विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्ल्डकपमधे सगळ्या टीम्स (ईंग्लंड आणि पाकिस्तान सोडून) होम-अवे जर्सीज वापरणार आहेत. ईंग्लंड आणि पाक फक्त होम जर्सीजच वापरतील.
बहुतेक संघांच्या अवे जर्सीज या जास्त व्हायब्रंट रंगांच्या आहेत. भारतानी अजून आपला अवे पोशाख जाहीर केलेला नाही (जो केशरी+निळा असल्याच्या शक्यता बोलल्या जात आहेत)
पण या वरच्या फोटोत तरी बाकी संघांच्या तुलनेत आपला होम पोशाख फारच एकसुरी वाटतोय. फारसा शेड डिफरन्स नसलेले दोन निळे रंग, बगलेतल्या केशरी रेघा आणि थ्रीडी भासणारी इंडिया लेटर्स हे फारच मिनिमल दिसतंय.

तुम्हाला काय वाटतंय??

*भाऊ, एक छान चित्र येऊ द्या* आग्रह म्हणून. चित्र जुनीच, कॅपशन नवीन -

आज टिव्हीसाठी एका हारात दोन सोहळे;
3 वाजतां लंडनचा, 7 वाजतां दिल्लीचा !!Semi-same.jpeg

दे बजरंग बळी, तोड दुश्मनकी फळी !!tricolor.JPG

या स्पर्धेच पहिलं षटक लेग- स्पीन, तेही एक महत्वाचा बळी घेवून यशस्वी ! फलंदाजी व गोलंदाजीचया क्रमांकाबाबत फार अढळ न राहता 'लवचिकता ठेवणं हितावह !!

फलंदाजी व गोलंदाजीचया क्रमांकाबाबत फार अढळ न राहता 'लवचिकता ठेवणं हितावह !! >> हो बटलर तिसर्‍या क्रमांकावर रूट ऐवजी खेळा पाहिजे त्याचा सध्याचा फॉर्म बघून.

छ्या! शेवटी अगदीच एकतर्फी झाली मॅच. द. अफ्रिकेनं काही आव्हान उभं करायच्या आतच गळपटले. उद्या पाकिस्तान वि. विंडीज चुरशीची व्हावी ही अपेक्षा आहे.

अहो, फक्त क्रमांक 4 चा प्रश्नच कठीण होता ना ? तो सुटला म्हणता तरी डोकं धरून कां बसलाय !20190118_205549.jpg

विंडीज ने पाकिस्तानची वाट लावली आहे!
विंडीज ची टीम अजिबात चर्चेत नाही, पण धक्कादायक निकाल देत फायनलला पोचेल असं उगीचच आतापासूनच वाटतंय ...

अफगाण आणि आॅस्ट्रेलिया मॅच चांगली चालू आहे. आतापर्यंत अफगाण छान बॅटिंग करत होते. झॅम्पाच्या एका ओवर मधे २०+ मिळाले होते . उगीच घाई करत गुलबदीन आणि नजीब ने लागोपाठ विकेट फेकली. आता २०० पार करणं पण अवघड दिसतंय.

क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला??.. हो 30 मे रोजी.!
मागे कुणीतरी म्हटलं तसं वर्ल्ड कप चा फिवर जाणवत नाही खरं.!
आपली पहिली मॅच आहे.. साऊथ आफ्रिका सोबत.. 5 जून पासून जाणवेल... Happy

१० संघांपैकी ५ आशियाई संघ पैकी तिघांचे प्रदर्शन म्हणावे असे झाले नाही... अजून २ संघ काय दिवे लावतायेत सुरुवातीच्या सामन्यात दिसेल....

विश्वचषकात सघांचया कामगिरीचा आलेख विचित्र वळण घेत असतो, हा अनुभव आहे व त्याच भान ठैवण महतवाचं!

फक्त तीन सिक्सेस, एकही शतक नाही आणि तरीही बांगला देश च्या ३३० धावा! ३३ बॉल्स मधे ४६ मारणार्‍या मोहम्मदुल्लानेही त्यातील फक्त १८ रन्स हे ४, ६ मधे काढलेत. म्हणजे त्याच्याही २८ रन्स पळून काढलेल्या आहेत.

हे रिमार्केबल आहे.

द.आफ्रिकेला धक्का दिलाच बांग्लादेशने !
>>>

खरंच! काल मॅच अजिबात फॉलो करायला जमलं नव्हतं. रात्री झोपण्यापूर्वी म्हटलं, नेटवर स्कोअर तरी बघावा. तर ४ ओव्हर्स शिल्लक होत्या आणि द.अफ्रिका धडपडत होते.
आणि बांग्लादेशच्या ३३०!!
तडक उठून टीव्ही लावला आणि शेवटच्या ४ ओव्हर्स बघितल्या.

द.अफ्रिका दोन्ही मॅचेस हरलेत. आता ५ जूनला आहे मजा...

अफगाणिस्तानची मॅच पण मला पहायला जमली नाही Sad

कालचा सामना छान झाला!
बांग्ला व्यवस्थित खेळले विशेषतः फलंदाजी करताना.. उगाच बळी गमावले नाही!.. अफगाण ने केलेली चूक केली नाही!

बांग्लाची बॉलिंग पण सुधारल्या सारखी जाणवत आहे असं वाटे पर्यंत कॉमेंटेटर ने त्यांच्या बॉलिंग कोच चे नाव सांगितलं..
कोर्टनी वॉल्श !!! Happy

*द.आफ्रिकेला धक्का दिलाच बांग्लादेशने ! * - कांहीसं अनपेक्षित असेलही पण धक्कादायक नक्कीच नाही. 150 - 200 ओडीआय खेळलेले 4-5 अनुभवी व गुणी खेळाडू आहेत बिंगलादेशचया संघात .

150 - 200 ओडीआय खेळलेले 4-5 अनुभवी व गुणी खेळाडू आहेत बिंगलादेशचया संघात .>>

भाऊ, सहमत हाच फरक अफगाणिस्तान आणि बांग्लादेशच्या अनुक्रमे पराभव व विजयास कारणीभूत ठरला!

३४८ केले पाक ने. इंग्लंड साठी अवघड नाही.
पाक ची सगळी मदार आता मोहम्मद आमीर आणि जावईबापूंवर....

Pages