महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महाराष्ट्र भाजपा फुटण्याची चिन्हे. महाविकास आघाडीसाठी सुखद बातमी>>>>>>

अच्छा ! म्हणजे जे राष्ट्रवादीतुन उड्या मारुन भाजपात आले होते ते घरी परत जातायत. चांगले आहे कारण सुबह भुला अगर शाम को वापस आये तो उसे भुला नही कहेते. या धर्तीवर बिजेपी में चुनाव से पैले जो गया उसे रॉकॉ नही बल्की फुटीर कहेते है, लेकीन वो वापस आये तो उन्हे भुलक्कड कहेते है !

महाराष्ट्र भाजपा फुटण्याची चिन्हे. महाविकास आघाडीसाठी सुखद बातमी
नवीन Submitted by सचिन पगारे on 5 December, 2019 - 14:24
>>

भाजपाचे सोडा, शिवसेनेला गळती लागली सुद्धा.

मुंबईतील ४०० शिवसैनिकांनी आज भाजपामधे प्रवेश केला. कॉंग्रेसी नेते-समर्थकांची, कॉंग्रेस पक्षनेतॄत्वाचे पाय चाटण्याची संस्कॄती आम्हाला मान्य नसल्याने आम्ही भाजपमधे प्रवेश करतोय असे त्या शिवसैनिकांनी माध्यमांना सांगितले.

>>> महाराष्ट्र भाजपा फुटण्याची चिन्हे. महाविकास आघाडीसाठी सुखद बातमी >>>

माझ्यासारख्या भाजप समर्थकासाठी सुद्धा ही सुखद बातमी आहे. फडणवीसांनी गावभरचा कचरा गोळा करून भाजपत आणला. हा कचरा स्वत:हून बाहेर जाणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या सर्वांनी आपल्याबरोबर फडणवीसांना सुद्धा घेऊन जावे.

माझ्यासारख्या भाजप समर्थकासाठी सुद्धा ही सुखद बातमी आहे. फडणवीसांनी गावभरचा कचरा गोळा करून भाजपत आणला. हा कचरा स्वत:हून बाहेर जाणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या सर्वांनी आपल्याबरोबर फडणवीसांना सुद्धा घेऊन जावे.>>>>

पण फडण२० कोण का घेईल पक्षात?एनसीपी वाले पार्टीत घ्यायला तयार असते तर फडण२० धावत धावत गेले असते.

>>> NCP च्या नख्या बाहेर! >>>

सेनेला शेवटी पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, वन अशा अत्यंत महत्त्वाच्या खात्याची मंत्रीपदे मिळतील असं दिसतंय.

ही अभूतपूर्व पॅसेंजर 'खाते' स्टेशनवर अडकून पडलेली दिसते.. १० रू च्या थाळीतलं काय काय व कुणि खायचं हे ठरवायला किती तो वेळ.
बरोबर आहे म्हणा साहेबांनी वदनी कवळ घेता म्हटल्याशिवाय पंगत काही सुरू होत नाही. तर दादांनी तीर्थ दिल्या शिवाय कुणि घास घेऊ शकत नाही. ते होते ना होते तोच मॅडम 'थँक यू गॉड' अशी प्रेयर म्हणायला लावतात'.. आणि आता सुरू करावे तर 'भाई' लोग शरबत, कीशमीश शिवाय बिस्मिल्लाह करू देत नाहीत... १० रू च्या खाते वाटपासाठी किती तो ऊपद्व्याप!
डरकाळी तर सोडा ढेकर द्यायला पण वाघोबा ची कुचंबणा होते आहे. Proud

>>>>डरकाळी तर सोडा ढेकर द्यायला पण वाघोबा ची कुचंबणा होते आहे <<<<<<

खरच ,
महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण मिळालेल आहे !!
Biggrin

अरेरे, किती ती उठाठेव NRI उपऱ्यांना. Wink

Submitted by Filmy on 13 December, 2019 - 21:42. >>

जाऊदे भावा, एवढं मनाला लावून घेऊ नको, असतात अमर्त्य सेन , रघुराम राजन, आताचा तो कोण बॅनर्जी की चटर्जी याच्यासारखे उपटसुंभ एन आर आय, ज्याना गरज नसताना भारताची उठाठेव करायची असते..

