महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विरोधी पक्ष झोपले होते का , ह्या आगबोटी बुडताना अन विमाने उडताना ?
तुमचे दोन खासदार काय गांजा मारून निजले होते ?

नवीन Submitted by BLACKCAT on 14 December, 2019 - 23:58>>>

त्यांची बोंबाबोंब तेव्हाच्या वर्तमानपत्रात वाच... Google news archives वर मिळतील. त्याशिवाय 2 खासदार काय उपटणार त्याचा प्रत्यय आता राज्यसभेतील 3 शिवसेना खासदारांची गत पाहून येईल (अर्थात ते समजण्या एव्हढा कॉमन सेन्स असेल तर)...

असेल, आम्हाला तर ते बोट प्रकरण ह्या निवडणुकितच समजले

आणि नेहरू गांधीबद्दल आदर दुणावला.

एकाच वेळी देशसेवा , मजा , निसर्ग सानिध्य , सगळे करायला संसारी अक्कल लागते,

तुम्हाला राख फासून भिक्षा मागत हिमालयात गेलेले आवडतात वाटते, पायरीवर पडले म्हणे, बरे आहे का?

एकाच वेळी देशसेवा , मजा , निसर्ग सानिध्य , सगळे करायला संसारी अक्कल लागते,

तुम्हाला राख फासून भिक्षा मागत हिमालयात गेलेले आवडतात वाटते, पायरीवर पडले म्हणे, बरे आहे का?

नवीन Submitted by BLACKCAT on 15 December, 2019 - 00:25 >>>

या असल्या गांधी चाटू लोकांमुळे नकली गांधी देशाच्या बोडक्यावर इतकी वर्षे बसून होते... आणि देशाची संपत्ती उंदरा सारखे कुरतडत राहिले.
असो , उशिरा का होईना देशाने त्या उंदरांना गटारात लोटून त्यांची शोचनीय अवस्था करून ठेवलीय त्यामुळे आनंद आहे.

त्या लंडनच्या घराचे काय झाले? निवडणूक आली की , राहुलचे नागरिकत्व आणि वदरा चे लंडनचे घर ह्याववर कुत्र्याच्या छत्रीगत केसेस उगवतात.

इंग्रजानी इथे भारतात एवढे बांधले आहे, बांधले वदराने एखादे फार्म हाऊस अन घेतला एखादा फ्लॅट लंडनमध्ये तर भाजपयांच्या पार्श्वगृहात का दुखते ?

>>>>>तुमचे दोन खासदार काय गांजा मारून निजले होते ?<<<<<<<
तुमचे गांजा मारुन निजलेले चाचा , jawaharlal-nehru-chacha-ji_0.jpg
एकाच वेळी , मज्जा , निसर्ग सानिध्य , चा पुरेपुर उपभोग घेणारे !!!

नेहरू गांधी ह्यांची 600 की 700 नावे असलेल्या योजना संस्थाची नावे असलेली यादी व्हाट्सपवर फिरत होती , ह्यांच्या नावाने 60 वर्षात इतके निघाले म्हणून , 10 वर्षात भाजपयांनी गोडसे अन गोडसेगुरूंच्या नावे किती योजना काढल्या ?

गुलामोंकी दुखती नस पर इंजेक्शन दे दिया गया है ! अब वह कुछ समयतक भौकते रहेंगे |

असो, भरत भाऊ, भाजपने कुठल्या योजनांची नावे बदलली? काही लिस्ट वगैरे?

BC, जास्त योजना काढून काँग्रेसने काय उपटल? देशातील किती लोकांना त्या सर्व योजना माहित असायच्या? जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचण्यासाठी काँग्रेसने काय प्रयत्न केले? गेल्या ४२ वर्षांपासून गरिबी हटाव गरिबी हटाव म्हणून बोंबलत आहेत, गरिबी हटली का?

बरं जास्तीत जास्त योजना काढण्यामागे काँग्रेसचा उद्देश हा होता की
खर्च केलेल्या १ रुपयातील २० पैसेच जनतेपर्यंत पोहोचवावे. ८० पैसे काँग्रेसचे चेलेचपाटे हजम करायचे. आता उपासमार चाललीय.

वरील कट प्रॅक्टिस वर काँग्रेसचे बांगाराम येथे फाफललेले नेते व त्यांच्या पुत्रीने शिक्कामोर्तब केलेले आहे, त्यामुळे काँग्रेसी गुलाम ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाहीत.

