विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत बघण्यासाठी पॅकेज घ्यायचा विचार आहे. स्वस्त आणि मस्त काय सांगणार का? थोडा उशीरच झाला आहे, पण चालेल.

स्लिंग वर स्वस्त आहे असे क़ळले. मी hotstar वर बघतोय तेंव्हा quality etc माहित नाही. >>>> धन्यवाद असामी. बघते.

आज इंग्लंड जिंकले असते तर त्यांची आधी फॉर्म मधे असलेली बॅटींग अजून confident झाली असती, म्हणून ते हरल्याचा आनंद मानावा कि पाकिस्तान हरण्याचे दु:ख हे कळत नाहिये नेमके ....

रूटने जरा धांवगती वाढवणं आवशयक होतं , असं वाटतं. तळाला कुणी 'बीग हीटर' नसताना , शेवटी जिंकायला रन-रेट 10 - 13 असणं घातकच होतं.
पाकी जिद्दीने खेळले. भारत, सावधान !

श्रीलंकेची मजबूत सुरुवात!
कुशल परेराचे अर्धशतक
मस्त खेळतायत लंकन्स.... अजुनतरी अफगाण बॉलर्सचा फारसा प्रभाव जाणवलेला नाहीये

चांगल्या सुरुवाती नंतर लंका ढेपाळताना दिसतेय!

अफगाणी खरोखर छान खेळतात थोडा संयम फलंदाजी करताना दाखवायला हवा!

हो तसेच वाटले हायलाइट्स वरून. मस्त flair आहे त्यांच्या गेम मधे. नबी ची बोलिंग आणि बॅटिंग दोन्ही, आणि हशमतुल्ला आणि त्यांच्या ओपनर चे शॉट्स ही जबरी होते.

आज पहिला सामना भारताचा!
सगळ्यांचे एक दोन सामने खेळून झाले आफ्रिकेचा तर तिसरा सामना!

आयपीएल खेळून दमल्याने भारतियांना जास्तच सवड दिली आयसीसी ने वेळापत्रक बनविताना....

*पावसाची कृपा राहूदे!* - तिकडे न पडून व इकडे पडून !! ( खेळात पाऊस पडला कीं 'डकवर्थ- लुईस' नांवाचा बेडूक ज्या विचित्र उड्या मारतो , त्याचाही उबग येतो ) Wink

*पावसाची कृपा राहूदे!* - तिकडे न पडून व इकडे पडून !! ( खेळात पाऊस पडला कीं 'डकवर्थ- लुईस' नांवाचा बेडूक ज्या विचित्र उड्या मारतो , त्याचाही उबग येतो. + १
पण द. आफ्रिकेने भारताला झुंजवावं ; अशीही इच्छा !!.. पण विजय आपलाच व्हावा Happy
आज पहिल्या मॅच साठी आपल्या संघाला शुभेच्छा..

Pages