>>> जाऊदे भावा, एवढं मनाला लावून घेऊ नको, असतात अमर्त्य सेन , रघुराम राजन, आताचा तो कोण बॅनर्जी की चटर्जी याच्यासारखे उपटसुंभ एन आर आय, ज्याना गरज नसताना भारताची उठाठेव करायची असते.. >>>

माबोवरील अनिवासी भारतीय सुद्धा नक्राश्रू ढाळत असतात.

आता महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या परिस्थितीला एक अभूतपूर्व वळण मिळालेले आहे. कॅब ला महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये यासाठी काँग्रेस ने मुख्यमंत्र्यांना गळ घातलीय.

आता शिवसेनेची गोची झालेली असून राऊत या विषयावर पुढची पत्रकार परिषद घेऊन काय बोलतो ते पाहणे मनोरंजक असेल..

बोलतो? एकेरी??
सन्मानित खासदार आहेत ते.

सन्मानित खासदार आहेत ते.

Submitted by पुरोगामी गाढव on 14 December, 2019 - 17:39 >>

,इथे पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत कशा प्रकारच्या कॉमेंट मारल्या जातात हे तुला माहिती नाही काय श्रीयुत द्युआयडी? कशाला वेड पांघरून पेडगावला जातोस?

>>> कॅब ला महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये यासाठी काँग्रेस ने मुख्यमंत्र्यांना गळ घातलीय. >>>

नागरिकत्व, पारपत्र, लष्करी धोरण, परराष्ट्र धोरण इ. विषयींचे कायदे व धोरण केंद्रीय असते. राज्यांना या विषयात अधिकार नसतो. नागरिकत्व देणे किंवा न देणे हा राज्याचा अधिकार नाही. त्यामुळे CAB या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा अधिकार कोणत्याही राज्याला नाही.

अनिरुद्ध मराठे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं खुलं पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच फिरतेय

मा.देवेंद्र फडणवीस

आपणास हे एक पत्र. आपण वाचाल न वाचाल ईश्वरास ठाऊक पण मी माझे काम करतो आहे!

स.न.वि.वि.

सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन , आपली विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली म्हणून! तसेच “मी परत येईन, मी परत येईन” असा कंठशोष आपण केलात पण या स्वरुपात “परत येईन” असे तुम्हालाच काय पण मला पण स्वप्नात देखील वाटले नव्हते.

पण झाले ते चांगले च झाले. पण असे का झाले ह्याचा विचार देखील आपण करायला पाहिजे.

भाजप च्या पराभवास (होय पराभव! तुम्ही उगाच स्ट्राईक रेट वगैरे बोगस गोष्टी बोलत राहता पण त्या बोगस आहेत हे शेंबडा पोर देखील सांगेल!!) कोणती कारणे आहेत याचा विचार तुम्ही करावात अशी इच्छा आहे पण आपण तो करताना दिसत नाही म्हणून मी च तुम्हाला मदत करतो.

हा भाजपचा पराभव कसा हे हे सर्वप्रथम आपण बघू. शतप्रतिशत भाजप ही आपली आणि अमित शहांची घोषणा होती पण तरीही लोकसभेला आणि विधानसभेला आपण शिवसेनेशी युती करायला गेलात हा पहिला पराभव. कारण शिवसेनेशी आपण युती करता याचाच अर्था या युतीशिवाय सत्तेचे गाजर खायचं सोडा पण दिसणार पण नाही याची स्पष्ट जाणीव आपल्याला होती म्हणून हा पराभव!

निवडूक काळात आपण जी मेगाभारती केलीत. हा दूसरा पराभव! मेगाभरतीत कोणते नमुने आपण घेतलेत ते जरा बघू. पद्मसिंह पाटील आणि त्यांचा मुलगा, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा, बबनराव पाचपुते, नारायण राणे आणि त्यांचे दोन्हीही पुत्र ज्यातल्या एका पुत्राने तुम्ही नेतृत्व करीत असलेल्या प्रशासनाच्या अधिकार्‍याची धिंड काढली होती! राधाकृष्ण विखे पाटील जे गेली 4 वर्षे विरोधी पक्षनेते होते आणि ज्यांनी गेली 4 वर्षे सभागृहात आपला विरोध केला!

