विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज परत पावसामूळे सामना गेला, बहुधा त्या बरोबर आफ्रिकेचे चान्सेस पण पूर्ण वाहून गेलो असे धरायला हरकत नाही.

किती गोंधळ. तो फा फे , फे फ नाही >> गोंधळ नाही, नावातल्या साधर्म्यामूळे तसे वाटते हे सांगायचा निष्फळ प्रयत्न होता.

किती गोंधळ. तो फा फे , फे फ नाही >> गोंधळ नाही, नावातल्या साधर्म्यामूळे तसे वाटते हे सांगायचा निष्फळ प्रयत्न होता.
>>मस्करीतच लिहिलेल हलकेच घ्या!

चुकीचा फोरम आहे पण युवी निव्रुत्त झाला. २००७ त २०११ मधे त्याने नि धोनीने घातलेला धुमाकूळ आठवला कि अजूनही मजा येते.

हा पावसाळी वर्ल्ड कप ९२ प्रमाणे होतो की काय? तेंव्हा पाक जिंकले होते.. ह्यावेळी तशी संधी आफ्रीकेला आहे...

धवन ३ आठवड्यांसाठी बाहेर.
म्हणजे आता राहुल ओपन करणार हे जवळपास नक्की. पण ४थ्या नंबरला कोण? विजय शंकर की डीके?
का स्टँडबाय प्लेअर्स मधून कुणाची वर्णी लागणार?

रायडूचा फॉर्म (डोमेस्टिक / आयपीएल/ आधीचे सामने) बघता त्याचं जाणं अवघड आहे.
धवन टीममधला एकमेव डेसिग्नेटेड लेफ्टी बॅट्समन असल्यानी पंतला डावरेपणाचा फायदा मिळू शकतो. पण न्यूझिलंड च्या मॅच च्या आधी तो पोचून, सेटल होणं शक्य नाही. (नंतरच्या सामन्यांच्यासाठी विचार करता येईल).

मला तरी वाटतंय की न्यूझिलंड सोबत चौथ्या नंबरला पांड्या ला खेळवून खाली जडेजाला आणातील.

माझ्या मते जडेजा अथवा विजय शंकरला संधी मिळेल. डीकेची शक्यता कमी वाटते... दोघांची गोलंदाजी जमेची बाजू दिसते आणि तीन यष्टीरक्षक खेळविण्यापेक्षा एक जादाचा गोलंदाज फायदेशीर ठरु शकतो.

*धवन ३ आठवड्यांसाठी बाहेर.* रिअल बॅड न्यूज ! डीके , अनुभवाच्या जोरावर आंत येण्याची शक्यता अधिक.

चहाल-कुलदीप जोडी आहे, शक्यतो तोडणार नाहीत. जडेजाची अशी जोडी अश्विन सोबत होती, पण तो गेला आता.
त्यामुळे जडेजाला आणालं तरी तिसरा स्पिनर म्हणून आणतील, दोनंच घेऊन खेळायचं असेल तर शंकर आत येईल.

(रच्याकने: शंकर अन जडेजा दोघंही परवा ऑसीज विरुद्ध सब्स्टिट्यूट फील्डर्स होते. त्यामुळे तसे मॅच माईंडसेट मधे आहेत.)

सगळ्यांना पंतच का हवाय ते कळत नाही. माझ्या मते पंत ह्या टीम मध्ये रिडंडंट आहे.
धोनी आणि पंड्या जे करू शकतात ते पंत पेक्षा फार काही वेगळं नाही. वरती विकेट पडल्या तर पंत त्याचा नॅचरल गेम खेळू शकणार नाही.
टॉप ऑर्डरने दोन तीन विकेट्सच्या बदल्यात चाळीस ओवर्समध्ये २००-२२० केले तर पिंच हिटर म्हणून पंड्या+धोनी आणि पंत फार काही वेगळे नाहीत. प्लॅटफॉर्म असेल तरच ते हिटर म्हणून ईफेक्टिव आहेत.
पण १०० वर ३ विकेट्स वगैरे स्कोर असेल तर मोठ्या पार्टनर्शिपसाठी कार्तिकच हवा. धोनी मधला ब्रिज आहे जो पार्टनरशिप आणि पिंच हिटिंग असे दोन्ही रोल पार पाडू शकतो.
धवनच्या गैरहजेरीत राहूल सलामीला,चार वर धोनी, पाच वर कार्तिक आणि पिच असेल तसे खाली कुलदीप, जडेजा वा शमी पैकी एक.
जाधवच्या जागेवर सुद्धा जडेजा किंवा शंकरचा विचार होऊ शकतो.

माझा अंदाज राहूल ओपनिंग ला येऊन खाली दिनेश कार्थिक खेळेल असा आहे. निव्वळ बॅटींग चा विचार करता तो ऑप्शन शंकर आणी जडेजा पेक्षा नक्कीच सुपिरियर आहे.

