अंधारात का प्रकाशात?
अँजिओप्लास्टी पण अंधारात करून घ्या

भारत तेरे टुकडे हो इंशा अल्लाह इंशा अल्लाह म्हणणाऱ्यां च्या पातळीवर आणणे हा देश द्रोह होईल

असा कोणताही व्हिडीओ मोदी शहांनी अजून सिद्ध केला नाही व कुणास शिक्षाही झालेली नाही. उगाच अफवा पसरवू नयेत.

गोडसेंच्या कुणीतरी जवळच्या व्यक्तीने मात्र अनेक संस्थानांना भारतात सामील होऊ नका असे पत्र घातली होती म्हणे,

गांधी नेहरू पटेल आंबेडकरांनी सगळा भारत शिवून टाके घालून आम्हास दिला, अशोक स्तंभाचे हे चार सिंह आहेत, उरलेले तुम्ही आम्ही म्हणजे खाली दाखवलेले बैल व घोडे आहोत
Proud

नथुराम गोडसेंचा नावाने रुग्णालय चालू केले तर लोकांना चालेल का?

Proud

करा सुरू , तुमचेच सरकार आहे, की परमिशन नेहरूंनी द्यायची ?

भारत रत्न आता सोनिया गांधी यांना द्यायचे आहे.
राजीव गांधी यांनी आपली अर्थव्यवस्था इतकी डबघाईला आणली की आपल्याला सोने गहाण ठेवावे लागले. त्याबद्दल श्री राजीव गांधी यांना भारत रत्न दिले गेले आणि ज्या श्री पी व्ही नर्सिंह राव यांनी देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढले त्यांना दिल्लीत अंत्यसंस्कार सुद्धा नाकारले श्रीमती सोनिया गांधी यांनी. शेवटी 2014 मध्ये सर्व दिवंगत पंतप्रधानांबरोबर दिल्लीत त्यांचे समाधी स्थळ बांधले गेले.

असा कोणताही व्हिडीओ नाहीच मुळी. अशा कुणीही म्हणलंच नाही आणि कुणी ऐकलं च नाही
लोकांना स्वप्न पडले असावे

अशा श्रीमती सोनिया गांधी यांच्या भेटीला चाणक्य चार पाच वेळा खेपा मारून लोटांगण घालून आले आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा मंगल कलश त्याच्या हातात आला.

असेल ,

एक्स रे सोनोग्राफीत दिसायला तर पाहिजे ना,
का उगाच आपला आपणच कांगावा करायचा, मला कँसर होता अन बराही झाला म्हणून,
असेल व्हिडीओ तर येईल समोर, तेंव्हा निषेध करूच

त्या घोड्या गाढवांमध्ये चाणक्य पण येतात का? आणि श्री उद्धव जी आणि श्री बाळराजे?
राजर्षी शाहु महात्मा फुले लोकमान्य टिळक नेताजी बोस सरदार पटेल डॉ अब्दुल कलाम ?
हा देश काही दोन चार सिंहांच्या कर्तृत्वावर उभा नाही.
तुमच्या टिनपाट बुद्धीची धाव तितपतच चालणार म्हणा

Blackcat

"असा कोणताही व्हिडीओ मोदी शहांनी अजून सिद्ध केला नाही व कुणास शिक्षाही झालेली नाही. उगाच अफवा पसरवू नयेत."

कोणतीही गोष्ट नाहीच म्हणून बेलाशक खोटे बोलण्याबद्दल जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा
हा व्हिडीओ कोर्टात सादर झालेला आहे।
2016 JNU sedition case chargesheet: Delhi cops submit 'Bharat Tere Tukde Honge, Inshallah' video in court.
https://www.indiatvnews.com/news/india-2016-jnu-sedition-case-chargeshee...

https://youtu.be/Va6jGHsifZI
थोडीशी लाज शिल्लक असेल तरहा व्हिडीओ पाहून घ्या आणि खोटारडे पणा बद्दल क्षमा याचना करा मायबोलीकरांची
हा व्हिडीओ फॉरेन्सिक सायन्स लॅबने सत्य आहे असे प्रमाणपत्र ही दिलेले आहे।

@भरत
मूळ व्हिडीओ डॉक्टरड नाही असा फॉरेन्सिक सायन्स लॅब चा अहवाल आहे उगाच तिसरे चौथे पाचवे खोटे व्हिडीओ आहेत म्हणून फाटे फोडू नका

अजून केस सुरू आहे ना ?

असेल व्हिडीओ तर येईल समोर, तेंव्हा निषेध करूच

केसचा निकाल लागू दे , त्याच्या आधीच काय नाचायचे ? ओरडणारे कोण माहीत नाही , व्हिडीओ बाबत कोर्टाचा निर्णय आला नाही आणि निषेध कुणाचा करणार ?

अजून केस सुरू आहे ना ?

तुम्हाला जनाची नाही ती नाहीच पण मनाचीही लाज नाही हे सिद्ध करून दाखवता आहात.

"मुद्दा केसचा नाहीच"

तुम्हीच लिहिलंय ना की असा व्हिडीओ नाहीच मग व्हिडीओ त्याचा दुवा सुद्धा पुढे आणून तूमचा खोटारडेपणा सिद्ध झाला त्याची ही लाज नाही

इतका कोडगेपणा की राजकारणी लोकांना पण लाज आणेल?

व्हिडीओ याचा अर्थ कोर्टात सिद्ध झालेला व्हिडीओ

नुसताच व्हिडीओ आणायचा तर तात्यांनी आशीर्वाद दिला असाही व्हिडीओ आहे , डायनासुर , माहिश्मती साम्राज्य असेही व्हिडीओ आहेत

जिनाच्या मुलीच्या नवर्याचे भारतात वाडिया हॉस्पिटल आहे

नेहरूंच्या मुलीच्या नावाने मालदिवला इंदिरा गांधी मेमोरियल हस्पिटल आहे,

ते मायबोलीवर परमिशन मागायला नव्हते आले. Proud

तुमचे गोडसे हॉस्पिटल लवकर सुरू करा.

कशाला टिवटिव करताय?
खोटारडेपणा निलाजरेपणा सिद्ध झालाच आहे.
पण परत पचपच करून कशाला लोकांची खात्री करून देताय?

Pages