मेगाभारती हा पराभव अशासाठी होता कारण मेगाभारती मधून दोन गोष्टी शाबीत झाल्या की या कोंग्रेसी नेत्यांच्याशिवाय आपण निवडणूक लढवू शकत नाही – म्हणजेच भाजप चा महाराष्ट्रात विस्तार फार च मर्यादित आहे नि एका विशिष्ट समहाच्या पुढे हा पक्ष जात नाही. जायचे असेल तर लोक आयात करायला लागतात. दुसरी गोष्ट ही की सत्ता समोर आली की साधन शुचिता गेली तेल लावायला हे भाजप चे धोरण आहे. येन केन प्रकरणे सत्ता पाहिजे बाकी काहीही नाही. हे आपण सिद्ध केलेत

नंतर प्रचारा मध्ये आपली जी भाषा होती ती भाषा म्हणजे अजून एक पराभव होता. आमच्यासमोर विरोधी पक्षाचा पैलवान च नाही, पवार पॅटर्न संपला, पवार म्हातारे झाले (असे च तुम्ही म्हणालात असे नाही पण अनेक विधाने अशी होती की ज्याच्यातून तुम्ही हे च म्हणत आहात असे स्पष्ट जाणवत होते) निवडणुकीनंतर वंचित चा विरोधी पक्षनेता होणार अशी विधाने जी तुम्ही केलीत ती अहंकार युक्त, उर्मट, मदा ने भरलेली आणि एखाद्या उन्मत्त हत्तीने जसा आरडा ओरडा करावा अशी होती. तुम्ही इतके उद्धट आणि अहंकारी असाल याची माला कल्पना नव्हती. “विद्या विनयेन शोभते” असे जसे म्हणतात त्याच प्रमाणे “सत्ता विनयेन शोभते” हे देखील खरे आहे. एकीकडे तुमचे नायक मोदी मी जनतेचा नोकर आहे असा मानभावी आव आणतात आणि दुसरीकडे आपण एवढ्या अहंकाराने जनतेत प्रकट होता – याची सांगड घालायची कशी? 15 वर्षे सत्तेत राहिल्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक जसे माजले होते ना अगदी तसेच तुम्ही 5 वर्षांच्या सत्तेत माजलात. आपले जे वर्तन होते त्यानी मला कुटुंबात एखादा लाडावलेला मुलगा असतो ना जो काहीही बरळतो, कसाही वागतो त्याची आठवण झाली! बाकी तुम्ही भाजप मधले लाडावलेले मुल आहात यात काहीही शंका नाही. ज्याप्रमाणे आपण एकनाथ खडसे यांच्या सारख्या नेत्याशी वर्तन केलेत – त्यांचा जसा पत्ता कट केलात हे बघून मला तरी असेच वाटते की आपण भाजपात फार लाडवलेले आहात पण त्यामुळे लडवलेला मुलगा जसा कसलाही पाचपोच नसलेले वर्तन करतो तसे आपले वर्तन होते! हा अजून एक पराभव.

निवडणुका झाल्यावर 30 वर्षे ज्यांची साथ होती अशा शिवसेनेबरोबर आपले जे वर्तन होते ते तर एक राजकरणी म्हणून आपला मोठा पराभव होता. माझे स्वत:चे असे म्हणणे आहे की “politics is an art of possibilities!”

समर्थ रामदास राजकराण या समासात म्हणतात

“मुख्य हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || जाणावे परांचे अंतर | उदासीनता निरंतर | नीतीन्यायासी अंतर | पडोच नेदावे || उपाधीसी विस्तारावे | उपाधीत न सांपडावे | नीचत्व पहिलेच घ्यावे | मूर्खपण || तरहे (tarhe) भरोच नये | सुचावे नाना उपाये | नव्हे तेची करावे काये | दीर्घ प्रयत्ने ||

आता आपल्या सत्ता संपदानाच्या राजकरणात यातली नेमकी कोणती गोष्ट होती?

