विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला जर 4 नंबरवर खेळायला दिल असती मँच लवकर संपली असती.>>

मला काल भारतीय फलंदाजी बरीचशी देहबोली आफ्रिकेच्या दमदार गोलंदाजीसमोर फलंदाजीच्या सरावाची वाटली !

क्लासिक ऑस्ट्रेलिया!! शेवटपर्यंत टिच्चून उभं रहाणारी ऑस्ट्रेलिया बर्याच दिवसांनी पुभा पहायला मिळाली. विंडीज बॅटींग टक्कर देणार का? वैय्यक्तिक मतः विंडीज जिंकले तर आवडेल.

मित्रांनो काल स्टेडियम मधे जाउन मॅच प्रत्यक्ष पहायची संधी मिळाली. Happy

चेस सोपा नव्हता. विकेट वर बाउन्स होता. उगाच घाई न करता इनिंग व्यवस्थित पेस करत विजय नक्की केला. बॅटींग फारशी आकर्षक नव्हती पण विजय महत्त्वाचा. एकदम प्रोफेशनल. अजून 50 रन असत्या तरी केल्या असत्या. रबाडा आणि माॅरीसला मात्र फार खेळू दिले हा एकच दोष.
चहल आपला एक्का असेल. बुमरा बेस्ट. TV वर वाटतो तितका किडक्या नाही.
स्टेडियम मधे मात्र फुलटू धमाल आली. ऑलमोस्ट 95 टक्के आपले सपोर्टर. निळा सागरच सर्वत्र . भारत माता की जय चा गजर. गणपती बाप्पा मोरया, जीतेगा भाई जायेगा चा जयघोष . ढोल आताशा टिपरया. धमाले धभाल. शिवाय भारत आर्मी. (ही मंडळी 400-500 च्या संख्येने ब्लाॅक बुकिंग करतात). एकदम होम अडवांटेज.
व्यवस्था उत्तम होती. फूडस्टाॅल, पाणी (बीयर) सहज अक्सेसिबल. पार्किंग व्यवस्था लांब होती. पण तिथून आणि स्टेशन पासून शटल. सगळीकडचे कर्मचारी येणार्या फॅन्सना हसत हसत चियर अप करत होते.

एकंदरीत खूप मजा आली.

पाकिस्तान ईंग्लंड सीरीज मधले दोन्ही टीम्सने सातत्याने ऊभे केलेले साडीतेनशे चे स्कोअर बघता हा वर्ल्डकप नुसता बॅट्समनचाच आणि म्हणून बोअरिंग असेल असे वाटले होते. पण दोन तीन मॅचेस वगळता आत्तापर्यंतच्या मॅचेस बॉलर लोकांनीच ईंट्रेस्टिंग केल्या.
कालची अफ्रिका-भारत मॅच तर अफ्रिकेतल्या टेस्ट सिरिजची आठवण करून देणारी ठरली. अडीचशेच्या पुढे मागे टार्गेट असणार्‍या मॅचेस जास्त अटीतटीच्या होतात आणि त्याच बघायला मजा येते आहे.
हार्ड लक विंडीज.

अरेरे!!! विंडीज ची हाराकिरी पाहून वाईट वाटलं. फिल्डींग मधे दाखवलेली परिपक्वता बॅटींग च्या वेळी कुठे गेली? रसेल उभा राहिला असता तर त्याने आणी होल्डर ने मॅच काढली असती. असो. रविवारी भारतानं हारवावं ऑस्ट्रेलिया ला अशी आशा आहे.

उद्या पाकिस्तान वि. लंका. पाकिस्तान चं पारडं आत्तातरी जड वाटतय.

अरेरे!!! विंडीज ची हाराकिरी पाहून वाईट वाटलं. फिल्डींग मधे दाखवलेली परिपक्वता बॅटींग च्या वेळी कुठे गेली? रसेल उभा राहिला असता तर त्याने आणी होल्डर ने मॅच काढली असती. >> खरय, पण विंडिज कडून हे सातत्याने होते Sad

* रोहितचे कालचे अनेक फटके केवळ डोळ्याचं पारणं फेडणारे होते, हें आपलं माझं वैयक्तिक मत !! >> भाऊ मान्य पण त्याचा अर्थ पांड्याचे शॉट्स क्रिस्प नव्हते किंवा पांडयाचे शॉट्स क्रिस्प होते म्हटल्याने रोहितचे डोळ्याचे पारणे फेडणारे नव्हते वगैरे अर्थ कसा काय होतो हे ह्या रॉबिन हूडला समजावा Happy

