विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामन्यात व्यत्यय आला कीं तज्ज्ञांच्या वायफळ चर्चेला ऊत येतो. काल एका तज्ञाने गंभीरपणे गंभीरला विचारलं, जर राहूल सलामीला आला तर पहिला strike कोण घेईल . मग गंभीर अधिकच गंभीरपणे म्हणाला, ' सिनीयर खेळाडू घेतो पण तसा नियम नाहीं. पण राहूल पहिल्यांदाच विश्वचषकात सलामीला येत असल्याने , रोहीतच पाहिला strikke घेईल. इ.इ.'
देवा, सामना नको, पण या तज्ञांना आवर !!

* एकंदरीत "रद्द "ड विश्वचषक होउन राहिला आहे बाप्पा!!!* -
रद्दड परवडला पण पावसामुळे तो 'डकवर्थ - लुईस' नांवाचा बेडूक अभद्र ओरडला तर आणखीनच वाट लागेल या स्पर्धेची !! Wink

पावसानंतरचा सामना बोल्ट, साउदी, फर्ग्युसन, हेन्री ह्यांच्या विरुद्ध खेळण्यापेक्षा मुकाट मिळालेला एक मार्क खिशात ठेवून पुढच्या फेरीवर लक्ष केंद्रित करावे.

पावसानंतरचा सामना बोल्ट, साउदी, फर्ग्युसन, हेन्री ह्यांच्या विरुद्ध खेळण्यापेक्षा मुकाट मिळालेला एक मार्क खिशात ठेवून पुढच्या फेरीवर लक्ष केंद्रित करावे. >> खेळून हरलो तरी चालेल की.... विश्वविजेते म्हणवून घ्यायचं असेल तर आधी खेळायला पाहिजे ना.

......म्हणजे, दोघांचीही झांकली मूठ एका पाॅईंटची !! Wink

तूं रोज इथे मस्त कांद्याची भजीं कर . मग कसला जातोय इंगलंडला तो पाऊस !!20190115_202619_0.jpg

भाऊ, कांदाभज्याची आहुती जठराग्नीला देऊन यज्ञ केला की पाऊस इथे पडेल आणि तिकडे ऊन! ही कल्पना भन्नाट आहे! Lol

ह्या रविवारी घरी आतापासूनच तयारी करायलाच हवी कांदाभजी यागाची! Wink

"तूं रोज इथे मस्त कांद्याची भजीं कर ."

भाऊ
त्या गृहिणीच्या हातात एक झारा दाखवायला हवा होता
म्हणजे मग पुढचं व्यंगचित्र साधारण असं असलं असतं

" मी भजी तळत बसलेय..आणी तुम्ही/ तू खुशाल सोफ्यावर बसुन पाय हलवत म्याच बघत बसलाय व्हय "

ठण्ण... झारा@नवरा

सुनीलजी, या रविवारी तरी ती आदर्श गृहिणी पतिदेवाला असं म्हणणं अशक्य ! त्या दिवशीच तर वटपौर्णिमा आहे !! Wink

वे. इंडीज वि. इंग्लंड-
मॅच होते आहे इतकंच नाहीं तर रंगतदार होण्याची दाट शक्यता आहे.
वे.इं. - 146-4 , 31 षटकं !

वेस्ट इंडीज परत एकदा, deceived to flatter मोड मधे गेले. रसेल अगदीच आयपीएल झिंदाबाद क्रिकेट का खेळतोय हे कळत नाहीये. ३३ ओव्हर्स मधे १६०/४ - खाली फक्त ब्रेथवैट (अगदीच नावापुरता) असताना पूरन आणी रसेल ने शेवटपर्यंत मॅच खेचली असती तर कदाचित २६०-२८० स्कोअर झाला असता - कदाचित २९०-३०० च्या सुद्धा जवळ जाऊ शकले असते. पण रसेल ने रशीद ला मारायला सुरूवात केली तिथेच धोक्याची घंटा वाजायला सुरूवात झाली. एक कॅच सुटल्यावर सुद्धा त्याने २ बॉल हवेतून भिरकावले. आणी पुढच्याच ओव्हर मधे पूल करताना बाऊंड्रीवर कॅच देऊन बसला. अगदीच अपरिपक्व!! आता बॉलिंग कशी करतात ते बघायचं. त्यातून इंग्लंड चे दोन बॅट्समेन इंज्युअर्ड आहेत.

रसेल अगदीच आयपीएल झिंदाबाद क्रिकेट का खेळतोय हे कळत नाहीये. >> खालावलेला फिटनेस आणि त्यामुळे शक्य होत नसलेला पेशन्स, ह्या दोन्हींमुळे पीचवर ऊभे राहून खेळणे त्याला जमत नाहीये. आणि पुन्हा थिन एज वर परफॉर्म करत राहण्यासाठी लागणारे आयपीएलचे फुल ऑफ एनर्जी वातावरण सुद्धा त्याला मिळत नाहीये.
ऊसका अब कुछ नहिइ हो सकता.

कधी कधी वाटतं की गेल-रसेल प्रभृतींमुळे होप, हेटमार, पूरन, होल्डर वगैरे सारख्या सिन्सीअर खेळाडूंचा खेळ वाया जातो. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे जेव्हा गेल-रसेल खेळूना जातात तेव्हा बाकीच्या खेळाडूंनी आधी सहा महिन्यात जे केलं नाही ते एका दिवसात जमवतात. अर्थात गेल आणी रसेल हे वेगवेगळ्या क्षमतेचे खेळाडू आहेत. गेल हा रसेल पेक्षा जवळ जवळ दहा वर्षांनी (वयानं) आणी १००+ टेस्ट्स नी मोठा खेळाडू आहे.

212 ऑल आउट ते ही 44.2 षटकात विंडीजला
फलंदाजी जमली नाही आणी गोलंदाजी पण

इंग्लंड 112-1 फक्त 100 हवेत जिंकायला !

रूट इतक्या सहज हूक व पुल शाॅट मारत असताना वे. इंडीज तेज गोलंदाज इतकी कल्पकता शून्य आंखूड टपयाची गोलंदाजीच करत राहिले. अर्थात, रूटचे स्क्वेअर व कव्हर ड्राईव्हजही द्रविडची आठवण करून देणारेच !
इंग्लंड निश्चितच खूप सरस व परिपक्व संघ !!

*.....हेटमार, पूरन, होल्डर वगैरे सारख्या सिन्सीअर खेळाडूंचा खेळ वाया जातो. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे ...* -
फेफजी , खूपच अर्थपूर्ण निरिक्षण. मलाही वाटतं कीं गेल व रसेल अत्यंत उपयुक्त असले, तरीही जेसन होल्डरचया तरूण व प्रतिभावान खेळाडूंच्या संघात ते कांहीसे outsidersच वाटतात. त्याचा परिणाम सांघिक कामगिरीवर होत असावा.

ऑसीज फाॅर्मात ! 80-1, 17 षटकं. ( मॅच होते आहे, हाच हल्ली दिलासा वाटतो ! )

<<< मॅच होते आहे, हाच हल्ली दिलासा वाटतो ! )>>>

खरंय....
नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना मे. डकवर्थ आणी लुइस यांचा विचार केला असावा लंकन कर्णधाराने !!!

इंग्लंडमधील हवामानाचे अंदाज तंतोतंत खरे ठरतात, हेंही खरंय.>.

उद्या खोटा ठरो अंदाज.... उद्या देखील पाऊस सांगितलायं....

Pages