कविकल्पना: हँपशायर कडून कौंटी क्रिकेट खेळत असलेल्या रहाणे ला बोलावून घेतील का? Wink

मला वाटत नाही रहाणे आता पुन्हा कधीही भारताकडून लिमिटेड ओवर क्रिकेट खेळेल.
१५ चा कोटा पूर्ण करण्यासाठी कॅप्ड प्लेअर पैकी कोणाला बोलवायचेच झाले तर रायडू, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर ही नावे आहेत.
पैकी चार नंबरच्या जागेसाठी माझी पहिली पसंती अय्यर आणि दुसरी पांडेला.
धोनी आणि पंड्या दोघेही १५ मध्ये असेपर्यंत पंतचा नंबर लागणार नाही.

सगळ्यांना पंतच का हवाय ते कळत नाही. माझ्या मते पंत ह्या टीम मध्ये रिडंडंट आहे.
>>
बाकी कुणीही डावरा बॅट्समन नाही आपल्याकडे.

१५ चा कोटा पूर्ण करण्यासाठी कॅप्ड प्लेअर पैकी कोणाला बोलवायचेच झाले तर रायडू, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर ही नावे आहेत.
>>
रायडू अन पंत ऑफिशिअल स्टँडबाय आहेत त्यामुळे अय्यर अन पांडे ला चान्स मिळणार नाही मोस्टली...

मला वाटतं धवनचया ऐवजी कार्तिक एवढाच बदल होईल. क्रमांक 4वर कोण खेळेल हें खेळाच्या परिस्थितीवरून ठरवलं जाईल.
( * शंकर अन जडेजा दोघंही परवा ऑसीज विरुद्ध सब्स्टिट्यूट फील्डर्स होते. त्यामुळे तसे मॅच माईंडसेट मधे आहेत* - केदार जाधव तर ' पलेईंग इलेव्हन'मधे होता . मग त्याचा माईंडसेट तर अधिकच मजबूत असावा ! Wink )

भाऊ,
केदार खेळणारंच. पण समहाऊ त्याचा रोल ६-७ नंबरला फिनिशर म्हणून डिफाईन केल्यासारखा वाटतोय कोहली अन शास्त्रीबुवान्नी.
केदारला ४ वर खेळवणार नाहीत.

न्यूझिलंडच्या सामन्यासाठी माझी ११:
शर्मा, राहुल, कोहली, सर, धोणी, केदार, पंड्या, चहाल, भुवी, यादव, बुमरा

क्लीन बोल्ड होऊन देखिल विट्टी न पडल्याने फलंदाज बाद न झाल्याचे ५-६ प्रसंग झाले ह्या स्पर्धेत...

काय कारण असावे १३०- १४५ किमी वेगाने जाणारा चेंडू घालुन गेला वा आदळला तरी विट्ट्या नाही पडल्या??
माझे एक निरिक्षण यंदा त्रिफळा झालेल्या फलंदाजांच्या यष्ट्या तीन ताड उडताना दिसल्या नाहीत म्हणजे जास्त पक्क्या जमिनीत रोवल्या जात असाव्यात ज्या मुळे चेंडू यष्ट्यांवर आदळला तरी ज्या प्रमाणात विट्ट्याना हादरा बसायला हवा तो बसत नाहीयाणि त्यामुळे त्या पुन्हा जागच्याजागी स्थिरावतात.. असे काही असू शकेल का? तज्ञांनी ह्या न पडणार्‍या झगमगत्या विट्ट्यांवर प्रकाश टाकावा.....

पाकचा कांगारूविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय!
दोन्ही संघातील गेल्या १४ सामन्यात पाकने केवळ एक सामना जिंकला आहे.. तर कांगारूंनी १३

* क्लीन बोल्ड होऊन देखिल विट्टी न पडल्याने फलंदाज बाद न झाल्याचे ५-६ प्रसंग झाले ह्या स्पर्धेत...तज्ञांनी ह्या न पडणार्‍या झगमगत्या विट्ट्यांवर प्रकाश टाकावा* -
Because the bails are now witty ! Wink

>>Because the bails are now witty ! Wink

भाऊ, You are so मार्मिक Happy

क्लीन बोल्ड होऊन देखिल विट्टी न पडल्याने फलंदाज बाद न झाल्याचे ५-६ प्रसंग झाले ह्या स्पर्धेत...
>>>
झिंग बेल्स हलक्या असल्या तरी स्टंप्स सोबत कॉन्टॅक्ट रहाण्यासाठी स्टंप चे ग्रूव्ज डीप कट करतात, जेणेकरून नुसत्या हवेनी थरथरल्यामुळे दिवे लागू नयेत. पण आता तेच भावतंय.

Pages