महाराष्ट्रातील राजकारणाला अभूतपूर्व वळण

Submitted by सचिन पगारे on 26 November, 2019 - 14:49

महाराष्ट्रातील राजकारणाने २०१९ मध्ये अभूतपूर्व वळण घेतले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. भाजपा ह्या सत्तेच्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकली गेली आहे.सर्वाधिक जागा जिंकून त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजीनामा दिला अवघे ८० तास ते मुख्यमंत्री होते हा ही एक विक्रमच त्यांच्या नावे नोंदला गेला.महाराष्ट्राच्या राजकारणा ने ह्या एक महिन्यात जे वळण घेतले ते सुखद आहे.तीन वेगळ्या विचारधारा असलेले पक्ष आज एकत्र येत आहेत.
ह्या साऱ्या सत्तंतराचे श्रेय हे पुढील व्यक्तींना जाते.

१: भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अत्यंत साध व्यक्तिमत्व असलेले उद्धव ठाकरे हे ह्या वेळेस अत्यंत आक्रमक मोड मध्ये होते.मुख्यमंत्री पद हे अडीच वर्षे देणार असाल तरच पुढील बोलणी होतील ह्या शब्दावर ते ठाम राहीले.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेच ह्या ध्यासाने त्यांनी ही लढाई लढली.अनेक चढउतार आले परंतु शेवटी त्यांनी विजय मिळवलाच. उद्धव ठाकरेंचे मनापासून अभिनंदन.

२:संजय राऊत. . युद्धात सेनापती ज्या तऱ्हेने किल्ला लढवतो त्या प्रकारे शिवसेनेची बाजू मांडण्याचा किल्ला संजय राऊत ह्यांनी लढवला.आपले प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडली.मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे, पवार साहेबांशी बातचीत, काँग्रेस नेत्यांशी बातचीत ह्या सर्व आघाडीवर ते अग्रेसर राहिले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ज्या प्रकारे लढत दिली ती अतुलनीय होती.आता त्यांचे पक्षप्रमुख, मित्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत.आज जी नेता निवडीची मीटिंग होती तेथे हा उद्धव ठाकरेंचा योद्धा मागे बसून आपले स्वप्न साकारत आहे त्याच्या समाधानात होता.खुद्द पवार साहेब आणि काँग्रेस नेत्यांनीही संजय राऊत ह्यांना श्रेय दिले.तर असे हे उद्धव ठाकरेंचे दिलदार जिवलग मित्र आणि सत्तास्थापनेच्या लढ्यात अतुलनीय कामगिरी करणारे संजय राऊत ह्यांचेही मनापासून अभिनंदन.

३:शरद पवार..महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही असा हा लोक नेता.पवार साहेब ह्या सत्ता नाट्य चे केंद्रबिंदू होते. ज्या वयात लोक दुखण्याने गपगार होवून निवांतपणे आराम करत असतात तेथे हा वयोवृद्ध नेता ही लढाई लढला.पवार यांचे युग संपले आहे, समोर पहीलवानच दिसत नाही अशी अहंकारी वक्तव्य त्यांच्याविरुद्ध वापरली गेली.दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्य टार्गेट पवार साहेबांना केले होते.पण हा विस्तावशी खेळ होता हे त्यांना कळेपर्यंत त्यांच्या हातून सत्ता गेली होती व त्यांचे हात पाय पोळले गेले होते.आपण ज्या विस्तावला थंड समजून त्यात हात घातला होता तो निखारा अजुन पेटता आहे हे समजेपर्यंत त्यांचे हात पोळून निघाले होते.शिवसेनेशी युती करावी म्हणून काँग्रेस सुरवातीला तयार नव्हती.पण पवार साहेबांनी ज्या कुशलतेने हा तिढा सोडवला ते राजकीय हुशारी चे एक अप्रतिम स्वरूप होते.नवीन सरकारचे मार्गदर्शक पवार साहेब ह्यांचे अभिनंदन

