कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.
★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)
मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!
१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★
इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2
धागा संपादित करण्याची मुदत
धागा संपादित करण्याची मुदत मागच्या संपादनाच्या वेळेपासून पुन्हा मोजली जाते असं वाटतं.
.
@भरत - नाही.
@भरत - नाही.
आता २ तासात धागा संपादन करता येणार नाही.
माझ्याकडे लुचाई नाही आहे .
माझ्याकडे लुचाई नाही आहे .
संक्रमण कालच वाचुन संपवल.
VB तुमच्या प्रतिसादाला अनुमोदन..
संक्रमण कालच वाचुन संपवल. कादंबरीचा फ्लो संथ असला तरी वाचकाला खिळवुन ठेवणारा आहे. कादंबरीच्या शेवटी उगाच फिलर आहेत जे नसले तरी काही फरक पडला नसता.
रेटींग 3 and half stars
Please put up all five star
Please put up all five star rated novels in the new thread in a list format.
द्वैत-
द्वैत-
द्वैत हे पुस्तक वाचण्याचा मला धीरच होत नव्हता. एक म्हणजे मागच्या दोन्ही पुस्तकानी निराशाच केली होती, आणि दुसरा म्हणजे द्वैतात अर्थ मी देवा धर्माशी लावत होतो, द्वैत अद्वैत शक्तींचा सामना वगैरे....
पण द्वैत हे पुस्तक पूर्णपणे वेगळं निघालं. एकाच माणसाची होणारी दोन रूपे म्हणजे द्वैत.
हे पुस्तक Strange Case of Dr Jekyll and Mr Hyde
या Robert Louis Stevenson च्या पुस्तकावर बेतलेलं आहे, असं मला जाणवलं.
एक गावात मास्तरांचा खून होतो. त्या खुनाच्या तपासाची जबाबदारी इन्स्पेक्टर सावन्त यांच्यावर येते, आणि या तपासात दोन व्यक्तींवर तपासाची सुई फिरते, एक म्हणजे डॉ. पटवर्धन आणि दुसरा म्हणजे एक रहस्यमय बुटका.
पुस्तकाची कथा अतिशय मस्त रंगली आहे. कथा थोडीशी संथपणे चालते, पण पुढील गोष्टी समजून घेण्यासाठी ते आवश्यक वाटतं. पुस्तकात रहस्य आहे रोमांच आहे. मात्र ही भयकथा अजिबात नाही.
रेटिंग - ★★★
@VB - तुम्ही स्वाहा, सैतान,
@VB - तुम्ही स्वाहा, सैतान, लुचाई किंवा काळी जोगतीण, यांपैकी कोणतंही वाचा!
कादंबरीच्या शेवटी उगाच फिलर
कादंबरीच्या शेवटी उगाच फिलर आहेत जे नसले तरी काही फरक पडला नसता.>>> अगदी अगदी मन्या S, याउलट जर श्रीकांत हे पात्र न दाखवता, श्यामलाबाई स्वतः लढा देऊन वाचतात असे अन इतकेच दाखविले असते तर कदाचित अजून चांगला शेवट झाला असता असे मला वाटते.
रच्याकने, कोणीतरी धारपांचे खरंच घाबरवणारे पुस्तक सुचवा ना रात्री वाचायला
धन्यवाद अज्ञातवासी, स्वाहा
धन्यवाद अज्ञातवासी, स्वाहा वाचून झाले छान आहे पण भिती नाही वाटली. सैतान वाचेन मग, तुम्ही त्याला ६ स्टार दिलेत म्हणजे चांगले असावे☺️
अरे हो, अजून एक
अरे हो, अजून एक
VB तुम्ही आभास मधील पहिली कथाही वाचू शकतात, तळघरातल्या म्हाताऱ्याची!
स्वाहा वाच व्हीबी.
स्वाहा वाच व्हीबी.
घाबरशील अशी नम्र अपेक्षा आहे ☺️☺️
अनु☺️
अनु☺️
स्वाहा वाचून झाली, प्रचंड आवडली पण भिती नाही वाटली.
माहित नाही परत असा योग येईल की नाही म्हणून मला आज रात्री मी एकटी असताना अंधारात एखादी भयकथा वाचायची आहे, भिती एन्जॉय करायची आहे, पण इतक्या भयकथा वाचून झाल्यात की भिती वाटतच नाही हल्ली
श्यामलाबाई स्वतः लढा देऊन
श्यामलाबाई स्वतः लढा देऊन वाचतात>>> >> >> हाच विचार कादंबरी वाचुन झाल्यावर मनात आला होता.
बादवे देवाज्ञा वाचलेल तेव्हा पुस्तकात दोन प्रसंग रिपीट छापले गेले आहेत.