*पांडयाचे शॉट्स क्रिस्प होते म्हटल्याने रोहितचे डोळ्याचे पारणे फेडणारे नव्हते वगैरे अर्थ कसा काय होतो हे ह्या रॉबिन हूडला समजावा * -
अहो ' पांड्याचे शॉट्स कसले क्रिस्प होते' यापुढे. 'रोहितचे ही तेव्हढे नाहित.' हे जोडायची काय गरज होती, तें आधी मला समजवाल का ?

विक्रम - सही! तेथेही मग आपली पूर्ण इनिंग एकाच जागी न हलता बसून का? Happy

तो कूल्टर-नाइल इतर टीपिकल ऑस्ट्रेलियन बॅट्समेन पेक्षा एकदम वेगळा वाटतो. त्याची स्टाइल ऑसीज पेक्षा विंडीज च्या लोकांच्या जास्त जवळची आहे.

तो कोट्रेल ने घेतलेला कॅच पाहिलात का? क्रिकइन्फो च्या कॉमेण्टरीतून...
"...sprints along the rope 20 yards moving left at full speed and stabs at it with his left hand, knifing it out of the air, then flicks it up before stepping over the rope before reclaiming it after reestablishing himself inside the field of play. 10 out of 10 for sure!"

*क्रिकइन्फो च्या कॉमेण्टरीतून...* -
छान शाब्दिक चित्रण ! क्रिकेट खेळ कित्येक लेखकानाही भुरळ पाडतो . नेविल कार्डस, आपले के एन प्रभू, कणेकर व
संझगिरी इ.इ. माझे एक जाणकार मित्र म्हणतांत, ' कुणीही, कांहीही व कितीही ज्यावर लिहूं व बोलू शकतो, असा क्रिकेट हा एकमेव खेळ आहे ! Wink

>>कुणीही, कांहीही व कितीही ज्यावर लिहूं व बोलू शकतो, असा क्रिकेट हा एकमेव खेळ आहे ! Wink

आता आपलेच उदाहरण घ्या ना! Wink

>>मित्रांनो काल स्टेडियम मधे जाउन मॅच प्रत्यक्ष पहायची संधी मिळाली. Happy

मस्त वर्णन विक्रमसिंह!
खुप मजा आली असेल ना?..... We can imagine Happy

फारेंडा आता भारतात आल्यावर TV समोरच बसायचे आहे.
मैत्रेयी आणि स्वरूप खरोखरच आपली मॅच स्टेडियम मधे बघणे हा एक अद्वितीय अनुभव होता.
रविवारी लंडन मधे चांगली हवा असणार आहे. पाउस नाही.
काल विंडीजने शाॅर्ट पिच बॉलिंग टाकून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले होते. भुवी ऐवजी शमीला घ्यायला हवे. कुलदीप पण पहिल्या सामन्यात फारसा effective वाटत नव्हता. खुप शाॅर्ट बाॅल टाकले. No proper flight. IPL पासून त्याने आत्मविश्वास गमावला आहे असे वाटते. तो सुद्धा यशस्वी होणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
ओव्हलला 350 च्यावर धावा करायला लागतील.

विक्रमसिंह, भारीच !!
बुमराह टीव्हीवर दिसतो तेवढा किडकिडीत नाही - या टाईपची निरिक्षणं वाचायला मजा येते. आणखी लिहा.

(बाकी, भारतातल्या स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहण्याची हिम्मत माझ्यात नाही...)

फक्त १० देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेला विश्व चषक स्पर्धा का म्हणायचे >>
१६ देशांचा समावेश असलेल्या हॉकी वर्ल्ड कपला म्हणतात तसेच Happy
Because they are best 10

बुमराह टीव्हीवर दिसतो तेवढा किडकिडीत नाही >> मागे बुमराह चा सिक्स पॅक असलेला फोटो पाहिला होता. २ वर्षआंपूर्वी कुठल्या तरी इंजरी नंतर त्याने बॉडी ट्रेनिंग कडे विशेष लक्ष दिले आहे त्याचा परीणाम त्याच्या बॉलिंग मधे ही दिसतो आहे.