४:सोनियाजी गांधी..सोनियाजी ह्या सत्ता नाट्य मध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हत्या पण त्यांनी जो शिवसेनेशी युतीचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य असा होता.अजिबात घाई न करता सर्व आमदारांचे मत लक्षात घेवून त्यांनी हा निर्णय घेतला.जर सोनियाजी नाही म्हणाल्या अस्त्या तर हे सरकार अस्तित्वात येवू शकले नसते. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेले हे पावूल क्रांतिकारी ठरणार ह्यात शंका नाही.नवीन सरकारच्या संस्थापक सोनियाजी ह्यांचे अभिनंदन

४:अजित पवार...अजित पवार हे पक्ष सोडून भाजपा मधे गेले उपमुख्यमंत्री झाले ह्यांचं अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला.पण त्यांनी तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून पुन्हा स्वगृही परतले व फडणवीस सरकार कोसळले...आता हे सर्व खरे होते की घडवून आणले गेले होते ह्याची कुणालाच कल्पना नाही. मात्र ही घटना महाविका स आघाडीचे सरकार आणण्यात महत्त्वाची ठरली यात वाद नसावा..
५:देवेंद्र फडणवीस..फडणवीस ह्यांनाही महविकास आघाडीचे शिल्पकार म्हणावे लागेल.मॅच सुरू होण्या आधीच ते विजेत्यांच्या थाटात वावरत होते.राजकारणातील मॅच ही सरकार स्थापन झाल्यावर संपते हे ते विसरले. लंच टाईम पर्यंत १०५ ठिकाणी विजयी झाले बाकीचे प्रतिस्पर्धी अर्ध शतकापर्यंत पोहोचले मॅच आपणच जिंकलो ह्या भ्रमात ते होते. आपले १०५ नी शिवसेनेचे ५६ मॅच तर आपणच जिंकलो. मात्र लंच नंतर उद्धव ठाकरे गुगली टाकू लागले तर संजय राऊत बाऊन्सर .त्यांचा सामना करताना त्यांची त्रेधातिरपीट उडाली.त्यात जोडीला पवारही येवून बाऊन्सर तर काँग्रेस गुगली टाकू लागली. चहापान झाल्यावर मात्र चित्र पालटले अजित दादां ची विकेट त्यांच्या हाती लागली जल्लोष झाला विजेत्यांच्या कप हाती लागला.मात्र दुर्दैवाने तो नो बॉल निघाला अजित दादांची विकेट शाबूत होती.बाजूच्या खुर्चीवरचा कप गायब झाला होता .कोपऱ्यात तो कप हातात घेवून उद्धव ठाकरे हसत होते बाजूलाच राऊत आणि पवार साहेब होते. थोडक्यात देवेंद्र साहेबांनी शिवसेनेची न्याय्य मागणी पुरी केली असती तर आज माहाविकास आघाडी अस्तित्वातच आली नसती.

तर महा विकास आघाडीच्या ह्या पाच ही शिल्पकरांच महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच असे सुखद वळण दिल्याबद्दल अभिनंदन

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तोरसेकर असे म्हणाले का गोळीबार, बॉम्ब स्फोट करून हत्या करा?
मला हे खरं वाटत नाही. भाऊ तोरसेकर सत्य लिहितात. वास्तवाकडे लक्ष वेधण्याचे ते काम करतात.

तूम्ही शहानिशा करा. तोरसेकरांच्या फेसबुक पेजवर किंवा ब्लॉगवर कुणी तरुणानं तशी कमेंट केलेली असू शकेल.

काहीही असो,

नवा गुरुजी अन नवा नथुराम नको,

ते काळच ठरवत असतो. सटवीनं बालपणीच लिहून ठेवलेले असते असं म्हणतात.
आपण फक्त बघायचं कोण महात्मा नी
कोण नथूराम आहे ते? आपल्या हातात काय आहे?

