विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ, असे करु नका!
१५ दिवसांत वेस्ट इंडीज सुरु होतेय. तेंव्हा क्रिकेटच्या नियमित धाग्यावर हवेच चर्चेसाठी. वर्ल्डकपचा शिमगा संपला तरी क्रिकेटची पंचमी सुरुच रहाणार! Wink

*भाऊ, असे करु नका!* - प्रचंड गैरसमज ! व्यचितली तंबी मुलगा व नवरा यांच्यासाठी आहे, मुलाच्या आजोबासाठी नाहीं ! तुम्ही जरी नको म्हणालात तरीही तुम्हाला इथे मला सहन करावं लागणारच आहे !! Wink

कालच्या ओव्हर थ्रो चे म्हणे आयसीसी नियमानुसार ५ धावा मिळायला हव्या होत्या (सायमन टफेल ह्या पंचांच्या हवाल्याने कुठेतरी बातमी वाचली) परंतु धर्मसेनाने ६ दिल्या... म्हणजे सामना टाय नव्हता...

"सायमन टफेल ह्या पंचांच्या हवाल्याने कुठेतरी बातमी वाचली) >> हो मीही तेच वाचले." - क्रिकिन्फो वर आहे. https://www.espncricinfo.com/story/_/id/27194046/umpires-made-error-judg...

५ रन्स आणी आदिल रशीद स्ट्राईक वर असा तो दावा आहे.

अनेक सामन्यात चूकीचे निर्णय ( DRS असूनही ) दिले जातात. पण सामन्याचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यावर ते उगाळत बसूं नये, असं मला वाटतं. नियमांच्या interpretationबद्दलचा भागही नंतर फार तांडला तर खेळाचा रसभंगच होण्याची शक्यता अधिक -

कालपासून ' धांवा पांच कीं सहा ' हें फालतू काय तरी विचारत गांवभर फिरताय ! आधीं, आपल्याला मुलं किती , पांच कीं सहा, तें तरी मला सांगा बघूं !!
shimagaa.JPG

Pages