एकाच वेळी , मज्जा , निसर्ग सानिध्य , चा पुरेपुर उपभोग घेणारे !!!

Submitted by युनिस on 15 December, 2019 - 06:21 >>

तेही देशाचे पैसे व साधनसंपत्ती स्वतच्या मजेसाठी उडवून !
आणि BC सारख्या गुलामांना त्याचा अभिमान वाटतो...

देशातील किती लोकांना माहीत आहेत ?

मग तुम्ही व्हॅटसप वरून नावे फिरवत होते , ते कर्ण पिशाच्चने सांगितले म्हणून का ?

आमच्या हॉस्पिटलचे नाव पं मदन मोहन मालवीय , 3 मजली होते आता 10 मजली करणार आहेत,
आमची डिग्री इगणु युनिव्हर्सिटी
रुग्णाअना पेन्शन मिळते , संजय गांधी निराधार योजनेतून.
काही झाकून ठेवलेले नाही, सगळे दिसते,

नवीन सरकारने टीबी साठी 500 रु महिना स्कीम आणली आहे, त्याला आगरकर किंवा माधवराव पेशवे वगैरे टीबी ने गेलेल्याचे नाव द्यायला हवे होते की
असो, अभिनंदन

खेलरत्न राजीव गांधी पुरस्कार !! असा काय पराक्रम केला राजीव गांधींनी क्रीडा क्षेत्रात ?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान !!!
का बाबा ? फक्त गांधी नाव म्हणुन ?

>>>>>>>तेही देशाचे पैसे व साधनसंपत्ती स्वतच्या मजेसाठी उडवून !
आणि BC सारख्या गुलामांना त्याचा अभिमान वाटतो...<<<<<सहमत !!!

>>>>>>>त्यांना फक्त नावं बदलता येतात.<<<<<<<<

औरंगझेब व महम्मद खिलजी ची नाव ठेवण्याचा करंटे पणा केला त्यावेळेला तोंडाला कुलुप लागलेल गुलामांच्या ??

<< खेलरत्न राजीव गांधी पुरस्कार !!
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान !!!
का बाबा ?>>

------ हे नावांचे जरा जास्तच झाले.
मला नाव देण्याचे प्रकार आणि पुतळे (यात सर्व नेते आले... महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज) दोन्ही आवडले नाही... मग CST असे त्रोटक म्हणतो तेव्हा काय साध्य करतो ?

"छत्रपती शिवाजी टर्मिनस वरुन राजेंद्र नगर टर्मिनल
लोकमान्य टिळक ट्रमिनस वरुन राजेंद्र नगर टर्मिनल"

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारने पाटबंधारे कंत्राटदारांना कोटय़वधी रुपयांची अतिरिक्त कामांची देयके नियमित करण्याची तरतूद लागू केली होती, मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने तूर्त त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे

https://www.loksatta.com/mumbai-news/cm-postponement-for-the-fadnavis-go...

जेटली स्टेडियम

धर्माणतर करून नाव ठेवले ना ? आधी काय होते?

>>> दिन दयाळनि वाफेच्या इंजिनाचा शोध लावला असावा >>>

चाचा तर क्रिकेट, फुटबॉल असे सगळे खेळ खेळायचा, अंतराळ संशोधन करायचा आणि फावल्या वेळात . . .

Proud

अशोक स्तंभातले चार सिंह म्हणजे गांधी नेहरू पटेल आंबेडकर.

उरलेले घोडा , बैल वगैरे खाली गोल गोल फिरत असतात.

unnamed.png

अशोक स्तंभातले चार सिंह म्हणजे
गांधी नेहरू पटेल आंबेडकर.

गाल पुढे कर , गांधी म्हणे सिंह !!!

Biggrin

अशोक स्तंभातले चार सिंह म्हणजे गांधी नेहरू पटेल आंबेडकर.

उरलेले घोडा , बैल वगैरे खाली गोल गोल फिरत असतात. >>>

आणि तो कस्टम मेड स्थंभाचा दगड म्हणजे BC सारखे गुलाम

पुढील केवळ पाचच नाही, तर पन्नास वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम राहिल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.. उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी नागपूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

>>> हो , काल मंकी डे होता.

आम्हीही केळीचे शिकरण केले >>>

तो तुझा मंकी सर्वधर्मसमभावाची पावशेर ढोसून महान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने ओकाऱ्या काढतोय.

Pages