जमोप्या,
वुहान मधल्या मुसलमान पाकीस्तान्यांना बाहेर काढायच कधी बघताय ?

भाऊ तोरसेकरयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही? पण पंतप्रधानांना काठीने मारू वगैरे बोंबलाणार्या रा गा ला आहे?

वॉर्डबाॅय!

अब्यास कमी पडतोय, अब्यास वाढवा !!

मारू

कुठे लिहिले तेवढे दाखवा

नवीन Submitted by BLACKCAT on 9 February, 2020 - 10:32 >>>

याचीच वाट बघत होतो... आता भाऊ तोरसेकर यानी बॉम्ब गोळ्या वगैरेच्या वार्ता कुठे केल्यात ते दाखवून दे , मग मी सुद्धा सांगतो राहुल मारू असं कधी म्हणाला ते...

ते ज्याने व्हिडीओ केला आहे व तक्रार केली आहे , त्यांना विचारा,

आणि आता रीतसर पोलीस केस झाली आहे तर पुढची बातमी येण्यापर्यंत सबर करू

चला blackcat यांची शेपूट म्यान झालेली आहे.

तोपर्यंत आपण रा गा बद्धल बोलू. रा गा हा काँग्रेसचा युवा नेता आहे असे किती लोकांचे मत आहे?

राहुल युवा नाही असे कुणाचे मत असेल तर युवक काँग्रेस नावाची फांदी अस्तित्वात आहे की नाही हे सांगावे.

>>> राहुल युवा नाही असे कुणाचे मत असेल तर युवक काँग्रेस नावाची फांदी अस्तित्वात आहे की नाही हे सांगावे. >>>

राहुल युवा नाही. तो फक्त ५० वर्षांचा अजाण बालक आहे.

तिथे कंसराजने सोईस्कर रीत्या श्री मोदीजींवर ठपका ठेवलाय की त्यांनी (श्री मोदीजींनी) फारुख अब्दुल्लावर चुकीच्या माहीतीच्या आधारे दोष दिला !
३७० कलम निरस्त केल्यावर फारुख अब्दुल्लानीं काय काय बोललेले आहे त्याचे बरेच व्हीडीयो उपलब्ध आहेत. फारुख अब्दुल्ला ३७० कलम हटवण्याच्या विरुद्ध आहेत व हा विरोध त्यांनी अत्यंत विखारी रुपात व्यक्त केलेला आहे !!
कंसराजच्या प्रतिक्रीये नंतर लगेच ढोंगी विजय कुलकर्णी सक्रीय झाले ! पण ह्या सगळ्या ढोंग्यांकडे CAA तसेच ३७० कलम काढण्याला त्यांचा विरोध का ह्याच समर्पक उत्तर नाही !!

Biggrin

राहुलजी गांधीजी हे टाईम ट्रॅव्हलर आहेत. ते वय वाढलं की टाईम मशीनमध्ये बसून भूतकाळात जातात आणि तरुण राहुलजी गांधीजींना वर्तमानकाळात पाठवतात. यामुळे ते कधीच म्हातारे झालेले आपल्याला दिसणार नाहीत. यामुळेच ते भारत देशाचे युथ आयकॉन आहेत.

श्री. लक्ष्मीकांत मोहन खाबिया यांनी ठाणे अंमलदार शिवाजीनगर पोलिस ठाणे यांना पाठविलेल्या गोपनिय तातडीच्या तक्रारीची प्रत मायबोलीवर प्रकाशित करणार्‍या काळबोकोबांवर कारवाई करणेत यावी.

सहमत

त्या पत्रात सुरुवातीपासुन शेवटपर्यंत मिळुन चार वेगवेगळे फॉन्ट व तीन वेगवेगळ्या साईज का बरे वापरल्या असतील?????

https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-ashok-chavan-on-donat...

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

Pages