भाऊ प्रामआणिकपणे मला रोहोतचे शॉत्स कधीच क्रिस्प वाटलेले नाहीत, ते मोअर ऑर लेस सिल्की करेस केलेले वाटतात. तो भरात नसेल तरीही तो तसेच वाटतात (नि मग तो बाद झाल्यावर फे फे त्याच्या नावाने शंख करतो Wink ) ह्यात फक्त टायमिंगचे वरदान नसून त्याची शॉट
खेळण्याआधीची, खेळताना नि नंतरची बॅटची होणारी मूव्हमेंट तेव्हढीच कारणीभूत आहे. (गॉवर किंवा मार्क वॉ असेच वाटत.) ह्यांनी हाणले तरी बॉलरला हाणलय असे वाटणारच नाही. जसा होल्डींग सायलेंट अ‍ॅसॅसीन होता तशा टाईप मधे. ह्यालट धोनी, वॉरनर, पांड्या वगैरे त्यांनी मारलेले फटके नेहमीच क्रिप्स वाटतात. सगळाच पॉवर प्ले असल्यासारखे. म्हणजे ह्यांनी प्रेमाने बॉलरला फूल दिले तरी ते कानफटात वाजवल्यासारखे वाटणार. रबाडा दुसर्‍या कि तिसर्‍या स्पेलवर आल्यावर रोहित ने दोन तीन शॉट्स तसे मारायचा प्रयत्न केला होता - एक लाँग ऑन ला आडव्या बॅटने मारलेला फोर किंवा त्याचे ऑफ च्या बाहेरून शामसी मारलेले स्वीप कम पॅडल शॉट्स वगैरे पण ते त्याच्या नेचरमधेच नसल्यामूळे क्रिस्प वाटले नाहित. ह्याउलट पांड्याचा पहिला स्केअर ड्राईव्ह कसा चाबकासारखा गेला होता. त्यानंतरचा पुल, 'पुल' शब्दाला जागणारा होता. त्या अर्थाने मी ते म्हटले होते.

मी मॅच लावली नि नेमका स्मिथचा कोट्रेल ने कॅच घेतला. तो लाईव्ह पाहिला तेंव्हा विश्वासच बसला नाही इतक्या सहजपणे तो आत आला होता. absolutely nonchalantly . कॉमेंट्री करणार्‍याला पण कळायला थोडा वेळ लागला काय झाले ते सांगताना.

"आता आपलेच उदाहरण घ्या ना!" - Happy मस्त रे स्वरूप. बाकी धाग्यांवर वाचनमात्रे असणारे माझ्यासकट बरेचजण इथे मस्त लिहीतात, चर्चा करतात. कितीही आणी कशीही चर्चा झाली तरी भांडणं, वैय्यक्तिक उणी-दुणी निघत नाहीत, कुणी (बहुदा) दुखावले वगैरे जात नाहीत. कुणी येऊन पिंका टाकून गेलं तरी ते सगळं दुर्लक्षित करून प्रवाहात वाहून जातं. ही क्रिकेट ची जादू आहे.

विक्रमसिंह, तुमचा अनुभव जबरी वाटला. एकदा तरी इंग्लंड, न्युझिलंड आणी वेस्ट इंडीज मधे स्टेडियम मधे जाऊन मॅच बघायची आहे.

"मग तो बाद झाल्यावर फे फे त्याच्या नावाने शंख करतो" - Happy

फॉर द रेकॉर्ड्स, माझा आक्षेप त्याच्या टेस्ट मधल्या टेंपरामेंट ला आहे. वनडे मधे तो इंपॅक्ट खेळाडू आहे. खरं तर तो एक चांगला कॅप्टन (वनडे मधे) होऊ शकतो असंही मला वाटतं.

एकदा तरी असामी माझ्या आयडी चं लघुरूप 'फे फ' करेल आणी माझी फे फे उडवणार नाही ह्याची वाट बघणारा बाहूला. Wink

फे फे मे वो मजा है जो फे फ मे नही भई. उगाच तू चौकड्यांचा शर्ट नि चष्मा लावून टाईप करतोस असे वाटत राहते रे Happy

आजची मॅच वाहून गेली. हा वर्ल्ड कप ९१ च्या मार्गाने जातोय की काय पाकिस्तानसाठी Sad

Pages