विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yo

आफ्रिकेचं शेपूट चांगलंच वळवळतय की..
२०० पण करु नाही शकणार वाटत होतं.आता २२५-२३० पर्यंत जाणार असं दिसतंय..

अहो हे सगळे खूप श्रीमंत लोक आहेत. कामाची सवय नाही त्यांना.
दमली असतील मुलं. किती वेळ धावत होती, वाकत होती, कधी कधी पडत पण होती.

मी तर बघूनच दमलो, नि पाठहि दुखते असे वाटायला लागले.

बुमराह अफलातून ! चहलच्या पहिल्या दोन विकेट शेन वाॅरनलाही हेवा वाटावा अशाच !
कोहलीचा घेतलेवा झेल अप्रतिम!
द. आफ्रिकेला हा सामना जवळ जवळ ' जिंकू किंवा मरूं आसाच आहे. ते जिद्द पणाला लावणारच.
रोहितला लय गवसली कीं टीव्ही समोरून उठूं नये ! सुंदर !!

अरेरे धोनि चे काहीही कारन नसताना शेवटच्या बॉल पर्यन्त म्याच ताणायचे आणि शेवटच्या बॉलवर फिनिश करून मीच कसा तारणहार हे दाखवायचे स्वप्न तो बाद झाल्या ने भंगले. हार्दिक पंड्याने फटक दिशी धावा काढून म्याच जिंकली ही.

हुर्रे! जिंकलो!

I will say its a clinical finish
मिडल ऑर्डरबद्दल आता जरा भरवसा वाटायला लागलाय Happy

पांड्याचे शॉट्स कसले क्रिस्प होते. रोहितचे ही तेव्हढे वाटले नाहित. IPL मधला कॉन्फिडन्स दिसतो. त्याला एखाद्या मॅच मधे ३ वर वगैरे पाठवून बघायला हवे एक प्रयोग म्हणून.

मस्त झाली मॅच भारताची. आज फारशी पहायला नाही मिळाली Sad

आयपीएल फायनल आणी पुढची आंतरराष्ट्रीय मॅच ह्यात किमान १५ दिवसाचं अंतर असावं असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणी आयसीसीने त्याचा मान राखत भारताची पहिली मॅच आज ठेवली होती.

तिकडे बांग्लादेश विरूद्ध जिंकायला न्यूझिलंड ला १४ ओव्हरस मधे ६८ रन्स हवे आहेत.

*पांड्याचे शॉट्स कसले क्रिस्प होते. रोहितचे ही तेव्हढे वाटले नाहित. * रोहितचे कालचे अनेक फटके केवळ डोळ्याचं पारणं फेडणारे होते, हें आपलं माझं वैयक्तिक मत !!

काल रोहितचे पुल, लेटकट, आणि दोन स्क्वेअर ओफ द विकेट मारलेले ड्राईव्ह मस्त.. शम्सी ला मारलेला लाँग-ऑनचा सिक्स भारी. राहुलने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह.

तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटले असतील माझी कालची इनिंग पाहून अशी मी आशा करतो. तुम्हाला माहित आहेच मी वर्षातून एकदाच अशी इनिंग खेळतो त्यामुळे आता उर्वरित विश्वचषकात जास्त अपेक्षा ठेऊ नका. धवन, कोहली, पंड्या, बुमरा खेळतील आणि सामने जिंकवतील. आता माझी अशी इनिंग पुढच्या आयपीएल मध्ये बघा , धन्यवाद
- वर्षातून एकदा खेळणार आणि जिंकावणार अखिल भारतीय संघटनेचा अध्यक्ष रो-हिट शर्मा

हार्दिक पंड्याने ३ चौकार मस्त मारले हे खरंय... पण त्याची देहबोली अशी की ७०-८० करून एकहाती मॅच जिंकून दिली असावी... Uhoh
हा मला आयपीएलचा परिणाम वाटतो.

Pages