अज्ञातवासी, ok बघते वाचून
अज्ञातवासी, ok बघते वाचून आभास
व्हीबी तुझी भीती वाटायची
व्हीबी तुझी भीती वाटायची ग्रंथी खूप हॉरर वाचून पाहून रेझिस्टंट झाली आहे इन्सुलिन रेझिस्टन्स सारखी ☺️☺️
काही दिवस साने गुरुजी आणि वि.स.खांडेकर आणि व.पु.काळे चे स्टेडी डायट घे.
कुणी मला सान्गू शकेल का,
कुणी मला सान्गू शकेल का, तुम्बाड चित्रपट धारपान्च्या कुठल्या कथेवर घेतला होता?
दोन कथांमधली 10% कल्पना आणि
दोन कथांमधली 10% कल्पना आणि बाकी सर्व कथा राही यांची.
कथा
बळी
यात एका प्राचीन बळदात मानवी बळीची प्रतिकृती(रक्त म्हणून गुलाल, आणि कणिक देह म्हणून) अर्पण करून सोन्याची नाणी मिळत असतात.यात लोभाने चुकीच्या प्रकारे एक माणूस जीव गमावतो
आजी
तरुणपणी काही अघोर पंथीय गोष्टी केलेली आजी बेड रिडन असते.एका लहान मुलाला तिच्याबरोबर एक संध्याकाळ एकटे राहावे लागते आणि हस्तर चे नाव आठवत नाही.
तुंबाड ही राहींची कथा आहे.त्यात इतरांचे इलेमेंट फक्त 10% आहेत आणि योग्य क्रेडिट दिलेले आहे.
चर्चा अजुन वाचली नाही सगळी.
चर्चा अजुन वाचली नाही सगळी. ही ई पुस्तक रूपात मिळतील का विकत?
धन्स अनू.
धन्स अनू.
सैतान आज वाचून झाली, भितीही
सैतान आज वाचून झाली, भितीही नाही वाटली अन इतकी आवडली पण नाही. सुरुवात ठीक मग बोर मग मध्येच एकदम भारी अन शेवटी फुसका बार अशी वाटली मला.
अर्थात हे माझे मत,
धारपांचे सर्वाधिक आवडलेले पुस्तक म्हणजे स्वाहा, सध्या तरी याच्या जवळपास देखील दुसरे पुस्तक सुचतच नाहीये.
आता फ्रांकेस्टाईन वाचायचा विचार आहे
रच्याकने, इथे कुणाला
रच्याकने, इथे मला कोणी कचकड्याची बाहुली म्हणजे काय सांगेल काय
पूर्वी मिळायच्या त्या
पूर्वी मिळायच्या त्या बाहुल्या
काच आणि अन्य गोष्टी वापरून बहुदा चिनी मातीच्या सुद्धा असतील
पण त्यामुळे अगदी नाजूक आणि शोभेच्या
त्यांच्याशी खेळता येत नसे म्हणून हा वाक्प्रचार आला
मी किंडल अनलिमिटेड चा फायदा
मी किंडल अनलिमिटेड चा फायदा घेत दणदण धारप वाचून काढतोय
काळी जोगीण, ग्रहण, वेडा विश्वनाथ, लुचाई, स्वाहा आणि फ्रांकेसताईन वाचून झाली
धन्यवाद आशुचँप
धन्यवाद आशुचँप
मी किंडल अनलिमिटेड चा फायदा घेत दणदण धारप वाचून काढतोय >>> तेच तर बरीच पुस्तके किंडलवर विकत घेतल्यावर आता ती किंडल अनलिमिटेड वर फ्री दिसतायेत
मला स्कीम मध्ये 79 ला तीन
मला स्कीम मध्ये 79 ला तीन महिने ऑफर मिळाली
त्यामुळे भस्मासुर झाल्यागत पुस्तकांचा फडशा पडतोय
जी एकदोनदा वाचून मग नंतर स्वारस्य संपते अशा पुस्तकांना प्राधान्य
त्यामुळे सगळ्या थ्रिलर, हॉरर कथा संपवत आहे
७९ la 3 mahine kasa?? 1month
७९ la 3 mahine kasa?? 1month unlimited ch subscription 200 ahe na...ani tyavar sagli pustke available nahiyet na...
व्हीबी, सैतान कुठे मिळाली
व्हीबी, सैतान कुठे मिळाली?विकत घेतली असेल तर साईट किंवा दुकानाचा पत्ता देणार का?
७९ la 3 mahine kasa
७९ la 3 mahine kasa
दिवाळी ऑफर होती, पटकन उचलली
ग्रास वाचून काढलं . सहा सात
ग्रास वाचून काढलं . सहा सात कथा आहेत , त्यांचा एक पॅटर्न आहे . भीतीदायक आहेत . धारपांची टिपिकल शैली आहे . एकंदरीत पॉपकॉर्न घेऊन वाचावं इतपत पॅकेज आहे .
रेटिंग 3.५/५
आता कमीत कमी तीन महिने मी
आता कमीत कमी तीन महिने मी पुढील धागा काढणार नाही,
थोडं वेगळं वाचून पुन्हा धारपांकडे वळेन!!!!
Pages