आपण ज्या मातृसंस्थेतून आलात त्या संस्थेविषयी असे म्हटले जाते की तिथे काम करणारे लोक देशासाठी, हिंदूंसाठी, राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करतात पण आपण अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा त्याग करायला तयार नव्हतात? आपण गणवेश घालून दसर्‍याच्या संचलनात सहभागी होता पण त्याग वगैरे या गोष्टी कुठेच दिसत नाहीत! आणि हे केवळ 5 वर्षांच्या सत्तेनंतर? 70 वर्षे सत्तेत असता तर काय केल असत?

शिवाय आपली ही वर्तणूक मित्रा पक्षाबद्दल ज्याच्या बरोबर आपण 30 वर्षे घरोबा केलात मग इतरांचे काय?

त्याच्यानंतर जेव्हा आपण अजित दादांबरोबर गेलात तो म्हणजे निर्लज्जपणाचा कळस होता! ज्यांच्यावर आपण भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, ज्याच्या विरुद्ध आपण गाडीभर पुरावे देणार होतात त्यांच्या बरोबर सत्तेची शय्या सजवताना मनाला जरा ही लाज वाटली नाही? आणि ते ही सगळं चोरी छुपे? आता काय तोंडांनी आपण विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात बोलणार आहात?

ते औटघटकेच सरकार पडल्यावर खरे तर आपण असे म्हणायला हवे होते की “माझी चुक च झाली – असे करायला नको होते!” असे म्हटले असते तर लाज थोडी बहुत वाचली असती पण आपण पत्रकार परिषदेत म्हणालात की आम्ही पक्ष फोडा फोडीत नाही. काय बोलताय? जनता एवढी मूर्ख आहे असे समजलात की काय?

त्यानंतर आपले विधांनसभेतले वर्तन पहिले “रेटून न्यायचय का?

रेटून न्यायचय का? रेटून न्यायचय का? मग मी बाहेर जातो!” आपण विधान सभा अध्यक्षांशी बोलत होतात. आपण माजी मुख्यमंत्री आहात आणि विरोधी पक्षनेते आहात वास्तविक आपण बोलायला उभे राहिल्यावर सभागृह आपोआप शांत झालं पाहिजे एवढा नैतिक वचक आपण निर्माण केला पाहिजे. याउलट आपले वर्तन लपाछपित सतत राज्य येणारा पोरगा जसा बालसुलभ भांडण करून ओरडतो तसे वाटले. निदान आपण माजी मुख्यमंत्री आहात याचे तरी भान असू देत की!

आपले वर्तन अत्यंत बालिश आहे “अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय” असे बालिश बोलणे या सभागृहाने पाहिले आणि त्यावर कितीतरी लोकांनी आपली खिल्ली उडवली पण आपण काहीही शिकलेले दिसत नाही!

काय कारण असावे याचे? माला तरी केवळ एक च कारण दिसते आणि ते म्हणजे आपण भाजप चे लाडावलेले बालक आहात त्यामुळे तुमचे सगळे बालहट्ट, सगळ्या बालिश क्रीडा भाजप च्या नेतृत्वाकडून खपवले जात आहेत.

पण जनता बिनडोक नाही – आशा आहे की जसे आपण वयाने वाढला आहात तसेच वर्तणूकीने, बोलण्या चालण्याने पण मोठे व्हाल! शुभेछा!

तळटीप – आत्तापर्यंत महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री सत्तेवरून पायउतार झाले त्यातील सर्वात “hated” मुख्यमंत्री आपण आहात याची देखील जाणीव असू दे!

– अनिरुद्ध मराठे

इथे पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत कशा प्रकारच्या कॉमेंट मारल्या जातात हे तुला माहिती नाही काय श्रीयुत द्युआयडी? >>> मला काय माहीत ? मी काय इथे पडीक असतो का ? मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांच्याबद्दल तसे उल्लेख वाचले होते. पण खूप वर्षांपूर्वी. तेव्हां तरी कुणी आक्षेप घेत नव्हते. तुम्ही काय नावाने होता त्या वेळी मला माहीत नाही.

<< मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांच्याबद्दल तसे उल्लेख वाचले होते. पण खूप वर्षांपूर्वी. तेव्हां तरी कुणी आक्षेप घेत नव्हते. तुम्ही काय नावाने होता त्या वेळी मला माहीत नाही. >>

----- मनमोहन सिंग, सोनिया गांधी... किंवा राहुल, प्रियांका यांच्याबद्दल काहीही (जर्सी गाय, मंद बुद्धी, पप्पूबुद्धी, जोकर), चिदंबरम बद्दल लुंगी... (सुटणे) असे लिहील्यावर आक्षेप नसतोच...

यांना विचारांचा सामना करता येतच नाही.... मग व्यक्तीगत टिका हा एव्हढा एकच पर्याय शिल्लक रहातो.

देश बदल रहा है, सोच बदल रही है....

>>> यांना विचारांचा सामना करता येतच नाही.... मग व्यक्तीगत टिका हा एव्हढा एकच पर्याय शिल्लक रहातो. >>>

बरोबर, म्हणून तर मोदींचा एकेरी उल्लेख, त्यांच्या पत्नीबद्दल गरळ ओकणे (ज्याची बायको त्याला सोडून गेली होती तोच ही गरळ ओकत असतो), टरबूज असे उल्लेख होतात.

मोदींच्या बायकोबद्दल कुणी गरल ओकली ?

मला विठ्ठलपंत व 4 संत ह्यांच्यापेक्षा रुक्मिणीबाई जास्त आदरणीय आहे, तसेच मोदीपेक्षा जसोदाबेन,
जसोदाबाईंनी स्वतःचे दुःख पचवले, शिक्षिकेची नोकरी करून शेकडो मुलांना स्वतःची मुले मानले, त्या अगदी सन्मानिय व्यक्तिमत्व आहेत.

घर सोडून हिमालयात फाफलणारे आम्हाला अप्रिय आहेत व अप्रियच राहातील.

देश बदल रहा है, सोच बदल रही है....

नवीन Submitted by उदय on 14 December, 2019 - 22:07 >>>

इसीलिये काँग्रेस की अवस्था शोचनीय हो गयी है !

इथे पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत कशा प्रकारच्या कॉमेंट मारल्या जातात हे तुला माहिती नाही काय श्रीयुत द्युआयडी? >>> मला काय माहीत ? मी काय इथे पडीक असतो का ? मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांच्याबद्दल तसे उल्लेख वाचले होते. पण खूप वर्षांपूर्वी. तेव्हां तरी कुणी आक्षेप घेत नव्हते. तुम्ही काय नावाने होता त्या वेळी मला माहीत नाही.

Submitted by पुरोगामी गाढव on 14 December, 2019 - 19:53 >>>

अरेरे , हल्लीच जन्म झालाय का मित्रा तुझा? मग खून से सने हाथ, मौत का सौदागर वगैरे वगैरे ऐकलंच नसेल नाही का?

घर सोडून हिमालयात फाफलणारे आम्हाला अप्रिय आहेत व अप्रियच राहातील.

Submitted by BLACKCAT on 14 December, 2019 - 23:08. >>>

ते एकवेळ परवडलं भावा, जे काही त्रास होते ते त्यांच्या कुटुंबियांना झाले.

इथे तर असले जबराट लोक होते ही ते सरळ बंगाराम बेटांवर फाफलायला जायचे ! वर एक विमानवाहू नौका, पाणबुडी, त्यांच्या संरक्षणासाठी काही विनाशिका , परदेशी दारू, परदेशी नातेवाईक, परदेशी मित्र एव्हढा लवाजमा घेऊन जायचे !

एका शहरात विषारी वायूमुळे मेलेल्या लोकांना मारण्यास जबाबदार असणाऱ्याला तर त्यांनी हेलिकॉप्टर मधून फाफलायला नेले !

ते तुला प्रिय असतील नाही का?

विरोधी पक्ष झोपले होते का , ह्या आगबोटी बुडताना अन विमाने उडताना ?
तुमचे दोन खासदार काय गांजा मारून निजले होते ?

Pages