महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाळासाहेब ठाकरे हे मला तरी मी एक हिंदू धर्मीय व्यक्ती म्हणून हिंदू हृदय सम्राट वगैरे वाटत नाही. स्वयंघोषित हिंदू हृदय सम्राट म्हणा हवं तर. शिवाजी महाराजांच्या नावाने दुकान चालवून ठाकरे आणि कंपनीनं माया गोळा केली. मीना ठाकरे मॉसाहेब?
हे चमचे कोणाला काय पदवी देतील सांगता येणार नाही.

कॉंग्रेस जशी मुसलमानांच्या मनात असुरक्षितता उत्पन्न करुन राजकारण करते तेच शिवसेना हिंदूंच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करत राजकारण आहे. सुरुवात मुंबईत मराठी माणसाच्या भावना जागृत करून केली. मराठी माणसाचे कैवारी दाखवत हिंदूंचे कैवारी दाखवत हजारो करोडोंची कमाई केली.

पोलिसांचे खाते अँक्सिस बँकेतुन ट्रान्सफर करणार. म्हणजे अँक्सिस बँक जवळपास २ लाख खात्यांना मुकणार.
नवीन Submitted by सचिन पगारे on 26 December, 2019 - 20:58
<<

हे असले काही एक होणार नाही.
"तोडपाणी" योग्य जागी पोहचली की वरिल निर्णयाला आपोआप पुर्णविराम मिळेल. भाजपाच्या नोटबंदी व इतर निर्णयांनी रिकामी झालेली गंगाजळी, कमी वेळात, लवकरात लवकर कशी भरता येईल ह्यासाठी सध्याचे उद्योग सुरु आहेत.

ब्लॅककॅट तुजाई नं शोधला का टरबूज एकादशीचा उपास. तिनं हे उपास केल्यानं तू बाहेर आला तिच्या ( उदरातून)

हो ना
पाच वर्षाचा उपास एक वर्षात सोडायचा आहे.
सरकार टिकेल कि नाही काय माहिती?

पाच वर्षाचा उपास एक वर्षात सोडायचा आहे.
सरकार टिकेल कि नाही काय माहिती?
--
अगदी !
एका खासगी बॅंकेतून, सरकारी बॅंकेत अकाऊंट ट्रान्सफर करुन,
काय "घंटा" मिळणार आहे "महाखादाड आघाडी"च्या मुख्यमंत्र्याला ! या आधी ऑफलाईन खंडणी घेत होते, आता काय सर्व कारभार ऑनलाईन.

बिएमसी वाल्यांची खातीही अँक्सिसमधुन सरकारी बँकेत ट्रान्सफर करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात

BMC कुणाच्या हातात होती? आहे? उगाच फुकाचा वाद!
माझी मावशी BMC hospital मध्ये काम करते. तिचे पगार खाते महाराष्ट्र बँकेत आहे पहिल्यापासूनच. जी त्यांच्या हॉस्पिटलच्या अगदी जवळ आहे. (जी सोयीची, त्यात खाते असावे असे वाटते. )

मूर्खांचा बाजार आहे.
ऍक्सिस बँकेच्या पगाराच्या खात्याबरोबर कर्मचाऱ्यांना ४० लाखाचा अपघात विमा ऍक्सिस बँकेने मोफत दिला होता. तो विमा राष्ट्रीयीकृत बँक देणार आहे का?
केवळ आकसापोटी असले निर्णय घेणे हे केवळ अकलेचे दिवाळे काढल्याचे लक्षण आहे.

एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये असताना माझा पगाराचे खाते तेथेच होते. म्हणजे काय ते समजून घ्या.

अरे वा , म्हणजे तुम्ही काय गोल्ड स्टॅण्डर्ड टेस्ट लागून गेले काय ?

आणि एशियन वाले पगार बुडवतात म्हणून तुम्हीच मिसळपाववर बोलत होते ना ?

त्या एकसिडेंट कव्हरला त्या कार्डवर गेल्या काही महिन्यात ऑन लाईन खरेदी , कार्ड स्वाईप होणे वगैरे आवश्यक असते.

ही सुविधा अनेक बॅंक देतात

@ blackcat
थापा मारू नका.
जिथे तिथे नाक खुपसायची सवय गेलेली नाही. मला वाटलं जरा वय वाढल्याबरोबर परिपकवता आली असेल.
क्रेडिट कार्डाचा अपघात विमा आणि पगार खात्याचा अपघात विमा हे दोन वेगळे असतात हे माहिती नसेल तर फुकट वायफळ टंकन कशाला करताय?

मी कोणतेही ऑनलाईन ट्रान्सक्शन केले नाही.

पण जोवर खात्यात पगार येत होता तोवर मला विम्याचे संरक्षण होते. तीन महिने आपल्या खात्यात पगार जमा झाला नाही तर हे पगाराचे खाते सामान्य खात्यात वर्ग होते आणि आपले विम्याचे कवच बंद होते जे मी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट सोडल्यावर झाले.

एशियन हार्ट इन्स्टिट्यूट पगार बुडवते त्याचा आणि ऍक्सिस बँकेचा काय संबंध?

राजकारणाच्या लठ्ठालठ्ठीत अँक्सिस बँकेचे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे फुकाफुकी नुकसान होत आहे..

पगार खात्याच्या अपघात विमाही डेबित कार्ड शी संलग्न असतो
डेबिट कार्डने विशिष्ट दिवसात खरेदी होणे आवश्यक असते, तरच विमा बेनेफीत मिळतो,

ए टी एम ने पैसे काढणे , हे त्यासाठी कन्सिडर होत नाही, खरेदी करून कार्ड स्वाईपच करावे लागते,

आणि या फेसिलिटी सगळ्या ब्यांका हळूहळू देत आहेत, आम्हालाही बी ओ बी मधून एच डी एफ सी त अकाउंट फिरवा म्हणून ऑफर आली होती, जेंव्हा डिटेल माहिती घेतली तेंव्हा केवळ काहीच लोक तयार झाले, कारण कार्ड खरेदी फेसिलिटीला मोठ्या मॉललाच जावे लागेल , आमचे बहुतांश लोक किरकोळ खरेदी रोखीतच जवळपास करतात, त्यामुळे फारसे कुणी तयार झाले नाही.

आणि माझा बी ओ बी वर फार विश्वास आहे, ढोकळा वाले सगळीकडे कर्जे बुडवतात , पण बी ओ बी अगदी सेफ ठेवतात
म्हणून मी तसेही त्या एच डी एफ सी त जाणारच नव्हतो, पगार जमा झाल्याशी मतलब
Proud

https://twitter.com/Swamy39/status/1210419954102632448?s=08

26/11 चा हल्ला काँग्रेस आणि पाकिस्तान लष्कर यांनी सहकार्याने केला असा डॉ सुब्रमण्यम स्वामी याचा खुलासा. आणि याचा दोष हिंदू दाहशतवाद्यांवर टाकायचा डाव होता. परंतु उप निरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडून दिल्याने पाकिस्तान लष्कराचा हात स्पष्ट झाला आणि आता त्यात काँग्रेसच्या चार वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याचा डॉ स्वामी यांनी आरोप केला आहे. डॉ स्वामी कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाहीत ही त्यांची ख्याती आहे.

Pages